कोरडी चटणी करायची असेल तर बरेचदा मी खोबऱ्याची किंवा मग तीळ+खोबर+दाणे अशी एकत्र करते. आज सकाळी बरेच दिवसांनी थोडी जाडसर अशी फक्त दाण्याचीच केली. आणि मग खाताना आमच्या लहानपणी जवळच राहणाऱ्या एका काकूंची आठवण आली म्हणजे आलीच. त्यांच्या घरी ही चटणी रोssssज असायची. अगदी कमी तिखट करायच्या त्या. ती रोज असण्याची दोन कारणं होती. पहिले, मुलांना कधीही भूक लागली की त्यांना चटणी-पोळी खाता यावी हे आणि दुसरे म्हणजे ते काका 'पाटबंधारे' खात्यात नोकरीला होते, त्यामुळे शेंगदाण्याची पोती 'घरपोच' यायची. असो.
.
सगळ्यांच्याच जिभेवर आपापल्या आईच्या 'हाताची' चव रेंगाळत असतेच. पण तरी असे अनेक पदार्थ असतात जे खाल्ल्यावर किंवा नुसतेच समोर किंवा बोलण्यात आल्यावर एखाद्या विशिष्ठ व्यक्तीची आठवण हमखास येते. म्हणजे अक्षरशः एकेका व्यक्तींची नावं एकेका पदार्थाला कायमचीच जोडली गेलेली असतात.
.
घरी मुलांसाठी वेगळा स्वयंपाक होत नसल्याने बहुतेक सगळ्या भाज्या आम्ही खात असू तरी पुष्कळ लहान होते तेंव्हा 'गवार' माझी नावडती होती. ताटात वाढलेल्या आमटी / कोशिंबीर / कढी कशावर तरी भार टाकून पहिल्यांदा वाढलेली तेवढी संपवायची, इतकेच. एकदा सुट्टीत आत्याकडे गेले होते. बाहेर पटांगणात चिक्कार धुडगूस घालून आल्यावर जेवायला बसले. त्यादिवशीचा स्वयंपाक माझ्या आत्येबाहीणीने, अंजुताईने, केला होता. कडकडून भूक लागली होती. एकीकडे पोळ्या करता करताच तिने ताट वाढले. ताटात गरम पोळी आणि भाजी मात्र गवारीची. भूक तर प्रचंड लागलेली, त्यात 'कुणाकडे गेल्यावर हट्ट करायचा नसतो' हे वाक्य अगदी तोंडीपाठ. त्यामुळे गुपचूप जेवायला सुरुवात केली. पण मग भाजी मात्र खूपच आवडली. तेंव्हापासून आजपर्यंत गवार आवडतेच. आणि तिची जशी किंचित पिवळसर झाली होती तसा कढईतल्या भाजीचा रंग दिसला की लगेचच तिची आठवण पण येतेच.
.
आंबट-गोड आमटी अनेकांच्या हातची खाल्ली. पण आमची एक मामी आहे तिच्या सारखी आमटी होणे नाही. तिच्याघरी मी नेहमीच घासभर पोळी कमी खाऊन मनसोक्त आमटी भात खायचे. मी अनेकदा 'ती' आमटी डोळ्यासमोर आणून करायचा प्रयत्न करते, तरीही तशी चव काही येत नाही. पण आठवण मात्र येतेच.
.
आमच्या बाबांचे एक मित्र होते. त्यांना आम्ही, आमचे आई-बाबा, आणि गावातले बहुतेक सगळेच मामा म्हणायचे. ते श्रीरामपूर पासुन जवळच टिळकनगर शुगर फॅक्टरीवर राहायचे. आम्ही कधीतरी शनिवार-रविवार मामींकडे रहायला जायचो. ताटात काहीतरी गोड हवेच असा मामींचा नियम असायचा. त्यामुळे वेगळे काही केलं नसेल तर त्या साखरआंबा वाढायच्या. इतर सगळे करतात त्याच पद्धतीने केलेल्या त्यांच्या साखरआंब्याची चव काही वेगळीच असायची. इतकी मधुर चव पुन्हा कधीच कुठेच खायला मिळाली नाही. पण कैरी किसून केलेला साखरआंबा आणि मामींची आठवण हे समीकरणच होऊन बसले आहे.
