कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म मा, जाड मीठाच्या पाण्यात अर्धा-एक तास ठेव भिजवुन कपडा. फक्त जाड मीठच टाकायचं. डिटर्जन्ट नाही. एखाद तासाने कपडा नेहमी साबणाने धुतेस तसा धुवुन टाकायचा. कडक उन्हात वाळवु नकोस, रंग फिका पडेल. दुसर्‍या धुण्यापासुन नेहमीची प्रोसेस. मीठाच्या पाण्याची गरज नाही.

कोटन कोटेज चे कपडे काही महिन्यानन्तर पोछा होथत असा अनुभव आहे. शिवाइ गेलि कित्येक वर्षे त्यान्चे डिजाइन एकसूरि वाटते. ( नेहेमी जात असल्यामुळे असेल कदाचित)

पेसे तर वाया गेलेच आनि दुपट्टाचा रन्ग लागून कुर्ताही.

मी तर गेलि कित्येक वर्षे फ़क्त चक्कर टाकून येते काहीच विकत घेत नै.

पटियाला सलवार आणि त्यासोबत दुपट्टा कुठे चान्गला मिळेल?
बरीच वर्षे मी पेन्टालून्स मधील (ब्रेन्ड ? रन्गमन्च ) वापरीत असे. सध्या तिथले कलेक्शन पण बेकार वाट्ले.
कोटन कोटेज मधील पतियाला बोन्गा वाट्ले. शिवाइ रन्गाचा क्वालिटी बाबत शन्का असलेमुळे घेणे नाइ.

दादर परेल आणि आसपास एरिया मध्ये एखाद मस्त दुकान माहीत असल्यास सान्गावे.

योडी & नी, थँक्स.

मेघा, 'बीबा'च्या पतियाला छान आहेत फिटिंगला. खुप महाग आहेत. पण आता का शोधते आहेस? Out of fashion झाल्या ना आता.

तरीही पुण्यामधे कोणी पतियालाचं फॅन असेल तर - -

B T कवडे रोडवर सेसिलियाच्या बाहेर जो कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे तिथे एक ' राणाज' नावाचं एका पंजाबी बाईचं रेडिमेड कम टेलरिंग शॉप आहे. ती ४५०Rs मधे पतियाला देते ( बाहेर कमीत कमी ७५०/८००Rs किंमत आहे). आपण जर कापड दिलं तर १५०Rs शिलाई. फार मस्त शिवते पतियाला. एकदम टिपिकल पंजाबी स्टाइल. बाकी सगळं बिघडवते हमखास Wink पण पतियाला मात्र अल्टिमेट. शॉर्ट कुर्तीज खाली पतियाला छान दिसते.

ओह हा धागा वर आलाय म्हणून लगे हातों विचारतेय तुम्ही लोकं तुमचे स्कार्फ्स धुवायला काही वेगळं तंत्र वापरतात का की नेहमीची (अमेरिकन) लाँड्री? मला वाटतं धुतल्यावर त्यांचा ओरिजिनल चार्म राहात नाही. माझ्याकडे बरेच स्कार्फ्स आहेत आणि इथे लागतात पण. काही टिपा?

पतियाला फॅशन जुने झाले असले तरी वापरायला बरे पडतात.
लेगिंग शॉर्ट आणि स्लिट वाल्या कुर्त्यांवर घालता येत नाहीत(म्हणजे घालता येतात, पण कुर्ता उडाला किंवा जिने चढता उतरताना पाय दिसतात.)
लेगिंग ची फॅशन लवकरात लवकर जाऊन इलॅस्टिक वाल्या नॉर्मल सलवारींची फॅशन यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे Happy

वेका, तुमच्याकडे फारसा घाम येत नसेल तर ड्रायेल शीटस वापरून घरगुती ड्राय क्लिनिंग कर ना.

पतियालाची फॅशन गेलेली असली तरी ती फक्त मोठ्या शहरात, ठराविक वर्तुळांच्यात.
मी अजूनही शिकवायला जाताना पतियालाच वापरते. लेंगिंग्ज/ चुडीदार वापरलेच तर कुर्ता चांगला लांब असेल असे बघते. मी शालेय मुलांना शिकवत नाही. माझे विद्यार्थी जनरली २०-२२ किंवा अधिक या वयोगटाचे असतात आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या छोट्या शहरागावातून किंवा खेड्यापाड्यातून आलेली असतात.

