कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एका शिफॉन साडी ला लावली आहे.
व्यवस्थित टिकली आहे, पण हाताने धुण्याचा आळस करुन मशिन मध्ये टाकली तर त्याचे बरेच कुंदन लेस च्या कोंदणातून निघून आले.(अजूनही चांगली दिसतेय तशी.)

लेस चे बंडल ९ मीटर चे असते.
साडीला लावताना साडीतला आतला गुंडाळायचा भाग आपण सोडतो.
पण पदर रुंदी ला लेस लावावी लागत असल्याने कव्हर होते.(माझ्या शिंप्याने आतला गुंडाळायचा भाग न सोडता पूर्ण साडीला लावून ९ मीटर संपवले.)
नीट वापरली तर १ मीटर उरायला पाहिजे, जो पदरात आत लेस ची नक्षी करावी लागली तर वापरता आला पाहिजे.

९ मीटर लेस साडीला लवकर संपते.
अगदी खूप चांगल्या कूंदन्/जरदोसी वर्क वाल्या लेस १२००-१५०० पर्यंत पण जातात.
पण बेसिक जास्त रुंद नसलेल्या लेस २०० पासून पुढे ९ मीटर मिळू शकतात.

या लिंक वर थोड्या आहेत.
http://www.ebay.in/sch/Womens-Accessories/4251/i.html?_from=R40&_nkw=sar...

मी भुलेश्वर मार्केटात 1500 रु वाली लेस पाहिलेली, अगदी अप्रतिम अशी होती. परत एकदा तिथे जाऊन आधी लेस आणि मग त्याला मॅचिंग साडी तिथेच पाहायला हवी. मी या आधी एकदा हा प्रकार करून पाहिलंय पण लेस साठी जी साडी निवडली ती खूपच हलकी निवडली. टेलरने खूप बडबड केलेली ☺☺

जरा बर्‍यातली जॉर्जेट चालू शकेल.
हम दिल दे चुके सनम मध्ये अजय देवगण शी लग्न झाल्यावर ऐश च्या ज्या इंक ब्ल्यू, टायटल साँग लाल,'दोस्त बन सकते है' आणि अजय देवगण पितो त्यावेळी पांढरी, मध्ये एका सीन ला काळी, ती गाडी खाली जाताना देवगण वाचवतो ती बॉटल ग्रीन या साड्यांना अप्रतिम लेस आहेत, तश्या साड्या आणी तश्या लेस मिळाल्या तर बेस्ट.
ती लाल तर कसली खतरा आहे..

अनू, Happy
तश्या साड्या आणी तश्या लेस मिळाल्या तर बेस्ट.......पण ते नेसायला तशीच ऐश्वर्या राय नको का?
काहीही.......किती लक्षात राहतं तुमच्या साड्या आणि प्रसंग!!

Happy ठिकाय आम्ही ऐश्वर्या दिसणार नाही पण नेहमी पेक्षा थोड्या बर्‍या दिसू की नै?
१. टायटल साँग जिथे ती रडके हसरे फोटो काढते त्यात लाल साडी अप्रतिम
२. ट्राम खाली तडमडता तडमडता वाचते तेव्हा इंक ब्लू लेस वाली साडी
३. बस मध्ये टी सी ला चुकवायला मिठी मारते तेव्हा पांढरी साडी.
४. मानेला गोळी लागून हाताला प्लास्टर घालते तेव्हा हिरवी साडी.ही सुंदर आहे पण हिला लेस बॉर्डर नाही.
५. काळी साडी 'क्यों भगवान बनना चाहते है आप' च्या वेळी ज्यात ती स्लायडिंग डोर लावते आणि देवगण उघडतो(या साडीबद्दल श्युअर नाही.)

>>>ह्या दोन laces साड्या बनविण्यासाठी घेतल्या आहेत. पण कुठल्या रंगाच्या आणि काय मटेरिअलच्या साड्या घेउ कुणीतरी सांगा. शिफॉन मला अजिबात आवडत नाही. गुलाबी फुलांच्या lace ला काळी प्लेन साडी घ्यायचीये.<<<

हिरवी लेस , लाईट पिवळ्या प्लेन साडी वर सुद्धा मस्त दिसेल. नाहितर लाईट क्रीम वा लाईट अबोली प्लेन साडी, लाईट ग्रीन प्लेन साडी. डुपियन सिल्क प्लेन साड्या योग्य आहेत. रॉयल लूक वाटेल. बँगलोर सिल्क प्लेन सुद्धा जाईल. पण शक्यतो बँगलोर वर कांथा वर्क लेस छान दिसतात.

