Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याला गिल्टी फिलींग येत. >>>>>
याला गिल्टी फिलींग येत. >>>>> च्यायला हे काय? आधी तर म्हणत होता she is not my types. मग आता गिल्टी कशाला वाटायच?
त्या वाश्याचं सगळंच गंडलेलं
त्या वाश्याचं सगळंच गंडलेलं आहे.
त्या वाश्याचं सगळंच गंडलेलं
त्या वाश्याचं सगळंच गंडलेलं आहे. >>>+१२३४५६७८९१०
हायला आता हा कसलं काम करतो
हायला आता हा कसलं काम करतो लॅपटॉपवर??
ट्रान्सलेशनचं.
ट्रान्सलेशनचं.
अरे हो तो एम.ए. इन संस्कृत
अरे हो तो एम.ए. इन संस्कृत आहे ना. विसरलोच होतो.
धन्यवाद.
काल इथे वाचून परवाचा भाग
काल इथे वाचून परवाचा भाग बघितला. उर्मी त्या आक्कबाईंना फार काही बोलली नाही
बहुतेक मी फारच मोठ्या अपेक्षेने बघायला गेले म्हणून माझा पोपट झाला
काल इथे वाचून परवाचा भाग
काल इथे वाचून परवाचा भाग बघितला. उर्मी त्या आक्कबाईंना फार काही बोलली नाही
बहुतेक मी फारच मोठ्या अपेक्षेने बघायला गेले म्हणून माझा पोपट झाला >> अगं, एवढ्या पण अपेक्षा ठेऊ नयेत. ती बोलली ते पण झीच्या नायिकेच्या मानाने फारच होतं. मुळात मुळूमुळू रडली नाही. अगदी घुश्शात आली हेही फार वाटलं मला.
ती आक्काचं काम केलेली नटी कोण
ती आक्काचं काम केलेली नटी कोण आहे? कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते.
उज्वला जोग आहे अक्का म्हणजे,
उज्वला जोग आहे अक्का म्हणजे, तरी उर्मि बरीचं बोलली, कारेदु मधे तर माठ जय-आदिती एक शब्द नाही बोलायचे.
उज्वला जोग मोठी बहिण दाखवली
उज्वला जोग मोठी बहिण दाखवली आहे तिची दुसरी आत्या दाखवली आहे ती कोण आहे? तिला पण बघितलय कुठेतरी..
हो, उज्वला जोग काम मस्त
हो, उज्वला जोग काम मस्त करतात. खूप सहज अभिनय असतो त्यांचा. उर्मी बरीच कॉन्फिडंट वाटली, नाहीतर अदुबाई फारच भेन्डी ( मुळुमुळु) होत्या.
ती दुसरी आत्या कोण नटी आहे? हो, तिला पण पाहीलय कशात तरी.
उर्मी त्या आक्कबाईंना फार
उर्मी त्या आक्कबाईंना फार काही बोलली नाही >>>> आणि तेही विन्ग्रजीत !
कालच्या भागात त्या चार चार बायका कीचनमध्ये जेवण बनवत होत्या . ( नंदीनी , माई , अदिती आणि ती मोठी सून , नाव विसरले ) .त्यात कमी म्हणून पाचवी आली . ( उर्मी) .
नंतर आतल्या रूममध्ये तीन बायका रडून-ओरडून गोंधळ घालत होत्या . ( नंदीनी , आक्का आणि ती आत्या )
मग ती बायका कीचन्मध्ये बसून सूप पित होत्या (उर्मी , अदिती आणि ती मोठी सून )
मग त्याना दोन बायका शामिल झाल्या . ( सूप पिण्यासाठी नाही - संभाषणात - माई आणि नंदिनी )
मग काही वेळाने परत तीन बायका रडून-ओरडून गोंधळ घालत होत्या . ( नंदीनी , आक्का आणि ती आत्या ) .
दरम्यान , दोन बायका ( आणि एक बाप्या ) वेगळ्याच डायनिंग टेबल वर बसून सूप पित होत्या ( कित्त्ती योगायोग . आजी आणि सीमा )
थोडक्यात काय -
मूगाच्या डाळीची खिचडी आणि सूप पचायला हलके असते .
माई घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसाना एक्त्र बांधून ठेवतायेत .
जर भाज्या बनवताना जास्त मसाले टाकले तर भाज्याची मूळ चव नष्ट होउन ती मसाल्याची भाजी बनते . ( हे पटले)
व्हेजिटेबल सूप मध्ये असंख्य भाज्या घालून , प्रत्येक भाजीची वेगवेगळी चव राखणे हे महत्वाचे .
उर्मीच्या हातच्या सूपाची चव कोणाला नाही.
पंतसचिवांचे घराणे संस्कारी आणि परंपराना जपणारे असल्यामुळे त्यांच्याकडे परदेशी सूप बनवले जात नसे .
मठाधिपतीना नंदीनीच्या हातची खिचडी आवडते आणि आता उर्मीच्या हातचे सूप आवडायला लागले .
इथली हिरवीण बरी आहे तर हिरो
इथली हिरवीण बरी आहे तर हिरो नाही, मी बघत नाही. पहिले दोन दिवस बघितली तर ती चांगली पण थोडी आगाऊ वाटली आणि हिरो माठ वाटला.
तिथे हिरो डोळ्यात बदामवाला (काहे दिया परदेस), उत्तम अभिनय तर हिरवीण माठ.
स्वस्ति ती नंदिनी ( सिरीयल
स्वस्ति ती नंदिनी ( सिरीयल मधली) फारच फताडी आहे.
