मी बनवलेली पहिली शॉर्टफिल्म !!!

Submitted by मी मधुरा on 5 April, 2016 - 09:58

माझा पहिला लघुपट! ☺
नक्की पहा.

Watch, like n subscribe.
400+ views & 40+ likes completed.

https://youtu.be/nYVdJOJ0p6w

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन,

मी आपली फिल्म पाहुन विस्ताराने इमेल करतो.

उद्देश दोन आहे.

१. तांत्रीक बाजु समजुन घ्यायची.

२. मी हा प्रयोग करु शकतो का त्याची चाचपणी करायची

मधुरा.....

प्रथम प्रयत्नाचे कौतुक मी करीत आहेच; तरीही या कौतुकापाठोपाठ एक शंकाही आहे (कलाकृतीच्या चांगलेपणाविषयीच बोलतो आहे मी...).

नमीताचा आपल्या डोळ्यासमोर झालेला अपघात, तिचा मृत्यू शिल्पा पाहते आणि तिला मानसिक धक्का बसतो. दवाखान्यातही तिला ठेवले जाते. डॉक्टर तर सुयशला तिला सायकियाट्रिस्टकडे घेऊन जाण्याचाही सल्ला देतात. तरी सुयश मी तिला सांभाळतो असे विश्वासाने सांगतो. असे असताना काही प्रमाणावर बरी झालेल्या शिल्पाच्या प्रेमभावनेला तो थेट नाकारतो, नमीताच्या स्मरणासाठी....ही बाब काहीशी न पटणारी वाटली मला. थेट नकार देण्याऐवजी दुसरा काही मार्ग त्याच्यासारख्या सुशिक्षित युवकास सुचायला हरकत नव्हती. कथानकाचे शीर्षक आहे "तुझ्याचसाठी..." पण कथेत तर कोणच कुणासाठी नाही असे जे चित्र समोर येते ते चिंताजनक वाटते.

नमीता गेली...शिल्पाही कोसळली आहे...आणि त्या दोघींची ती अवस्था पाहून सुयशचे काय होईल ? हा अनुत्तरीत प्रश्न आहे. शिल्पाच्या हाती असलेली नमीताची ओढणी काढून घेऊन तो बाजूला टाकतो...हा जर एक चांगला ईशारा असेल, तर तो छानच आहे असे म्हणावे लागेल.

Ashok mama,

To shilpa la nahi tr namita la nahi mhanto..... Shilpa swatahala namita samjun tyachyashi vagate bolte he tyala samjle tevha tyane namitala nakarle..... Shilpala nahi.

Tuzyachsathi he shirshak namitachya premasathi aahe. Shilpacha kahich sambandh nahi tyat.

Pudhchyaveli suspast pane katha mandnyacha prayatn kren nakki. ☺

thanks for reply .

Kapoche,

Making baddal nakki sangen adgi savistar.... Pn thod thambav lagel. Mazya engineering chya exams aahet. Vel milala ki lagech lihayla bsen ☺

अरेच्चा !
इंजिनियरिंगची विद्यार्थिनी आणि शॉर्ट फिल्म !! मग तर कौतुक करायलाच हवं. लहान वयात धाडस केल्याबद्दल.

जसजशी जाण येत जाईल तस तसं तू आणखी चांगल्या कलाकृती निर्माण करशील अशी आशा आहे. या प्रयत्नातून चांगला अनुभव तुझ्या गाठीशी जमा झाला असेल, तो कामाला येईल, हो ना ?

थॅन्क्स मधुरा.....सविस्तर खुलासा केल्याबद्दल....आता तुझा हा चित्रपट समजत गेला मला. इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम सांभाळत तू हा चित्रप्रयत्न केला आहेस त्यावर येत राहाणा-या प्रतिक्रिया तुझ्या या विषयातीलही अभ्यासाला पूरक ठरत जातील यावर विश्वास ठेवत जा.

भावी प्रगतीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेतच. चारही कलाकारांनी (तीन प्रमुख आणि एक डॉक्टर) टीमला अभिनयाद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे.

पहिल्या प्रयत्नात छान जमलीय शॉर्टफिल्म !!

