कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅम्पात हनुमान मंदिरच्या इथे डावीकडे जायचे आणि काही दुकाने सोडून एक बोहरी माणसाचे लेसेसचे दुकान आहे. त्याच्याइतकी व्हरायटी कुणाकडेही नाही.

अनु, क्लोवर मधे जा. पुर्वी एकुलतं दुकान होतं बेसमेंट मधलं. आता ३-४ आहेत. आणि सगळ्यांकडे प्रचंड वरायटी आहे. क्लोवर मधे गेलं की हातासरशी अजुन दोन कामं सुद्धा होवुन जातात.

अनु
बाटा च दुकान माहीत आहे का ??? समोरुन अजुन एक रस्ता जातो (क्वार्टर गेटकडे. ) त्याच रस्त्याला डाव्या बाजुला २० पावलावर आहे हनुमान मंदीर.तिथली पाणीपुरी तर किती फेमस आहे.माहीत असेन तुला कदाचित.शेजारी पोलिस चौकी आहे.त्याच्या डाव्या बाजुने गेले की नीधप सांगतीये ते लेस वाल दुकान आहे.

ओक्के, कँपात जाईन एकदा वेळ काढून. लेस लावून देणारा चांगला शिंपी आहे घराजवळ.
कँपात गेल्याला आता ३-४ वर्षे झाली असतील, क्लोव्हर सेंटर चांगले लक्षात आहे. बाकी गोष्टी सापडतीलच.

कॅम्पमधे पु ना गाडगीळ आहे? असेल तर मला माहित नाही. मी आता पुण्यात राहत नाही.
बाटाची शोरूम हा मेनस्ट्रीटवरचा ठळक पत्ता आहे. तिथून बाकीचे सापडेल.

तुम्ही पिवळसर झालेले पांढरे दुपट्टे टाकुन देता का? मला सध्याच स्वतःच्या हुशारीचं फार कौतुक वाटलं. झालं असं -

एका विचित्रच रंगाचा दुपट्टा कुठेही मिळत नव्हता. कुर्ता पॅटर्न असा आहे कि दुपट्टा घेणं मस्ट होतं, मग मी माझ्या क्लोवर मधल्या सरदारजी कडे दुपट्टा डाय करायला गेले. ते अंकल वाट्टेल ते कलर अगदी छान डाय करुन, मॅच करुन देतात. तर तिथे गेल्यावर त्यांनी जे पांढरे दुपट्टे दाखवेले (जे ते नंतर डाय करतात) त्याचं फॅब्रिक अगदीच टुकार होतं. शिवाय नो लेस, नो बॉर्डर. मग मला आठवलं कि माझ्याकडे पिवळट पडलेले जे जुने पांढरे दुपट्टे आहेत ते वापरले तर फॅब्रिक ची ४०-४५ रुपये कॉस्ट वाचेल शिवाय जु न्या दुपट्ट्याला लेस आहे ती पण छान दिसेल ( डाय करताना लेस पण डाय होतेच ना). नुसता डाय करायची किमत खुपच कमी असते.

तर थोडक्यात असं कि जुने पांढरे दुपट्टे फेकु नका. त्यालाच डाय करुन नविन ड्रेसचा दुपट्टा बनवा. अर्ध्या किंमतीत काम होतं आणि अगदी काटेकोर मॅचिंग दुपट्टा मिळातो. शिवाय जुन्या दुपट्ट्याच्या बॉर्डर छान असतील तर अनायसे मिळुन जातात.

तर थोडक्यात असं कि जुने पांढरे दुपट्टे फेकु नका. त्यालाच डाय करुन नविन ड्रेसचा दुपट्टा बनवा.>> हे दुपट्ट्याच्या फॅब्रिकवर अवलंबून आहे. काही ठराविक फॅब्रिकवरच डाय करता येतं.
आमच्या साबा तर गावाकडे जुना रंगित दुपट्टा पण रंगकाट करून त्यावर हवा तो रंग डाय करून वापरतात.

लेस आणि दुपट्ट्याचं फॅब्रिक वेगळं असेल तर एकाच डायमधे घातल्यावर दोन्हीचा रिझल्ट वेगळा येऊ शकतो.

