कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंचवीस, तीस हजार! हे आकड्यात लिहिताना मध्ये योजलेला स्वल्पविराम त्या पंचवीसला 'लाखमोलाचे' बनवून जाऊ शकतो Happy

येस्स नी! मस्त आयडिया! पण साड्या काठापदराच्या आहेत! त्यांचे अनारकली शिवता येतील का? आणि मी जाड कॅटेगरीत मोडते. मला बरे दिसतील?

शिफॉन /नेट च्या साड्यांचे अनारकली जास्त छान वाटतिल. सिल्कचे तितकेसे चांगले नाही दिसणार.
मी खूप जुन्या एका प्लेन साडीचा बनवला होता दोन वर्षांपूर्वी.

मलाही तसंच वाटंतय. लाँग कुर्ता आणि चुडिदार आणि त्याबरोबर नीधप ने सांगितलेला दुपट्टा, असा सध्या विचार आहे. साडी नेसण्याचं प्रमाण फार कमी आणि साड्या फार जास्त अशी गत झाली आहे सध्या!

साध्या साडीचा शिवून पहा. म्हणजे खास नाही वाटला तरी जास्त काही वाया जाणार नाही.

पूर्णपणे शुद्ध रेशीम धागा, त्याचे हातमागांवर पारंपरीकरित्या विणणे, त्यातली खरी जर (चांदी वा सोने), त्यातली कलाकुसर या सगळ्यांची किंमत असते.
वस्त्रकला ही आपल्याकडची अत्यंत महत्वाची पारंपरिक कला आहे. मागांवरची विविध प्रकारे केलेली वीण, धाग्यांचे कॉम्बिनेशन व त्यातून तयार होणारी नक्षी, कपड्यांवर केलेले भरतकाम, रंगकाम या सगळ्या बाबतीत भारतभरात प्रत्येक प्रांतामधे विविध शैली विकसित झालेल्या आहेत.
हे करणारे पारंपरिक कारागीर अस्तंगत होऊ नयेत, या कला जगाव्यात हे महत्वाचे आहे आणि त्यासाठी ओरिजिनल वस्तूला योग्य ती किंमत मिळणे महत्वाचे आहे.
जागतिक बाजारपेठेमधे हाताने केलेल्या वस्तूंचे वेगळे स्थान आणि महत्व आहे. हाताने केलेल्या वस्तूमधे कष्ट अधिक, वेळ अधिक लागतोच त्याबरोबरच त्याच कारागीराने केलेली एक वस्तू दुसर्‍या वस्तूसारखी असू शकत नाही. या कारणांमुळे हाती बनवलेल्या वस्तूंची किंमत कारखान्यात एकसारख्या बनवलेल्या वस्तूंपेक्षा खूप जास्त मानली जाते.

तस्मात ज्या किमती आपल्याला अशक्य वाटतात त्या योग्य असू शकतात.. असो..

हे मात्र खरं आहे. कारागिराने केलेल्या वस्तुची खरी किंमत पैशाने मोजता येत नाही. केवळ 'महाग' आणि 'स्वस्त' - या परिमाणात तोलणं योग्य नाही

>>>हे करणारे पारंपरिक कारागीर अस्तंगत होऊ नयेत, या कला जगाव्यात हे महत्वाचे आहे आणि त्यासाठी ओरिजिनल वस्तूला योग्य ती किंमत मिळणे महत्वाचे आहे.
जागतिक बाजारपेठेमधे हाताने केलेल्या वस्तूंचे वेगळे स्थान आणि महत्व आहे. हाताने केलेल्या वस्तूमधे कष्ट अधिक, वेळ अधिक लागतोच त्याबरोबरच त्याच कारागीराने केलेली एक वस्तू दुसर्‍या वस्तूसारखी असू शकत नाही. या कारणांमुळे हाती बनवलेल्या वस्तूंची किंमत कारखान्यात एकसारख्या बनवलेल्या वस्तूंपेक्षा खूप जास्त मानली जाते. <<<

ह्यातले कोणतेही कारण 'ती वस्तू अतिशय उठून व अतिशय वेगळी दिसावी' ह्याच्याशी निगडीत नाही.