.
आमच्या कॉलनितल्या एका काकुंचे माहेर गुलबर्ग्याचे होते. त्यामुळे त्या बरेचदा चित्रान्न करयच्या. तेव्हा एकमेकांच्या घरी 'चव' देण्याची पद्धत होती. आणि मग नंतर मला आवडते हे कळाल्यावर त्या आवर्जून आमच्या घरी पाठवायच्या. म्हणजे श्रीरामपूरला असे पर्यंत मी चित्रान्न खाल्ले ते फक्त त्या काकूंच्या हातचेच. आता माझ्या करण्यात पण ते नेहमीच असते पण अजूनही त्याला नाव मात्र आंबेकर काकुंचेच आहे.
.
अजुनही बरेच पदार्थ असतील. पण ट्रेनची वेळ होईपर्यंत झरझर सुचले ते हे इतकेच .........
.
आता बाकी सगळ्यांचे ऐकते
.
पदार्थांच्या आठवणी. .....
Submitted by आरती on 12 March, 2016 - 13:34
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचल आणि एक एक आठवणी जमा होऊ
वाचल आणि एक एक आठवणी जमा होऊ लागल्या .
माझ्या आईच्या हातचा डाळ कांदा , हरबरा डाळ आणि कांदा बस्स पण अजून मला ती चव साधता आलेली नाही. तो डाळ कांदा आणि कढी भात. दुसर काही नको.
कढी भात आणि बटाटाच्या काचर्या
दिवाळीत आई प्रचड प्रमाणात चकल्या करत असे. तेंव्हा काही वाटल नाही पण आता जेंव्हा मी करते तेंव्हा कळत कि त्या किती जास्त करत असे. खुसखुशीत पण तेलकट नाही . आणि चव तर अहाहा .
माझी आई खूप खूप म्हणजे खूप सुंदर कुरड्या करत असे. तो चिक ,दुध, साखर आणि उन्हाळ्याची सुट्टी.
कुरड्या घालून झाल्या कि खाली लागलेली खरपुड .
पापडाच्या लाट्या, साबुदाण्याच्या ओल्या पापड्या ह्या सगळ्या पदार्थाच्या आठवणी मला माझ्या आईच्या जवळ घेवून जातात.
माझी मामी बटाट्याची रस्सा भाजी , मटकीची उसळ हिरव्या वाटणाची करते. तिच्या हातची ओल्या हरभराची पालेभाजी . बेसन पिठाची धिरडी . मस्तच
आम्ही लहानपणी माझ्या धाकट्या मामाकडे सुट्टीला जात असू. कुठे तर पिंपरीत . आता गाड्या आल्यापासून सहज जाता येते. पण त्यावेळी ते खूप लांब वाटत असे . २-३ बस बदलून जावे लागे . तिथून परत येताना माझी मामी आम्हाला डबा करून देत असे. अंड्याच लोणचे, मिरचीची भाजी आणि पोळ्या हा मेनू असे डब्याचा . ती चव अजून जिभेवर आहे.
आता लगेच मामींना विचारते त्याची रेसिपी . ती चव नाही येणार पण ती आठवण कायम माझ्या सोबत राहवी म्हणून
आई असताना कधी जाणवलं नव्हते, पण जसे जसे दिवस जातायत तसे कळतंय किती अमुल्य गोष्टी निसटून गेल्यात
बर्याच आहेत . लहानपणी ,
बर्याच आहेत . लहानपणी , आमच्या मजल्यावर आणखी २ घरे होती .
समोरचे कुटुंब म्हणजे एक्दम षटकोनी . आजी , आजोबा , काका-काकू आणि माझ्यापेक्शा वर्शा-दोन्वर्शाने मोठी त्यान्ची दोन मुलं - एक मुलगा आणि एक मुलगी . .
काकू नोकरी करायच्या . त्यामुळे शनिवार- रविवार काहितरी स्पेशल नाश्टा असायचा.
पण बरेचदा आम्ही दोघी बहिणी - माईंच्या हातचा मउ भात खायला सकाळी सकळी जायचो
छोट्याश्या खोलगट ताटलीत पसरवलेला मउ-मउ भात , त्यावर तूप , भाजलेला पोह्याचा पापड आणि एक छोटीशी फोड. गरम गरम भात सकाळी नश्त्याला ओरपायला मज्जा यायची .
