निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज या धाग्यालाच वसंताची चाहूल लागल्या सारख वाटतय Happy पलाश, (माझ अतिशय आवडत नाव, इतक की मुलगा झालाच तर त्याच नाव ठेवायच ठरवल होत) चंद्र, रोहिणी, इविता, गाणी, मानुषीताईची फुलं....... सगळंच छान छान Happy

इंद्रा, काजूला भारतातील कोकणपट्टीचे हवामान खुप मानवलेय असे वाटते. पोर्तुगीजांनी जमिनीची धूप थांबावी म्हणून हे झाड भारतात आणले खरे. पण त्यपुढची मेहनत मात्र भारतीयांची. मग ते फेणी बनवणे असो कि काजूगर अखंड निघण्यासाठी शोधलेले तंत्र असो.

माझ्या सुदैवाने मला भारताबाहेर म्हणजे नायजेरिया, अंगोला आणि ब्राझिल इथले काजूगर आणि बोंडे दोन्ही खायची संधी मिळाली. पण दोन्ही बाबतीत भारतीय काजूच उत्तम प्रतीचे आहेत यात शंका नाही.
.

काजूगराची पेस्ट ही अनेक ग्रेव्हींचा बेस असते तर काजू कतलीचे नुसते नावच आपल्या तोंडाला आणते. काजूच्या बोंडाचे भरीतही कुर्ग भागात करतात. ओल्या काजूगरांचे खास तंत्र केवळ आपल्याकडचेच !!!

जिप्सी, मला तुच आठवलास पळस बघितला तेव्हा. फक्त इथे लिहीलं नाही. स्मित+१००

मानुषि ताई काय जादुई फोटु टाकते आहेस, व्वा!

डॉगवुड नाव आहे होय...

आदिजो, कीत्ती छान कविता आठवली तुम्हाला...

ईन्द्रा, काजु व्वा! काय मस्त रंग आहे

दा ,काजु बद्द्ल मस्त माहिती..

काजूच्या बोंडाचे भरीतही कुर्ग भागात करतात >>> वा.. भरीत साठी परत जाव म्हणतो कुर्गला Happy

डाव्या हातात मीठ आणि उजव्या हातात काजूच बोंड.. काय दिवस होते ते.. तोंपासु

सर्व फ़ोटो, कविता, माहिती सारेच छान! Happy
डाव्या हातात मीठ आणि उजव्या हातात काजूच बोंड.. काय दिवस होते ते.. तोंपासु>>>>>>>>.आम्ही तर नुसते सुद्धा हादडायचो. Happy

फ़ो्टोतल्या बोंडूची काजू बी कोणी तरी आधीच लांबवलेली दिसतेय. हा अमचा आवडता उद्योग होता. आणि नंतर तो आकार बदलेला बोंडू कसा वाढतो ते निरिक्षण. :आ.र.बा:

डॉगवूडची फुलं मस्तच! >>+१

सर्व फ़ोटो, कविता, माहिती सारेच छान! Happy

पण मला "मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों" चा अर्थ कळला नाही. Sad

अदिजो...पाड्स माझं अत्यंत आवडतं पुस्तक . शाळकरी वयात त्या पुस्तकाने मनावर जे गारुड केलय ते आजही तितकच ताजं आहे.

बादवे गेले काहि दिवस रात्रीचे आकाश जरा जास्तच निरभ्र वाटते का? मुम्बई मधे सहसा अति प्रकाशामुळे तारे कमी दिसतात, ते ही बघायचेच म्हणून निरखुन बघितले तरच. पण गेले काहि दिवस सहज वर बघितले तरी दहा पंधरा ग्रह तारे दिसत आहेत. आणि चंद्र सुद्धा गोड दिसतोय... Happy

काजू, पलश वाह वाह!!!!!!!
डॉगवुड कसली नाजूक आहेत फुलं.मानुषी मस्तं,.........

बर्क लेक वॉशिन्ग्ट्न डीसी...
२०१५ हिवाळ्यात हे तळं संपूर्ण गोठलेलं पहायला मिळ्लं होतं . बहुतेक इत्थे फोटो ड्कवले होते.
काल फार सुंदर हवा होती. सी गल्स आणि गीज ही थामुळे खूष होते. त्यांच्या खूप अ‍ॅक्टिविटीज चालू होत्या.

सर्व फोटो मस्त मस्त.

काजूच्या बोंडाचं भरीत कोकणातपण करतात. मला नाही फार आवडत. काजू फोटो, माहिती मस्त. माहेरी आहेत काजूची झाडं (आता आहेत का होती माहिती नाही). त्यामुळे खूप आठवणी आहेत. मला बोंड बघायला आवडतात पण खायला नाही विशेष.

