
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
शलाका पाटील, मागची पानं चाळा,
शलाका पाटील, मागची पानं चाळा, कुणीतरी लिहिलंय गॅसवर कशी करायची ते.
वाह, सोपी आणि मस्तं पाककृती
वाह, सोपी आणि मस्तं पाककृती दिसतेय. नक्की करून बघीन.
ही फ्रीजमधे ठेवायची की बाहेर?
ही फ्रीजमधे ठेवायची की बाहेर? बाहेर किति टिकते?
बाहेर. आरामात टिकते चार पाच
बाहेर. आरामात टिकते चार पाच दिवस.
काठोचु एकदम दोन नव्या पोस्टी
काठोचु एकदम दोन नव्या पोस्टी बघून
थॅन्क्स सायो, उद्या करून बघीन
थॅन्क्स सायो, उद्या करून बघीन
मी काल केली बर्फी, इथे पहा:-
मी काल केली बर्फी, इथे पहा:-

सेट झाल्यावर कोरडी झाली का?
सेट झाल्यावर कोरडी झाली का? हा फोटो मिश्रण ओतल्यानंतरचा वाटतोय.
मी १४ औंसाचा कॅन वापरून
मी १४ औंसाचा कॅन वापरून ३-२-१ केले.. मिश्रण कोरडे वाटते आहे, स्मूथ नाही..काय करू आता? आणि माझे काय चुकले?
पुर्न कोरडी नाही झाली...
पुर्न कोरडी नाही झाली...
जरावेळ उघड्यावर ठेवून बघा.
जरावेळ उघड्यावर ठेवून बघा. कदाचित जरा कोरडी होईल.
स्नेहा, मावेच्या टेंपमुळेही
स्नेहा, मावेच्या टेंपमुळेही तसं होऊ शकतं. खूप कोरडं वाटल्यास थोडं दूध घालून ढवळून बघ.
डीप फ्रिज मधे ठेवली आहे, तरी
डीप फ्रिज मधे ठेवली आहे, तरी थोडी मउ आहे
सायो, तसं करून काही झालं
सायो, तसं करून काही झालं नाही. मग त्यातले काही कडक खडे काढले आणि बाकीचं मिक्सर मधून फिरवलं. मग मऊ झालं पण पेढे वळताना हातातून तूप टपटप गळत होतं
बापरे, का असं? माझं आधीच्या
बापरे, का असं?
माझं आधीच्या घरातल्या मावेत टेंप वेगळं असल्याने ३-२-१ वेळात परफेक्ट व्हायची. या नवीन मावेत ३-२ पुरतं. शेवटच्या १ मिनिटांत रंग बदलतो, ड्राय होते खूप.
धन्यु सायो आणि तिची मैत्रीण !
धन्यु सायो आणि तिची मैत्रीण !
माझ्या कडे कंडेन्स्ड मिल्क जरा कमी पडले तरी मी ३ - १:३० - ०:३० केले पण ड्राय झालीच. बहुतेक दूध अजुन घातले असते तर बरोबर झाली असती.
अरे भारी दिसतेय बर्फी धनि,
अरे भारी दिसतेय बर्फी
धनि, तुला फ्रेंडशिप दिली 
(No subject)
(No subject)
५००
५००
Wow cool photo.
Wow cool photo.
भारी!!! ५०० निमित्तानं
भारी!!!
५०० निमित्तानं करावीच मब
हायला भारी. पुढच्या गटगला
हायला भारी. पुढच्या गटगला मिळणार का?
एबाबा काय सुंदर दृष्ट काढावे
एबाबा
जबरदस्तं !!!!
काय सुंदर दृष्ट काढावे असे पेढे
नविन वर्षात मुहुर्त लागला
नविन वर्षात मुहुर्त लागला बर्फी करायचा " गुडी-पाड्व्याच्या शुभेच्छा"

(माझं आधीच्या घरातल्या मावेत टेंप वेगळं असल्याने ३-२-१ वेळात परफेक्ट व्हायची. या नवीन मावेत ३-२ पुरतं. शेवटच्या १ मिनिटांत रंग बदलतो, >>> माझ्या मावे च सेटिन्ग पण हाय असाव माझी ३-१ मधेच रन्ग बदलायला लागली होती. त्यामुळे पुढे नाही फिरवत बसले. दीपच्या पावडरिने बदामिच रन्ग येतो.आणखी एक म्हणजे मी २ टेबलस्पुन मार्क वर स्टिक कापुन तेवढच बटर घातल.)
सुंदर झाली आहे बर्फी. मी
सुंदर झाली आहे बर्फी. मी गेल्या कित्येक वर्षांत (म्हणजे या वर्षभरात) केलीच नाहीये. केली पाहिजे.
कोणीतरी प्लीज भारतात हमखास
कोणीतरी प्लीज भारतात हमखास यशस्वी होणारी रेसिपी टाका बघू. मागच्या वेळेस फार म्हणजे फार गोड आणि चिवट झाली होती
मंजुडी यांनी इन्ग्रेडिएंट्स दिले आहेत. आता प्लीज स्टेप्स पण सांगा.
स्नू, एक कप मिल्क पावडर पाव
स्नू,
एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप
हे प्रमाण घेणार आहेस का? तर सगळं साहित्य एकत्र करून मायक्रोवेवमधे हाय पॉवरवर २ मिनिटं + १ मिनिट + १ मिनिट आणि मग गोळा फिरू लागेपर्यंत लागेल तसं अर्धा अर्धा मिनिट ठेवायचं.
जमली
जमली जमली!!
मायक्रोवेव्हमध्येच केली. सायोकडून डेमो घ्यावा लागला, पण जमली एकदाची!
पायलट एपिसोडः

मॅन्गो पल्प एपिसोडः

नॉनफॅट मिल्क पावडरच वापरली, आता एकदा मावा पावडरही वापरून पाहीन.
बटरची अर्धीच स्टिक घातली, व्यवस्थित पुरली.
काही अॅडिशन्स :
१. मिश्रणात कन्डेन्स्ड मिल्कच्या जोडीला दोनतीन चमचे साधं दूध घातलं तर मिल्क पावडर छान विरघळते आणि मिश्रणात गुठळ्या राहात नाहीत.
२. मॅन्गो पल्प वापरताना सिंडरेलाच्या सल्ल्यानुसार तो आधी अर्ध्यात आटवून घेतला. पण फायनल बर्फी काहीशी ओलसर - मऊसरच राहाते असं लक्षात आलं. मबसख्यांनीही हे ऑब्झर्वेशन व्हॅलिडेट केलं. (पीअर रीव्ह्यू म्हणतात तो हा! :P)
मिश्रण आचेवरून उतरवल्यावर काही मिनिटांनी थोडी पिठीसाखर घालून मळून घेतलं आणि वड्या थापल्या तर छान खुटखुटीत झाल्या. थेऽऽट चितळ्यां(च्या आंबाबर्फी)सारख्या!
एकूण (ऑल्मोस्ट :P) फूलप्रूफ रेसिपीसाठी सायो यांचे आभार!
अजून गुरुदक्षिणा काही मिळाली
अजून गुरुदक्षिणा काही मिळाली नाही पण असो,
मस्त दिसतायत. मी आजवर कोणतंही व्हेरिएशन केलेलं नाहीये. करायचा विचार आला तरी बिघडायच्या भितीने तो विचार नकोच होतो.
Pages