त्यांच्याच घरी गुरुवारी दत्तारती व्हायची . मग काका किन्वा तात्या - चॉकलेटी रंगाचे साधे पेढे प्रसाद म्हणून द्यायचे. माई कधीतरी अशाच श्रीखंडाच्या वड्या हातावर ठेवायच्या. काकूंच्या हातची मोठी खुसखुशीत थालिपीठं , मोकळ भाजणी - आईला कधी जमली नाहीत.
बाकी नंतर लिहिते .
आईच्या हातचे मुगाचे वरण, अडे,
आईच्या हातचे मुगाचे वरण, अडे, दही पोहे,
ताई चा बिशी ब्याळी अन्ना, आमटी
काकू च्या हातचा मसाले भात, मेदु वडा सांबार
त्यांनी लक्षात ठेवून मला हे आवडते म्हणून केलेले जास्त महत्त्वाचे . आता हे लिहीताना पण डोळे ओले होतात .
सगळ्यांच्याच आठवणी
सगळ्यांच्याच आठवणी मस्त.
चाळीत आमच्या शेजारी 'मामी' रहायच्या. आमचा अगदी घरोबा त्यामुळे त्यांच्याकडे काहीही बनले तरी आम्हाला हिस्सा असायचा. मामी अगदी सुगरण कॅटेगरीतल्या त्यांचा कोणताही पदार्थ बेस्टच बनायचा.
चहा - मामींच्या हातचा चहा म्हंजे जो जहारीतीत दाखवतात ना अगदी तस्सा दिसायला आणि चव आहाहा! एक घोट प्यायलो की ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा. आई आणि मी त्यांच्यासारखा चहा बनवायला शिकलो पण तस्सा नाहीच जमला कधी.
कांदेपोहे - रोज न चुकता सकाळच्या नाश्त्याला मामींकडे कांदेपोहे असायचे. रोज चवही अगदी सेम. कांदेपोहे मला स्वतःला खुप आवडतात त्यामुळे मी नेहमीच करते, कितीतरी वेळा कितीजणांकडे खाल्ले असतील पण मामींच्या पोह्यांची सर नाही . मामी आम्हा लहानग्यांना कागदावर पोहे देत असतं तो कागदपण आम्ही चाटुनपुसुन खायचो. मोठे झालो तेव्हा प्लेटमधुन देऊ लागल्या पण चव तिचं
इडली, सांबार, चटणी - मामींचा रविवारचा मेनु. त्यांच्याकडे वाट्या असणारे इडलीपात्र होते त्यामुळे त्यांच्या इडल्या गुबगुबीत आणि मुलायम असायच्या. (मामी बुटक्या, जाड आणि गोर्यापान होत्या त्यामुळे आम्ही मामींच्या इडल्या मामींसारख्याच असतात असे बोलायचो) आणि चव पुन्हा एकदा ब्रम्हानंदी टाळी. त्या कधीच मिक्सर वापरायच्या नाहीत, सगळी वाटणे त्या पाट्यावरच करत असतं.
पाटोळ्याची भाजी - अमरावती माहेर असलेल्या मामी ही भाजी तर सुपरडुपर बनवायच्या. आम्हा सगळ्यांना खुप आवडते म्हणुन आईने त्यांच्याकडुन पाटोळ्याची भाजी शिकुन घेतली पण ती' चव कधी आलीच नाही. माझ्या लग्नानंतर आम्हाला मामींच्या घरी जेवण होते त्यावेळस मामींनी मला आवडते म्हणुन सुनेला पाटोळ्यांची भाजी बनवायला सांगितली होती. वहिनींनी पण चांगली बनवलेली पण ती चव जमली नव्हती. मामींचे आजारपण सुरु झालेलं त्यामुळे त्यांनी स्वयंपाक बनविणे बंद केले होते.
डाळ-पालक, कढी-गोळे, उपमा, चाकवताची मुग घालुन पातळ भाजी, डाळवडे, बासुंदी हे अजुन काही मामींनी बनविलेले पदार्थ ज्याची चव अजुनही जिभेवर रेंगाळते आहे.
