आपण त्या दिशेने जाऊ?

Submitted by आशयगुणे on 19 February, 2016 - 16:10

मी अमेरिकेत असताना आमच्या विद्यापीठात 'स्टूडंत असोसियेशन' अतिशय सक्रिय होते. तिथल्या प्रमुख विद्यापीठातील तशी संस्कृतीच आहे. आपली 'भारतीय स्टूडंत असोसियेशन' देखील तिथल्या प्रत्येक विद्यापीठात सक्रिय भूमिका बजावत असते. अर्थात ती भूमिका गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, गणपती आणि दिवाळी ह्यात अधिक गुंतलेली असते. म्हणजे गुंतू नये असे नाही, पण त्याच्या बाहेर ज्या देशात आपण आलो आहोत त्याबद्दल जाणून घेणे ही इच्छा खूप कमी लोकांच्या मनात असते. नाहीच जवळ-जवळ! कारण भारतीय पोशाख, फेसबुक चेक-इन्स, नमस्कार आणि सेल्युट करणाऱ्या पोझेस आणि त्यातून निर्माण होणारे असंख्य फोटो ( आणि आता सेल्फी) ह्याची निर्मिती थांबवून बाहेरचे जग पाहण्याचा मोह फार कमी लोकांना आवरता येतो.

तर, दोन घटना अशा होत्या ज्यांनी माझा 'अमेरिका' ह्या संकल्पने बद्दलचा आदर अधिक वाढवला. तिथल्या विद्यापीठ - जीवनपद्धतीच्या बाबतीतचा तरी निश्चितच!

आमच्या कॅम्पसवर एक विद्यार्थी गट असा होता जो शेजारच्या मेक्सिकोतून ( मी टेक्ससला होतो) अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत कामानिमित्त राहिला आलेल्या लोकांच्या मुलांच्या हक्कासाठी लढत होता. ही मुलं ह्याच विद्यापीठात शिकत होती. परंतु, अमेरिकन नागरिक म्हणून नाही. तर, त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळावं , किमान ग्रीन कार्ड तरी मिळावं ह्या मागणीसाठी त्यांची घोषणाबाजी चालायची. अमेरिकेत राहणारी ही मूलं दुसऱ्या राष्ट्रातील ह्या मुलासाठी का लढत होती? स्वतःच्या सरकार विरोधात घोषणा का देत होती? त्यांना तिथल्या विद्यापेथाने परवानगी मात्र दिली होती. कारण आपण कोणते निदर्शन करतो आहोत हे विद्यापीठातील ऑफिसला कळवावे लागते. कुठे करतोय, कोणत्या वेळी आणि एकंदर हेतू काय ह्याची तपशीलवार माहिती तिकडे पुरवावी लागते.

दुसरी एक घटना ह्या घटनेपेक्षा वेगळी आणि एकंदर अधिक विलक्षण होती. कॅम्पस मध्ये एक नास्तिकत्व मानणारी संस्था होती. कॅम्पस मधल्या मुलांनी धर्माच्या प्रभावातून बाहेर यावे म्हणून त्यांनी अशी एक मोहीम सुरु केली होती ज्यात तुम्ही तुमच्या घरातील 'बायबल' आणून त्यांना द्यायची आणि त्याच्या बदल्यात ते तुम्हाला पोर्नची DVD देणार. हा खोडसाळपणा होता. विरोधकाला मुद्दाम डिवचणे ह्या व्यतिरिक्त ह्या मोहिमेतून काहीही सध्य होणार नव्हते. विशेष म्हणजे ह्या मोहिमेला देखील परवानगी दिली गेली! हा कार्यक्रम दोन दिवस सुरु राहिला आणि ओउधे काही दिवस तो तसाच सुरु राहणार होता. येणारे-जाणरे ही गम्मत बघत जायचे. परंतु कुणीही मारहाण, दगडफेक ह्यातले काहीही केले नाही. पण दोन दिवसांनी काय झाले हे अधिक महत्वाचे आहे! दोन दिवसांनी Christians on Campus ह्या विद्यार्थी गटाने त्याला उत्तर म्हणून आपली मोहीम हाती घेतली. त्यांनी काय करावं? त्यांच्याच समोर आपले टेबल टाकले आणि तुम्ही तुमच्याकडे असलेली पोर्न DVD परत द्या आणि बायबल घेऊन जा ही मोहीम हाती घेतली! विचारांना विचारांनी मात द्यायची ह्याचे ह्यापेक्षा चांगले उदाहरण कोणते द्यायचे? आणि ही मुलं बहुतांश पंचविशीच्या आतली, म्हणजे १८ -२३ ह्या वयोगटातील होती. आपल्या कॉलेज मधील कॉलर ताठ करून, शर्ट फोल्ड करून हुशारी करणारी पोरं डोळ्यासमोर आणा ना! वागतील ते असे? असेल त्यांच्यात एवढा संयम?

