Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जॉन केसिक अजूनही टिकून आहे
जॉन केसिक अजूनही टिकून आहे का? असेल तर धन्य आहे त्याच्या आशावादाची! अमेरिकन म्हणतात तसे, तो जे सेवन करतोय ते मलाही सेवन करायला आवडेल!
क्रूझने कार्लीबाईंना जोडीदारीण बनवली तेव्हाच त्याने अध्यक्षपदाच्या युद्धात हरण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले होते! मायडस टच अर्थात परीसस्पर्श जो प्रकार असतो त्याच्या विरुद्ध जे काही असते त्याला कार्ली टच म्हणायला हरकत नाही.
इंडियानात निवडणूक हरूनही हिलरीने सुपर डेलिगेट्सचा रडीचा डाव खेळून भरपूर मिळकत केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षात डेमोक्रसी नावालाच आहे. सुपर डेलिगेटस चा रडीचा डाव कधीतरी रद्द होईल अशी आशा आहे.
सुपरडेलिगेटस ही पक्षाच्या
सुपरडेलिगेटस ही पक्षाच्या घटनेमधली तरतूद आहे. त्यात हिलरीनी रडीचा डाव खेळण्याचा प्रश्न कुठे येतो?
>>> विरोधकांना आपले विचारही
>>> विरोधकांना आपले विचारही मांडू न देणे हे फासिस्ट मनोवृत्तीचे नाही का?
--- सहमत आहे. अशा स्वरूपाच्या विरोधाचा निषेध करावा तितका थोडाच!
>>> इंडियानात निवडणूक हरूनही हिलरीने सुपर डेलिगेट्सचा रडीचा डाव खेळून भरपूर मिळकत केली आहे.
--- सुपर डेलिगेट्स वगळले तरीही हिलरी आघाडीवर आहे १६८२ वि. १३६१. शिवाय, हे डेलिगेट्स मतांच्या प्रमाणात विभागले जातात. रिपब्लिकन पक्षाप्रमाणे विनर-टेक्स-ऑल सिस्टिम असती, तर हिलरी आत्तापर्यंत नॉमिनी झाली असती. (टेक्सस, जॉर्जिया, पेन्सिल्व्हानिया, ओहायो, फ्लोरिडा, टेनेसी, अॅरिझोना, नॉर्थ कॅरोलायना) अशी डेलिगेट-रिच, लोकसंख्या अधिक असणारी राज्यं जिंकल्यामुळे.
हिलरीने सुपर डेलिगेट्सचा
हिलरीने सुपर डेलिगेट्सचा रडीचा डाव खेळून भरपूर मिळकत केली आहे.
खेळाच्या नियमात जे जे बसते त्याला रडीचा डाव कसे म्हणता येईल?
सुपर डेलिगेट्स मधे सुद्धा निवडून आलेल्या लोकांचा (काँग्रेस, सिनेटचे मेंबर, गव्हर्नर्स ) मोठा भाग आहे. शिवाय त्यात पार्टीचे प्रमुख पुढारी, जे विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मते मिळवून देऊ शकतील असे लोक असतात. म्हणजे त्यांना ते जमण्याची जास्त शक्यता असते, तरी नेहेमी डेमोक्रॅट च प्रेसिडेंट होईल असे नाही, पण त्याने काही धोका झाल्याचा अनुभव नसावा पक्षाला म्हणून तसा नियम ठेवला आहे.
नाव डेमॉक्रॅटिक असले तरी पार्टी ही खाजगी संस्था आहे त्यांनी नियम बदलावे अशी इच्छा असणे यात काहीच चूक नाही, पण त्यासाठी आधी भरपूर देणगी देऊन, निवडणुका लढवून आपला पुढारीपणा सिद्ध करावा लागतो. तोपर्यंत फार तर फार पक्षाचे सभासद होऊन एक चळवळ उभी करून पद्धत बदलता येईल.