माझी आई सांगते की ती जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा आमच्याघरी फक्त मच्छी-मटणचं होत असे फक्त सोमवारी वरण-भात व वालाची भाजी. तिला वरील सगळे पदार्थ व इतर भाज्या वैगरे शिकविल्या त्या मामींनीच.
मी बासुंदी शिकले मामींकडुन अगदी डिट्टो, घट्टसर, गुलाबी रंगाची मी केलेली बासुंदी माझ्या सासरी हिट आहे
चकल्या काहीजण अगदी सुरेख
चकल्या काहीजण अगदी सुरेख करतात. माझे मोठे दीर, नालासोपारा राहायचो त्या शेजारच्या वहिनी, आणि आमच्याकडे कामाला येतात त्या ताई. त्या ताईन्कडून मी दरवर्षी चकल्या घेते दिवाळीच्या.
>> बापरे, सशल! कसली कोडी
>> बापरे, सशल! कसली कोडी घालतेस?
गजानन,
अरे नातंच असलं कॉम्प्लिकेटेड आहे .. नवर्याच्या आईची सख्ख्या चुलत बहिण .. मी लिहीतानाच इतक्या चुका करतेय म्हणजे बघ!
"मामे" हे परत चुकून लिहीलं .. "चुलत मावस की मावस चुलत सासुबाई" हे बहुतेक अक्क्युरेट असावं .. (आता परत एकदा एडिट करते .. :हाहा:)
>> बापरे नंदा वगैरे पण मानल्या जातात का?
बी, नवर्या ची मानलेली बहीण म्हणजे माझी मानलेली नणंद झाली ना?
(No subject)
सशल तू मानलेली वैनी म्हणजे
सशल
तू मानलेली वैनी म्हणजे
आरती अनेक आभार..तुझ्या ह्या धाग्यामुळे मला एक आमंत्रण मिळाले आहे
जल्ला, इथे कुणी माझ्या
जल्ला, इथे कुणी माझ्या बायकोच्या हातचं अमुक किंवा नवर्याच्या हातचं तमुक सांगत नाही आहे.
(माझ्या नवर्याला मराठी टाईप करता येत असतं तर माझ्या नावाने चार दोन पदार्थ लिहायला लावले असते.
)
हे घ्या: नवर्याच्या हातची
हे घ्या:
नवर्याच्या हातची मिसळ
नवर्याच्या हातची ताकातली बटाटा भाजी.
माझ्या हातचे पण काही पदार्थ
माझ्या हातचे पण काही पदार्थ चांगले होतात.

अर्थात काही विशिष्ट पदार्थ आई + आजी + बहिण मोनोपॉली रहाणारच .
जल्ला, इथे कुणी माझ्या
जल्ला, इथे कुणी माझ्या बायकोच्या हातचं अमुक किंवा नवर्याच्या हातचं तमुक सांगत नाही आहे>>>>>:फिदी: बाकी नन्तर लिहीते, पण नवर्याच्या ( माझ्या) हातचे पोहे आणी पिठले आवडते मला. माझा नवरा मला एक दिवशी म्हणाला की तुझ्या हातचे पोहे मी लग्ना आधी खाल्ले असते तर तुला नापसन्तच केली असती.:फिदी: मला खरच त्या वेळ पर्यन्त पोहे वा बाकी स्वयम्पाक जमत नव्हता. आता प्रयत्नानी पोहे जमतायत. नवर्याला पोह्यात खूप मिर्च्या लागतात.
माझ्या आईच्या हातची कोबीची भाजी मला आवडते, तसेच आमटी पण आवडते. माझ्या मुलीला तर माझ्या आईच्याच हातचा सान्जा हवा असतो.
माझी धाकटी मामी उत्तम स्वयम्पाक करायची. बर्याच वर्षापूर्वी आम्ही सज्जन गड आणी चाफळला गेलो होतो. चाफळला मन्दिरामागे एक घरगुती हॉटेल होते. त्यात उत्कृष्ट जेवण मिळाले. चवळीची उसळ अजून आठवते तिथली.
आमच्या घरमालकीण काकु पण अतीशय सुन्दर स्वयम्पाक करायच्या. काका गेल्यानन्तर त्या एकट्याच रहायच्या. ( मुले होऊन गेली) एकदा आई बाबा एका लग्नाला गेले, माझी परीक्षा असल्याने मी एकटीच होते. काकुनी जेवायला बोलावले. मस्त भरली वान्गी केली होती. दुसर्या दिवशी भाजी उरली तर त्यात भाजणी घालुन थालीपीठे लावली. काय खमन्ग चव होती. बर्याच आठवणी आहेत.