परंतु सर्वात आदर वाटतो तो तिथल्या विद्यापीठाचा. सर्व विचार सामावून घेण्याचे ह्यापेक्षा दुसरे उदाहरण कोणते? लोकशाहीचा पाया हा इथे असतो. कारण उद्या हीच काही पोरं राजकारणात प्रवेश करणार असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करू नये, अभ्यासाकडे लक्ष द्यावे; घोषणा देणे हे काम राजकीय पक्षांचे असते असले जे काही मतप्रवाह काही आठवड्यांपासून इथले विचारवंत सांगत आहेत ते किती पोरकट आहे हे लक्षात येते. अमेरिकन समाजाची आणि आपली तुलना होऊ शकत नाही वगेरे मतप्रवाह आता मांडले जातील. पण त्या दिशेने जायचेच नसेल तर ह्या विषयावर चर्चा करण्यात देखील काहीही अर्थ नाही.

- आशय Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशय, लोकशाही, शब्दात नाहे, तर रक्तात मुरावी लागते. 'let us agree to disagree' हे तत्व अंगी बाणणं सोपं नाही.

उदाहरणं आणी मांडणी चांगली आहे.

ईंटरेस्टींग ! किस्से आणि टॉपिक ..
बायबल द्या आणि पॉर्न घ्या.. आपल्याकडे असे काही झाले तर संस्कृतीरक्षक आणि धर्मसंरक्षक मिळून अख्खा देश जाळून टाकतील.

असो, बाकी तसेही मला एकूणच आपल्या देशातील लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य गंडलेले वाटते.

अमेरीकेला गेलो नाही म्हणून तुलना किंवा त्यांच्यावर टिप्पणी करू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय राजकारण त्यांचेही सडकेच आहे Happy

आशय, सुंदर लिहीलंत.
फक्त आपल्या लोकांना 'विथ फ्रीडम कम्स रिस्पॉन्सिबिलिटी' हे कळत नाही.
केवळ निदर्शने करायची परवानगी विद्यापीठाने दिली तर ती जबाबदारीने पार पाडावी याची जाणीव निदर्शकांना नसते.
उद्या या निदर्शनांतून काही बरे बाईट झाले तर 'तुम्ही ऑफिशीयली परवानगी दिलीत तर आता तुम्हीच जबाबदार' असा ठपका विद्यापीठावर येतो.

अहो मोठ्या वाढलेल्या महाविद्यालयीन तरूणांची सहल नेली आणि तिथे मुलांच्याच चुकीने काही बरेवाईट झाले तर लोक कॉलेजला नावे ठेवतात म्हणजे विचार करा.

पण .. इतरत्र असलेले हे सुजाण आणि सुजबाबदार विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य भारतात असावे ही इच्छा आहेच!

'let us agree to disagree'>>>> परफेक्ट.... आमच्याकडे एकतर अ‍ॅग्री होच नाहीतर डोक्यावर टण्णुच.... अगदी घरादारापासुन ते विद्यापिठापर्यंत.... बहुतेक बळी तो कान पिळी ह्या बालगोष्टींचे आपला समाज जास्तच मनावर घेतो.

२०१० च्या दरम्यान आमच्या युनिव्हर्सिटीच्या मागे चर्च च्या बाजुला कुराण चे विटंबन कोणी अज्ञाताने केले होते. ती जागा नेमकि आमच्या लेनच्या बाजुला होती. संध्याकाळी मित्रांबरोबर चर्चा करताना समजले. बाकि कोनतीही रेअ‍ॅक्शन नाही. २ दिवसानंतर चर्चच्या काही लोकांनी तेथे कँडल लावुन सभा घेतली एवढे समजले....

