Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुम्बई ला जाणं झालं तर
मुम्बई ला जाणं झालं तर अजेंड्यावर ठेवणार. स्पेशल ट्रिप नाही..
बाकी आमच्या इथून गाड़ी बीड़ी चालवून कॅम्पात जाण्यापेक्शा मुम्बईला जाणं जास्त सोपं आहे
थॅन्क्यू नीधप, तिला मी ग्लोबस
थॅन्क्यू नीधप, तिला मी ग्लोबस आधीच सांगितले होते. आता बाकीची दुकाने सांगते .
भाची साडीबरोबर चालतील अशी जॅकेट्स विचारत होती . मी तरी कधी साडी + फॉर्मल वेअर जॅकेट *असे पाहिले / ऐकले नाही. हा नवा ट्रेंड आहे का अलिकडचा?
(* इथे येणारे / राहणारे भारतीय जे ना साडी + कोल्ड वेदर साठीची जॅकेट्स घालतात, तसे नकोय तिला )
हे मी पण पहिल्यांदाच ऐकतेय.
हे मी पण पहिल्यांदाच ऐकतेय. म्हणजे ऑलिंपिक्स वगैरेमधे देशाला रिप्रेझेंट करणारा मुलींचा संघ अनेकदा गणवेशाची साडी + गणवेशाचा ब्लेझर अश्या अवतारात असतो किंवा तत्सम सोडल्यास मी तरी हे पाह्यले नाही.
गुगलून पाह्यले तर काही चित्रे
गुगलून पाह्यले तर काही चित्रे दिसली. अजून एका स्टाइलवर डिझायनर्सचे एकमत झाल्यासारखे वाटत नाहीये.
बोलेरो ते बरोक स्टाइल कट अवे जॅकेटस यातलं काहीही साडीवर वापरून पाह्यलेलं दिसतंय.
मोस्टली त्या त्या साडीसाठी कस्टम डिझाइन्ड असावं असं वाटतंय.
http://blog.brijraj.com/lates
http://blog.brijraj.com/latest-trends-in-sarees-jackets-with-sarees-are-...
मिनी लेंग्थ वाले चांगले
मिनी लेंग्थ वाले चांगले वाटते आहे
माझ्याकडे पिवळा, गुलाबी बाटिक
माझ्याकडे पिवळा, गुलाबी बाटिक न इंडीगो दाबू प्रिंट असे ३ स्कर्टस आहेत गिफ्ट आलेले.... त्यावर कोणत्या रंगाचे टॉप्स चांगले दिसतील? कलर कॉम्बो सुचवा pls...
हन्ड्रेड हॅन्ड्स नावाचे एक
हन्ड्रेड हॅन्ड्स नावाचे एक हस्तकला प्रदर्शन भरलं होतं नुकतंच त्यात मी साड्यांवरची सुंदर जॅकेट्स पाहिली एका जयपूर कारागिरच्या स्टॉलवर. बाकी ठिकाणीही होती. वीव्ह्ज किंवा पारंपारिक कारिगरची प्रदर्शनं भरतात त्यात रेडिमेड ब्लाउजेस ठेवतात त्यांच्याकडेच जॅकेट्सही असतात हल्ली.
सुषमा स्वराजही परदेश दौरा
सुषमा स्वराजही परदेश दौरा कींवा मिटींगला साडीवर जाकीट वापरतात.
या सर्व रंगाच्या स्कर्ट वर
या सर्व रंगाच्या स्कर्ट वर पांढरा किंवा काळा प्लेन स्लीव्हलेस कॉटन शॉर्ट टॉप चांगला वाटेल.इंडिगो ला प्लेन फिका ऑरेन्ज पण चांगला दिसतो.गुलाबी वर थोड़े डेरिंग कॉम्बो म्हणजे पोपटी कॉटन.माझ्याकडे पोपटी आणि फ्यूशिया या कॉम्बो मधला कॉटन ड्रेस आहे, चांगला दिसतो.
प्रिंटेड स्कर्ट वर घालायचे असल्यास टॉप वर उठून दिसणारी एम्ब्रॉयडरी किंवा सेल्फ प्रिंट नको, स्कर्ट च्या प्रिंट ची शोभा वाटली जाते.
तुम्ही कुणी पुण्यात ऑथेंटिक
तुम्ही कुणी पुण्यात ऑथेंटिक हँडलुम सारीज/ड्रेस मटेरिअल साठी चांगलं दुकान सांगु शकता का? जुनं असेल तर जास्त चांगलं. फॅबइंडिया नको. मी जनरली जिथे कुठे जाते, तिकडून आणते. म्हणजे गुजरातमधुन बांधणी, पटोला, मप्रमधुन चंदेरी, महेश्वरी, कलकत्त्याहून कांथा, तात वगैरे..पण पुण्यात एका जागी मिळत असेल कुठे तर बरं होईल.