धाग्याबद्दल धन्यवाद आरती.:स्मित:
हिने केलेली दाल-तडका एकदम
हिने केलेली दाल-तडका एकदम एकमेव. भेंडीची भाजी, गवारीची भाजी, मेथीची भाजी या आमची मुलगी नुसती वाटीभर भाजीच घेऊन फस्त करते (चपाती/भाताशिवाय)
आईने केलेले बटाटा-पोहे (यात कांदा अद्याहृत आहेच), तांदळाची खिचडी (डाळ + तांदुळ + इतर ठराविक भाज्या घालून) एकमेव. भाऊ पल्ल्याडल्या देशी गेल्यावर त्याला या खिचडीची आठवण येऊन येऊन त्याने फोनवरून तशी शिकून घेतली. आणि मग त्याच्या रूमवरही ती 'याच्या आईच्या पद्धतीची खिचडी' म्हणून प्रसिद्ध झाली.
)
साधारणतः आमच्या काकूचा सुक्या भाज्या/पदार्थ (भजी, भरलेली वांगी, भरलेली ढब्बू मिरची, मटण, मासे, अंड्याची पोळी इ.) करण्यात हातखंडा. यात भजी पहिल्या क्रमांकावर. प्रवासाला निघताना तिला "तू मला तू केलेली भजी आणि चपात्याच बांधून दे, अशी फर्माईश नातेवाईकही करतात." तर आईचा पातळ भाज्या/रश्शे/कालवणं करण्यात. यात पोळ्यांची आमटी (पुरणासाठी शिजवलेल्या डाळीच्या पाण्याची) एक नंबरावर. अपवाद. कारल्याची सुकी भाजी. आई काय जादू करते माहीत नाही कारल्यावर पण गूळ अथवा साखर न घालता, तुरीची डाळ घालून कारल्याच्या चकत्यांची अशी भाजी करते की बास!
(अजून बरेच आहेत. त्या-त्या पदार्थाची आठवण येईल तसे लिहीन.
कालच लिहिताना माझ्या मनात
कालच लिहिताना माझ्या मनात विचार आला होता. माझी मुले माझ्या बद्दल काही लिहू शकतील का ?

माझ्या नवर्याच्या हातचे दडपे
माझ्या नवर्याच्या हातचे दडपे पोहे, अंडा बुर्जी आणि चहा मला अतिशय प्रिय आहे.
माझी आई अप्रतिम बटाटे-पोहे, कांदे-पोहे करते, अगदी खमंग चवीचे. पोह्याचा चिवडा पण उत्तम. मला तसा कधीच जमत नाही.
माझी ताई मावशी बेसन भाजुन पिठलं करते तसं अद्याप कोणालाही जमलं नाही.
माझे आजोबा ताकातली उकड खुप छान करायचे तशी कोणाचीच होत नाही. आता आजोबा नाहीत पण उकड केली कि त्यांची आठवण येते.
अजुन खुप मोठी लिस्ट आहे, सवडीने लिहीते.
माझा नवरा कदाचित 'हिच्या
माझा नवरा कदाचित 'हिच्या हातची रसमलई आणि उकडीचे मोदक अहाहा असतात, पण रोजची भाजी मात्र आईनेच करावी' असं म्हणेल
आईच्या एक सहशिक्षिका पावभाजी अप्रतिम करायच्या. रत्नागिरीत तेव्हा एव्हरेस्टमसाले मिळत नसत. त्या पुण्यात आल्या की पाकीट नेऊन तिकडे करायच्या नि डबाभरून पाभा आम्हाला द्यायच्या. घरच्या लोण्यात केलेली भाजी फार मस्त असायची. रंग, लोण्यामुळे आलेला स्निग्ध पोत आणि चव... शेकडो वेळ पाभा करून-खऊनही आमच्याकडे तशी चव नाही आली कधी.