>>>तस्मात ज्या किमती आपल्याला अशक्य वाटतात त्या योग्य असू शकतात..<<<

त्यामुळे, कारखान्यात बनवलेले जर दिखाऊरीत्या भावखाऊ दिसत असेल तर ते कारागीर जगणे, ते अस्तंगत न होणे, त्यांचे कष्ट, वेळ, एकमेवाद्वितीयता ह्या कारणांचे महत्व खरे तर राहायलाच नको.

मग असे का?

>>>हे मात्र खरं आहे. कारागिराने केलेल्या वस्तुची खरी किंमत पैशाने मोजता येत नाही. केवळ 'महाग' आणि 'स्वस्त' - या परिमाणात तोलणं योग्य नाही<<<

सावळ्या कांतीच्या जोडप्याने झावळ्या रचून बांधलेले झोपडे बल्क प्रॉडक्शनच्या तीन बेडरूम्स हॉल किचन फ्लॅटपेक्षा अधिक किंमतीत विकले जायला हवे मग!

व्हाय दीज डबल स्टँडर्ड्स?

सिल्क च्या साड्यांचे मस्त घेरदार स्कर्टस काय मस्त दिसतील..... तशी पण हल्ली फ्याशन आहेच....किंवा त्याची हाफ साडी ही बनवता येईल मिक्स अँड मॅच करुन...

शिफॉन /नेट च्या साड्यांचे अनारकली जास्त छान वाटतिल. सिल्कचे तितकेसे चांगले नाही दिसणार.>>>>>>>>>>>> अल्पना सिल्क साड्यांचे अनारकली खुप मस्त दिसतात.... पण शिवणारा तितकाच कुशल असला पाहीजे..... तरच ते चांगलं दिसेल प्रकरण....आता लाँग स्ट्रेट टॉप्स विथ चुडीदार, अनारकली विथ पलाझ्झो पँट्स, अनारकली विथ नॉर्मल सलवार हे इनथिंग आहेत अनारकली विथ चुडीदार जरा जुनी झालीय फॅशन...

पण अनारकली विथ नॉर्मल सलवार / पलाझ्झो पँट्स हे जाड व बुटक्या मुलिंना तितकेसे बरे दिसत नाहीत...उंच , बारीक ( कमी उंचीच्या पण बारिक ) अशांना छान दिसतात....पण ते नीट कॅरी केले तर....नाहीतर खुप बेकार दिसते....

सिल्क साड्यांचे अनारकली खुप मस्त दिसतात ....पण साडी जर जुनी असेल तर शिवणीत विरतात. सिल्क चे कापड खूप नाजूक असते. आणि अनारकली ला शिवण खूप असते. त्यामुळे विचारून घे.
तसेच त्यांना अस्तर पण चांगले लावावे लागते . त्यामुळे ४ आण्याची कोंबडी १२ आण्याचा मसाला अशी गत होवू शकते ( हा सगळा स्वानुभव आहे)
काही हेवी साड्या प्लेन ड्रेस वर ओढणी वेस्टर्न वेअर वर स्टोल अशा पण वापरता येतात.

आमच्याकडे सध्या लांब स्ट्रेट टॉप विथ चुडीदार/ पलाझो पँट्स /घोट्यापर्यंतच्या उंचीचे नॅरो बॉटम सलवार अशी फॅशन आहे. (त्यातली ती आखूड सलवार अगदीच विचित्र दिसते असं माझं मत.)

मी घेतलाय शिवुन साडीचा अनारकली रादर अम्ब्रेला... मला आवडला... जरीच्या साड्यांच काय करायच हा एक प्रश्न असतो आणि साधा ड्रेस शिवला तर बाकीची साडी उगाच वाया जाते त्यापेक्षा हा ऑप्शन मस्त आहे

लांब स्ट्रेट टॉप विथ चुडीदार हा मझ्या आवडीचा प्रकार आहे...

एक्सपर्ट टेलर आमच्याकडे मिळणे अवघड आहे. पुणेवारी करावी लागणार

तर मुलीनो मला एक मदत हवी आहे. मी ४ दिवसापूर्वीच रेडीमेड पतियाळा सलवार ( कमीज नाही, पण ओढणी आहे) घेतली. बेबी पिन्क कलर आहे, पूर्ण प्लेन आहे. त्यावर कालच मध्यम शेडचा थ्री-फोर्थ बाह्यान्चा डार्क नाही पण मध्यम शेड वाला प्लेन निळा कुर्ता घेतला. बरेच रन्ग नन्तर बघीतले पण मॅच मिळाले नाही. मी अजून एक घेण्याच्या विचारात आहे. तर मला सान्गा की गुलाबी पतियाळाला अजून कोणता कलर मॅच होऊ शकेल? तिथे थोडा मरुन+ चॉकलेटी असा त्यातलाच दुसरा कुर्ता होता. तो मॅच होऊ शकेल का? की अजून कोणता कलर घेऊ? जाम्भळी शेड हुन्दडुन पण मिळाली नाही.

