रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोमो मधे जितकं जास्त घाबरु घाबरु वाटणारं, तितकं प्रत्यक्ष एपिसोड मधे 'डोंगर पोखरके उंदीर निकाल्या' टाइप असतं हा आतापर्यंतचा अनुभव... (तिखटाचं मळवट, १२ वाजताना घाबरुन बसलेली रजनीकांत आणि फ्यामेली वगैरे)
त्यामुळे त्या बॅगेत माशाबा चा शाळेतला विविधगुणदर्शनातला एखादा फोटो असण्याची शक्यताच जास्त आहे !

>>माशाबा चा शाळेतला विविधगुणदर्शनातला एखादा फोटो असण्याची शक्यताच जास्त आहे

तिला 'माशाबा' का म्हणताय? मला कळलं नाही.

बाकी प्रतिसाद...अशक्य आहात सगळे. मालिका लेखकाने इकडे डोकवावं आणि तुमच्या सांगण्यानुसार मालिका बनवावी, एकदम सुपर डुपर हीट Biggrin

ठोकळीने चष्मा न घालता, केस मोकळे सोडून आपल्या नॅचरली खत्रुड असलेल्या नजरेने क्षणभर जरी पाहिले तरी सगळे किंचाळतील.

बाकी त्या दिवशी बल्ब फुटल्यावर किंचाळल्याचे काय झाले? तो भाग तसाच ठेऊन पुढचा भाग दाखवला काय?

हो.

बाकी त्या दिवशी बल्ब फुटल्यावर किंचाळल्याचे काय झाले? तो भाग तसाच ठेऊन पुढचा भाग दाखवला काय?<<<<<< सगळे भाग असेच दाखवतात हे लोकं, रात गई …. बात गई

अहो बघा तरी धागा , ब-याच इमोजी मधे कोंबड्याच कोंबड्या आहेत . हा नाईकांच्या घरी कोंबड्या नाsssssय .

सस्पेन्सच्या नावाखाली एपिसोड संपताना आग दाखव, बल्ब फोड, किंकाळी ऐकव असं काहीबाही दाखवत बसतात.
त्या शेवंताच्या आत्महत्येमागचे कारण अगदीच न पटण्यासारखे आहे.

या पेक्षा असंभव ही मालिका मस्त होती. निलम शिर्केने मस्त काम केले होते. पुर्वजन्मीची निलम शिर्के (बयो) उत्तमप्रकारे वठवली होती. तिच्या मरणाचे नि शास्त्री फॅमिलीच्या लोकांच्या मरणाची कारणे सुसंगत वाटायची.

ह्या मालिकेच्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी "असंभव"चे एपिसोड पाहुन घ्यावेत. बरेच काही शिकतील.

भगवती Lol

असंभव उत्तमच होती, प्रेक्षकांसमोर आधी स्टोरीचा अंदाज देऊन पुढे नेली होती, कामं सर्वांनी उत्तम केली. त्या मंजुषा गोडसेनेपण कित्ती छान केलं, तो सीन मला खूप आवडला होता. नीलम शिर्के तिच्याकडे विद्या शिकायला जाते आणि ती सहजपणे तिला थांब, हि भाजी निवडून दे, माझी इतर कामं चालू आहेत ह्या टाईप सांगते, पार गार करते तिचा अविर्भाव.

इथे तो गण्या पण विद्या शिकताना दाखवलाय? पण त्याची विद्या स्मगलिंग नाहीतर हातभट्टी लावण्याची विद्या वाटतेय.

पण ठोकळ्याचे किन्चाळणे बघुन नक्कीच काहीतरी विक्षीप्त असावे असे वाटते. कारण त्याने घाबरल्याचा अभिनय उत्तम केलाय, ठोकळीपेक्षा तो बरे काम करतो.

असंभव उत्तमच होती, प्रेक्षकांसमोर आधी स्टोरीचा अंदाज देऊन पुढे नेली होती, कामं सर्वांनी उत्तम केली. >>>> +१०००००००.
बेरिनानांना बघुन सोपान आजोबा आठवतात. सुहास भालेकर सहीच होते

1500 !

Pages