आईने केलेले उकडीचे मोदक. ताईच्या हातची भरली वांगी. बाबांनी एकदाच केलेलं श्रीखंड. अफाट झालं होतं. सायीचं विरजण-ताक-लोणी प्रकरण झेपणार नाही म्हटल्यावर साय साठवून जेमतेम विरजण लावलं नि दही लागल्यावर दिला चक्का टांगून. मग मनसोक्त जायफळ-वेलची घालून श्रीखंड केलं. खाताखाताच माझे डोळे मिटत आले होते!
वर आमसुलाच्या चटणीचा उल्लेख
वर आमसुलाच्या चटणीचा उल्लेख केला आहे, तसे हे थोडे विचित्र वाटू शकेल-
आमच्याकडे मृत्युनंतर तीन दिवस घरी स्वयंपाक केला जात नाही. शेजारी जेवण आणून देतात. तिसर्या दिवशी 'माती'चा कार्यक्रम असतो. त्यानंतर घरी येऊन सगळ्या नातेवाईकांनी आणि पाहुण्यांनी आणलेले जेवण एकत्र करून मातीला आलेल्या सगळ्यांसोबत ते खाल्ले जाते. हे जेवण म्हणजे झुणका आणि भाकरी. दुसरे काही नसते. 'माती'ला जाताना झुणका आणि भाकरीच नेतात. हा झुणका इतक्या अप्रतिम चवीचा असतो की बास. घरी केलेला झुणका असा होत नाही.
कालच लिहिताना माझ्या मनात
कालच लिहिताना माझ्या मनात विचार आला होता. माझी मुले माझ्या बद्दल काही लिहू शकतील का ?
>> खरंच मृणाल. माझ्याही मनात अगदी हेच आलं होतं लिहिताना
नाही लिहू शकणार बहुतेक काही. कारण इतकी नॊव्हेल्टीच राहिली नाही काही. आणि आजी-आईइतकं निगुतीनं मी करतही नाही फ़ारसं.
माझ्या आजीसारखे बेसनाचे लाडू माझ्या आईचे होत नाहीत. माझ्या आईसारखे माझे होत नाहीत. तरी मी केलेले लाडू ’चांगले’ असतात. तर माझ्या आजीचे कसे होत असतील! मांडा त्रैराशिक!
पूनम, डोनट्स बद्दल लिहितील ना
पूनम, डोनट्स बद्दल लिहितील ना मुले
माझी मुलं मॅगीबद्दल
माझी मुलं मॅगीबद्दल लिहितील!

अहाहा! आमची आई केवळ नूडल, मसाल्याचं पाकिट आणि पाणी घालून काय सुंदर मॅगी करते!
माहेरी गेल्यावर मी किचनकडे
माहेरी गेल्यावर मी किचनकडे बघतसुद्धा नाही. चहासुद्धा मला हातात लागतो. आमचे धाकले बंधुराज कधीही चहा पितात आणि त्याचमुळे कधीही चहा करतात.
तर त्यादिवशी उप्पीट हवं असा हट्ट लेकीनं धरला. तोदेखील "मम्मा, तूच कर" मग मम्मानं कसंबसं झिगमिग करत ते उप्पीट एकदाचं केलं. त्यावर लेकबाई "यम्मी" झालंय. आई म्हणाली, हातात धरून मारायची ढेकळं झालीत आणि तुला ते यम्मी लागतंय होत. चांगलं तेलातुपातलं उप्पीट केलं तर नक्को, मम्माच हवी"
मजा येतेय वाचताना. मस्त
मजा येतेय वाचताना. मस्त धागा.
माझी आजी निगुती आणि सोज्वळ आणि सात्विक असलं जे जे काय सुंदर असेल जगातलं ते घेऊनच आली होती. तिच्या हातचा महालक्ष्म्यांचा संपूर्ण स्वयंपाक, मसालेभात, नारळाच्या वड्या, पाटवड्या अगदी फोडणीचा भातही मी विसरू शकत नाही. अन्नपूर्णा.
आईच्या हातचं तिनेच केलेल्या भाजणीचं थालीपीठ, साबु खिचडी, ताकातल्या पालेभाज्या, बटाटेवडे, सांजा आणि सगळ्यात जास्त आवडणारी पावभाजी!! आईच्या हातासारखी पावभाजी मला हॉटेलातही मिळालेली नाहीये. एव्हरेस्ट, सुहाना कोणताही मसाला वापरून चव तीच!
