पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे पण त्यांच्या पोटा-पाण्याचे काय? दोघं शिकतायेतना अजून. जाऊदे असले लॉजिकल प्रश्न प्रेक्षकांनाच पडतात.

काल एवढा राडा होऊनही बॅकग्राउंडला पसंत आहे मुलगी पसंत आहे होतेच.>> Lol हो मी पण हे नोटीस केलं. म्हणजे एवढं टेन्शन चालु होतं आनि त्यात ते बॅकग्राउंडला पसंत आहे मुलगी पसंत आहे वेगळंच वाटत होतं.

<< हिला काय म्हणुन तो वाश्या आवडलाय?>> अहो, नवरा, सासर असं असलं तरच हिरॉईनला चमकायला वाव असतो ना ! सिरीयलवाल्यानी पण काँट्रॅक्ट सही करतानाच सांगितलं असणार ना तिला, " तुझ्या आवडी-निवडी ठेवायच्या कुलूपांत आणि आमच्या फॉर्म्युलात बसतो त्याच्याशीच करायचं लग्न " !! [ अलका कुबल यांच्या सर्व काँट्रॅक्टमधे अशीच तरतूद असे, असं त्या क्षेत्रातल्या एका माहितगार मित्रानं मागें मला सांगितलं होतं !]. Wink

काल एवढा राडा होऊनही बॅकग्राउंडला पसंत आहे मुलगी पसंत आहे होतेच.>> हो मी पण हे नोटीस केलं. >>> मी पण

अलका कुबल यांच्या सर्व काँट्रॅक्टमधे अशीच तरतूद असे, असं त्या क्षेत्रातल्या एका माहितगार मित्रानं मागें मला सांगितलं होतं >> ते हिरोसाठी असेल बहूतेक. Proud

हो मी पण हे नोटीस केलं. >>> मी पण>> म्युझिक पिसवर कदाचीत पसंत नाही मुलगी, पसंत नाही असेल. Wink

अलका कुबल यांच्या सर्व काँट्रॅक्टमधे अशीच तरतूद असे, >>> तिला त्यातल्या त्यात बरे हिरो मिळाले होते. कुंकु लावते माहेरच मध्ये तिचा नवरा प्रसाद ओक दाखवला होता.. प्रसादवर अन्याय होता हा..

कुंकु लावते माहेरच मध्ये तिचा नवरा प्रसाद ओक दाखवला होता>> मुग्धा, तुला अलका कुबलचे चित्रपट आठवतात???

होतीस कुठे मध्येच???

मुग्धा, तुला अलका कुबलचे चित्रपट आठवतात??? >>>> तिचे पिक्चर कोण विसरेल ग..

होतीस कुठे मध्येच??? >>>> अग खूप बिझी.

ती नंदिनी, पुनर्वसूची बहीण आणी त्याची वहिनी या तिघींच्या लिपस्टीक काय भयाण कलरच्या आहेत. चक्क जांभळा रंग न दिसता राखाडी दिसतो. ती वासुची वहिनी कळत-नकळत ( अनिकेत आणी ऋजुताची सिरीयल) मध्ये कामवाली की अशीच गरीब घरची दाखवलीय. यात तिला बढती दिल्याने संतोष जाहला.

मठाधिपतींनी काल अतीरेक केला. असाच अतीरेक केकताच्या कुसुम नावाच्या सिरीयल मध्ये हिरोच्या वडलानी केला होता. अर्थात, ते हिरो नावाच पात्र पाचकळच होतं त्यात.

वासुला खरे तर एखाद्या पौराणिक सिरीयलीत काम द्यायला हवे होते. पार बाबा आदमच्या गेटप मध्ये आणी अविर्भावात असतो तो.

तिचे पिक्चर कोण विसरेल ग..>> मला माहेरची साडी नावाचा इमोसनल अत्याचारच आठवतोय फक्त.

मठाधिपतींनी काल अतीरेक केला. >> +१.

म्या अलकाबैचा एक-दोन मुवीच बघितलेत, लेक चालली सासरला. तिचा मेन रोल, डोल्यातुन पाणी वगैरे नंतर नाहीच बघितले, टिव्हीवर पण नाही.

काल बायडीनं धावू धावू हा मेळोद्रामा पायला. कायच्या काय शिरेल आहे ही. काय ते त्या आईचं रडण्ं, त्या नंदिनी चा मेकप बाबौ!