पिंक लेस, तर लाईट क्रीम, लाईट पिंक काळी वर जरा लॉउड वाटेल.

http://indiarush.com/georgette-lace-work-green-plain-saree-g147/

http://www.snapdeal.com/product/orange-chiffon-saree-with-chanderi/20257...

कारागिर चांगला असेल तर लेस कशी लावली त्यावर अवलंबून आहे. हि डुपियन सिल्क वर लावलेली लेस छान दिसते.

https://www.templeofsilks.com/blue-dupion-silk-saree-with-lace-border

पहिली वाली अगदी फिका ऑरेंज(म्हणजेच पीच) रंगाच्या सिल्की पोत असलेल्या साडी वर छान दिसेल.
बेबी पिंक असला तर तो अगदीच फिका हवा.ऑफ व्हाईट वर पण.
डार्क ग्रे वर थोडी निस्तेज दिसेल असे वाटते.

>>पहिली वाली अगदी फिका ऑरेंज(म्हणजेच पीच) रंगाच्या सिल्की पोत असलेल्या साडी वर छान दिसेल.<<<

लाईट अबोली ना? छान दिसेल.
http://2.bp.blogspot.com/-FuvjZvJXYTk/VbSM7btD3AI/AAAAAAAAEB8/20pn7Inae2...

-----------------------------------------------------------------------------
पिंक लेस साठी तर दोन शेड्स ऑपशन सुद्धा आहे. एकदम वर लाईट पिंक आणि खाली लाईट क्रीम.

ग्रे खूपच डल आहे..... खूलून दिसणार नाही लेस. तर काळी साडी लेस खावून टाकेल. ( अ. आ. मा. म.)

हिरवी लेस अश्या रंगावर सुद्धा छान दिसेल. कारण त्यात तो नारंगी रंग आहे,

http://images10.voonik.com/45888501/aarohi-saree-exclusive-combo-of-plai...

http://images10.voonik.com/84115101/roopsangam-saree-exclusive-combo-of-...

-------------------

पिंक लेस, निळ्या वर नाही दिसणार छान... त्या लेस मधले रंग जे आहेत त्यातली लाईट शेड चांगली दिसेल. लेस मध्ये कॉपर आणि पिंक आहे.

हाच मस्त कलर ठरेल सॅटीन सिल्क साडी वर पिंक लेस,
http://www.ninecolours.com/bahubali-satin-silk-designer-saree-in-light-p...

ती साक्षी( ज्या आयडीने प्रश्ण विचारला ती) साडी घेवून मोकळी झाली असेल. Happy

हो, स्लेट म्हणजे राखाडी, ग्रे. त्या लेसमधला पिंक जर शॉकिंग पिंक असेल तर छान दिसेल.
बाकी पहिल्या लेसला लाईट रंगच मस्त दिसेल.

अवने...
टिव्ही वर लागतो तितक्या अगणित वेळा, थिएटर मध्ये आल्यावर एकदा आणि परिक्षेची पी एल चालू असताना एकदा Happy

नाही. अजुन घेतल्या नाहियेत. Happy
भागलपुरी घ्यायची आहे.
पण प्लेन भागलपुरी कुठे मिळेल? लुंकड मधे मिळतात का?

~साक्षी

शर्ट / टॉपसाठी बट्नसची एखादी ऑनलाइन खरेदीची साइट आहे का? मला हवी तशी बटन्स फार अनयुज्वल नाहीत, पण तरीही पुण्यात कुठेच मिळत नाहीएत. ब्रासची नॉन ग्लॉसी, काळपट छोटी बटन्स हवी आहेत. मी पुर्ण क्लोवर आणि हर्षाने तुळशीबाग परिसर शोधला, पण तशी बटन्स मिळत नाहीएत. माझ्याकडच्या टॉप्सना दुसरी कोणतीही सुट होत नाहीत आणि दोन अ‍ॅमेझिंग टॉप पडुन राहिले आहेत.

Pages