मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
<< पटतच नाही हा उग्रपणा.>>
<< पटतच नाही हा उग्रपणा.>> पुजारी म्हणून देवळात दिसणारे गुरव व मांत्रिक म्हणून वावरणारे गुरव यांत फरक असणारच ! 'उग्रपणा'शिवाय मांत्रिक भुतांना पळवून लावूं शकेल यावर विश्वासच नाहीं ना बसणार लोकांचा !!
बरोबर आहे भाऊ....पण मालिकेत
बरोबर आहे भाऊ....पण मालिकेत दाखविण्यात आलेले गुरवबाबा हे पुजारीच वाटतात चारचौघांच्या घरातील. मांत्रिक म्हटल्यावर त्याचा जो भयावह अवतार असतो तो तर इथे दाखविलेला नाही. म्हणून मुलीला बाहेर काढा अशी चढ्या आवाजात दटावणी देणे अशा पुजारी गुरवांच्या परंपरेत बसत नाही. [मी असे अनेक गुरव पाहिलेले आहेत. यजमानांशी अगदी अदबीने बोलत असतात....मान देतात, घेतातही.]
भाऊकाका
भाऊकाका
हो मला पण ते गुरव न वाटता
हो मला पण ते गुरव न वाटता पुजारीच वाटले.
हो मला पण ते गुरव न वाटता
हो मला पण ते गुरव न वाटता पुजारीच वाटले.
कोणी का असेना, पण निदान त्याच्यामुळे तरी ठोकळी खर्या कॅरेक्टरमध्ये आली हे काय कमी आहे?
ठोकळीचं गणेश च्या बाबतीततलं
ठोकळीचं गणेश च्या बाबतीततलं म्हणणं पटलं..
आख्खो जन्म गेलो मुंबैत, आतां
आख्खो जन्म गेलो मुंबैत, आतां ही सिरीयलय बघतास, तरी पन तसल्या घराचां स्वप्न मिटणां नाय अजून तुमचां ?
चिखल असो का शेण असो मा?>> ते
चिखल असो का शेण असो मा?>> ते शेणच वाटत होते. नाथाच्या बायकोला जमीन सारवतांना बघितले होते, तीच असावी.
मस्तय व्यंगचित्र
मस्तय व्यंगचित्र
मलापण शेण वाटलं, काल रिपिट
मलापण शेण वाटलं, काल रिपिट लास्ट सीन बघितला. काल ठोकळीला कंठ फुटला जामच, आता ती जोमात आणि बाकीचे कोमात. मालिका आता तिच्यावर केंद्रित. काम मात्र नावाला साजेसं, जरा बरं करकी ग.
भाऊकाका सॉलीड
गुरवांचा पेहराव जरी
गुरवांचा पेहराव जरी पुजार्यासारखा असला तरी चेहर्यावरचे भाव शांत, धीरगंभीर नव्हते वाटत. मांत्रिकासारखे वाटत होते.
फारच कमी भागांची वाटतेय
फारच कमी भागांची वाटतेय मालिका. मामांची जानी परत येते आहे कि काय?
अग असुदेत कमी भाग, नाहीतर
अग असुदेत कमी भाग, नाहीतर अजुन गोगलगाय होईल, त्याच विषयातल्या बाकीच्या कथा आणू शकतातना.
जानी नको मग डी ३ आणा.
निलीमाचे चीडणे पटले, घालायला
निलीमाचे चीडणे पटले, घालायला कपडेच नसतील तिला. सुषल्याला दिले की. मग मी जाते, मी जाते करणारच.
हो, ते ही खरच अंजू.
हो, ते ही खरच अंजू.
भगवती.....पोरी, तुझ्या तोंडात
भगवती.....पोरी, तुझ्या तोंडात घी-शख्खर.....जानी येणार असेल तर !
ओ मामानु ती वेळ आमच्या डी ३ची
ओ मामानु ती वेळ आमच्या डी ३ची आहे, जानुबाय ८ ला यायची.
अन्जू, डी३ येऊ दे की आता ८.००
अन्जू, डी३ येऊ दे की आता ८.०० ला . जानीबाईला येऊ देत १०.३० ला.
आठची इतक्या लवकर थोडी
आठची इतक्या लवकर थोडी संपवणार, कोणी बघत नसलं तरी.
माधव ज्या पध्दतीने ओरडला
माधव ज्या पध्दतीने ओरडला त्यावरून मला तर वाटलं की मान मुरगाळलेली काळी मांजरच आहे सुटकेसमध्ये. मग वाटलं काही महिन्यांपूर्वी लोकलच्या महिलांच्या डब्यात कोणीतरी human waste पसरवून ठेवायचा तसला प्रकार आहे. मग वाटलं शेण आहे. मग वाटलं चिखल आहे. होतं काय ते नक्की?
काल निलीमाला सगळे - अगदी सासू आणि माधव सुध्दा - बोलले ते बरं झालं. आता नुसतंच 'अंधश्रद्धा, अंधश्रद्धा' म्हणून बोंबलण्यापेक्षा काहीतरी शोधून तरी काढेल. फक्त तिने गुरवाला खुलं चॅलेन्ज द्यायला नको होतं. पडद्याआड राहून अनेक गोष्टी शोधता येतात.