पण तसे जोपर्यंत होत नाही त्याला रडीचा डाव म्हणता येणार नाही.
क्रिकेट मधे रनरने क्रीज ओलांडली तर गोलंदाज चेंडू टाकण्या आधीच विकेट उडवून त्याला आउट करू शकतो, त्यालाहि रडीचा डाव म्हणता येईल, पण नियमात बसत असल्यावर त्यात काही चूक नाही.
असे आपले माझे मत आहे. ते मांडू दिल्याबद्दल धन्यवाद.
बरं आता इथून पुढे रिपब्लिकन
बरं आता इथून पुढे रिपब्लिकन पार्टी चे कोणी जबाबदार लोक ट्रम्प ला डावलून दुसराच उमेदवार आणू शकतात का? पार्टीच्या किंवा अमेरिकन निवडणुकीच्या नियमात तशी काही सोय आहे का? असे ऐकले होते की डेलिगेट्स किंवा पार्टीचे कोणी ऑफिशियल्स तसे करू शकतात.
मायकेल ब्लूमबर्गची ही चर्चा मधे सुरू होती.
दोन उमेदवार असतो करता येते
दोन उमेदवार असतो करता येते बहुधा. पण त्यापेक्षा third party conservative candidate हा जास्त उपयोगी पर्याय आहे असे वाचले.
तळटीप : हे दोन्ही नियमसंमत पर्याय आहेत.
नियम हे आधीच ठरवलेत म्हणून
नियम हे आधीच ठरवलेत म्हणून त्यांना शिरोधार्य मानायचे हे काही पटत नाही. जाचक, वाईट नियम बदलायलाच पाहिजेत. डेमोक्रॅटिक पक्ष ही खाजगी संस्था असल्याचा युक्तीवाद हास्यास्पद आहे. त्या पक्षाचा प्रत्येक पुढारी आपण तळागाळातील लोकांचे कसे भले करणार हे उच्चरवात सांगतो. म्हणजे हा पक्ष सामान्य लोकांकरता असल्याचा आव आणतो, लोकांचे प्रतिनिधित्व करायचा आव आणतो आणि दुसरीकडे मूठभर ढुढ्ढाचार्य लोकांच्या इच्छेकडे काणाडोळा करून त्यांना जे योग्य वाटते तेच करणार. हे लोकशाही परंपरेशी सुसंगत आहे का? इथे लोकांच्या इच्छेला मान दिला जातो आहे का? कुठल्याशा कालबाह्य नियमांकडे बोट दाखवून जनमताच्या गळा घोटण्याचे समर्थन करणे मला साफ अमान्य आहे. अशा सुपर डेलिगेटसच्या अतिरेकी वापराने त्या पक्षाचेच नुकसान होणार आहे. बर्नी जर उमेदवार नसेल तर आम्ही सरळ ट्रंपला मत देऊ असे म्हणणारे अनेक डेमोक्रॅट्स आहेत. तरुण वर्गाला बर्नी आवडतो. तो उमेदवार नसेल तर हे लोक हिलरीला मत देतील असे वाटत नाही.
रिपब्लिकन पक्षातही असेच होत होते. कोलरॅडो व अन्य काही राज्यात क्रुझने कुठल्याशा नियमाच्या आधारे निवडणुक न घेताच डेलिगेट मिळवले. तेही चूकच होते.
shendenaxatra, एकूण दोन्ही
shendenaxatra,
एकूण दोन्ही पक्षाचे नियम तुम्हाला मान्य नाहीत. पक्षाचे नियम काही असोत, शेवटी नोव्हेंबर २०१६ च्या निवडणुकीत कोणता पक्ष जिंकतो हे महत्वाचे. त्यातहि निव्वळ जनतेच्या बहुमताबरोबर Electoral College.चे बहुमत लागतेच!!
म्हणजे सगळाच भोंगळ, चुकीचा कारभार.
