Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊ.. शाहिद आफ्रिदी म्हणायचंय
भाऊ.. शाहिद आफ्रिदी म्हणायचंय का तुम्हाला???
<< भाऊ.. शाहिद आफ्रिदी
<< भाऊ.. शाहिद आफ्रिदी म्हणायचंय का तुम्हाला???>> हिम्सकूलजी, चूक सुधारलीय, धन्यवाद. [ सध्यां सायबर कॅफेतल्या गडबडीत बसून लिहीतोय म्हणून चूक झाली असेल; किंवा वय झालंय पण... दिल है जो मानताही नही ! ]
श्रीलंकेची टीम पाकिस्तान
श्रीलंकेची टीम पाकिस्तान पेक्षा गयी-गुजरी आहे. बॅकप बॉलर्स आणी कॅप्टन्सी क्लब दर्जाची वाटते.
हो. श्रीलंकेची गयीगुजरी आणि
हो. श्रीलंकेची गयीगुजरी आणि पाकिस्तानची बेभरवश्याची. बांग्लादेश डिजर्व्ह करत फायनलला पोहोचली आहे. कुठलेही लक नाही. भारताची टीम देखील डळमळीत असती तर त्यांच्यासाठी आशिया कप जिंकायची ही बेस्ट संधी असती. पण सद्यस्थितीत दहातले नऊ सामने भारत जिंकेल ईतका तो बांग्लादेशच्या तुलनेत मजबूत आहे.
पावसाने शेवटीं हजेरी लावलीच
पावसाने शेवटीं हजेरी लावलीच 'आशिया कप'मधे ! "पाऊसच जिंकला", म्हणायची आज वेळ नाही आली म्हणजे मिळवलं !! [ आठ वाजतां सुरूं होणार म्हणे मॅच आतां ]
द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया
द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया काय थ्रिलर झाली राव! लास्ट बॉलवर ऑसीज जिंकले. आता आपण काय करतो बघायचे.
पॉवरप्लेनंतर असे वाटतेय की आज जाडेजामुळे वाट लागणार की काय. दोन रनआउट्स मिस आणि बॉलिंगही काही खास नाही.
महमदुल्लाहचा फॉर्म बघता
महमदुल्लाहचा फॉर्म बघता त्याला मागे ठेवणे आणि मशरफे मुर्तझाला पुढे पाठवणे अनाकलनीय.. तरी ठोकलाच त्याने.. ईंटरेस्टींग स्कोअर .. मजा येणार
पंड्या आणि नेहरू च्या
पंड्या आणि नेहरू च्या शेवटच्या षट्कानी शतक पार करवले बांगलादेशाचे
जिंकले!! आशियायी सम्राट!!!
जिंकले!! आशियायी सम्राट!!! अभिनंदन!!!
येऽऽऽऽ! धवन, कोहली, आणि धोनी
येऽऽऽऽ! धवन, कोहली, आणि धोनी झिंदाबाद! धोनी किती दिवसांनी असा खेळला! बांग्लादेशच्या त्या मूर्ख जाहिरातीमुळे भडकला की काय?! मस्तच. शेवटी आपणच बॉस!
धोनीने रैना नि युवीच्या आधी
धोनीने रैना नि युवीच्या आधी येणे कौतुकास्पद होते. आशिया कप जिंकला असला तरी soft lower order क्रंच सामन्यामधे महाग पडू शकते. धवनने नेहमीप्रमाणे मह्त्वाच्या सामन्यामधे खेळायचे काम चोख बजावले
सर्व बांग्लाचे शिर त्या सिक्स
सर्व बांग्लाचे शिर त्या सिक्स बरोबर सीमापार धोनीने घालवले
अगदी अगदी मायबाप. कसला
अगदी अगदी मायबाप. कसला उत्तुंग होता तो शॉट. (हा शब्द बर्याच दिवसांनी वापरतोय.)
असामी, होपफुली तेव्हा ती एवढी सॉफ्ट नसेल.
हो, त्यांना त्यांची जागा
हो, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
त्याने कृतीतून दाखवून दिले.
आय अॅम लव्हिंग इट!
शर्मा गेल्यावर पहिली पोस्ट मी
शर्मा गेल्यावर पहिली पोस्ट मी व्हॉटसपवर टाकली की गेला शर्मा आता कोहली जिंकवेल.. कसला विश्वास कमावलाय पठ्ठ्याने.. धवन नसता तर त्या जागी रैना किंवा युवराज, पण दुसरीकडे कोहलीला उभे राहून जिंकवायचेच होते..