पण त्याचे पडसाद आपल्या भारतात जबर्दस्त उमटले. दंग्यात एकाचा मृत्यु झाल्याचे वाचलेले आठवते.

निवांत पाटील टण्णु हा शब्द लै दिसानी ऐकला. आमच्या मित्रमंडळीत तो होता. टण्णु म्हणजे कोपराच्या शेवटच्या टोकदार भागाने भागाने डोक्यात प्रहार करणे. त्याने भयंकर लागते आणि वेदना होतात. तुम्हाला हाच अर्थ अपेक्षित आहे काय?

रिस्पॉन्सिबिलीटी पेक्षा राइट्स लै महत्वाचे आहेत तो इथे>>>> अगदी अगदी..

आपल्याकडे शांतता नावाचा प्रकारच माहित नाही लोकांना. निषेध करणारे लोक सुद्धा शांतपणे नाही करु शकत निषेध, हुल्लडबाजी शिवाय काही जमतच नाही लोकांना. खेद वाटतो.

(एका देशात राहून खाऊन त्याच देशाच्या स्वातंत्र्याला एकात्मतेला बाधा येईल अशा वर्तणूकीवर न्यायालयीन कारवाई योग्यच आहे असे माझे मत)

अमेरीका या संकल्पनेचे जागतीक स्तरावरील "कार्याबाबत" उल्लेख वर आलाच आहे.

या सगळ्या अमेरीकन विद्यापीठात हे असे "विरोध" करण्याचे सगळे स्वातंत्र्य असते, असे वाचुन,
इथुन कोणी उद्या अमेरीकेत जावे आणि दक्षीणी राज्ये मेक्सिकोत समाविष्ट करा / ते मेक्सीकोचेच अविभाज्य अंग आहेत म्हणुन घोषणा द्या, यासाठी सशस्र लढा उभारा,
किंवा
अमेरीकाविरोधी इतर कुठले "कृत्य" करा,
मग इथे येऊन मला जरुर सांगा तुमच्या अमेरीका या संकल्पनेबद्दलचा अनुभव? काय?
एफबीआय / सिआयए काय झोपा काढतात असे वाटते का तुम्हाला? एनएसए चे एवढे भले मोठे डेटा सेंटर काय पोर्नचे सर्वेक्षण करते काय?
वर उल्लेखलेल्या चळवळीत अमेरीकाविरोधी काहिही नव्हते म्हणुन ते चालले आहे हे साधे कळु नये?

पॉर्न वगैरे स्वातंत्र्य इथे भारतात नाही हा इथल्या समाजाचा दोष. त्यात भारत या संकल्पनेची काय चुक?

अमेरीका / युरोपात गेमींगच्या चॅटींग रागाच्या भरात धमकी दिली / अपशब्द वापरला म्हणून १२ वर्षांच्या मुलांना अगदी कैदेत टाकले जाते. हीच का तुमची अमेरीका ही संकल्पना?
खाजगी तत्वावर चालणारे तुरुंग भरावे म्हणुन टीनेजर्सना खोट्या आरोपात अडकवले जाते.
ई.ई.

कोणीही परफेक्ट नसताना त्यांची चांगली बाजु नुसती मांडन्याऐवजी ,
त्यांच्या चांगल्या बाजुचा आपल्या वाईटच बाजुशी तुलना करण्याचा हेतु काय?
असेच होते तर जेव्हा तु २०१४ च्या आधी प्रत्यक्ष अमेरीकेत होतास, तेव्हाच हे गुणगाण का नाही गायले?