हे लोक सगळे खाली होते. वर फक्त सुशल्या. पण तिचा ह्यात हात नसणार. एक तर तो वेडा नोकर किंवा नाथा. किंवा तिसरंच कोणीतरी. ह्या वाड्याला एखादं भुयार असणार (अग्निहोत्र मध्ये तो मोरया येत असतो अश्या भुयारातून) आणि तिथून ह्यांच्या चुलत घराण्यातील कोणीतरी येऊन हे करत असणार. किंवा नाना वाटतात तितके आजारी नसणार आणि ते हे करत असणार. पण इथे means and opportunity दोन्ही असले तरी motive कळत नाहीये. काल निलीमाने गणेश तेव्हा घरात नसल्यावर नेमकं बोट ठेवलं तेव्हा रजनीकांतचा चेहेरा कसला पडला. सुशल्या माधवाच्या आईला 'ही सगळी तुमच्या पापाची फळं' असं का म्हणाली. शेवंताने आत्महत्या च केली ना का ह्या लोकांनी तिचा खून केला होता? :ओ:
सुशल्याने घरात राहणं हा तिचा हक्क आहे हे निलिमा ठासून सांगते ते ठिक. पण हा थोडा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाईप प्रकार वाटतो. ती आज नाही तर उद्या मुंबईला निघून जाणार आहे त्यामुळे घरात जे काही महाभारत रामायण होईल ते तिच्या अपरोक्ष. असो. तिने कायद्याचा मुद्दा काढला तो मात्र योग्य.
मध्यरात्रीची वेळ दारावर पडली
मध्यरात्रीची वेळ
दारावर पडली थाप
निलीमा एकटी बोलली
बाकी सगळे चुपचाप
अभिराम सासुरासी गेला
सासूने दिला चहा मंतरलेला
निलीमाची मुंबई ट्रीप चुकली
आणि सुटकेस पाहून माधव तंतरलेला
आणि आता अनेक वर्षांपूर्वीच्या
आणि आता अनेक वर्षांपूर्वीच्या 'हम लोग' सिरियलीच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटी कै. अशोक कुमार सांगत त्या इस्टाईल मध्ये:
छन्नपकैय्या छन्नपकैय्या
छन्नके उपर माईक
गुरवका पर्दाफाश करेगी
मॅडम सायंटीस्ट निलीमा नाईक
बॅग किसने साफ किया? गणेश कहा है? निलिमा ने सांस के लिये खीर बनायी क्या? अगले एपिसोडमे देखेंगे हम लोग.
@स्वप्ना राज अय्यो अम्मा,
@स्वप्ना राज
अय्यो अम्मा, आत्ता तरी बर्रुब्बर रिअॅक्शन दे निलम्मा... नायतर तुमच्च्याच घरातल्या रजनीकांत्तला तुझी कात लावून सुप्पारी देऊ
सुषमाक 'सुसल्या' म्हटलेलां
सुषमाक 'सुसल्या' म्हटलेलां चलणां नाय
गुरवाक गुरगुरल्याशिवाय करमणां नाय
माधवाचो निलीमावर कसलो धाकच नाय
धुमशान घाला, टीव्ही आमचो दमणां नाय II
माधवाचो निलीमावर कसलो धाक ..
माधवाचो निलीमावर कसलो धाक .. निलीमाचाच माधवला धाक होता , तो आताशी कुठे त्यातुन थोडा बाहेर पडतो आहे .
निलीमाने कायद्याची भाषा
निलीमाने कायद्याची भाषा आपल्या संवादातून मांडल्याचे दाखविणे हे अतिशय योग्य होते. मुलींच्या बाजूने कायदा असतो पण अशा वाटण्याच्या समयी थोरले बंधू वा काका लोक मुलींना दटावून वा समजविण्याच्या सुरात काहीतरी सांगतात आणि तिच्या वाट्याला आलेली जमीन आपल्याच हाताखाली कशी राहील त्याकडे लक्ष देवून राहातात. ही मालिका कोकण तसेच देशावर लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे....हे चिन्ह चांगले एवढ्यासाठी की या निमित्ताने अशा वाटणी संदर्भात मुलीच्या बाजूने भक्कम कायदा आहे ते पात्रांच्या संवादातून सर्वांनाच कळावे अशीही त्यामागील लेखक आणि दिग्दर्शक यांची इच्छा असेल.
सुषमा निर्धाराने तेथील सर्वांना आपला मालमत्तेवरील हक्क दाखविते आणि वेळ पडल्यास कायद्याचा हिसका देखील दाखवेन असा जो रुबाब आणते सर्वासमोर ते दृश्य परिणामकारकच झाले....आणि उपयुक्तही.
<<सुषमा निर्धाराने तेथील
<<सुषमा निर्धाराने तेथील सर्वांना आपला मालमत्तेवरील हक्क दाखविते..... जो रुबाब आणते सर्वासमोर ते दृश्य परिणामकारकच झाले....आणि उपयुक्तही >> सहमत. << .सुषमा भूत नसूनही नाईक कुटूंबाला छानच पछाडतेय !!>>, हें आधींच झालेलं माझं मत .
:हहगलो: स्वप्ना_राज , भाऊ
स्वप्ना_राज , भाऊ नमसकर
क्सल्या धमाल पोस्ट्स!!!!
Sagale susaat sutalet.Maja
Sagale susaat sutalet.Maja yetey vachatana.
स्वप्ना, अशोककुमार डोळ्यासमोर
स्वप्ना, अशोककुमार डोळ्यासमोर आले ग!
Pages