पण तरीही उद्या चर्चा होणार ती धोनीच्या तडाख्याची.. सुपर्ब! त्याने बांग्लादेशला त्यांचे स्थान दाखवून द्यावे तसे भिरकावून दिले.. धोनीने असे जिंकवत विश्वचषकासाठी जाणे हे कमालीचे आत्मविश्वास जागवणारे ठरणार.. टीमसाठीही आणि खास करून मिडल ऑर्डरसाठी, तिथे आत्मविश्वास वाढल्यास संघात वीक लिंक फारशी राहणार नाही ..
<< पण तरीही उद्या चर्चा होणार
<< पण तरीही उद्या चर्चा होणार ती धोनीच्या तडाख्याची.. सुपर्ब!>> आणि, धवनने स्क्वेअर लेगला मारलेल्या त्या मनगटी सिक्सरचीही !!
एकंदरीतच आपला खेळ आश्वासक वाटला. कोणत्याही संघातला एखादा महमदुल्ला 'टी-२०'मधे विरुद्ध बलाढ्य संघालाही तोंडघशी पाडूं शकतो, याची ताजी जाणीव घेवून विश्वचषकात उतरणं हेंही खूप फायदेशीर ठरणार आहे.
बांग्ल्यांनी धोनीला फुकट
बांग्ल्यांनी धोनीला फुकट भडकवले. त्यांच्या कर्माची फळ धोनीने तिथल्या तिथेच दिली. जुना आक्रमक धोनी काल पुन्हा उसळून बाहेर आला. एरव्ही मॅच शेवटच्या ओवर पर्यंत घेऊन जाणारा धोनी १४व्या ओव्हरमधेच संपवण्याच्या मुड मधे होता. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारून त्याने "you mass with wrong man" असा संदेश बांग्लादेशी खेळाडूंना दिला. विराटच्या आधी धोनी उतरला असता तर बहुदा त्याने खुन्नसमधे मॅच१० व्या ओव्हरलाच संपवली असती असा आवेश दिसत होता.
बरोबर आहे. एका प्रकारे खर्या
बरोबर आहे. एका प्रकारे खर्या वाघाच्या जबड्यात हात घालायचा मूर्खपणा 'टायगर्स' म्हणवणार्यांनी केला, असेच म्हणायला हवे.
धोनीच्या हातात तस्किनचे शीर
धोनीच्या हातात तस्किनचे शीर वाला फोटो आता सर्वत्र फिरत आहे.
जसास तसे उत्तर द्यायलाच हवे. स्पोर्ट्समनशीप गेली खड्ड्यात.
अरे काय बोलले होते ते? काय
अरे काय बोलले होते ते? काय भडकावले होते ?
मस्त झाली कालची फायनल. शिखर
मस्त झाली कालची फायनल. शिखर धवन, धोनी आणि विराट कोहली !
काल कोहली बॅटींग करत असताना त्याने त्याच्या वीक झोन्स मधे कशाप्रकारे मेहनत घेऊन स्वतःला बदललं आहे ते दाखवलं. मस्त वाटलं. १००% त्याच्यावर आता भरवसा ठेऊ शकतो, कुठल्याही प्रकारच्या सामन्यात !
रच्याकने, काल (काल का..खरं तर नेहमीच), भारताची मॅच असली की रमीज राजाची कॉमेंट्री ऐकायला धमाल येते. पाकिस्तानी टीमचा धसमुसळेपणा, त्या तुलनेत भारताची सर्वच डिपार्टमेंट मधे होणारी सफल कामगिरी या पार्श्वभूमीवर त्याची जळजळ, मळमळ, कॉमेंट्री तून साखरेत घोळून वाढलेल्या कारल्यासारखी येत राहते
धमाल मॅच झाली काल. खणखणीत
धमाल मॅच झाली काल. खणखणीत स्कोर होता. नेहरा व पांड्याच्या दोन ओव्हरमुळे मोठी टोटल दिसली. त्या रोहीत शर्मा गेल्यावर मी म्हणलेच आज धवन आणी कोहली खेळायला हवे. मस्त खेळले दोघेही. पण कुठेही मॅचचे पारडे एका बाजुला जात नव्हते. धोनी आला आणी हवाच काढली. धम्माल.
बाकी रमीज राजा पाकीस्तानला व मांजरेकर आपल्याला धार्जीण नाही हेच खरे. आता विष्वचषकाला एक्स्पर्ट म्हणुन मांजरेकर नाही असे कालच कळले. एक मोठा अडसर दूर झाला.
शान मधे जिंकले... विशेष करुन
शान मधे जिंकले... विशेष करुन बांग्लाच्या घरातच त्यांच्या वाघाचे दात त्यांच्याच घशात घातले ते पाहून आनंद झाला.