प्रतिक्रियांसाठी सर्वांचे धन्यवाद! Happy
कुणी ह्या लेखातून काय घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी माझ्या विषयी काय विचार करावा, किंवा मला काही कळतं का वगेरे म्हणावे हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आणि हो, मी माझ्या लेखात कोणत्याही वर्षाचा उल्लेख केलेला नसताना ' २०१४' ह्या वर्षाचा एका प्रतिक्रियेत उल्लेख होतो ह्यात बरंच काही आलं. एकंदर प्रतिक्रियेचा रोख, तिची भाषा आणि ह्या वर्षाचा उल्लेख हे सारे एकत्रित रित्या येणे हा योगायोग नक्कीच नाही. Happy

१. अफझल गुरुच्या फाशीबद्दल निषेध करणारी मुलं ती अफझलला २०१३ मध्ये फाशी देणार्‍या काँग्रेस पक्षाचा मात्र अजिबात निषेध करत नाहीत, राहुल गांधींना त्याबद्दल अजिबात विचारत नाहीत की बाबा तुम्ही अफझलला का फाशी दिलं..उलट राहुल गांधींचं स्वागत करतात...हे प्रचंड संशयास्पद वाटतं.

२. सुशील कुमारने रोहित वेमुला व त्याच्या मित्रांना फेसबुकवर 'गुंड' म्हटलं होतं. त्यामुळे त्या मुलांनी सुशीलच्या रुमवर घुसून त्याला शाब्दिक दमदाटी करुन माफीनामा लिहून घेतला. पुढे रोहितचं जे झालं ते नक्कीच वाईट झालं पण फेसबुकवर 'गुंड' म्हणणं हा सुशील कुमारचा फ्रीडम नव्हता का? त्याबद्दल कोणी काहीच बोलत नाहीये. असं का?

३. फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स तीन वर्षाचा आहे..पण अलीकडे झालेल्या संपात अशी मुलं होती जी गेली १० - दहा- वर्षं तिथे शिकत आहेत..स्वस्त्/फुकट राहाणं-जेवणं करदात्यांच्या पैश्यांनी उपभोगत आहेत व आंदोलन करत आहेत. अशा फुकट्यांचं म्हणणं कोणी का ऐकून घ्यावं?

३.

स्पॉक यांची प्रतिक्रिया कळली नाही. गुण्यांचा हे सगळे इथे मांडायचा उद्देश अमेरिकेची भलामण करणे हा नसून लोक, मग त्यांचे नागरिकत्व काहीही असो, हक्कांसोबत आलेल्या जबाबदारीचे जाणीवपूर्वक पालन करतात हे सांगणे हा आहे असे मला वाटतेय. स्पॉकना त्यात काय वाईट दिसले.

आपल्याकडे हक्क आणि जबाबदारी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लोकांना कळायला अजून २०० वर्षे जावी लागतील, आणि तरीही आशा नाहीय.

आशय,
अमेरीकेच्या एक्याला व सामजीक शांततेला काहीच बाधा येणार नाही अशा पद्धतीने चाललेल्या चळवळिचे दाखले देऊन,
अमेरीका किती चांगली,
आणी,
भारताच्या ऐक्याला व सामाजीक शांततेला बाधा होईल अशा पद्धतीने चाललेल्या गोष्टींवर कारवाई केली म्हणुन "सद्धाचे" विशिष्ट सरकार किती दडपशाही करत आहे, लोकशाही पायदळी तुडवत आहे,
असा बादरायण संबंध जोडुन वाचकांची दिशाभुल करण्याचा तुझा डाव हाणुन पाडला,
त्याबद्दल दिलगीर आहे.
इथे जे बरंच काही आलंय, ते माझ्या पर्तिसादात नव्हे, तुझ्या लेखात मुलतः आलेले आहे! तिकडे बघ बर आधी!

साधना,
सांप्रतकालीन, भारतातील विद्यापिठांत काय चालले आणि त्याच वेळेला थेट भारत कसा याबबतीत मागासलेला अस उल्लेख करुन व म्हत्वाचे म्हणजे ज्याचा अमेरीकेच्या ऐक्याशी काहीही संबंध नाही अशा चळवळीचा दाखला देऊण लेख लिहिला आहे,
म्हणुन मी वरील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

साधना, जर
अमेरीके विरुद्ध विचारसरणी / त्यांच्या ऐक्याला धोका / सामाजीक शांतता सलोख्याला बाधा असणा-या चळवली किंवा त्यतील व्यक्ती यांना अमेरीकेने कसे हँडल केले , याचे उदाहरण देउन मग तिथे भारताचे कंपेरिझन केले असते,
तर मी अशा प्रतिक्रिया नसत्या दिल्या.