लेगिंग आणि शॉर्ट कुर्ता इ.इ. टिचींग मध्ये किंवा कोणत्याही प्रेझेंटेशन च्या दिवशी वापरणे जरा कठीण पडते.
(मुलं किंवा कोणीही वयाचा ऑड्यन्स शिकवणार्‍याला सर्व अँगल ने पाहतो आणि बराच वेळ पाहतो.) त्यात त्या प्रेझेंटेशन चा व्हिडीओ बनून अमर होणार असेल मग तर बघायलाच नको Happy

एक्झॅक्टली!
कॉर्पोरेट सेक्टरच्या प्रेझेंटेशन्सचं फारसं माहित नाही मला पण आमच्याकडच्या बिझनेस प्रेझेंटेशन्स, पिचिंग्जना चुडीदार/ लेगिंग्ज चालून जातात.

चुडीदार्/लेगिंग्स मध्ये वाईट काहीच नाही, त्यावर शॉर्ट् आणि स्लिट वाला कुर्ता घालून वेड्यावाकड्या हालचाली(उंच हात करुन लाईट्चे बटन दाबणे, ऑड्यन्स कडे पाठ करुन वाकून प्रोजेक्टर ची कॉर्ड कनेक्ट करावी लागणे इ.इ.) करायला लागण्यात आहे.

माहितीये की.
पण मुळात चुडीदार/लेगिंग्ज घालताना कश्या प्रकारचा कुर्ता घालायचा याचा सेन्स पाहिजे ना. तो बहुतेकदा नसतो.

मी माझ्या फिल्डमधली पिचिंग्ज म्हणतेय. ती टिपिकल कॉर्पोरेट सेक्टरपेक्षा वेगळी असतात. आणि जनरली आमच्याकडे ड्रेसिंग सेन्स हा एक मस्ट प्रकार आहे. नसेल तर हायर अ स्टायलिस्ट हे पण कॉमन आहे.

पिचिंग म्हणजे काय?
हो खरेच. शॉर्ट मोठे स्लिट कुर्ता लेगिंग वर न घालण्याचा सेन्स बहुतेकांकडे असतोच.
हायर अ स्टायलिस्ट? असे स्टायलिस्ट (परवडणेबल पैशात)विकत मिळतात का?
लॉ कॉलेज रोड वर एका गल्लीत पर्सनल स्टायलिस्ट अशी पाटी आहे. तिथे डोकावून यावे असा मला बर्‍याच दिवसापासून मोह आहे Happy

खरं तर चुडीदार पेक्षा लेगिंग्ज जास्त कंफर्टेबल असतात. खाली उठबस करताना चुडीदार फाटु शकतो. पुर्वी माझा तरी त्यासाठीच डिसकार्ड करावा लागायचा. लेगिंग्ज वावरायला आणि उठाबसायला खुप मस्त. अर्थात विथ T&C.

T&C खुप आहेत, पण एक अगदी महत्वाची म्हणजे पुर्ण ड्रेस अप करुन झालं की ३ मिनिटं वेळ काढुन एकदा आरशात स्वतःला नीट बघावं. साइड प्रोफाइल, पुढुन, मागुन एक नजर तरी टाकायलाच हवी. ड्रेसिंग मधले किती तरी घोटाळे घरच्या घरीच निस्तरले जातात. जर आरशात पाहिलं तर जाड/बुटके पाय असणारी मुलगी शॉर्ट कुर्त्या खाली लेगिंग घालणारच नाही. आणि स्कीन कलर घालणार्‍या बायकासुद्धा दिवसभर कॉन्शसली वावरतील Lol

मी परवाच ३ अनारकली कुर्ते घेतले लेगिंग्जवर घालायला. मस्त मिळाले. मला कॉलेजसाठीच पाहिजे होते. प्रेझेंटेशनसाठी आणि इन जनरल वाप्रायला.