तुमच्यासारखे अनेक लोक आहेत, म्हणून तर इथे मतदान करणार्यांची टक्केवारी इतर देशांपेक्षा फार कमी असते. कारण कुणि निवडून यावे यापेक्षा कुणि निवडून न यावे यासाठी लोक त्याच्या/तिच्या प्रतिस्पर्ध्याला मत देतात, जसे बर्नीचे लोक. तसेच ट्रंप ला मत देण्यापेक्षा हिलरीला देईन असे म्हणणारे रिपब्लिकनहि आहेत.
लै धम्माल असते राव हितं!! अपुन टेंशन नहि लेनेका, क्या!
आमच्या एका मित्राच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या पोळीवर तूप असे ओढून घेता येईल ते बघावे.
बहुतेक जॉन केसिक पण बाहेर
बहुतेक जॉन केसिक पण बाहेर पडतोय. http://www.usatoday.com/story/news/politics/elections/2016/05/04/john-ka...
हो केसिक पण गळाला.... कस्काय
हो केसिक पण गळाला....
कस्काय होणार आपल्या सगळ्यांचं...काळजी वाटून राहिली आहे.
हे इलेक्षन भयाण आहे.
शूम्पी, दिल उदास क्यों करती?
शूम्पी, दिल उदास क्यों करती? हिलरी बाई निवडून येऊ शकतात.
एकीकडे डोनाल्ड डक, दुसरीकडे
एकीकडे डोनाल्ड डक, दुसरीकडे हिलॅरियस क्लिंटन. ईक तरफ उसका घर, ईक तरफ मयकदा!
पूर्वी म्हणजे ८ वर्षापूर्वी,
पूर्वी म्हणजे ८ वर्षापूर्वी, हिलरीबाई जितक्या पसंत होत्या तितक्या आता त्या मला आव्डत नाहीत.
हिलरीपेक्षा मला ट्रंप आवडतो.
हिलरीपेक्षा मला ट्रंप आवडतो. निदान जगभर इथेतिथे नाक खुपसायची सवय जाईल अमेरिकेची.
शिवाय इस्राएल ला बिनशर्त पाठिंबा देणार नाही.
हिलरीचे मार्गदर्शक किसिंजर आहेत म्हणे. अंजामे गुलिस्तं क्या होगा.
निदान जगभर इथेतिथे नाक
निदान जगभर इथेतिथे नाक खुपसायची सवय जाईल अमेरिकेची. >> गेली आठ वर्षे कुठे होता विकु ? ओबामाने तेच करायचा प्रयत्न केला तर काय झाले ? रिपब्लिकन वॉर क्राय ऐकली नाहित का ?
असाम्याशी सहमत. ओबामाने तेच
असाम्याशी सहमत. ओबामाने तेच केले की. आणि पब्लिक सपोर्टही होता त्याला. हे रिप. वाले काय ओरडत आहेत कोणास ठाउक. ट्रम्प लूज कॅनन वाटतो. एक दिवस मधे पडणार नाही म्हणेल, दुसर्या दिवशी डायरेक्ट बूट्स ऑन ग्राउण्ड.
२०१४ च्या ड्रीमफोर्स
२०१४ च्या ड्रीमफोर्स कॉन्फरन्स ला हिलरी सॅनफ्रान्सिको ला आली होती. ऑल्मोस्ट एक लाख लोक होते त्या कॉन्फरन्स ला, कदाचित जास्तच. तेथे मोठ्या स्टेज वर बोलताना टोटली प्रेसिडेन्शियल वाटली होती. मात्र आता ट्रम्प व बर्नी यांच्या जे खरे खोटे बोलायचे आहे ते थेट बोलण्याच्या स्टाईल मुळे हिलरी चे हास्य सुद्धा फोनी वाटते.
>>ओबामाने तेच करायचा प्रयत्न
>>ओबामाने तेच करायचा प्रयत्न केला तर काय झाले ?<<
हो बरोबर आहे, आणि जिथे खमकेपणा दाखवायचा तिथेहि हाय खाल्ली...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि नो बुट्स आॅन ग्राउंड हे ओबामा रोज सकाळी उठल्यावर म्हणायचा, शेवटी ट्रुप्स पाठवलेच...