प्रेक्षक म्हणून सांगायचे झाल्यास ११ मिनिटांची शॉर्टफिल्म बघायला बरेच पेशन्स लागले Wink

डॉक्टर आणि नमिताच अभिनय उजवा वाटला !
संवाद कृत्रिम वाटले!
कथा बाळबोध वाटली!
गाणं, गायिका, संगीत मस्त वाटले!
एकंदरीत ठिकठाक वाटली!

मात्र पहिला प्रयत्न असल्याने समजून उमजून घेत गेलो अन आवडलीच !!!

Thanks kapoche. Happy

Thanks Ashok Mama. Happy

Thanks. Devaki. Happy

@Javherganj ji, thanks for reply , Will try better next time for sure!

@Kapoche

Nakkich! Anubhav kami yeilach pn tumche saglyanche reviews pn madat kartil mala pudhcha prayatn kartana....aani nkkich toh uttam hoil. Thanks! Happy

आभिनंदन मधुरा. शॉर्टफिल्म आवडली.
सासूसुनांच्या मालिका बघण्यापेक्षा हल्ली मला शॉर्टफिल्म्स बघायला आवडतात.
एक सूचना - सोशल मिडिया वरून हि शॉर्टफिल्म इतर लोकांपर्यंत पोहोचवता येईलच. पण शॉर्टफिल्म जास्तीत जास्त लोकांनी पहावी म्हणून यूटयूबवर एखाद्या channel ची संपर्क कर.
पॉकेट फिल्म्स येथे बऱ्यापैकी मराठी शॉर्टफिल्म आहेत.
मला यातली फारशी माहिती नाही. पण सहज सुचले म्हणून लिहिले.

Thanx Sarika.

Suchavlela marg chhan aahe. Mi nakki pratatn kren. Aani link pn pahin nkki! Happy

फिल्मच्या तांत्रिक बाबीं बद्दल माहीती देऊ शकाल का? उदा: कोणता कॅमेरा (आणि लेन्सेस ) वापरला आहे, फ्रेम रेट , रिझोल्यूशन आणि बिट रेट काय ठेवला होता, ऑडिओ रेकार्डिंग कोणत्या उपकरणांनी केले आहे , डबिंग साठी / व्हाईस ओव्हर साठी कोणते तंत्रज्ञान वापरले आहे , ऑडिओ - व्हिडिओ पोष्ट प्रोसेसिंग साठी कोणते सॉफ्टवेअर वापरले आहे , इनडोअर शॉट्स साठी प्रकाशयोजना कशा प्रकारे केली होती (उपकरणे , कलर टेंपरेचर , रिफ्लेक्टर / डिफ्युजर ) , क्रोमा की चा वापर केला आहे का (असल्यास त्याचे प्रोसेसिंग कसे केले ) इ.

हे तांत्रिक तपशील विचारायचा हेतू असा की मी स्वत: काही 'इंस्ट्रकशनल व्हीडिओ' बनवण्याची तयारी करत आहे आपली माहीती / अनुभव मला उपयोगी पडेल.

धन्यवाद

अभिनंदन, मधुरा !
पहिलाच प्रयत्न असला तरी खूपच छान जमली आहे. रेझोल्युशन व एकंदर तांत्रिक बाजूमध्ये सुधारणेला वाव आहे. बिचार्या शिल्पासाठी मात्र क्षणभर वाईट वाटले. पुढील लघु-चित्रपटासाठी शुभेच्छा !

धन्यवाद सुरेशजी. पुढील वेळी नक्की या बाबी लक्षात ठेवेन. Happy

Thanks नताशाजी.

Suja ji, Thanks

suhas sg ji,

-13mp camera of mobile
-Movie editor version 9
-Sound recorder
-Mobile handle stand
-double lighting for in-door shoots

That was only used for this short film. Other all factors was covered in editing.
Happy

पहिल्या प्रयत्नात छान जमलीय शॉर्टफिल्म !!

प्रेक्षक म्हणून सांगायचे झाल्यास ११ मिनिटांची शॉर्टफिल्म बघायला बरेच पेशन्स लागले>>> मलाही!!

पण छान प्रयत्न!!

OMG......

खूप पूर्वीचा धागा आहे हा.

Thanks जव्हेरगंज, पद्म.
मला माहिती आहे की अनेक चूका होत्या starting from sound...... but if I decide to make next shortfilm, I will definately avoid the mistakes that I made.

Thanks for encouragement. Happy

Pages