अल्पना, घरी डाय करायचं तर विशिष्ठ फॅब्रिकच लागतं. पण हे डायवाले जनरली सगळी बेसिक कापडं डाय करू शकतात.

मी एकदा एक क्रेप सिल्क ओढणी काळ्या रंगात डाय करुन घेतली होती. नंतर काय दुर्बुद्धी झाली की पहिल्यांदाच ती गणपती विसर्जनाच्या क्राऊड कंट्रोल सेवेसाठी माझ्या DMV युनिफॉर्मच्या पांढर्‍या प्लेन कुर्त्यावर घेतली. पाऊस आला. माझा कुर्ता काळ्या पांढर्‍या बाटिक प्रिंटचा झाला. ओढणीतून काळ्या धारा लागल्या होत्या Sad

अल्पना, कुठल्या फॅब्रिकवर खात्रीशीर डाय करता येतो?

नाही नी, इथे दुपट्टा डायवाले सगळ्या ओढण्या नाही डाय करत. रंगकाट पण नाही करत. पण हलक्या रंगाच्या ओढणीला डार्क डाय करतात. माझ्या बर्‍याच जुन्या ओढण्या डायवाल्याने डाय करता येणार नाही म्हणून रद्द केल्या होत्या.
प्युअर आणि सेमी प्युअर सिफॉनचे दुपट्टे करतात डाय. शिवाय ते एक झुळझुळित फॅब्रिक कसतं ना हलकी चमक असलेलं (पटियाला सलवारला सुटेबल असं) ते होतं डाय.

अल्पना, इतक्यात मी सरसकट सगळ्याच हलक्या रंगाच्या फॅब्रिकला डाय करुन घेतलं आहे. नी म्हणाली तसं प्रोफेशन डाय कर णार्‍यांना जमत असावं.

नीधप, बरोबर आहे. लेस आणि मेन फॅब्रिक शेड मधे फरक पडतो. पण माझ्या ड्रेसच्या लेस कॉटनच्याच (क्रोशे) असतात मोस्टली. त्यामुळे चालण्यासारखाच शेड डिफरन्स असतो.

अश्विनी, डाय केलेल्या कपड्यांचा रंग लवकर जातो, म्हणुन थोडी काळजी घ्यावी लागते धुताना. तसे ही मी दुपट्टे कमीच् धुते.

डार्क रंगात ओढणी डाय केली असेल तर तो डाय काढून देतात म्हणजे मग नव्या हव्या त्या रंगात परत डाय करता येतं. माझ्या साबा बर्‍याचदा एकाच चुन्नीला ५-७ वेळा डाय करुन घेतात. परत तिथे आख्खी चुन्नी न एकाच रंगात न रंगवता दोन रंगात रंगवायची असेल तर मशिन प्रिंट्स प्रमाणे अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने पण रंगवून देतात. जावेनी बर्‍याच चुन्न्या तश्या रंगवून घेतल्यात.

जुन्या ओढण्या बरेचदा नायलॉन किंवा सिंथेटिक जॉर्जेट किंवा तत्सम असायचं. त्याला केवळ इंडस्ट्रीयल डायच बसतात. म्हणून डायवाले नाही म्हणतात.
शिफॉनला काहीही प्रॉब्लेम नाही. रंगकाट म्हणजे डाय रेझिस्ट असं म्हणतीयेस का? पुण्यामुंबईत असं काही नाही मिळत इझिली करून.

रंगकाट - जुना डाय काढणे. अणि ते वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ओढणी रंगवणे म्हणजे बहुदा डाय रेसिस्ट. पुण्या-मुंबईला सोड इथे दिल्लीला पण या दोन्ही गोष्टी करुन देत नाहीत.
तिकडे पंजाबात करतात.

दिल्ली किंवा नॉर्थमधे रंगरेज लोक भरपूर आहेत त्यामुळे तिकडे हे असे उद्योग करून मिळतात भरपूर.
आधीचा रंग काढून म्हणजे डिस्चार्ज सोल्युशन वापरत असतील किंवा ब्लिच. पण ब्लिचने कापड कुजके होत जाते.

इथेतरी एकाही डायला फिक्सर ट्रिट केलेलं नसतं त्यामुळे रंग जातोच.