आण्णांच्या हातचं पिठलं, मुगाची खिचडी, गाठीशेवेची भाजी, शिरा जगावेगळं असायचं. तोडच नाही. घमघमाट नुसता.
मिसळ करावी ती माझ्या सासर्यांनीच. हर चीज जीव ओतून करणार. पूर्वतयारीपासून सर्व्हिंगपर्यंत! त्यांचे पुलाव वर्ल्डफेमस होते., रोजची आमटी त्यांच्या हातचीच प्यायची इतकी सवय लागली होती की ते अचानक निवर्तल्यावर कित्येक दिवस आम्ही आमटीच केली नव्हती!
साबांचं काम म्हणजे टीपटॉप. चव नंतर येते जिभेवर पण त्यांचं एकूणच सगळं पदार्थ करणं डोळ्यांनाच आनंद देत जातं. अवघड पदार्थ त्यांना मस्त येतात. पुरणपोळ्या, गूळपोळ्या,करंज्या, हलवा, टोमाटोचं सार, हिरवी चटणी अशा अनेक पदार्थांची चव बेंचमार्क आहे माझ्यासाठी.
माझी ताई एक नवा माईलस्टोन झालीये. खव्याच्या पोळ्या. डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू. बेस्टेस्ट.
१. माझ्या बाबांच्या हातचा
१. माझ्या बाबांच्या हातचा नारळाच दूध घालुन केलेला मठ्ठा.
२. आई करते ते सगळेच पदार्थ
३. साबांच्या हातची अंबाडीची भाजी, चुक्याची चटणी
४. नवर्याच्या हातचे हिरवे पोहे, मटार उसळ
५. सासर्यांच्या हातची पापडाची भाजी, भडंग
माझ्या आजीसारखे बेसनाचे लाडू
माझ्या आजीसारखे बेसनाचे लाडू माझ्या आईचे होत नाहीत. माझ्या आईसारखे माझे होत नाहीत. तरी मी केलेले लाडू ’चांगले’ असतात. तर माझ्या आजीचे कसे होत असतील! मांडा त्रैराशिक! >>> तुझ्या नातीचे बेसन लाडू कसे असतील हा विचार आधी मनात आला
बाकी मलाच डोनट्स, कश्मिरी अंगूर बासुंदी, बेरीचे लाडू, ओट्सचे आप्पे, रसमाधुरी ( हेच होतं ना नाव ? रव्याची खीर आणि तांदळाची घावनं ?? ) इतकं लगेच आठवलं तर तुझ्या लेकाला का नाही आठवणार ?
आरती, धागा वाचायला खरंच खूप
आरती, धागा वाचायला खरंच खूप मजा येतेय.
आशूडी, तुझी पोस्ट वाचून डोळ्यांत पाणी आलं ...का कुणास ठाऊक !
खरंच छान धागा आहे. नव्याची
खरंच छान धागा आहे.
नव्याची पुनव अशी एक असते तेव्हा हरभर्याचे हिरवे सोललेले ताजे दाणे आंबे मोहोर तांदुळाच्या
ताज्या भातात मिसळून दही घालून एक भात असतो नैवेद्याचा तो आई करायची अफाट चव.
तुम्हाला खरे वाटणार् नाही पण मेदू वडे, पुलाव, टोमाटो सॉस हे पदार्थ तेव्हा नव्याने आलेले. ते आई घरी करत असे. तसा पुलाव वडे व सॉस कुठेच खाल्ला नाही. हे नुसते गतकाल विव्हल विचार नव्हे.
रेसीपी लिहून घेतलेली आहे. एक ताई एस एन डीटीत होम सायन्स शिकत होती तिने ती सॉस ची रेसीपी दिलेली. हाइन्झ वगैरे कंपन्यांना चक्कर येइल अशी चव असे. पुढे केचप आले.
आई फराळाचे पण सुरेखच करे. कुरड्या वगिअरे वाळवणे तिने करायची व मी वाळत घालायची, सालपापड्या ओल्याच खायच्या मध्येच.
हलक्या हाताने बनवलेला नाजूक काट्यांचा हलवा. ( संक्रांतीचा)
खाराच्या मिरच्या.