कोहलीची पण हुर्यो उडवत होते.
कोहलीची पण हुर्यो उडवत होते.
कोहलीची पण हुर्यो उडवत होते. >>> उलट कोहली त्यांना जसास तसे उत्तर देत होता. हाताने तुमची बक्बक चालू ठेवा या पध्दतीचा इशारा देत होता. कॅच पकडल्यावर स्लो मोशन मधे चिडवणे इ. बरेच प्रकार तो करत होता
<< बांग्ल्यांनी धोनीला फुकट
<< बांग्ल्यांनी धोनीला फुकट भडकवले. त्यांच्या कर्माची फळ धोनीने तिथल्या तिथेच दिली.>> दौर्याच्या किंवा मोठ्या सामन्यापूर्वी विरुद्ध संघावर मानसिक दबाव आणण्यासाठी किंवा त्यांचं मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी असले प्रकार घडणं क्रिकेटला नविन नाहीं. इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या क्रिकेटचे ज्येष्ठ देशही हें करतात तर त्यांचं अनुकरण करत बांगलादेशनं असा अचरटपणा केला तर नवल नाही. पण मला नाही वाटत धोनीसारखा मुरलेला कर्णधार अशा बालीश डांवपेचाना बळी पडून आपल्या खेळाचं नियोजन करत असेल. त्या घडीला जिंकण्यासाठी आवश्यक तसाच खेळ धोनीने केला, तो यशस्वी झाला व तेंच तसल्या बालिश डांवपेचांच आपोआपच परिणामकारक उत्तर झालं. << उलट कोहली त्यांना जसास तसे उत्तर देत होता. हाताने तुमची बक्बक चालू ठेवा या पध्दतीचा इशारा देत होता. कॅच पकडल्यावर स्लो मोशन मधे चिडवणे इ. बरेच प्रकार तो करत होता >> हें बघायला कितीही बरं वाटलं तरीही तें अपरिपक्वतेचंच लक्षण आहे, हें कर्णधार कोहलीला लवकरच उमगेल अशी माझी खात्री आहे.
नाही भाऊ, नुसता 'ट्रॅश टॉक'
नाही भाऊ, नुसता 'ट्रॅश टॉक' म्हणून काहीतरी बडबड करणे आणि तुमचे कापलेले मुंडके समोरच्या टीमच्या प्लेयरच्या हातात असणारे चित्र इंटरनेटवर फिरणे ह्यात खूप मोठा फरक आहे. प्लेन बार्बारिक गोष्ट आहे ती. फायनल मध्ये कुठली तरी अपोझिट टीम असणारच. त्यांच्या कप्तानाने काय असा मोठा गुन्हा केला म्हणून तुम्ही असली घाण इमेज सर्क्युलेट करता आहात? इथे राजकारण नको, पण मला तरी ते चित्र बघून आयसिसची आठवण आली, आणि ते अजिबात आवडले नाही.
मला तरी ते चित्र बघून आयसिसची
मला तरी ते चित्र बघून आयसिसची आठवण आली, आणि ते अजिबात आवडले नाही.>> +१०१
मला तरी ते चित्र बघून आयसिसची
मला तरी ते चित्र बघून आयसिसची आठवण आली, आणि ते अजिबात आवडले नाही.>> +१००१
<< पण मला तरी ते चित्र बघून
<< पण मला तरी ते चित्र बघून आयसिसची आठवण आली, आणि ते अजिबात आवडले नाही >> भास्कराचार्यजी, ज्याला मीं 'अचरटपणा' म्हटलं त्याला तुम्ही 'प्लेन बार्बारिक गोष्ट' म्हणतां व त्याबाबत मी सहमतही आहे. पण मूळ मुद्दा तो नसून, अशा गोष्टींचा स्वतःच्या खेळावर परिणाम न होवूं देणं हेंच त्या गोष्टीना चोख प्रत्यूत्तर असावं , हा आहे. अशा गोष्टींमुळे ईरेला पेटून तुम्हीं सामन्यात अनुचित खेळ करणं, म्हणजे त्या गोष्टीना बळी पडणंच. गावसकर, सचिन यांची एकाग्रता भंगावी म्हणूनसुद्धां असभ्य असे कित्येक प्रकार मैदानात व बाहेरही घडतच असत पण त्याचा खेळावर परिणाम होवूं दिला नाही, म्हणूनच ते 'ग्रेट' झाले !
भाऊ, त्यांनी ती एकाग्रता भंगू
भाऊ, त्यांनी ती एकाग्रता भंगू देऊ नये हे योग्यच, पण आपण फॅन म्हणून बोलणे आपलेही कामच नाही का?
Pages