रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण ते गाद्या अंथरूणाचे गणीत काय समजले नाऽऽऽय!
माणसे एवढी आणि गाद्या एवढुशाच Wink

आता अगदीच किस पाडायचा ठरवलाय तर दत्ता एकदा चहा मागतो तेव्हा दत्ती एवढ्या मोठ्या पातेल्यात अर्धा कप चहा करते आणि लगेच गाळून देते. चायमधे दुध घालायला विसरली होती की ब्लॅक टी पितो दत्ता देवजाणे! कपात दिसला सुद्धा काळो चा Proud

जिप्सी Lol

काल ऐकू आलं मला नानाचं, कोणालातरी आत ये, अंगणात का उभी आहेस असं काहीतरी म्हणाले.

चायमधे दुध घालायला विसरली होती की ब्लॅक टी पितो दत्ता देवजाणे! कपात दिसला सुद्धा काळो चा. >> अंजली, हो कोकणांत बरेच लोक कोरा चहा (ब्लॅक टी) पितात. पाहुणे आले तरच त्यांच्यासाठी दुध आणतात. Happy

काल ऐकू आलं मला नानाचं, कोणालातरी आत ये, अंगणात का उभी आहेस असं काहीतरी म्हणाले.>> 'गे बाय, आत ये, भायर का उभी हायस? घरात ये, घरात ये. ' असं म्हणाले ते.

अरे काय चाललंय आजच्या एपी मधे..! काल कोण व का किंचाळळं ते दाखवलचं नाही. आणि आज एक्दम काल
झालं ते उतरवायला पुजा? पण झालं काय काल?

ठो' एक्दम नवर्याला दमातच घेते.. 'हो ना माधव?' म्हणुन.. त्याल 'नाही म्हणायला, स्वतःच मत मांडायला काही संधीच ठेवत नाही.. Proud

उद्याचा एपिसोड मध्ये आणखी काहीतरी हॉरर आहे असं वाटतयं. ठोकळा, अण्णी किंचाळतात. Open Mouth Surprised

आज अभिरामला मंतरलेला चहा पाजला, त्याच्या होणार्‍या सासूने. आणि प्रॉपर्टीबद्दल्लचे विचार बदलले त्याचे एकदमच.
Tea

अरे आज कालचा काही संदर्भ दाखवलाच नाही.. >>>

बरेच शेवट सोडून देतायत ते असेच, अगदी शेवटी दाखवतील नैतर फ्लॅशबॅक मध्ये सगळं रहस्य उलगडून
तो पर्यंत आपापली डोकी लढवा Wink

त्यान्च नेहेमी पुढच पाठ आणी मागच सपाट असत.:फिदी: आत कोण नाय इला तरी पूजा घातल्यान गुर्वान. आणी गुर्व कसे बघत होते त्यान्च्या कडे.

आज देवीका बर्‍याच दिवसानी हसली. तिची आय लय गुणाची. अभिरामच्या चहात वेलची कुटुन घालते की बाकी काही देव जाणे. कारण आधी प्रॉपर्टी नको म्हणणारा अभिराम चहा प्यायल्यावर लगेच हक्काची भाषा बोलु लागतो.

उद्याच्या भागात किन्चाळी आहे. बॅगेत काय असेल? लिम्बु-मिर्ची? मान्जर?

Kahich nasnar aahe... ugich aaplya dokyala shot kashala. Day 1 pasun he lok asach karat aahe kashacha kashala sandarbhach nahi... yede nuste....

अरे त्या निलिमाला कोणीतरी लॉजिक शिकवा रे. एकदा म्हणते अभिरामला स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्क आहे. मग तुझ्या मुलाला घेऊ देत की त्याचे निर्णय. मग लगेच म्हणते की माझ्या मुलाबाबतचे निर्णय मी घेते तसे आई अभिरामबाबत निर्णय घेऊ शकतात. आं? मग अभिरामने निर्णय घ्यायला पाहिजे असं म्हणाली होतीस त्याचं काय? ही नक्की सायंटिस्टच आहे ना? का पॉलिटिशिअन आहे?

