Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20
आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात
हो जाओ शुरू!
इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल
उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे यार त्या नंन्दीनी ला कसे
अरे यार त्या नंन्दीनी ला कसे घेतले शिरेलीत... कीती थोराड आहे ती.. नाक रंग बदद्ल बोलुच नका.. साड्यांचे कलर पण अतरंगी....
साधी दाखवणे म्ह्णजे दोन मुलांची आई वाटेल ईतके गबाळे दाखवणे असे का?
आणि वासुचे बाबा शहाणेच आहेत... स्वतः छान गोरीगोमटी बायको केलीये... आणि दोन्ही मुलांच्या गळ्यात थोराड आणि काळ्यासावळ्या मुली बांधत आहेत > +१
(No subject)
एकुणाच तो वासू किती खोटारडा
एकुणाच तो वासू किती खोटारडा आहे. घरच्यांपासून आणि उर्मीपासून - सगळ्यांपासूनच सगळे लपवतो
घरात चांगल पायजम्यासारख काहीतरी घालतो आणि उर्मीच्या घरी धोतर घालून जातो
बेक्कार सिरियल.. वासुचे केस
बेक्कार सिरियल..
वासुचे केस लवकर वाढावेत .. असा कमी केसात वेडाच वाटतो..
एकुणाच तो वासू किती खोटारडा
एकुणाच तो वासू किती खोटारडा आहे. घरच्यांपासून आणि उर्मीपासून - सगळ्यांपासूनच सगळे लपवतो >>> हो ना , स्वतःमध्ये अजिबात गट्स नाहीयेत... त्या उर्मीच्या बाबांची बिचार्यांची तडफड.. पार्थ ची पण एन्ट्री दाखवली पाहीजे होती.
घरात चांगल पायजम्यासारख काहीतरी घालतो आणि उर्मीच्या घरी धोतर घालून जातो >> नै त कै बिनडोक!
वासुचे केस लवकर वाढावेत .. असा कमी केसात वेडाच वाटतो>> +११११
या शिरेलीत ते सतत व्हायोलीनवर
या शिरेलीत ते सतत व्हायोलीनवर पसंत आहे मुलगी वाजवत आहेत ते जाम बोअर होते. प्रसंग कुठलाही असला तरी माग पसंत आहे मुलगी असतेच. त्या कुठल्याही नाटकाचे नाव + 'बेडवर' वाल्या विनोदासारखे.
प्रसंग कुठलाही असला तरी माग
प्रसंग कुठलाही असला तरी माग पसंत आहे मुलगी असतेच >>>> हो आणि ते नुस्ते पसंत आहे मुलगी असे नै वाजवत, तर "पसंत आहे मुलगी..पसंत आहे" असं वा़जवतात
क्लिओ
क्लिओ
(No subject)
<साधी दाखवणे म्ह्णजे दोन
<साधी दाखवणे म्ह्णजे दोन मुलांची आई वाटेल ईतके गबाळे दाखवणे असे का?> म्हणजे दोन मुलांची आई गबाळी असते असे सार्व् त्रिक विधान करायचे आहे की काय?
म्हणजे दोन मुलांची आई गबाळी
म्हणजे दोन मुलांची आई गबाळी असते असे सार्व् त्रिक विधान करायचे आहे की काय?>>> नाही.
<< स्वतः छान गोरीगोमटी बायको
<< स्वतः छान गोरीगोमटी बायको केलीये... आणि दोन्ही मुलांच्या गळ्यात थोराड आणि काळ्यासावळ्या मुली बांधत आहेत > अहो, त्यांच्या बाबानीं ठरवलं आणि ह्यानीं आधीं न बघतांही लग्न केलं; आतां ती छान गोरीगोमटी निघाली हा त्यांच्या पत्रिकेतला योग !!
भाऊ
भाऊ
आज दुपारी २ सीन बघितले ह्या
आज दुपारी २ सीन बघितले ह्या शिरेलीचे. डोकं दुखायला लागलं. ती हिरवीणीची आई २ वाक्यात किती वेळा नवऱ्याला विद्या, विद्या म्हणते (१० वेळा म्हटल्यासारखं वाटलं मला). विद्या म्हणायला माझी काही हरकत नाही (मीच नवऱ्याला नावाने हाक मारते, अरे तुरे करते). पण किती वेळा? वाक्य कळलंच नाही, विद्या-विद्याच कानावर आदळले. channel बदललं.