जॅकेट्स साठी झारा व फॉरेव्हर
जॅकेट्स साठी झारा व फॉरेव्हर २१ बघा. दोन्हीकडे मस्त मिळून जातील. आमच्याकडे दोन्हीतली आहेत. फॉरेव्हर २१ मध्ये लेदर ची पण मिळतील. व इतर ही. पण वेस्टर्न वेअर साठीच. कूव्ह्ज वगैरे ऑनलाइन साइट्स बघा.
नताशा, तुला सोहराब हॉलमधलं
नताशा, तुला सोहराब हॉलमधलं 'Either or' माहित आहे का? तिथे छान हॅन्डलुम साड्या मिळतात. क्लासी पण एक्स्पेन्सिव. ड्रेस मटेरिअल्स नाही मिळत, पण तयार ड्रेसेस ( कुर्ते, कुर्तीज, टॉप्स, ट्युनिक्स, स्कर्ट्स स्कार्वज इ इ) मस्त मिळतात. फक्त कॉटन आणि सिल्क. एकदम हटके कलेक्शन असतं. आता समरसाठी तर तिथलं सॉफ्ट कॉटन एकदम छान.
शिवाय अॅक्सेसरीज कलेक्शन पण आवर्जुन पहा. तिथल्या ड्रेसेसवर त्यांच्याकडचीच हलकीशी ज्वेलरी घातली........ अगदी एखादा पीस, तरी क्लासी लुक येतो. ड्रेसेसचे कट्स आणि डिझाइन्स पण वेगळीच असतात. घातलं कि दिवसभर फक्त कॉम्प्लीमेंट्स गोळा करायच्या.
दोन शॉप्स आहेत त्या प्रिमाइस मधे. एक डेली वेअर साठी आणि एक एक्सक्लुसिव कलेक्शन. गेलीस तर दोन्हीकडे नक्की जावुन ये.
गणेश कला क्रिडामंचला
गणेश कला क्रिडामंचला हॅन्डलुमचे प्रदर्शन सुरु आहे 2 मार्च पर्यंत
पुण्यात, जिन्स वर घालण्याचे
पुण्यात, जिन्स वर घालण्याचे मस्त टाॅप कुठे मिळतील,? लक्ष्मी रोड सोडुन इतर आॅप्शन्स सांगा प्लिज. अगदीच टिनेजर स्टाइल टाॅप नकोयत.
'Either Or' हेच का?
'Either Or' हेच का?
अरे हां.. आयदर ऑर. विसरलेच
अरे हां.. आयदर ऑर. विसरलेच होते. मस्त आहे ते. धन्यवाद मनीमाऊ.
पण.... हे जरा बुटीक टाइप आहे. एखादं मोठ्ठं शॉप आठवतंय का? म्हणजे जिथे ढीगाने कपडे असतील असं?
शब्दाली, २ मार्च म्हणजे आजच की..
अरेच्या हो की जर एक्सटेंड
अरेच्या हो की
जर एक्सटेंड केल्याची काही बातमी दिसली तर सांगेन इथेच
साड्यांबद्दलचे प्रश्न कुठल्या
साड्यांबद्दलचे प्रश्न कुठल्या धाग्यावर विचारणे अपेक्षित आहे?
अंजली, हो तु लिंक दिलीस तेच
अंजली, हो तु लिंक दिलीस तेच आहे 'Either Or'. मी खुप मोठी फॅन आहे.
मार्च आला तरी कलर ऑफ द यिअर
मार्च आला तरी कलर ऑफ द यिअर चा जिक्र नाही ???
गर्ल्स, चला पुढच्या शॉपिंगसाठी नोट करा.
Pantone Color of the Year 2016 - Rose Quartz and Serenity
उत्तम प्रतीची सिल्कची साडी
उत्तम प्रतीची सिल्कची साडी पावसात भिजली व रंग फिसकटले. ती रंगवायला पायोनिअरकडे नेली तर ९०० रु. रंगवायचा खर्च... रंगवायला एवढे पैसे घेतात का? काही स्वस्तातला उपाय आहे का रंगवण्याचा? ती नंतर कदाचित वायाच जाईल अशी भिती वाटतीये. अर्र्र्र्र....धागा चुकला.
ऑफिस च्या वार्षिक पार्टीसाठी
ऑफिस च्या वार्षिक पार्टीसाठी खरेदी करायचीय.(आमच्या इथे हा लग्न सोहळा असल्याप्रमाणे उत्साहाने खरेदी केली जाते, जबॉंग्/फ्लिपकार्ट/फॅशन अँड यु चे कुरियर वाले ओव्हर टायमात असतात )
१. साडी नकोय
२. वन पीस आतापर्यंत ऑफिस मध्ये कधी घातलेला नाही त्यामुळे वनपीस नकोय
३. स्कर्ट नकोय
बोट नेक्/कॉल नेक्/राऊंड नेक किमोनो/पोंचो/एलेफंट स्लीव्ह आणि फॉर्मल काळी पँट्(ही आहे) या कॉम्बीनेशन मध्ये थोडे पार्टीवेअर वाटेल (माफक प्रमाणात झगा मगा मला बघा ) असे टॉप्स सुचवा(फोटो सहित सुचवले तर बेस्ट)
बजेट २०००-२५००.