अमेरीकेच्या एक्याला व सामजीक शांततेला काहीच बाधा येणार नाही अशा पद्धतीने चाललेल्या चळवळिचे दाखले देऊन,
अमेरीका किती चांगली,
आणी,
भारताच्या ऐक्याला व सामाजीक शांततेला बाधा होईल अशा पद्धतीने चाललेल्या गोष्टींवर कारवाई केली म्हणुन "सद्धाचे" विशिष्ट सरकार किती दडपशाही करत आहे, लोकशाही पायदळी तुडवत आहे,
असा बादरायण संबंध जोडुन वाचकांची दिशाभुल करण्याचा तुझा डाव हाणुन पाडला,
त्याबद्दल दिलगीर आहे. ------ सध्याच्या सरकारचा उल्लेख कुठे दिसला? आणि हाणून पडला हे कोण सिद्ध करणार? मुळात डाव होता हे तरी कोण सिद्ध करणार? तुम्ही स्वतः? ठीक मग निष्कर्ष सुद्धा सगळे तुम्हीच मांडत बसा

स्पॉक मला तरी तसे वाटले नाही. तुम्ही म्हणता तसेही प्रयत्न होतात, नाही असे नाही. पण या लेखात तरी मला तसे अजिबात आढळले नाही.

लेख समजला. स्पॉक यांनी तुलना केलेली आपल्याला आवडली नाही हे ही समजतं.

मला एक प्रश्न आहे. अमेरिकेत रशियन कम्युनिजम किती श्रेष्ठ आहे अशा आशयावरुन विध्यापीठात ओपन सभा घेता येइल का? आणि समजा घेतली तर प्रेमळ अशा काही सरकारी संस्था त्या कितपत एक गंम्मत म्हन्णुन स्विकारतील आणि त्याकडे बघतिल अस वाटत?

अमेरिकेत आयसिस व अल कायदा यांच्या समर्थनार्थ सभा होतात का? त्यांच्या दहशतवाद्यांच्या पुण्यतिथ्या साजर्‍या होतात का? 'आयसिस झिंदाबाद अमेरिका मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या जातात का? मग घोषणा देणार्‍यांचं कौतुक केलं जातं का?

मी अमेरिकेत राहात नाही. जाणकार सांगू शकतील.

तुम्ही तुमचे अनुभव अगदी चांगल्या पद्धतीने मांडले आहेत.
मात्र अमेरिकेतही दुस-या महायुद्धाच्यावेळी तेथे पिढ्यानपिढ्या स्थायिक असलेल्या जपान्यांना त्रास दिला गेला, यात तिथली विद्यापीठेही आली. असे प्रकार सगळीकडेच चालतात. कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरूनही अनेक विद्यापीठांमधून मोहिम राबवली गेली, काहीतरी घोषणांची कागदपत्रे कोणाकडे सापडली की तो कम्युनिस्ट इतका साधा हिशोब. अशा पद्धतीने मग अनेकांकडे मग असे कागद 'सापडत'.
विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये तेथे राजकीय हस्तक्षेप असतो का? असला, तर त्यातून उठसुट विद्यापीठे बंद पडतात का, संप होतात का?
इथले येचुरी जसे अभिमानाने सांगतात की जेएनयुमध्ये आमच्या पक्षाचा विजय झाला आहे असे अभिमानाने सांगतात (इतरही सांगत असतील), तसे तेथील कोणता राजकीय पक्ष सांगतो का?
बाकी अमेरिकेत देशद्रोही समजले जातील अशा मुद्द्यांवर तेथील विद्यापीठांमध्ये काय होते यावर अनेकांनी लिहिलेले आहेच.

ह्या लेखाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याला इथे मिळालेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर 'एक्सप्रेस' मध्ये आलेली ही बातमी जरूर वाचा. Happy

http://indianexpress.com/article/india/india-news-india/wont-act-if-stud...

हे लक्षात घ्या की, त्या विशविद्यालयाने असे म्हटलेले नाही की,
"आमच्या भुमीवर अमेरीकाविरोधी सर्व चळवळी आणि कृत्य आम्ही सहन करु",
त्यांनी असे म्हटले आहे की,
"ओसामा बिन लादेन बद्दल कार्यक्रम असेल तर त्याला परवानगी देऊ".