मला ह्या सिरीयतलं बहुतेकांचं
मला ह्या सिरीयतलं बहुतेकांचं वागणं तर्कशुद्ध तर सोडाच पण 'नॉर्मल'ही वाटत नाही; उदा., वडिलाना स्वतःच्या प्रेमाबद्दल सांगायचं धैर्य नाही पण लग्न करून त्याना न कळवतांच नवरीला घेवून तडक घरीं हजर ! निदान, फोनवरून - सॉरी, दूरध्वनीवरून- तरी त्याना याची कल्पनाही देण्याचं सौजन्यही सुचूं नये ? आणि, ते पंतमहाशय; माणूस सनातनी असणं व भावनाशून्य, बिनडोक असणं यांत कांहीं फरकच नसतो ? पोरीला एका शब्दानं विचारत नाहीं कीं काय प्रॉब्लेम आहे तिच्या व जांवयामधे !
<< ती हिरवीणीची आई २ वाक्यात किती वेळा नवऱ्याला विद्या, विद्या म्हणते >> 'हिरवीणी'चे वडिल व आजी तर बेसुमार 'ओव्हर अॅक्टींग' करतात; फारच कृत्रिम वाटतं तें सारं.
काल लग्न केल्यावर नवदांपत्य
काल लग्न केल्यावर नवदांपत्य गावी जात, तिथे अपेक्षित (म्हणजे प्रेक्षकांना अपेक्षित) प्रकार होतात. मोठ्या पंतसचिवांनी धाकट्या मुलाच्या नावाने थेट अंघोळ करणे, आईला चक्कर येणे, त्यांनी ठरवलेल्या वधुच्या नातेवाईकाने "अरे देवा" करुन गळा काढणे इ. त्यानंतर काही वेळाने उर्मीने घरी फोन केला गावी पोचल्याच सांगायला. तेव्हा तिच्या घरच्यांच्या रिअॅक्शन्स
बाबा: "पोचलात का तुम्ही? काही कळवायची पद्धत आहे की नाही? बर मला सांग कशी आहेत ती माणस? त्यांनी स्विकारल का तुला? त्यांना धक्का बसला का?
आई: कशी वाटली ती लोक?
आजी: मुलाचा आणि सुनेचाच प्रश्न थोडा मॉडिफाय करुन.
अरे काय हे? थांबा की जरा. म्हैत्येना तुम्हाला त्यांच घर, ती माणस कर्मठ आहेत मग आपल्याला न कळवता मुलगा डायरेक्ट लग्न करुन आला म्हटल्यावर स्वीच ऑन स्वीच ऑफ सारख पट्टकन कस काय मुलीला स्विकारतील? त्या माणसांना समजुन घ्यायला मुलीला थोडा वेळ तर द्या. आजी म्हणे शितावरुन भाताची परीक्षा, जी माणस सुरुवातीला चांगली वागतात ती नंतर पण चांगली वागतात..
त्यातल्या त्यात कधी नव्हे ते हिरवीण जास्त कॉन्फीडन्ट दिसली या मालिकेत, धाकटे पंतसचिव मुळुमुळु आहेत आणि हे म्हणे मठाचा कारभार सांभाळणार. इथे स्वतः केलेला कारभार स्वतःच्या तोंडून पटकन सांगता आला नाही. तिथेही बायकोच बोलली...
इथे स्वतः केलेला कारभार
इथे स्वतः केलेला कारभार स्वतःच्या तोंडून पटकन सांगता आला नाही. तिथेही बायकोच बोलली...
लय भारी मुगु.
<< त्यातल्या त्यात कधी नव्हे
<< त्यातल्या त्यात कधी नव्हे ते हिरवीण जास्त कॉन्फीडन्ट दिसली या मालिकेत,>> अहो, अख्खी मालिका त्यावरच तर बेतली आहे - सासरला जिंकणारी व सुधारणारी आदर्श सून !! पिढ्यान पिढ्या सिनेमा, सिरीयल्समधे यशस्वीपणे राबवलेला व अजूनही यशाची गुरुकिल्ली असलेला एकमेव 'फॉर्म्युला' आहे तो !! ::डोमा:
हो खरं आहे भाऊकाका. हिरवीण
हो खरं आहे भाऊकाका. हिरवीण अति कर्मठ सासर आणि अति आधुनिक माहेर ह्यांचा सुवर्णमध्य साधणार. तिची हुशारी जास्तीतजास्त अधोरेखित व्हायला हिरोला अजूनच मुळमुळीत करतील (तसाही तो वाटतोच चेहेऱ्यावरून).