पण बेस्ट म्हणजे आई व मी मिळून यीस्ट घालून डो बनवण्या पासोन व्हेज पिझा बनवला होता.
माझी लुडबूडच. पण तसा खरच परत खाल्ला नाही. मला पण येत नाही.
एका दूरच्या नातेवाईक बाईंनी लाल तिखट घालून साबुदाणा थालिपीठ बनवले होते ते वर्ल्ड बेस्ट.
आईच्याच आळूच्या वड्या. चुलत साबांचे मटण चिकन व फिश फ्राय. साधी मोठी गरम पोळी.
और फिर कभी.
अगो, आजी,आण्णा आणि बाबांच्या
अगो, आजी,आण्णा आणि बाबांच्या आठवणीने काल मलाही कासावीस झालं होतं म्हणून लिहीेलेली पोस्ट टाकलीच नव्हती. भराभर इतकं सगळं भूतकाळात जमा झाल्याचं जाणवून उपरंच वाटायला लागलं.
खरंच छान धागा आहे. नव्याची
खरंच छान धागा आहे.
नव्याची पुनव अशी एक असते तेव्हा हरभर्याचे हिरवे सोललेले ताजे दाणे आंबे मोहोर तांदुळाच्या
ताज्या भातात मिसळून दही घालून एक भात असतो नैवेद्याचा तो आई करायची अफाट चव.
तुम्हाला खरे वाटणार् नाही पण मेदू वडे, पुलाव, टोमाटो सॉस हे पदार्थ तेव्हा नव्याने आलेले. ते आई घरी करत असे. तसा पुलाव वडे व सॉस कुठेच खाल्ला नाही. हे नुसते गतकाल विव्हल विचार नव्हे.
रेसीपी लिहून घेतलेली आहे. एक ताई एस एन डीटीत होम सायन्स शिकत होती तिने ती सॉस ची रेसीपी दिलेली. हाइन्झ वगैरे कंपन्यांना चक्कर येइल अशी चव असे. पुढे केचप आले.
आई फराळाचे पण सुरेखच करे. कुरड्या वगिअरे वाळवणे तिने करायची व मी वाळत घालायची, सालपापड्या ओल्याच खायच्या मध्येच.
हलक्या हाताने बनवलेला नाजूक काट्यांचा हलवा. ( संक्रांतीचा)
खाराच्या मिरच्या.
पण बेस्ट म्हणजे आई व मी मिळून यीस्ट घालून डो बनवण्या पासोन व्हेज पिझा बनवला होता.
माझी लुडबूडच. पण तसा खरच परत खाल्ला नाही. मला पण येत नाही.
एका दूरच्या नातेवाईक बाईंनी लाल तिखट घालून साबुदाणा थालिपीठ बनवले होते ते वर्ल्ड बेस्ट.
आईच्याच आळूच्या वड्या. चुलत साबांचे मटण चिकन व फिश फ्राय. साधी मोठी गरम पोळी.
और फिर कभी.
माझे सासर माहेर नाशिकचे,आइ
माझे सासर माहेर नाशिकचे,आइ औरन्गाबादची.
माझ्या बाबाच्या आइच्या (काकु आजी)आजीचा स्वयपाक म्हणजे स्वर्ग.. ,स्वयपाक जरासा गोडुस,टिपीकल ब्राम्हणी. आम्बट गोड वर्॑ण, हारोळ्या, दहि भात, सगळ्या सणाचा स्वयपाक उत्तम.., घरी जर काही कार्य प्रसन्गाने आचारी आले तर तिच्या देखरेखी खाली सर्व पदार्थ व्हायचे.
आइची आइ (अक्का आजी) तिखट स्वयपाक करायची. भरली वान्गे, भजी, मुगाची खिचडी अहाहा..
आईच्या हातचे पाकातल्या पुर्या, भरीत, आणी सगळा स्वयपाक. साबाच्या हातच्या सुके गुलाबजाम, इडल्या.
तुझ्या नातीचे बेसन लाडू कसे
तुझ्या नातीचे बेसन लाडू कसे असतील हा विचार आधी मनात आला फिदीफिदी>>
अगो तुला पुण्यात पार्किंग मिळू देणार नाही पूनम
तुला तिचे पदार्थ आठवले, मला तिची 'आईच्या हातचं' ही गोष्टच आठवली अख्खी
Pages