Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही एपिसोडस बघितल्यावर अभिनय
काही एपिसोडस बघितल्यावर अभिनय वगैरे कळेल. हिरोईन बरी वाटली पण थोडी आगाऊ वाटली अर्थात इतक्या लवकर काही कळणार नाही, नवीन आहेत, थोडा वेळ द्यायला हवा पण फार काही मालिका मी बघेन असं मला वाटत नाही.
मागे एक बघितली तेव्हा हिरो हिरवीणवर मी प्रोमोमध्येच फिदा झाले होते आणि अपेक्षेप्रमाणे दोघेही आवडले होते, अभिनय पण चागला केला त्यांनी.
मी आत्ता रिपीट बघतेय. काय ते
मी आत्ता रिपीट बघतेय. काय ते गिरीश ओक दुस-याच्या घरात ओळख ना पाळख पहील्यांदा गेलेत आणि वास्तुशास्त्राचे धडे देतात. बरं ज्यांच्याकडे गेलेत त्यांचा विश्वास नाही या गोष्टीवर कळल्यावर तरी गप्प बसावंना, तर नाही लेक्चर चालू. त्या नायिकेने योग्य उत्तर दिलं.
आज अधुन मधुन बघितला
आज अधुन मधुन बघितला एपिसोड.
गिरीश ओक अति सनातनी दाखवलेत. एकही शब्द इंग्रजीत बोलत नाहीत.
आधीच्या सिरियलमध्ये ओक
आधीच्या सिरियलमध्ये ओक नानाअमृत द्यायचे आता दादाअमृत व्याख्यान बहुतेक.
सिरीयलचे प्रोमो व पहिले भाग
सिरीयलचे प्रोमो व पहिले भाग बघता, या वेळेस झीमराठीने, "हिंदू धार्मिक समजुतींवर" अन्निस स्टाईलने हल्लाबोल करण्याचे योजलेले दिसते.
पुनर्वसु जर पोराचे नाव घेतले
पुनर्वसु जर पोराचे नाव घेतले असेल ते ही जरा हटके म्हणुन तर ह्यांनी हिरवणी चे नाव भरणी घ्यायला हवे
अशी काही स्टोरी असेल तर माहित
अशी काही स्टोरी असेल तर माहित करुन घ्यायला आवडेल. >>>> सगळी नक्षत्र या स्त्रियाच आहेत. त्या दक्ष प्रजापतीच्या मुली आहेत, पार्वतीच्या बहिणी आणि या सर्वांची लग्ने चंद्राबरोबर झालेली आहेत. आता या शिरेलीत मुलाच नाव पुनर्वसु कस ठेवलय हे मला माहित नाही.
तुम्ही काय नक्षत्र वगैरे घेऊन
तुम्ही काय नक्षत्र वगैरे घेऊन बसलायत? तो मुलगा आपल्या बायकोचं किंवा आई वडलांचं पुनर्वसन करणार म्हणून ते नाव दिले आहे दूरदृष्टीने.
पुनर्वसु >> कुठल्या दशकातलं
पुनर्वसु >> कुठल्या दशकातलं नाव म्हणे हे ? २०१६ चालु आहे हे झी वाल्यांना माहित नाही का?
आशुडी ..
आशूडी
आशूडी
पसंत आहे मुलगा ..अस टायटल असत
पसंत आहे मुलगा ..अस टायटल असत तर काहीतरी वेगळेपणा तरी वाटला असता.पुन्हा खोटेपणाच्या बेस वर अजुन एक झी ची सिरीयल.
हिरवीण आहे ऊर्मी. जरा वेगळी
हिरवीण आहे ऊर्मी. जरा वेगळी नावे हो ती बापाला विद्या म्हणते. तो अन्निस वाला आहे असे वाट्ते.
>>>> हो ती बापाला विद्या
>>>> हो ती बापाला विद्या म्हणते. <<<<<
हो, हा एक नविनच प्रकार. म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मरतात, किमान पक्षी निरनिराळ्या आगींन्ना फुंकरले तरी जातेच.
कसे?
तर विद्याधर म्हण हे आजी सांगते, मग कळते की तो तिचा बाप आहे, तोवर वाटत होते की हा विद्या अन ती उर्मी भाऊबहिण असुन आजी दिसणारी त्यांची आई आहे.
आता सेरियलीच्या सुरवातीलाच बापाला एकेरी तुटक नावाने संबोधताना दाखवुन सेरियलीचे पाय पाळण्यात दिसू लागलेच, अन यावर कुणी आक्षेप नोंदविलाच, तर आहेत फैरीच्या फैरी की "क्का? आईला एकेरी हाक मारलेली चालते, मग बापाला का नको?" झाला फुंकर मारुन स्त्रीमुक्तिवाद सुरु. (आता ही गोष्ट अलाहिदा की आईला अग आई असे एकेरी हाक मारत असलो तरी मी तरी कुठेही आईला तिच्या नावाने हाक मारताना कुणाला पाहिलय, मग इथेच "विद्या" का (बापाला नावाने हाक मारणे का)? अन आजीलाही आजी नको म्हणूदे, तिचे जे काय सरस्वती/शकुंतला वगैरे नाव लेखकुने ठरविले असेल तेच हाक मारुदे ना... कशाला उगाच आज्जी/आजोबा/काका/मामा वगैरे नात्यांचा काथ्याकूट करायचा? सरळ नावानेच हाक मारावे...