' cut Toes' किंवा 'Free toes
' cut Toes' किंवा 'Free toes ' नक्की काय म्हणायचं ते माहित नाही, पण असे स्टॉकिग्ज कुठे मिळतील ? पुण्यात शोध शोध शोधले आहेत. मुंबईत कुठे असं शॉप नक्की असेल. कोणाला माहित आहे का, प्लीज?
एक फॉर्मल वन पीस आहे, पण सुपर शॉर्ट आहे. त्यामुळे स्टॉकिंग्ज घालायचेच आहेत. यात अजुन एक पण आहे, म्हणजे नविन फॉर्मल शुज Peep Toes आहेत, त्यामुळे नॉर्मल स्टॉकिंग्ज.... ज्याचे toes बदकाच्या पायासारखे जोडलेले असातात ते वाईटच दिसताहेत. ' cut Toes' किंवा 'Free toes ' स्टॉकिंग्ज कुठे सुद्धा मिळत नाहीएत. आणि ड्रेस घालायचा दिवस जवळ आला आहे. कोणाला माहित असेल तर पटकन सांगा ना. कोणी घेतले आहेत का इकडे इंडियात. नक्कीच मिळत असतील. मुंबईत तर अगदीच. पण ऑनलाइन काही सापडले नाहीत आजवर. मी एकदा युरोपमधुन आणले होते, तेव्हा इथे मिळणार नाहीत असं वाटलं नाही त्यामुळे एकच पॅक (तीनचं असतं) आणलं होतं. आता मात्र सगळे बदकाच्या पायाचे स्टॉकिंग्ज आहेत स्टॉक मधे.
मनी, हे असे म्हणायचेत
मनी,
हे असे म्हणायचेत का?
http://www.amazon.com/Medical-Compression-Hosiery-Stockings-20-30mmHg/dp...
पण हे मेडिकल दिसत आहेत आणि कॉम वर आहेत, इन वर आहेत की नाही माहिती नाही.
वन पीस आतापर्यंत ऑफिस मध्ये
वन पीस आतापर्यंत ऑफिस मध्ये कधी घातलेला नाही त्यामुळे वनपीस नकोय >>> अनु, कधी घातला नाहीस म्हणुनच घाल ना. तरच पार्टीमधे वेगळी दिसशील. नेहमीच तर आपण काळी फॉर्मल ट्राउजर्स वापरतो, मग अॅन्युअल फंक्शनला वेगळा लुक हवा ना.
जर नेहमी वेस्टर्न फॉर्मल / सेमी फॉर्मल्स मधे असशील, तर साडीसुद्धा चांगली दिसेल पार्टीमधे. अर्थातच नेहमीच्या ट्रॅडिशनल नाहीत.
अनु, पर्फेक्ट हेच्च. पण हे
अनु, पर्फेक्ट हेच्च. पण हे जाड असतात. बहुतेक varicose veins साठी असावेत. मेडिकल पर्पज.
हे दिसले होते दुकानात, पण हे नको आहेत. नेहमीचे अल्ट्रा थीन स्टॉकिंग्ज हवेत.
नोकरी बदलल्यावर आणि वजन कमी
नोकरी बदलल्यावर आणि वजन कमी केल्यावर घालेन वन पीस.
(या दोन्ही घटना कधी घडतील ते विचारायचे नाही)
पार्टी मोठ्या हॉटेल मध्ये असते (एरिया५१/मॅरियॉट इ.इ.), वन पीस बर्याच जणी घालतात. (दिवसभर नेहमीचे कपडे घालून हॉटेलात येऊन कपडे बदलतात), स्कर्ट बर्याच जणी घालतात, साडी कोणीच नेसत नाही, नंतर डिजे असतो हे मुख्य कारण आणि साडीचा कंटाळा हे साईड कारण. अजून विचार चालू आहे.चांगला (माझे दोष झाकणारा) वन पीस मिळाला तर तो आणि शीअर लेगिंग्स असे काही करु शकेन.
मनी, चुकीच्या ठिकाणी ओपन
मनी,
चुकीच्या ठिकाणी ओपन असलेले एक मिळाले(इतरेजनः गैर समज नको, टोज ऐवजी हिल्स ओपन असलेले)
http://www.flipkart.com/bonjour-women-s-sheer-stockings/p/itmebg5y9dr7t8...
चुकीच्या ठिकाणी ओपन >>>
चुकीच्या ठिकाणी ओपन >>> मिळायला हवेत खरं तर.
हिल्स ओपन असायचं कारण कळलं नाही, पण असे पुर्वीपासुन असतात. मी लहान असताना लाँग टी बरोबर स्लॅक्स म्हणुन जो प्रकार घालायचे तो प्रकार असाच असायचा. पण हे मला नकोच आहे. बदकाचे पाय दिसायला नकोत म्हणुन क्लोज्ड शुज घालावे लागणार बहुतेक.
Pages