पहिली गोष्ट म्हणजे २००१, नंतर असे किती कार्यक्रम झाले? त्यांची यादी व त्या त्या विशविद्यालयांची यादी आपण देऊ शकाल का?
दुसरी गोष्ट, जरी असा कार्यक्रम झाला तरी, "साधा कार्यक्रम" ते "खरेच सामाजी सलोख्याला धोका असलेला कार्यक्राम / व्यक्ती" हा प्रवास झाला की नाही / होईल की नाही हे ठरव्ण्यासाठी एफबीआय आहे. ते त्यांचे काम चोख पार पाडत असतात.
हा असा प्रवास सुरु झाला की लगेच सरकारी हस्तक्षेप होईल / झाला असेल / होतोच.

आणि विश्वविद्यालयापेक्षा सरकारचा अधिकार मोठा. तेव्हा असे अधिकृत वक्तव्य आणि भुतकाळात परावनगी दिलेल्या कार्यक्रमांचा डेटा येउ द्या मग विश्वास ठेऊ.

"Under some circumstances, I might have to speak out and indicate my disagreement as the President (of Princeton) and say that what the students were expressing was not consistent with the views of the university. - See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/wont-act-if-stud..."

असा निषेध विद्यालय किंवा विद्यार्थि युनियन चा अध्यक्ष यांनी व्यक्त केला का. विद्यार्थि युनियनचा अध्यक्ष तिथे उपस्थित होता. त्याने यावर भाष्य केले का?

कारवाई नंतरच्या भाषणाचे कवित्व नका सांगु.

आशय, सुंदर लिहीलंत.
फक्त आपल्या लोकांना 'विथ फ्रीडम कम्स रिस्पॉन्सिबिलिटी' हे कळत नाही.
केवळ निदर्शने करायची परवानगी विद्यापीठाने दिली तर ती जबाबदारीने पार पाडावी याची जाणीव निदर्शकांना नसते.
उद्या या निदर्शनांतून काही बरे बाईट झाले तर 'तुम्ही ऑफिशीयली परवानगी दिलीत तर आता तुम्हीच जबाबदार' असा ठपका विद्यापीठावर येतो.

अहो मोठ्या वाढलेल्या महाविद्यालयीन तरूणांची सहल नेली आणि तिथे मुलांच्याच चुकीने काही बरेवाईट झाले तर लोक कॉलेजला नावे ठेवतात म्हणजे विचार करा.

पण .. इतरत्र असलेले हे सुजाण आणि सुजबाबदार विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य भारतात असावे ही इच्छा आहेच! +१

यालाच प्रगल्भ समाज व्यवस्था म्हणतात. एखाद्या घटनेचा (उदाहरणार्थ बायबलच्या बदल्यात पोर्नची DVD देणे) भावनिक मुद्दा करून देशभर वातावरण तापवणे हा प्रकार त्या देशात होऊ शकत नाही. कारण तेथील लोक तसे नाहीत. जसे लोक तशी व्यवस्था. सामाजिक प्रगल्भता यायला वेळ लागतो हे सुद्धा तितकेच खरे आहे.

हे काय चालुये बलाढ्य लोकशाहीत?
A Government Error Just Revealed Snowden Was the Target in the Lavabit Case

http://www.wired.com/2016/03/government-error-just-revealed-snowden-targ...

  • मा. ओसामाजींच्या कार्यप्रमाला परवानगी देणारी हीच का तुमची प्रगल्भ लोकशाही?
  • इथे साधे सरकारच्या अनैतीक / बेकायदेशीर कृत्याविरोधी बोलले तर दुस-या देशात पळुन जावे लागते
  • कायद्याने बांधील नसलेली माहिती दिली नाही म्हणून, एक चांगला चाललेला व्यवसाय मुस्कटदाबी करुन बंद पाडला जातो?
  • त्या व्यवसाय मालकास आयुष्यभर तोंड बंद ठेव नाहीतर खोट्या केसे खाली आत टाकतील ही भिती घेउन जगावे लागते?

काय चालुये?
त्यापेक्षा आमचा भारत काय वाईटेय का? इथे कमीत कमी भारताच्या बरबादीचे नारे तरी दिले जाउ शकतात. एवढे करुन दुस-या देशात पळुन जावे लागत नाही, उलट पार्ट्या आणि प्रेस्टीट्युटस मागे लागतात प्रसिद्धीसाठी.

