रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बाई फालतूपणा चालवलाय या मालिकेत.. त्या सुटकेसला पाहून इतके घाबरले होते सगळे कि मला वाट्ले तो गणेश गायब आहे त्यालच कोणी मारुन मुटकुन त्यात कोंबलय की काय..
पण काय तर चिखल/शेण ... यात येवढे काय घाबरायचे .. त्या ठो२ किंचाळणे जरा अतीच होते

तो गणेश गायब आहे त्यालच कोणी मारुन मुटकुन त्यात कोंबलय की काय..>>>:हाहा:

अरे पब्लिक काय धीट आहे इथे. ठोमा चे किंचाळणे अती वाटते सगळ्यांना.
कपडे भरलेल्या बॅगेत शेण चिखल दिसल्यावर, तेही आता जे काही घरात चाललंय त्या बॅकग्राउंडला तर त्याची भिती / किंचाळणं योग्य वाटलं. मी असते तर किचाळुन बेशुदध पडले असते. Happy

बॅकग्राउंडला तर त्याची भिती / किंचाळणं योग्य वाटलं>> नाही हो. त्याच्या ओरडण्यात त्या सरिताच्या ओरडण्याला सुप्त कांपिटिशन जाणवली Wink त्याच्या जागी मी असतो तर आरडाओरडा न करता कचकचून शिवी घातली असती.

आणि त्याने न किंचाळता एखादी शिवी घातली असती तर मालिकेचं पर्पजच डीफीट होणार ना भौ. तस्मात ठोशा सोडुन सगळे घाबरायलाच हवेत. (हो ठोशा आणि प्रेक्षकही)

ठोकळी Vs गुरव match सुरु होणार आता...
पण त्या माधव ने एक काहीतरी नक्की विचार करायचा नं...कधी म्हणतो विश्वास आहे कधी म्हणतो विश्वास नाही...असा नवरा असेल तर कोणीही बायको वैतागणारच... कधी कधी ठोकळी च्या हिम्मतीची दाद द्यावीशी वाटते...इतक्या सगळ्यांच्या विरोधात एकटी जाते आहे...
अर्थात त्या ठोशाबा ला अभिनय जमला नाही त्यामुळे तिची हिम्मत कमी आणि आगाउपणा जास्त वाटतो...

माशाबा ( ठोकळी ) पहिल्या पासुनच रुड वाटली. चेहेर्‍यावर नको तेवढा रुक्षपणा, इतरान्साठी ( त्यातल्या त्यात खेड्यातले तिचे दीर, जाऊ, सासु आणी नणन्द ) तुच्छता, त्यात मीच तेवढी शहाणी बाकी सारे अनपढ, गवार असा खोचक भाव. तिच्या आवाजात आपलेपणा नव्हताच, होती ती फक्त मग्रुरी. जर आधीपासुनच तिने थोडी नरमाई दाखवुन, परीस्थिती आपल्या हातात घेऊन, सगळ्याना समजावुन आणी समजून घेऊन कारवाई केली असती तर मालीकेला रन्ग चढला असता., पण बाईन्चा पहिल्यापासुनच मला पहा आणी फुले वहा असा शास्त्रज्ञ अ‍ॅटिट्युड होता.

मात्र परवाच्या भागात मला ती आवडली. पहिल्यान्दा तिच्या स्वरात सुरेख चढ उतार जाणवला. गुरवाला बोलते तेव्हा आणी नन्तर गणेश च्या काळजीने जावेला बोलते तेव्हा. त्या दोन सुरात वेगळेपण होते.

मला मात्र मालीका खूपच आवडलीय. वेगळेपण आहे, कोकण आवडते त्यामुळे जास्त आवडली, भावली.

बहुतेक, मालीकेत रहस्य जरा कायम ठेवले तर कलाकारान्चा अभिनय पण खुलेल.

झी मराठीच्या त्या अती सोशीक, देवत्व आत्मसात केलेल्या सुना/ नायिका (जान्हवी, अदु बाळ, स्वानन्दी वगैरे छाप ) पाहुन सासरी अपेक्षा वाढायला लागल्या होत्या. पण आधीच सुन घरात आल्याने तिच्यात जानु, अदु किन्वा स्वानन्दु सन्चारणे शक्य नाही हे सासरच्याना कळुन चूकले असणार.

बरय ही भूताटकी चालू झाली.