धन्यवाद अश्विनी.:स्मित: बघते आता. काल रविवार असल्याने खूप गर्दी होती, त्यामुळे जास्त वेळ पण मिळाला नाही बघायला.

बेबी पिंक बरोबर बेस्ट म्हणजे जवळच्या फॅमिलीमधले पण तरी वेगळे असे डीप कोरल ते बर्न्ट सिएना मस्त जाऊ शकतील.
अजून काही हमखास यशस्वी कॉम्बो म्हणजे
मेंदी(पावडर) कलर
मॅजेन्टा ते बर्गंडी
क्रीम ते पांढरा
डीप ग्रे
ब्लॅक
सॉफ्ट/ लाइट लेमन यलो
एकदम लाइट व्हायोलेट

मेंदी(पावडर) कलर
मॅजेन्टा ते बर्गंडी
सॉफ्ट/ लाइट लेमन यलो
एकदम लाइट व्हायोलेट>>>>> धन्यवाद नीधप. पिस्त्याबरोबरच यातले पण एक दोन जरी मिळाले तरी बेस्ट.:स्मित:. ग्रे मात्र मी जायच्या आधीच एका मुलीने घेतला.

ते लांब स्ट्रेट टॉप बुटक्या मुलींना नाही बरे वाटत. दुसरे गेटटुगेदर छाप समारंभासाठी काय निवडावे? (जमणार्या मैत्रिणी भलत्या बोलून दाखवणाऱ्या पण अतिमायेच्या गटातील आहेत Wink साधे चालेल पण आऊटडेटेड चालणार नाही.) एखादे चित्र/लिंक दाखवले तर जास्त बरे पडेल.
(मी आलियाचे २ स्टेटस मधले कुर्ते इन्स्पिरेशनसाठी बघत होते, तर ते मुंबईत कुठे सापडावे?)

बेबी पिंक व व्हाइट कुर्ता छान दिसते. वर सिल्वर किंवा ओक्सिडाइज्ड सिल्वरची ज्वेलरी. माझ्याकडे आहे हे काँबो.

मैत्रीणींच्या गटग ला लाँग स्कर्ट व टीशर्ट छान दिसेल. म्हणजे फॅन्सी टी. काहीतरी डिझायनर चित्र असलेला असे. हौझखास मधि मिळतात असले टी. बरोबर लेदर बॅग. लॉट्स ओफ बांगड्या. काजल टेराकोटा ज्वेलरी.

सीम्स, कलोसल काजल म्हणून एक मस्त काजल पेन्सिल मिळते. ते लावायचे. आणि टेराकोटा मातीची ज्वेलरी फार छान मिळते. चित्र शोधोन टाकते. शिवाय लाकूड, हस्तिदंत, मेटल अश्या मटेरिअल च्या बांगड्या. एकदम आर्टी पण भारतीय पण मॉडर्न पण छान लुक येतो. किती गोड ग मैत्रीण गटग! त्यामुळे जुने कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे वाट्ते.

ओके Happy बांगड्या काजल माहिती होते, टेराकोटा ज्वेलरी बहुतेक पाहिलेली आहे (शोभा डे का अशीच कुणीतरी बहुतेक घालते) पण कधी वापरली नाही. चित्र द्या. थंँक यू!

उंची कमी असेल आणि वजन बरेच असेल तर लाँग स्कर्ट इज अ बिग नो नो.

कमी उंचीला बॉडी हगिंग स्लॅक्स आणि वरती फ्युजन किंवा ट्युनिक टॉप चांगले दिसेल.
अ‍ॅक्सेसरीज हेवी जंक वापरणार असाल तर एकच हेवी पिस वापरा. नेकलेस किंवा कानातले किंवा भरपूर बांगड्या
सगळे भरपूर वापरले तर कुलाबा कॉजवेचा स्टॉल चालतोय असे वाटेल.

Pages