पण ती नायिका उच्च शिक्षणासाठी
पण ती नायिका उच्च शिक्षणासाठी फारिनला जाणार होती ते राहिलंच का?
ते आहेच हो भाउकाका, पण जनरली
ते आहेच हो भाउकाका, पण जनरली सगळ्या शिरेलींमध्ये अशी गुपचुप लग्न करुन मुली सासरी आल्या की त्याच धो धो रडतात आणि नंतर मन जिंकण वै वै प्रकरण होतात. इथे मात्र आई ने दोन दोन वेळेला प्रश्न विचारल्यावर पण धाकटे पंतसचिव ढिम्मच, पण सूनबाई बोलल्या हो माई आम्ही लग्न करुन आलोय. नंतर सुद्धा पुनर्वसु खूप पॅनिक झालेला दाखवलाय पण ती एकदमच शांत आहे. नणंद विचारते आता काय करणार तर घरात घेतल नाही तर इथे अंगणातच सतरंजीवर चांदण्या बघत रात्र काढु म्हणाली. डायलॉग्ज वै वै थोड अती आहे, पण गंगायमुनांना डोळ्यात थारा दिला नाहीये हे बघुन सुखावलेय.
मुग्धा पुर्ण पोस्टीला
मुग्धा पुर्ण पोस्टीला अनुमोदन
इथे स्वतः केलेला कारभार स्वतःच्या तोंडून पटकन सांगता आला नाही. तिथेही बायकोच बोलली... >> वासुला झोडुन काढावं वाट्लं
हिला काय म्हणुन तो वाश्या
हिला काय म्हणुन तो वाश्या आवडलाय?
बघ की
बघ की
माझ्या प्रश्नाला उत्तर द्या
माझ्या प्रश्नाला उत्तर द्या की.
<< पण ती नायिका उच्च
<< पण ती नायिका उच्च शिक्षणासाठी फारिनला जाणार होती ते राहिलंच का? >> पुण्याहून साखरगांव म्हंजे तसं फारिनच ना ! " माणसं वाईट नसतात; परिस्थिती तशी असते", " आतां हेंच माझं घर व हींच माझीं माणसं ", असलीं तिचीं एकेक अमूल्य वाक्यंही तिला सहज हव्या तेवढ्या 'पीएचड्या' मिळवून देतील; उच्च शिक्षण, उच्च शिक्षण तें आणखी काय वेगळं असतं !!
अन्जु, अगं आता कसली उच्च
अन्जु, अगं आता कसली उच्च शिक्षणासाठी फारेनला जाती ती. आता आदर्श सुनेची डिग्री मिळवण्यात वेळ आणि डोकं खर्च करणार बघ ती.
हो बरोबर. आता संसारातील
हो बरोबर. आता संसारातील खरीखुरी पी एच डी करणार.
इथे स्वतः केलेला कारभार
इथे स्वतः केलेला कारभार स्वतःच्या तोंडून पटकन सांगता आला नाही. तिथेही बायकोच बोलली...
पण झीने एक बरी गोष्ट केली. एरवी महएपिसोडाच्या शेवटी पाच मिनिटे खरे नाट्य दाखवतात. आधीचा ९०% वेळ फालतु गोष्टीत वाया घालवतात (आठवा जानूचे श्रीला ती प्रेगनंट असल्याचे सांगणे. कुठल्याश्या आश्रमात.)
हिला काय म्हणुन तो वाश्या आवडलाय?>>> होना त्या खोटारड्यात काय आवडण्यासारखे आहे
पण झीने एक बरी गोष्ट केली.
पण झीने एक बरी गोष्ट केली. एरवी महएपिसोडाच्या शेवटी पाच मिनिटे खरे नाट्य दाखवतात. आधीचा ९०% वेळ फालतु गोष्टीत वाया घालवतात (आठवा जानूचे श्रीला ती प्रेगनंट असल्याचे सांगणे. कुठल्याश्या आश्रमात.) >>>> हो हो
Pages