आज माधवला म्हणाली मी म्हणते म्हणून हो म्हणू नकोस. प्रॅक्टिकली समजून घे. हायला, ही आज्ञा झाली. त्याला घ्यायचं असतं समजून तर घेतलं नसतं त्यने एव्हाना? तरी बरंय माधवला आपल्याला कणा असल्याची जाणीव झाली आज. मला सध्या तरी ते शक्य नाहिये असं म्हणाला चक्क. टाळ्या!!!

त्या भूताने आणखी काही करो ना करो ह्या निलिमाच्या कानाखाली सणसणीत जाळ काढायला हवा.

अभिरामच्या सासूने जे काही चहात घातलं त्याचं पेटन्ट घ्यायला हवं भारताने. ते जे काय होतं ते कोकणात इतर मसाल्याबरोबर बनतं का? Uhoh तिला सापडलं बरं लगेचचहात घालायला. आणि एकदम सट्टाक करून इफेक्ट पण झाला. ह्यावर निलिमा काय म्हणेल?

ती अभिरामची सासू साधं बोलते ते पण भांडायला आल्यासारखं वाटतं. मुलगी मवाळवादी वाटतेय सध्या तरी. आज परत अभिराम म्हणाला माझी परिक्षा झाली की नोकरी मिळेल ना. ह्या बाबाला कोणीतरी वास्तवात आणा रे. परिक्षा झाली की रिझल्ट लागतो. त्यात पास झालं तरी नोकरीसाठी बरेच लोक असतात. जाऊ देत.

आणि फक्त घरातल्या पुरुषांना पूजेला का पाठवलं? बायका डिस्पेन्सेबल आहेत? का बाई भूत आहे म्हणून पुरुषांनाच त्रास होणार आहे? का कुठलंही भूत बाईला काही करू शक़णार नाही हा स्त्रीशक्तीवरचा विश्वास आहे? नानांना पूजेला नाही नेलं ते? ते सगळ्यात जास्त उपदव्यापी आहेत.

ते जे काय होतं ते कोकणात इतर मसाल्याबरोबर बनतं का? >> माका वाटता कसलोतरी अंगारो होतो तो. वेलची सोबत कुटुन तो पण चायत टाकल्यान. लगेचच अभिराम तिका हवा तसा बोलूक लागलो. Uhoh

अरेरे! कथा घसरवली. चहातल्या अंगार्‍याचा सीन दाखवायला नको होता. लेखकच ठोकळीला खोटं पाडायला निघालाय म्हटल्यावर काय बोलणार? बिच्चारी गो आमची ठोकळीबाय ती! Sad Wink

आता चहात कसलं सायंस घुसवणार देव जाणे! पोराला ते तोंड धूऊन घे नाहीतर इंन्फेक्शन होईल म्हणून सांगते. आता तो काय तीन महिन्याचा बाळ आहे जे त्याच्या स्किनला ते सूट होणार नाही काय माहित! Sad

बाकी ठोकळी हल्ली खुप बोलायला लागलेय ह्ं. बामोवरच्या प्रतिक्रियांचा सगळा राग ती घरातल्या सदस्यांवर काढणार असं दिसतंय! Wink

देविका हसली. अभिराम तर भाळलेला आहेच. ती समोर आली की भारी हसतो तो. तिची आई ड्यांबीस वाटते. अभिरामला पाहीलं की एक हजार वेळा ब्लॉक झालेल्या आयडीची आठवण येते. पण हा सभ्य वाटतो.

दत्ता - दत्ती पटत चाललेत. ठो ठो डोक्यात जायला लागले. आजच्या भागात ठोकळीने तमाशा केल्यानंतर ठोकळा ज्या पद्धतीने होयबागिरी करतो त्याची तिडीक येऊन दत्ता आत जातो. ठोकळ्याचा हा अभिनय नैसर्गिक वाटतो.

मला तर मजा वाटली सगळे एकाच खोलीत झोपतात ते बघून.

आम्ही लहानपणी असेच सर्व (फक्त लहान)मुले एका भिंतीपासून ते दुसर्‍या भिंतीपर्यंत चिकटून झोपायचो माजघरात गावी. आणि त्या भुताच्या गप्पा असायच्याच.

बुर्नूस लय दिवसांनी एकला.

--------------
कोकणातील वेगवेगळ्या छोट्या गोष्टी असत्या ना भुता-खेताच्या, चकव्याच्या तर मजा आली असती.
हे जरा बोर होतेय.
------------------------------

Pages