नेमकी कोठे, राज? पब्लिक
नेमकी कोठे, राज? पब्लिक सुद्धा 'वॉर फटिग' मधेच आहे की. म्हणजे त्याने लोकांचे मत आहे त्यापेक्षा वेगळे केले नाही. डेम्स हे जास्तच पॅसिफिस्ट वाटतात अनेकदा हे खरे आहे. पण सध्या जनमत ही त्याच्यापेक्षा फार वेगळे नाही.
अरे, तुम्ही लोकं पेपर/बातम्या
अरे, तुम्ही लोकं पेपर/बातम्या वाचता/ऐकता कि नाहि...
तो सीरियात लोक पाठवायचा फंडा
तो सीरियात लोक पाठवायचा फंडा मलाही समजलेला नाही. वाचतो.
हिलरीपेक्षा मला ट्रंप आवडतो.
हिलरीपेक्षा मला ट्रंप आवडतो. म्हणजे फक्त दिसायलाच ना? मग ठीक आहे.
पण तो निवडून आला तर काय होईल याची झलक:
आजच बातमी वाचली - उर्थ कॅफे, लगुना बीच, कॅलिफोर्निया, येथे ७ मुसलमान स्त्रियांना हाकलून दिले.
http://www.latimes.com/local/orangecounty/la-me-0504-hijab-20160504-stor...
तसेच हेहि वाचा:
http://www.salon.com/2016/05/03/donald_trump_backer_allegedly_attacked_m...
२००१ मधे न्यू यॉर्क मधे वर्ल्ड ट्रेड सेन्टर वर मुसलमानांनी विमाने आपटून हजारो लोकांना मारले म्हणून कित्येक शीख लोकांना मारले कारण ते पण मुसलमानच आहेत असे वाटले म्हणून.
पूर्वी चरणसिंग नाव असलेला पण शीख नसलेला (म्हणजे फेटा, दाढी मिशा नसलेला) माणूस भारताचा पंतप्रधान झाला तेंव्हा टेक्सास च्या वर्तमानपत्रात स्वर्णसिंग (जो फेटा, दाढीमिशावाला शीख होता) याचाच फोटो छापला होता.
खरी खोटी कारणे दाखवून इथले पोलीस, निरपराध अफ्रिकन अमेरि़कन लोकांनाही ठार मारतात!!
हे सर्व लिहिण्याचे तात्पर्यः इथल्या लोकांची अक्कल बरीच मर्यादित आहे, पूर्वग्रह अतिशय तीव्र आहेत. तुम्ही हिंदू असला तरी तुम्हालाहि मुसलमान समजून इथले लोक त्रास देऊ शकतील. नि तुम्ही फिर्याद केलीत तर ट्रंप तुमच्या विरुद्ध बाजूला असलेल्या व्यक्तीच्या वकीलाचा खर्च देईल.
लॅटिनो लोकांनाहि भीती आहे, पण निदान संडास साफ करायला नि स्वस्तात हमाली करायला बरे पडतात म्हणून जरा कमी. एकदम सगळ्यांना हाकलणार नाहीत.
भारतीय काय, ते काय करतात ते इथल्या लोकांना सांगूनहि समजणार नाही, त्यांची कशाला काळजी करतील इथले लोक? धरून बदडतील त्यांना! दुकानात, रेस्टॉरंट मधे येऊ देणार नाहीत!!
बाप रे! किती भडक लिहीलंय
बाप रे! किती भडक लिहीलंय नंद्या४३ ह्यांनीं. म्हणजे शीख, मुसलमान लोकांवर जाणते/अजाणतेपणी अत्याचार झालेत हे मी समजून आहे पण तुम्ही अगदीच भडक चित्र निर्माण केलं आहे!
