मलई बर्फी

Submitted by सायो on 15 March, 2009 - 13:07
malai burfi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.

क्रमवार पाककृती: 

मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्‍या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२,१३ वड्या.
अधिक टिपा: 

इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी १४ औंसाचा कॅन वापरून ३-२-१ केले.. मिश्रण कोरडे वाटते आहे, स्मूथ नाही..काय करू आता? आणि माझे काय चुकले?

सायो, तसं करून काही झालं नाही. मग त्यातले काही कडक खडे काढले आणि बाकीचं मिक्सर मधून फिरवलं. मग मऊ झालं पण पेढे वळताना हातातून तूप टपटप गळत होतं Happy

बापरे, का असं?
माझं आधीच्या घरातल्या मावेत टेंप वेगळं असल्याने ३-२-१ वेळात परफेक्ट व्हायची. या नवीन मावेत ३-२ पुरतं. शेवटच्या १ मिनिटांत रंग बदलतो, ड्राय होते खूप.

धन्यु सायो आणि तिची मैत्रीण !

माझ्या कडे कंडेन्स्ड मिल्क जरा कमी पडले तरी मी ३ - १:३० - ०:३० केले पण ड्राय झालीच. बहुतेक दूध अजुन घातले असते तर बरोबर झाली असती.

MalaiBarfi.jpg

नविन वर्षात मुहुर्त लागला बर्फी करायचा " गुडी-पाड्व्याच्या शुभेच्छा"
(माझं आधीच्या घरातल्या मावेत टेंप वेगळं असल्याने ३-२-१ वेळात परफेक्ट व्हायची. या नवीन मावेत ३-२ पुरतं. शेवटच्या १ मिनिटांत रंग बदलतो, >>> माझ्या मावे च सेटिन्ग पण हाय असाव माझी ३-१ मधेच रन्ग बदलायला लागली होती. त्यामुळे पुढे नाही फिरवत बसले. दीपच्या पावडरिने बदामिच रन्ग येतो.आणखी एक म्हणजे मी २ टेबलस्पुन मार्क वर स्टिक कापुन तेवढच बटर घातल.)
image_2.jpeg

सुंदर झाली आहे बर्फी. मी गेल्या कित्येक वर्षांत (म्हणजे या वर्षभरात) केलीच नाहीये. केली पाहिजे.

कोणीतरी प्लीज भारतात हमखास यशस्वी होणारी रेसिपी टाका बघू. मागच्या वेळेस फार म्हणजे फार गोड आणि चिवट झाली होती Sad मंजुडी यांनी इन्ग्रेडिएंट्स दिले आहेत. आता प्लीज स्टेप्स पण सांगा.

स्नू,

एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप

हे प्रमाण घेणार आहेस का? तर सगळं साहित्य एकत्र करून मायक्रोवेवमधे हाय पॉवरवर २ मिनिटं + १ मिनिट + १ मिनिट आणि मग गोळा फिरू लागेपर्यंत लागेल तसं अर्धा अर्धा मिनिट ठेवायचं.

जमली जमली!!
मायक्रोवेव्हमध्येच केली. सायोकडून डेमो घ्यावा लागला, पण जमली एकदाची! Happy

पायलट एपिसोडः
maba1.jpg

मॅन्गो पल्प एपिसोडः
maba2.jpg

नॉनफॅट मिल्क पावडरच वापरली, आता एकदा मावा पावडरही वापरून पाहीन.
बटरची अर्धीच स्टिक घातली, व्यवस्थित पुरली.

काही अ‍ॅडिशन्स :
१. मिश्रणात कन्डेन्स्ड मिल्कच्या जोडीला दोनतीन चमचे साधं दूध घातलं तर मिल्क पावडर छान विरघळते आणि मिश्रणात गुठळ्या राहात नाहीत.
२. मॅन्गो पल्प वापरताना सिंडरेलाच्या सल्ल्यानुसार तो आधी अर्ध्यात आटवून घेतला. पण फायनल बर्फी काहीशी ओलसर - मऊसरच राहाते असं लक्षात आलं. मबसख्यांनीही हे ऑब्झर्वेशन व्हॅलिडेट केलं. (पीअर रीव्ह्यू म्हणतात तो हा! :P)
मिश्रण आचेवरून उतरवल्यावर काही मिनिटांनी थोडी पिठीसाखर घालून मळून घेतलं आणि वड्या थापल्या तर छान खुटखुटीत झाल्या. थेऽऽट चितळ्यां(च्या आंबाबर्फी)सारख्या! Happy

एकूण (ऑल्मोस्ट :P) फूलप्रूफ रेसिपीसाठी सायो यांचे आभार! Happy

अजून गुरुदक्षिणा काही मिळाली नाही पण असो,
मस्त दिसतायत. मी आजवर कोणतंही व्हेरिएशन केलेलं नाहीये. करायचा विचार आला तरी बिघडायच्या भितीने तो विचार नकोच होतो.

Pages