आजपासून फुल on ठोकळीवर मालिका केंद्रित होणार. ती ठोकळी सुषमाच्या बाबतीत soft आहे फक्त, ती म्हणाली ते चुकीचं नाही.

पण सुषमा सोडून कोणालाही ठोकळी काडीची किंमत देत नाही. रश्मीला पहिल्या paragraphसाठी मम(१६.४९).

रश्मीला पहिल्या paraसाठी>> जाऊद्या हो. तुम्ही मनाला लाऊन घेऊ नका. असतो एकेकीचा स्वभाव. आपलंच माणूस समजून सोडून द्या Wink

झी मराठीच्या त्या अती सोशीक, देवत्व आत्मसात केलेल्या सुना/ नायिका (जान्हवी, अदु बाळ, स्वानन्दी वगैरे छाप ) पाहुन सासरी अपेक्षा वाढायला लागल्या होत्या.+ १

जान्हवी, अदु बाळ आधीपासनंच होपलेस होते.. स्वानन्दु ने अपेक्शा धुळीस मिळवल्या (आपल्या.. )

जान्हवी, अदु बाळ आधीपासनंच होपलेस होते.. स्वानन्दु ने अपेक्शा धुळीस मिळवल्या (आपल्या.. )>>>> अगदी बरोबर . क्लि Happy .
आता उर्मीकडून काही अपेक्शा ठेवाव्यात का?

आजचा पाहिला एपिसोड.

डॉक्टरला पॅरासिटॅमॉल द्या असं सांगायचं असेल तर कंपाउंडर पण चालल असता. डॉक्टर आश्चर्याने विचारतो तुम्हाला कसं माहीत ? जसं काही कॅन्सरवरच्या दुर्मिळ औषधाचं नाव अचूक सांगितलंय. आणि अमूक तमूक दे म्हटलं की कशाचा ताप हे न बघता इंजेक्शन ठोकणा-या या डॉक्टरचा सत्कार वेताळ टेकडीवरच करायला पाहीजे.

स्टेथॅस्कोप गळ्यात अडकवून अंगाला हात लावून सांगतो की ताप आहे. अरे मग तुला बोलवलंय कशाला ? इंजेक्शन देताना तोंड फिरवून ज्या पद्धतीने तो ते देतो त्याला मेडीकल सायन्सच्या हिस्टरीत तोड नाही. हा कोकणातला लुई पाश्चरच की !

त्याला पाहून कुणाची तरी जाम आठवण आली.

<< आता उर्मीकडून काही अपेक्शा ठेवाव्यात का? >> अपेक्षाभंगाचं आपल्याला व्यसन लावायचंच, हा तर विडाच उचलला आहे सिरीयलवाल्यानी !! Wink

पॅरासिटामाल हे नाव माहीत असण्यासाठी सायंटिस्ट असावं लागतं हे ज्ञान आजच्या भागात मिळाले.
बहुतेक गावातल्या सिक्स सिटर किंवा टेंपोचालकाकडून संवाद लिहून घेतलेले दिसतात.

जाम मजा आली आजचा एपिसोड बघताना. डाॅक्टर सांगतोय इंजेक्शन जुने आहे हिचे (निलीमा) आपले एकच, इंजेक्शन द्या. अरे काय हे? Happy बर ती नंतर म्हणाली एक्सपायरी चेक करा, तो इतका गांगरून गेला कि चेक न करताच इंजेक्शन दिले, वरून विचारतोय दिले का? Biggrin
मला तर अर्चीस गालातल्या गालात हसल्याचा भास झाला.
निलीमाने नवर्याकरिता पेज पण बनवू नाही? (तिच्या द्रुष्टीने) आडाणी जावेला जमेल का सांयटिफीक पद्धतची पेज?
केवढा तो दुस्वास सासरच्यांचा.

डाॅक्टर सांगतोय इंजेक्शन जुने आहे हिचे (निलीमा) आपले एकच, इंजेक्शन द्या. अरे काय हे? स्मित बर ती नंतर म्हणाली एक्सपायरी चेक करा, तो इतका गांगरून गेला कि चेक न करताच इंजेक्शन दिले, वरून विचारतोय दिले का? खो खो>>>>>>हो ना. आर्चिसच्या कपाळावर टिळा लावल्याने इन्फेक्शन होईल असं म्हणणारी नवर्‍याला मात्र त्या बावळट डॉक्टरला इन्जेक्शन द्यायला सांगत होती. डॉक्टरका सीन कुछ हजम नही हुआ. Sad

Pages