सर्वच फोटो आणि माहिती मस्त.
सध्या बागेतले ट्युलिप जमिनीतून इंचभर वर आले आहेत.
एवढ्यात जरा कुठे तापमान ६ - ७ डि. से. झाले की अचानक परत हिमवर्षाव होतो.
हल्ली सकाळी मस्त धुके दाटलेले असते. माझ्या मागे, पुढे चालणारे सगळे त्या धुक्यात गुडूप होताना दिसतात. मीही धुक्यात शिरण्यासाठी नकळत भरभर चालण्याचा प्रयत्न करते पण मला काही यश येत नाही.

मानुषी , ते बहुतेक मॅग्नोलिआ चे झाड आहे. डॉग वूड फुलायला वेळ आहे अजून, अन फुलेही वेगळी असतात.

इथे डॉग वूडचा क्लोझ अप आहे

http://beautifulflowerspict.blogspot.com/2016/01/dogwood-flower-pictures...

जीझस क्राइस्टला ज्यावर लटकवले होते ते डॉग वूड चे खोड होते. त्या दु:खाने ती झाडे फारशी उंच वाढत नाहीत अन फुलांच्या पाकळ्या क्रॉस च्या आकारात असतात अशी आख्यायिका आहे. मॅग्नोलियाच्या पाकळ्यांची रचना आपल्या सोनचाफ्याच्या पाकळ्यांसारखी असते .


हे मॅग्नोलिया आहे ना? हे घरासमोर आहे. मग वरचं वेगळं वाट्त नाही का? एखादे वेळी मॅग्नोलियाच्या वेगवेगळ्या जाती असतील?

मॅग्नोलियाच्या बर्‍याच जाती आहेत. तुम्ही हा शेवटचा फोटो , पूर्ण फुलाचा क्लोझ अप टाकलाय तो सदर्न मॅग्नोलिआ आहे .

सगळेच फोटो सुंदर! मानुषी, मॅग्नोलियाला सुंदर वास असतो ना?
आमच्या घराजवळच्या टेकडीवर एक झाड आहे, ते शेवरीचंच आहे असं मी इतके दिवस समजत होते. जेमतेम ८ - ९ फूट उंची असेल त्याची. हे ते झाडः

From shevari

मागच्या आठवड्यात या झाडाला हलक्या पिवळ्या - ऑफव्हाईट रंगाची फुलं दिसली:

From shevari

From shevari

आणि हे एक बोंडः

From shevari

संध्याकाळच्या वेळेला फुलं मिटलेली होती, दुसर्‍या दिवशी सकाळी परत फुललेली. ही आपली साधी काटेसावर (शेवरी)च आहे का? का सोनसावर आहे? फुलांचा रंग असा कसा? शेवरीची फुलं संध्याकाळी मिटतात का? या टेकडीवर सोनसावरीची २-३ तरी झाडं मी बघितलीत, ती नैसर्गिकरित्या आलेली वाटतात. पण हे झाड निसर्गप्रेमींनी वृक्षारोपण केलेल्या भागात आहे, त्यामुळे वेगळं कुठलं झाड कुणी हौसेने लावलेलं असण्याची पण शक्यता आहे.

वा, सगळे फोटू मस्त.. मानुषी, तुझे फोटो तर कमाल आहेत. आणि ते खरेच मॅग्नोलिअ आहे. डॉगवुडला फक्त चारच पाकळ्या असतात.

गौरी, ते शेफ्लेरा आहे. अर्थात शेफ्लेरा मध्येही खुप उपजाती आहेत. याचे नाव सांगता येणार नाही मला. पण सामान्यनाम शेफ्लेरा म्हटले तरी चालेल. त्या बोंडांमध्ये कापुस असतो पण आपण ज्याला शेवरी म्हणतो तसा नसतो. नव्या मंबईत खुप आहेत ही झाडे.

http://www.maayboli.com/node/40660?page=7 - ह्या धाग्यावर जिइप्स्याने बघ सोनसावर टाकलीय.

मी त्या उडत येणा-या म्हातारीचे झाड अजुन पाहिले नाहीय. माझ्या घरात मे महिन्यात खुप म्हाता-या उडुन येतात, म्हणजे त्याचे झाड आजुबाजुलाच कुठेतरी असणार. पण माझे अजुन लक्ष गेले नाहीये.

साधना, नाही हे शेफ्लेरा नाही. तू लिंक दिली आहेस त्याच पानावर जिप्सीने याचेच फोटो पण टाकलेत, आणि शांकलीने हे पांढर्‍या शेवरीचे फोटो आहेत असं पुढच्या पानावर सांगितलंय!!!

निगवर सर्चची काहीतरी विशेष सोय करायला हवी आता ... सगळी माहिती इथेच आहे ! Happy

मानुषी पुण्याला वेताळ टेकडीवर भरपूर म्हातार्‍या असतात, पण त्या वेलाच्या आसतात. त्या वेलाचं नाव कावळी. ही डॉ. सुरेश शिंदेंची कथा:
http://www.maayboli.com/node/48346

आणि शशांकनी दिलेली कावळीविषयीची माहिती:
http://www.maayboli.com/node/31522

Pages

Back to top