रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आणि ते नाना काय बोलतात ,,,,,,,,, देव जाणे. काल कोणाला तरी आत ये म्हणत होते एव्हढं कळलं. शेवंता आण्णाचीच ना? का नानांची?>> शेवंता काय वडिलोपार्जित प्रॉपर्टी वाटली कीं काय.. नांनांकडसून अण्णांकडे येवक !! बहुतेक नानांक नानी इल्याचो भास झालो असतलो; म्हणान 'आंत ये' म्हणा होते !!! Wink

इथे तो गण्या पण विद्या शिकताना दाखवलाय? पण त्याची विद्या स्मगलिंग नाहीतर हातभट्टी लावण्याची विद्या वाटतेय.>> पण हाभट्टीला गहु कुठे लागतात? Uhoh

गांवच्या महाशिवरात्रीचो प्रसाद, गजाली नंतर, आधी सांगा
नाईकांचां माडीचां घर बघून ईलास कीं नाय ?

raatriskhel.JPG

आत्तापर्यंतचा अनुभव पाहता बॅगेत कुंकवाचा सडा असेल फक्त, पण बायकोला बघितल्यासारखा ठोकळा आपला जीव खावून ओरडतोय. Sad

रच्याकने माझा मुलगा मला 'बॅगवती'च म्हणतो. मराठीची बोंबच आहे. सगळे इंग्रजाळलेले उच्चार नुसते...हमम्मं.

डोंगर पोखरून काढला चिखल...>> नैतर काय.. उगाच सगळ्यांची डोकी पिकवली इतके दिवस. Uhoh
सगळ्यांच्यात फक्त अर्चिसची रिअॅक्शन योग्य होती. बाकीच्यांनी कैच्याकै केल्यानी.

तो गुरव आज जाम डोक्यात गेला. Angry

आत्ताचा सीन ओके आहे, फक्त ठोकळ्याने बोंब ठोकायला नको होती, ते काय रक्त वगैरे नव्हतं. बाकीच्यांची एक्सप्रेशन्सही ओके. त्यामुळे आजच्या भागाला तरी आमचा पास! Wink

आज ठोकळीचा ठामपणा आवडला.
बॅगेतला चिखल पाहून चिखलभात वाली गानु आजी आठवली.

..

..

सुषमाने दाखविलेला घर हक्काबाबतचा ठामपणा खूपच प्रभावी ठरला. सारे घर भरले आहे, एक भाऊ, त्याची बायको, विधवा मालकीण आणि तो आगाऊ गुरव "या पोरगीला घराबाहेर काढा" असे कोकलत आहेत आणि सावत्र आईने दंड धरताच हिसका मारून स्वतःला सोडवून घेऊन त्या सर्वांपेक्षाही आवाज चढवून आपला हक्क तिने सिद्ध केला आणि तितक्याच तोर्‍यात ती परत वरच्या मजल्यावर गेली...मालकीणीच्या थाटात.

निलिमा सुषमाचा कायदेशीर हक्क कसा आहे आणि तो तिला द्यायलाच पाहिजे अशी जी भूमिका घेते आणि सर्व घटकांना ठामपणे सांगून टाकते त्याबद्दल तिचे कौतुक करायला हवे. त्या गुरवाला खरे तर घरात यायला बंदी करायला हवी. हेच लोक अशा भुताखेताच्या समजुती पक्क्या करण्यात अग्रेसर असतात. निलिमा म्हणते त्यानुसार कमकुवत मनाच्या लोकांच्या भावनांचा असा गैरफायदा घेणारे प्रत्येक गावात असतातच....लिंबू काळा दोरा सुया बिब्बे आणि कोंबड्या घेऊन.

चिखल निघाला काय? छान. मला वाटलं माझी चारोळी फुकट जाणार ;).

'बॅगवती', तुझा मुलगा भगवती सॉलिड Lol

वा मामा, बघतायना. मस्त.

मामा सगळेच गुरव काही नसतात हो तसे.

'गजाली'च्या धाग्यावरचं हें -

प्रत्येक बॅग उघडून तपासायची वरून आलेली ऑर्डरच आहे !
बाँबसाठी नाही हो, आंत चिखल आहे का हें पहाण्यासाठी
!!!
no-argue_0.JPG

अन्जू....

"....मामा सगळेच गुरव काही नसतात हो तसे...." ~ अगदी बरोबर आहे तुझे हे निरीक्षण. वाईट यासाठीच वाटते की अशा मालिकांमधून ज्या रितीने या पात्राला समोर उभे केले जाते त्यावरून बहुतेकांचा समज असाच होत जातो की ही मंडळी अतृप्त आत्म्यांची घरचे यजमान आणि अन्य घटकांना भीती घालत असतात. मी तर असा गुरव कुठेच पाहिलेला नाही (खूप फ़िरलो आहे मी पाच जिल्ह्यांतील शेकडो छोट्यामोठ्या गावातून.....) जो घरातील एखाद्या मुलगीकडे डोळे मोठे करून पाहात "हिला अगोदर घराबाहेर काढा" असा मोठ्या आवाजात हुकूम देतो....तेही तिच्यादेखत....सर्वांना. पटतच नाही हा उग्रपणा.

Pages