नंद्या४३ अहो तुम्ही पण रिप
नंद्या४३
अहो तुम्ही पण रिप सारखं फिअर मोंगरिंग करून र्हायला की.
डबल
डबल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जर पुढल्या वर्षी
जर पुढल्या वर्षी कॅलिफोर्नियात भूकंप आला, दुष्काळ पडला वा पूर्व किनार्यावर मोठे चक्रीवादळ आदळले तर त्यालाही ट्रंप जबाबदार असेल ह्याची मला खात्री आहे! आयसिस ह्या प्रेमळ आणि सहिष्णू संघटनेने काहीसे वावगे वाटणारे प्रकार केले तर त्याला ट्रंपची भडक भाषणे उत्तरदायी आहेत ह्याची आपण खूणगाठ बांधा! जर उत्तर कोरियाने पुन्हा काही विध्वंसक क्षेपणास्त्रे डागली तर काय? बरोबर ओळखलत! तेही ट्रंपमुळेच. तात्पर्य काय? आजवर जे काही वर्णद्वेष्टेपणा वा अन्य वाईटपणा अमेरिकेत आढळतो आहे मग तो आज असो काल असो वा १००-२०० वर्षे घडलेला असो. त्यामागे एकमेव दोषी व्यक्ती म्हणजे ट्रंप. ट्रंप, ट्रंप आणि ट्रंप!
ट्रंप राष्ट्राध्यक्ष बनलाच तर त्याचा शपथविधी संपता संपता तिथेच तमाम अमेरिकेतील तमाम अल्पसंख्यांकाना ठार मारण्याचा हुकूम सोडणार ह्याची तर १००% खात्री बाळगा! आणि तेही ठार मारणे साधे नाही तर आयसिस आणि हिटलर दयाळू वाटतील अशा क्रूरतम पध्दतिने!
किती पुरोगामी आणि उदार विचार आहेत हे! आपल्या आवडीचा नेता निवडून येत नसेल तर जो निवडून येतो त्याला जगातील सर्वात वाईट्ट्ट खलनायक असा रंगवायचे आणि येन केन प्रकारेण बडवून काढायचे! सगळे कसे लोकशाही परंपरेला धरून! वा!
मुद्देसूद वाद घालण्यापेक्षा हे कितीतरी सोपे नाही का?
बिल मार, जान आलिवरच्या शोची
बिल मार, जान आलिवरच्या शोची नांदि मायबोलीवर सुरु झाली कि काय?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जर पुढल्या वर्षी
जर पुढल्या वर्षी कॅलिफोर्नियात................. ह्याची मला खात्री आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नि जर मागल्या वर्षी झाला असता तर तो ओबामा मुळेच असे फॉक्स न्यूज ने सांगितले असते, नि ट्रंप ने त्याला दुजोरा दिला असता. आणि बर्याच लोकांनी ते खरे मानले असते.
अन्य वाईटपणा अमेरिकेत ......... ट्रंप. ट्रंप, ट्रंप आणि ट्रंप!
इथे ट्रंप या व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नाही. त्याचे विचार कुणाला पुरोगामी नि उदात्त वाटत असतील, कुणाला नाही. इकडे माझ्या मित्रांपैकी बर्याच जणांना नाही.
व्यक्तिपूजक लोक हे विसरतात की व्यक्ति पेक्षा राष्ट्राध्यक्ष पदी असलेल्या व्यक्तीची विचारसरणी, भाषा महत्वाचे. कारण परिस्थितीमुळे कमी शिकलेले, सत्यासत्य जाणून घेण्याला वेळ नसलेले अश्या सामान्य लोकांवर त्यांचे काय परिणाम होतात, ते काय करतात हे महत्वाचे. शिवाय केवळ पक्षाचे इमान राखून काँग्रेस नि सिनेटमधे रहाणार्या लोकांवरहि त्याचा परिणाम होतो.