ती आक्काचं काम केलेली नटी कोण
ती आक्काचं काम केलेली नटी कोण आहे? कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते.>> ई टीव्हीवर गोजिरवाण्या घरात लागायची त्यामध्ये होती ती.
स्वस्ति.
उर्मी मला आवडते. शिवला पण शोभली असती पण उंचीमध्ये मार खाते. शिवच्या कमरेपेक्षा थोडीचं उंच असेल.
ती दुसरी आत्या कोण नटी आहे?
ती दुसरी आत्या कोण नटी आहे? हो, तिला पण पाहीलय कशात तरी.: ती दूसरी आत्या प्रिया बापटची मोठी चुलत बहीण दाखवली होती, शुभम् करोति मालिकेमधे.
उर्मी मला आवडते >>> मलापण
उर्मी मला आवडते >>> मलापण आवडते. तिची फॅमिलीपण आवडते. आता काहीवेळा अती करतात पण जनरली आवडते.
ही सिरीअल "जुयेरेगा" च्या
ही सिरीअल "जुयेरेगा" च्या वळणावर जाते की काय असं काल सूप चा एपिसोड बघुन वाटलं..
किती ते वर्णन उर्मी च्या "व्हेज सुप" चं......उर्मी, तिची सासु, सासरे हे कमी म्हणुन की काय तिचे वडील सुद्धा...तेच तेच बोलत होते....वेगवेगळ्या भाज्या, त्यांची चव तशीच राखणे, सात्वीक्पणा, उर्मी च्या हातची चव कोणाच्याच हाताला नाही ई ई ....
मला तर तो सुप चा क्लोसअप बघुन ते नॉर चं व्हेज सुप असल्याची शंका आली...
आणि उर्मी ने ज्या पातेल्यात सुप केलं ते कोणी कोणी पिलं पाहिलं का ?..
सासु, सासरे ( २ वाट्या ) , उर्मी ची जाउ, नणंद, ( प्रत्येकी २ वाट्या ), शिवाय आणि ती नंदिनी आणि तिच्या आत्यांसाठी उर्मी वेगळ्या ३ वाट्या नेतेच.....
तिची सासु सुरवातीला म्हणते की थोडच करुन बघु आवडलं नाही तर वाया नको जायला....आणि ते थोडंच केलेलं सूप इतके लोक कसे काय पिउ शकतात....
म्हणजे जास्त केलेलं सूप अक्ख्या गावला पुरेल...
अगं उर्मि कडे द्रौपदीची थाळी
अगं उर्मि कडे द्रौपदीची थाळी \ पातेलं असेलं
ती दुसरी आत्या आहे - किर्ती
ती दुसरी आत्या आहे - किर्ती मेहेंदळे. माझ्या शाळेत होती, बर्याच लहान वयात मोठ्या बाईचा रोल करत्ये, जसं रुग्वेदी ला त्या नांदा दाख्यभरे मधे काकूचा रोल करावा लागतोयं तसं
मोठ्या आत्याची एक आकाशी
मोठ्या आत्याची एक आकाशी रंगाची साडी सुरेख दिसत होती त्यांना!
कीर्ती मेहेंदळेचं माहेर
कीर्ती मेहेंदळेचं माहेर माझ्या बहिणीच्या जवळ आहे गोग्रासवाडीत, एकदा तिच्याशी बहिणीनेच ओळख करून दिली होती, ती आणि माझी भाची एकत्र त्यावेळी बाजीराव मस्तानी ह्या इ टीव्हीच्या सिरीयलमध्ये काम करत होत्या, छान बोलली होती तेव्हा माझ्याशी.
स्मिता , सूपपुराणासाठी +
स्मिता , सूपपुराणासाठी + १००००००० .
पण त्या वाट्याही फार मोठ्या नव्हत्या . मिसळ्णीच्या डब्यात असतात तशा होता. .
उर्मी , गोखले , नाईक सर्व कुटुम्बा>कडे द्रौपदीची भांडी आहेत .
दोन दिवसात येवढच झाल? श्या!
दोन दिवसात येवढच झाल? श्या!
स्मिता श्रीपाद......उर्मीच्या
स्मिता श्रीपाद......उर्मीच्या सूप पुराणाबद्दल ++++++
खरेच नॉर चे सूप वाटत होते. आणि पातेले तर अगदी चार कपांचे होते. ती नंदिनी फारच फताडी व बिनडोक आहे याच्याशीही सहमत!
उर्मी किती दिवस ती एकच गुलाबी
उर्मी किती दिवस ती एकच गुलाबी साडी घालून होती.
उर्मी काय बोल्ली म्हणे
उर्मी काय बोल्ली म्हणे नंदिनीशी? आणि नंदिनी आत्महत्या करायला निघाली होती....
अरे काल २ मिनिटं बघितली,
अरे काल २ मिनिटं बघितली, रजनीकांत सिरीयलमध्ये जाहिराती चालू होत्या तेव्हा. ह्यात एका जुन्या सिरीयलच्या बऱ्याच साड्या आणि इतर प्रॉपर्टी वापरत आहेत, हिरोच्या बेडरूमचे पडदे आधीच्या सिरीयलच्या नायिकेच्या माहेरचे पडदे आहेत. झी वाल्यांना कसं चालते.
हायला, अंजुचे कुठे पण लक्ष
हायला, अंजुचे कुठे पण लक्ष असते.:फिदी::दिवा:
Pages