आईला अग आई असे एकेरी हाक मारत
आईला अग आई असे एकेरी हाक मारत असलो तरी मी तरी कुठेही आईला तिच्या नावाने हाक मारताना कुणाला पाहिलय
>>>
मी मारायचो
आणि या मागे फार मोठी स्टोरी आहे. रात्री घरून टाकतो ..
तसेच तुम्हाला चर्चाच करायची असेल तर वेगळा धागाही काढता येईल, पालकांना नावाने हाक मारणे यावर..
तसेच तुम्हाला चर्चाच करायची
तसेच तुम्हाला चर्चाच करायची असेल तर वेगळा धागाही काढता येईल, पालकांना नावाने हाक मारणे यावर..>>>
ऋ , तु कहर आहेस
>>>> तसेच तुम्हाला चर्चाच
>>>> तसेच तुम्हाला चर्चाच करायची असेल तर वेगळा धागाही काढता येईल, पालकांना नावाने हाक मारणे यावर..>>>
>>>> ऋ , तु कहर आहेस खो खो <<<<
नै नै, मी नै धागा काढत कधीच.... तो मक्ता तुमच्याकडेच आहे! तुम्हीच काढा धागा....
अन त्यात नुस्ते पालकांना नव्हे, तर नवर्यालाही एकेरी वा नावाने हाक मारणे अशी भर घाला...
नवर्यालाही एकेरी वा नावाने
नवर्यालाही एकेरी वा नावाने हाक मारणे अशी भर घाला...>>>>>>>>
नवर्यालाही एकेरी वा नावाने
नवर्यालाही एकेरी वा नावाने हाक मारणे अशी भर घाला... >>>>> ती पायरी केव्हाच ओलांडलीय आम्ही.. आणि त्यात काही विशेष नाहीये.
अहो लिंबुकाका, हे काहीच
अहो लिंबुकाका, हे काहीच नाही!
मी तर काही छचोर नवर्यांना चार चौघात आपल्या बायकोला छान 'या आमच्या मंडळी' किंवा ' या आमच्या मालकीण बाई' म्हणण्याऐवजी 'ही माझी बायको - शरू' असं काहितरी विचित्र बोलताना ऐकलंय.
आहात कुठे?
चक्कं बायकोला चार चौघात नावाने हाक, ते ही लाडक्या 'एकांतातच म्हणाव्या' अश्या नावाने!
साती +१. काही म्हणजे काही
साती +१. काही म्हणजे काही धरबंधच राहीला नाहीये.
चावडीवरून अहो कारभारी
चावडीवरून अहो कारभारी म्हटल्यावर राणीसरकार म्हणत चटदिशी धाव घेतली जाते तीच खरी संस्कृती.
या कारभा-याला राजे बनण्यासाठी संधी मिळते पण त्या वेळी राजवस्त्रं चढवावी लागत नाहीत..
कंटाळा येत नाय?
कंटाळा येत नाय?
मला आला कंटाळा ह्या शिरेलीचा.
मला आला कंटाळा ह्या शिरेलीचा. मी दोन दिवस बघितलीच नाही.
आणि या मागे फार मोठी स्टोरी
आणि या मागे फार मोठी स्टोरी आहे. रात्री घरून टाकतो ..
तसेच तुम्हाला चर्चाच करायची असेल तर वेगळा धागाही काढता येईल, पालकांना नावाने हाक मारणे यावर..
मनाली
मनाली
मनाली लय भारी!
मनाली लय भारी!
पुनर्वसु हे हिरोचं नाव
पुनर्वसु हे हिरोचं नाव असेल... तर लग्नानंतर तो हिरवीणीचे नाव बदलून उत्तराषाढा असं करेल का???
जानने के लिए देखीए.. सिर्फ झी मराठी पर... पसंत आहे मुलगी !!!!
मनाली एक नंबर...
मनाली एक नंबर...
मनाली भारी ! बाकी या
मनाली भारी !
बाकी या शीरेलीबद्दल बोलण्याची आपली लायकी नाय भो!
तो पुनर्वसुचा दाखवलेला बाप
तो पुनर्वसुचा दाखवलेला बाप फारच लाऊड दाखविला आहे, तितका कर्मठपणा अंदाजे शंभरवर्षांपूर्वी होता, माझ्या पन्नास वर्षात असला आक्रस्ताळेपणा मी कुठल्याच "मठाधीपति" मधे बघितला नाहीये.
आता याच गतिने झीमराठी जाणार असेल, तर लौकरच झीची पुढची मालिका शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या लाल अलवणातल्या व डोके सफाचाट केलेल्या विधवा स्त्रीयां दाखवित सुरु झाली तर मला नवल वाटणार नाही.
वाईट इतकेच वाटते की टीआरपीच्या नादात, वा मिळालेल्या टीआरपीच्या जोशात झी वहावत चालले आहे, ज्याचि झी कडुन अपेक्षा नव्हती.
Pages