इतके छान डायर्स मिळतात दिल्लीत?
काल तुळशीबागेत मंडई रस्त्यावर एक केमिकल चं दुकान आहे(तिथे अ‍ॅसिड,घरगुती क्लिनर्,इअतर बरेच काय काय मिळते) तिथे डाय चे रंग पाहिले होते. पण ते घरी वापरणं घातक असू शकतं
पिंपळे सौदागर मध्ये चांगला डायर हवा आहे.
काळी जीन्स होती.असेच एकदा तावातावात बाथरुम मध्ये लायझॉल टाकून गुडघ्यावर बसून फरशी घासली.
गुढघ्याच्या जागी काळ्या जीन्स ला पांढरे डाग, बरं फेडेड म्हणून मिरवण्यासारखे पण नाहीत.ती डाय करुन घ्यायची आहे.

ते वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ओढणी रंगवणे म्हणजे बहुदा डाय रेसिस्ट. <<
डाय रेझिस्ट म्हणजे डाय अडवून डिझाइन करणे.
बांधणीमधे खड्यावर बांधलेला दोरा डाय झिरपायला अटकाव करतो त्यामुळे तिथे पांढरा चौकोन तयार होतो आणि आत रंगाचा बुंदका.
बाटीकमधे वॅक्स ओतून मग त्याच्या भेगांमधे डाय वाहू देतात. वॅक्समुळे जिथे डाय जात नाही तिथे आधीचा रंग राहतो.
जपानी शिबोरी टेक्निकमधे विविध प्रकारे घड्या घालून, त्यावरून ठराविक प्रकारे टाके घातले जातात. जिथे जिथे दोरा असतो तिथे डाय लागत नाही.

गुट्टा नावाचे एक प्रकारचे पातळ चीज असते. कोनने मेंदी काढावी तश्याप्रकारे हे ट्युबमधे भरून त्याने डिझाइन काढले जाते कापडावर. ते सेट व्हायला वेळ दिला जातो आणि मग उरलेल्या भागात हवा तसा डाय टाकला जातो. डाय अ‍ॅक्टिव्हेट होऊन, हवा तसा चढला कपड्यावर आणि जास्तीचा काढून टाकला की कापड सुकवतात. मग गुट्टा काढून टाकायला ड्राय क्लीन करतात. बाटीक सारखेच.

अगं दिल्लीत प्रत्येक छोट्या मार्केटात १-२ डाय वाले असतातच. ओढणीच्य दुकानांमध्ये पण रंगीत ओढण्या कमीच मिळतात, पांढर्‍याच असतात सगळ्या. अपल्याला हव्या त्या पॅटर्न /लेसची ओढणी निवडायची आणि मग तो दुकानदार हव्या रंगात डाय करून देतो ओढणी.
मी ३-४ वर्षांपासून हे असले कुटाणे बंद केलेत. जिथून कपडे शिवते ती बुटीकवाली पण याला मॅच ओढणी दे असं सांगितलं की डाय करून देते. त्यामूळे आता सरळ तिलाच सांगते ओढणी किंवा सलवारचा कपडा मॅच करून द्यायला. Happy

चंदीगढला तर सरसकट पांढरा दुपट्टाच असतो सेटमधे. मग ड्रेस खरिदला कि आपल्या चॉइस प्रमाणे तो डाय करुन देतात एका दिवसात. हवा तसा - सिंगल किंवा मल्टी कलर्ड. लेस लावणं वगैरे जादा चार्जेस घेवुन करुन देतात.

हल्ली पुण्या मुंबईत सुद्धा ओढणीला प्लेन डाय रंगाप्रमाणे मॅच करून देणारे आहेत. पण हे डिझाइन बिझाइन नाही करून देत कुणी.

गुट्टा रेझिस्टच्या मेथडने मी २ मस्त सिल्कचे चौकोन बनवले होते ग्रॅड स्कूलमधे फॅब्रिक सरफेस टेक्निकच्या एकेका सेमिस्टरमधे.
काश माझ्याकडे हा सगळा सेटप टाकायला जागा + पैसे असते. सिल्कवरची पेंटींग्ज एवढेच केले असते. Happy

डाय ची बरीच चांगली माहिती मिळतीये.मी फक्त एकदाच शिफॉन चा ड्रेस डाय करुन घेतला आहे.तो आहे तसाच आहे अजुन तरी.

Pages