मी २ शॉर्ट कुर्ते घेऊन आता पस्तावले. Sad अगदी कमी वावर, नुसतं बसून मज्जा करायची एखादी छोटीशी/ मैत्रिणींची पार्टी असेल तर घातले जातात. आणि घेतले तेव्हा मी बारीक होते. आता मलाच नाही आवडत.

मी तर नॉर्मल सलवार कमीज घालते तेव्हाही कमीज चे साईड कट्स लांब ठेवत नाही. पूर्वी बाईक चालवायचे तेव्हा मोठ्या कट्सनी फार गोची व्हयची. आणि कमीजचा कमी घेरही अडचणीचा वाटायचा. व्यवस्थित घेर, फार मोठे नाहीत नि अगदी वीतभर नाहीत असे साईड कट्स, आणि पूर्ण ओढणी असाच वेष मला कायम कंफर्टेबल वाटलाय. शॉर्ट कुर्ते काय विचार करून घेतले हेच नवल.

शॉर्ट मोठे स्लिट कुर्ता लेगिंग वर न घालण्याचा सेन्स बहुतेकांकडे असतोच. >>> नाही. उलट नसतोच. मी माझ्या ऑफिसमधे आणि रस्त्यावर सुद्धा पाहिलं आहे. कदाचित आवरुन झाल्यावर आरशात पहात नसतील.

प्रज्ञा फार वापरले नसतील तर पतियाला घेवुन त्यावर वापरुन टाक. पतियालावर शॉर्ट कुर्ता छानच दिसतो. किंवा मग आल्टर करुन अजुन शॉर्ट कर आणि पॅन्ट्सवर वापर. आपल्याकडे फॉर्मल्स कमी आणि देसी फॅशनचे टॉप्स जास्त घातले जातात ट्राउजर्सवर. तुझ्या कुर्त्याचा तसा उपयोग करुन संपवुन टाक.

अगं एखादा प्रोजेक्ट पिच करणे इन्व्हेस्टर्स किंवा को प्रोड्यूसर्ससाठी. पिचिंग करणारा डीरेक्टर किंवा प्रोड्यूसर असू शकतो.

हायला भार्री आयडीया!

मी मुळात ते जनरल वापर म्हणून नाहीच घेतले, जरा (माझ्या मानाने Wink ) स्टयलिश म्हणून घेतले त्यामुळे कमीच वापरलेत. करून बघते.

प्रेझेंटेशन/ मिटींग असो वा नसो, चुडीदार/ लेगिंग्जवर शॉर्ट कुर्ते घालणार्‍यांना सा.न.! <<
असं नको म्हणूस.. रोज जाता येता किती सा न घालशील? Wink

आता प्रिंटेड अ‍ॅण्कल लेन्ग्थ लेगिण्ग्स आलेत. अर्थात ते आधीच आले असणार, मी गेल्या आठवड्यात हायपरमध्ये पाहिले. लेकीने घेतले.

मी याआधी पाहिलेले ते सगळॅ वाघाच्या आणि बिबट्याच्या कातड्यासारख्या डिजाईनचे होते, जे लेक कायम नापसंत करत होती. यावेळी हायपरमध्ये प्रिंटेड बुट्टी आणि रंगित भुमितीय आकृतीचे लेगिंग पाहुन जरा बरे वाटले. आणि घोट्याएवढ्याच लांबीचे असल्याने खाली चुन्या बिन्या प्रकार नाही. खुप छान दिसतात, मला तरी आवडले. अर्थात माझ्यासाठी नाही घेतले. माझ्याकडॅ अनारकली सदृश्य ड्रेस नाहीय सध्या.

अनू, जीन्स आणि कॅज्युअल शर्ट + खाली स्पोर्ट शूज किंवा लाँग एथनिक स्कर्ट + स्पगेटी स्ट्रॅप + स्टोल + एकाच हातात माळा वगैरे अश्या वेषात पण होतात प्रेझेंटेशन्स आमच्याकडे. शॉर्टस, टॅटर्ड जीन्स वगैरे नो नो असते. जनरली लेगिंग्ज + कुर्ता इतके बोरींग कपडे माझ्यासारखीच जनता घालते. Proud
हायर अ स्टायलिस्ट हे थोड्या वेगळ्या लेयरसाठी होते कॉमनली.

Pages