<< म्युझिक पिसवर कदाचीत पसंत नाही मुलगी, पसंत नाही असेल.>> बहुतेक, प्रसंगानुरूप " पंत नाही ही मुलगी, पंत नाही ही मुलगी " असंही असेल !! Wink

कधी नव्हे ते झी ने महा एपिसोडमधे जाहीरात केलेली घटना दाखवली, नाहीतर आज पर्यंत जी जाहीरात करतात ती घटना अगदी शेवटी दाखवतात किंवा नुसती झलक.

उर्मिचे बाबा मात्र जेनुइन वाटतात. त्यांची काळजी रास्त आहे.

उर्मिचे बाबा मात्र जेनुइन वाटतात. त्यांची काळजी रास्त आहे. >>> हो ना

काल वासू म्हणला की दादा-माईंशी बोलणे मी बंद केले नाहीये. त्यांनी थांबवले आहे. Uhoh अरे पण माठाड्या त्याला तुच जबाबदार आहेस ना Angry

<< उर्मिचे बाबा मात्र जेनुइन वाटतात. त्यांची काळजी रास्त आहे.>> +१. पण जेवढा जास्त आरडा-ओरडा तितकी जास्त काळजी, हा त्यांचा गैरसमज कुणीं तरी दूर करायला हवा, असंही वाटतं ! Wink

कालच्या भागात उर्मीने त्या अक्की?? ला टशन दिली. जरा बरं वाटलं. ती म्हातारी कै वाट्टेल ते बोलत होती उर्मीला. मला तर जाऊन तिची जीभ हासडावीशी वाटली. Angry Angry
आणि उर्मी चक्क न रडता, चेहरा न पाडता तिला उलट उत्तर देत होती. ही झी चीच हिराॅइन आहे ना असा प्रश्न पडला मला. Happy

उर्मी चांगली आहे पण तिचा चॉईस फ्लॉप आहे.>> +१

मी बघितला तेवढा सांगते..
वाश्या खोलीत उर्मीची वाट बघत असतो. बहुतेक ती चहा आणायला गेलेली असते. तर नंदिनी चहा घेऊन येते आणि हा ती दारातनं आत येताच कोण आहे ते न बघताच तिला मीठी मारतो. मग ती रडतरडत तुम्ही असं का केलं मी तुमच्याशिवाय कोणाचा विचार नै केला, आता सगळंच संपलय, रिकामं झालयं, डोळे मिटायची भीती वाटते, शिकलेली बायको हवी होती तर मी शिकले असते, शहरातली हवी होती तर मी तशी राहीले असते वैगेरे बोलते मग याला गिल्टी फिलींग येत.

उर्मीचं म्हातारीशी भांडण होतं. म्हातारी काय तोंडाला येईल ते बोलत असते. अगदी उर्मीचे संस्कार, आईबाबा, खानदान, पूर्वज सगळ्यांचा उद्धार करते. मग उर्मी भडकते आणि खबरदार माझ्या आईबाबांच नाव घेतलंत तर वैगेरे बोलते. मग म्हातारी अजूनच भडकते आणि उर्मीला तुझे हातपाय मोडुन ठेवीन मी बारागावचं पाणी प्यायलेय वैगेरे धमकी देते. मग माई उर्मीला शपथ घालून अदिती? सोबत बाहेर पाठवून देतात.

यस्स! काल खंरच मज्जा आली .. उर्मी रॉक्स!
उर्मी चांगली आहे पण तिचा चॉईस फ्लॉप आहे.>> +११११११११११
हा ती दारातनं आत येताच कोण आहे ते न बघताच तिला मीठी मारतो. >>>त्याच्या चेहर्यावरचे भाब बघुन हसु का रडु झालं !

त्याच्या चेहर्यावरचे भाब बघुन हसु का रडु झालं !>> मला काय कळलेच नाहीत त्याचे एक्स्प्रेशन्स.
पण नंतर नंदिनीचे एक्स्प्रेशन्स भारी होते. Rofl मला तर वाटलं, हिला जोरात लागलीय आणि डायरेक्टरने जबरदस्तीने तसाच तो सीन तिच्याकडून करवून घेतला. किती विचित्र तोंड करून बोलत होती.

Pages