म्हणजे ट्रंप असो वा हिलरी, वा लिंडन जॉन्सन, बिल क्लिंटन, रेगन, ओबामा, यांच्या विचारसरणीने देशातली परिस्थिती घडते. बुश (कार्ल रोव्ह), छेनी, रम्स्फेल्ड यांच्या विचारसरणीने वागल्यावर देशाचे काय झाले हे सर्वांना ज्ञात असेलच.
उगाच हजारो मुसलमानांना कोंडून ठेवणे, त्यांचा छळ करावा, इराकचे वाट्टोळे, अफगाणीस्तानमधे गोंधळ घालणे याने अमेरिका सुखरूप रहाते असे नाही, त्या मुसलमानां पैकी कित्येक जण संपूर्णपणे निर्दोष होते हेहि उघड झाले आहे. अशी अमेरिकनांची संस्कृति नाही, पूर्वी असल्यास ती बदलायला पाहिजे असे बर्याच जणांचे मत आहे.
आयसिस जसे वागतात तसेच आपण वागलो तर एका दिवसात सर्व पृथ्वी बेचिराख करू शकतो. नि होईलहि. आपले सामर्थ्यच तसे आहे, पण तसे करायचे नाही असे कित्येकांचे मत आहे. धंदा करणे नि राष्ट्र चालवणे यात फरक आहे, स्वतःच्या कंपनीचे दिवाळे काढणे ठीक असले तरी उद्या देशाचे दिवाळे निघाले तर काय होईल? ग्रीस सारखे जगायचे की अमेरिकन परंपरेने? ती परंपरा कुणामुळे अबाधित राहील?
ट्रंप सारख्या अननुभवी, भडक बोलणार्या माणसाच्या हाती सत्ता जाणे जास्त धोकादायक आहे.
(आणि हिलरी आली निवडून तर काही कमी धोकादायक होईल याची खात्री नाहीच), केवळ आपले मत, ते सिद्ध करायला वाद घालायची गरज नाही, वाद घालणे जमले असते तर मीच निवडणुकीला उभा राहिलो असतो.
बाप रे! किती भडक लिहीलंय
बाप रे! किती भडक लिहीलंय नंद्या४३ ह्यांनीं.
अहो भडक काय? बातमी आहे ती, एव्हढेच. भडक वाटत असेल, पण एव्हढ्या मोठ्या देशात असले प्रकार घडणारच, (असे कुठल्या तरी देशातल्या एका नेत्याने दहशतवादी भयंकर हल्ला झाल्यावर व बर्याच लोकांनी अनेक महिलांवर बलात्कार होत असताना म्हंटले होते असे आठवते).
सानबर्नाडिनो, कनेक्टिकट मधील प्राथमिक शाळेत झालेले, बॉस्टन च्या मॅरॅथॉन मधे झालेले हल्ले पण असेच भयंकर होते, पण हे आपल्या जवळ येत चालले आहे म्हणून भीति.
अहो तुम्ही पण रिप सारखं फिअर मोंगरिंग करून र्हायला की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बुश अश्या रीतीनेच पुनः निवडून आला. म्हणजे ही पद्धत उपयुक्त आहे.
घी देखा, बडगा नही देखा, माहित आहे ना? बर्नीला मत देणार्यांनीहि समजून असावे.
त्यामुळे हिलरी चांगली ठरते असे नाही, पण संत तुकारामाने म्हणून ठेवलेच आहे ना - तुका म्हणे त्यातल्या त्यात!
तुम्ही बुश (ज्यु) चे फॅन आहात
तुम्ही बुश (ज्यु) चे फॅन आहात का? नावात ४३ घेतले आहे म्हणून विचारतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्रम्प वाईट हे उघड आहे. बर्नी च्या बाबतीत घी/बड्गा लॉजिक, आणि हिलरी ही चांगली नाही. अमेरिकन लोकांनी काय करायचे मग? :). तो राल्फ नेडर आहे का यावेळेस?
Pages