पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उर्मीला पत्र न मिळाल्याने जर एवढा गोंधळ झाला , तर तें पत्र कां नसेल मिळालं याचा विचारही नाहीं !! >>>> अज्जुनही ते पत्र गायबच आहे.. कालच्या भागात पुनर्वसु देवसाखरीच्या मुलांना संस्कृत शिकवत होता. दिग्दर्शकाने लिहुन दिलेल फक्त पाठ करुन म्हणत होता आणि नंतर वडिलांना म्हणे मुलांना पुढच्या वर्षी संस्कृतच्या स्कॉलरशिपच्या परिक्षेला बसवुया.. वडीलांचा कॉन्फिडन्स तर अजुन दांडगा त्यांना वाटतय पुनर्वसुच्या मन लावुन शिकवण्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल.. Uhoh

ज्याने कोणी हा भाग बघितला असेल त्यांना माझ्या Uhoh मागच्या भावना समजतील...

खर आहे की नै नताशा? त्याने रामः पुस्तक पठति मध्ये रामः का म्हटलय हे अक्षरशः पढवल्यासारख सांगितल. हे म्हणजे हिरो म्हटला की तो जे काय करेल ते यशस्वीच होत अस गृहित धरल्यासारख झाला तो सीन.

मी वासुला दुरध्वनी करु का.....अस त्याची आई विचारते त्याच्या वडिलान्न्ना....

अरे...अस कधी कोणी बोलत का आजकाल???? दुरध्वनी वगैरे!!!

मी वासुला दुरध्वनी करु का.....अस त्याची आई विचारते त्याच्या वडिलान्न्ना....

अरे...अस कधी कोणी बोलत का आजकाल???? दुरध्वनी वगैरे!!! >>>> हो ना, ते दोघे अगदी जाणुन बुजुन बोलतायत हे कळत होत, फोन करु का ची सहजता नव्हती त्यात

. म्हणे एकाच कपातून कॉफी प्यायली तर तू मला माफ केलस >>> एक ठेवून दिली पाहीजे त्या वासूड्याच्या कानाखालीः:राग:

आणि डॉक्टर येऊन काय सांगतात तर म्हणे हा viral fever नाही कसलातरी प्रचंड tension घेतले आहे. त्यानी ताप आला आहे. काहीही हं!

लेखन, अभिनय, संवाद या सर्वांतच कथा-कादंबरीत क्षम्य असलेल्या पलिकडे तर्कशुद्धता व सहजता यांचा खूपच अभाव जाणवतो या मालिकेत !

अरे तो टकलु कसला चामट दिसतो.
आणि हिर्वणीचा बाबा तर अगदीच स्वातंत्र्यवीर आहे.

टकलु बेअक्क्लच आहे. कै च्या कै धोतर नेसुन लायब्ररीत जातो नि पोराना शाकुन्तल समजावुन देतो., आणि स्वतःला दुष्यन्त समजतोय:G
अणि विचार तर पहा एकाच कपातून कॉफी वैगरे... येवढ्या तापात हे बर सुचत!

Lol

अख्खी मालिकाच कैच्याकै आहे. संध्याकाळी ८:०० ही वेळ भौतेक कैच्याकै मालिकांची असावी. आधी होसुमियाघ आणि आता पआमु. त्याआधी कुठली होती?

माझा अंदाज -
७:३० ते ८ मधे शॉर्ट टर्म मालिका. कन्यादान, राधा ही बावरी, जावई विकत घेणे... वगैरे. म्हणजे तुलनेने लहान लांबीच्या. कमी दळण पोटेन्शिअल.

८ वाजता लंबी रेस. (उंच माझा झोका विषय चांगला असून हाताळला बालिश प्रकारेच!)
८:३० ला जनमत बघून असावं. किती ताणलं तर लोक बघतील.... वगैरे.

९ चा स्लॉट रामभरोसे! Proud म्हणजे वाटेल ते दाखवा, खपवा, गळ्यात मारा! प्रेक्षकांचा विचार जास्त करू नका, त्यांना सोडून द्या, रामभरोसे मालिका चालू करा. नाईलाज म्हणून तरी का होईना, लोक बघतीलच!

८:३० ला जनमत बघून असावं. किती ताणलं तर लोक बघतील.... वगैरे. >>> असंभव नव्हती ना ग पण त्या कॅटेगरीत.. ती पण ८:३०लाच असायची.

तेजस्वीचा अभिनय खूपच छान होता. विक्रम गायकवाड आणि स्पृहाचा अभिनय ही मस्त होता. आणि शीर्षकगीत तर अप्रतिम होतं

असंभव मी नाही बघितली कधी. कारण तेव्हा आमच्याकडे दूरदर्शनचा सेट टॉप बॉक्स होता. फ्री-टू-एअर असतील तेवढेच चॅनेल्स दिसत. त्यात अल्फा/ आताची झी मराठी नव्हती. तसंही हा आपला असाच अंदाज. Wink

मी नाही टीव्ही बघत फार. आता शून्यच.

असंभव मी नाही बघितली कधी. कारण तेव्हा आमच्याकडे दूरदर्शनचा सेट टॉप बॉक्स होता. फ्री-टू-एअर असतील तेवढेच चॅनेल्स दिसत. Uhoh

त्यात अल्फा/ आताची झी मराठी नव्हती. तसंही हा आपला असाच अंदाज. >>>> तेव्हा झी मराठीच होत. अल्फा मराठी फार काळ नाही राहील. लवकरच झी मराठी झाल होत.

Pages