काल स्पॉटलाईट बघितला. प्रस्थापितांविरुध्दचा चित्रपट. या चित्रपटाला ऑस्कर सुध्दा मिळाले आहे. (आता हे ऑस्करवाले कम्युनिस्ट/ब्रिगेडी/काँगी असतीलच असे मानू या Wink ) अतिशय संवेदनशिल विषयाला उत्तमरित्या हाताळाले आहे. हा चित्रपट बघताना एक आठवले की या चित्रपटाविरुध्द अमेरिकेत या अजुन कुठे "हिंसक प्रदर्शन, चित्रपटाचे पोस्टर फाडणे, चित्रपटावर बंदी आणण्याची मोहीम चालवणे, फेसबूकवर फॉटोशॉप वापरून चित्रपट पाहू नका चे आवाहन, चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्यांविरुध्द त्यांच्या घरी जाऊन दगडफेक करणे, त्यांना "मॅक्सिको" ला पाठवा अश्या घोषणा देणे, या अभिनेत्यांची जीभ छाटणार्‍याला १ करोड देऊ इ. घोषणा, " मला कुठल्याच बातमीत दिसल्या नाही. उलट सर्वत्र या संवेदनशिल विषयावर बनलेल्या चित्रपटाचे कौतुकच चालू होते. विशेषतः चर्च वगैरे बरेच स्फोटक विषय आहे. (थोड्या फार प्रमाणात विरोध झाला असेल तर ठाऊक नाही)
तरी हा चित्रपट त्याच्या योग्य कारणामुळे गाजला. आणि हे तिथेच होऊ शकते हा विश्वास रुढ झाला.
इतकी स्वतंत्रता आहे म्हणजे तिथे.

मग विचार केला असा चित्रपट भारतीय व्यवस्थेवर जर बनला तर. काय आक्रित घडेल?
दीपा मेहता यांनी "वॉटर" हा चित्रपट निर्माण केला होता. तेव्हा अवघे जग डोक्यावर घेतले होते. काही जण तर मुळापासून हदरले होते. इतका प्रचंड विरोध इतका प्रचंड गोंधळ की एक कलाकृती म्हणून बघितलेच नाही. तरी त्यात फक्त विधवांच्या हलाखीची परिस्थिती इतकाच विषय होता.
स्पॉटलाईट सारखे प्रकरण तर भारतात सुध्दा बरीच गाजली आहे. त्यावर असा चित्रपट भारतात आजच्या परिस्थितीत तर अजिबात बनु शकत नाही. बनवणारा तर सरळ देशद्रोही, गद्दार ठरेल, त्याच्या जीभ छटाईसाठी १ करोड, हात कापण्यासाठी २ करोड अश्या जाहीर खुल्लेआम बोल्या लावल्या जातील (यात सरकार मात्र काहीच करणार नाही हा. कोणी कितीही बोली लावू दे. सरकार ढिम्म.. ) अभिनेत्यांना पाकिस्तान चले जाओ असा नारा दिला जाईल. सरकारी जाहिरातीतून काढून ही टाकले जाऊ शकते, फेसबूक ट्विटरवर मोहीम चालवून असल्या अभिनेत्यांच्या चित्रपटांना बघु नका अशी भावनिक आव्हाने दिली जातील. सीमेवर जवान शहीद होत आहे आनि इथे ही लोक धर्माविरुध्द चित्रपट बनवत आहे. अशी बरीच भक्त्लॉजी फोटोशॉप चित्र व्हॉट्सप, फेसबूक इ. सोशल मिडीयातून प्रसारीत केली जातील. अवघा धुराळा उडवून एक तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अथवा झालाच तर १ आठवडुयाच्या आत बंद पाडला जाईल.

करा विचार

मायबाप,
इथे विषय सरकारची / विद्यापीठ प्रशासनाची / न्यायव्यवस्थेची अधिकॄत भुमीका असा आहे.
तुम्ही मांडलेला विषय सामाजीक आहे. प्रशासकीय नाही. तेव्हा त्यासाठी वेगळा धागा काढा. इथे वेगळा विषय चालु आहे.

Pages