आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
धन्यवाद किरण , सगळेच एकमेकाना
धन्यवाद किरण ,
सगळेच एकमेकाना प्रोत्साह्न देत , झाल्या असतील तर चुका एकमेकाला सांगत पुढे जाऊया .
होपफुली मग आपण केलेली चूक इतर करणार नाहीत
मी रोज अर्धा तास ब्रिस्क वॉक,
मी रोज अर्धा तास ब्रिस्क वॉक, त्यात थोडा वेळ पळणे, १४ सूर्यनमस्कार, क्रंचेस ४ प्रकारचे (प्रत्येकी १५ वेळा) आणि ३० ते ४० स्क्वॅटस की स्क्वॉट्स (कसा उच्चार आहे?) इतका व्यायाम करते. पोट आणि एकूणच वजन कमी करण्यासाठी यापैकी कशाचा उपयोग होईल? की काही बदल आवश्यक आहेत? जाणकारांनी कृपया प्रकाश टाका.
बाकी खाणे - पिणे बर्यापैकी प्रमाणात चालू आहे.
मी आजपासून ग्रीन टी प्यायला
मी आजपासून ग्रीन टी प्यायला सुरूवात केली आहे... कार्ब लेस डाएट चालू आहे..
व्यायामाला मात्र सध्या काही दिवस सुट्टी आहे...
आशिका, क्रंचेस मुळे खूप फायदा होऊ शकतो.. आपले रिझल्ट्स नक्की सांगा..
(No subject)
कालच्या मॅच वेळचा फोटो . परत
कालच्या मॅच वेळचा फोटो .
परत माणसात आलोय .
वजन ८४.७ . फायनली ८५ चा प्लाटू सुटला
हार्दिक अभिनंदन!!! नाईस
हार्दिक अभिनंदन!!!
नाईस फॅमिली पिक टू !!!
धन्यवाद वर्षू नील
धन्यवाद वर्षू नील
अभिनंदन केदार!
अभिनंदन केदार!
फायनली ८२.८. ८३ च टारगेट होत
फायनली ८२.८.
८३ च टारगेट होत ते गाठल . ठरवल्यापे़क्षा ५ दिवस आधी
आता ४ तारखेपासून १८ दिवस जीवाची अमेरिका करायची असल्याने डाएट्ला विश्रांती .
आधी वाटल होत , जमेल की नाही पण थोड्या दिवसानी काहीच वाटल नाही .
तेव्हा सगळे परत करायला सुरू करा . केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे
केदार ___/\___ मला कधी
केदार ___/\___
मला कधी जमणारेय हे
किमान १५ किलो वजन कमी करायला हवंय मला
मला कधी जमणारेय हे राग किमान
मला कधी जमणारेय हे राग
किमान १५ किलो वजन कमी करायला हवंय मला
>> निव्वळ असे प्रश्न विचारीत राहिले तर कधीच नाही !
ऐ वॉव.. केदार..
ऐ वॉव.. केदार.. काँग्रॅट्स!!!
आज पार्टी आहे..मागील १५ दिवस
आज पार्टी आहे..मागील १५ दिवस डाएट करून वजन ६५ किलो वर आणले आहे..आता २-३ दिवस खरी परिक्षा आहे..
रीया , मला कधी जमणार अस म्हणू
रीया ,
मला कधी जमणार अस म्हणू नको .
करायला सुरू कर मग नक्की जमेल. वाटल्यास थोड्यापासून सुरूवात कर .
आणि अस कोणी तरी असेल की जे तुला काहीही बोलू शकेल (तुला काय वाटेल याची पर्वा न करता ऑनेस्ट फीडबॅक
देऊ शकेल) त्याला/तिला तू वजन कमी करणार आहेस हे सांग . इन जनरलच मी वजन कमी करतेय हे सगळ्याना सांग . त्याने दोन फायदे होतील . एक तर नको असलेले पदार्थ बिनदिक्कत नाही म्हणता येतील (हा आपल्या कडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे) दुसर स्वतःवर च एक आपोआप स्वतःला सिद्ध करायच प्रेशर असेल , जे तुला कायम अॅलर्ट ठेवेल
माउ , पार्टी एंजॉयच करायची
माउ ,
पार्टी एंजॉयच करायची असेल तर सॅलड , सूप (सुरूवातीला यानेच ताट भरून घ्यायच , पण तेही विदाऊट मायोनीज वगैरे ) अन प्रोटीन्स . फक्त तळलेल टाळा
येस केदार... पण बेत पाणिपुरी
येस केदार... पण बेत पाणिपुरी आणि भेळपुरीचा आहे....त्यामुळे बघू कसे जमतेय...
केदार ऑनेस्टली मला कोणीच
केदार ऑनेस्टली मला कोणीच काहीच बोलल्याने फरक नाही पडतेय आजकाल.
How Sad
बस झालं पण आता आजपासूनच मी सुरुवात करणार म्हणजे करणार.
आज उपवास. सुदैवाने साबुदाणा आवडत नाही सो पुर्ण दिवस फळांवर.... अर्ध डाएट इथेच झालं
पुर्ण ऑफिसला ३ राऊंड मारुन येते म्हणजे३३ किमी चालण्ं होईल.
गेट सेट गो
छान रीया, व्यायाम हळू हळू
छान रीया, व्यायाम हळू हळू वाढवत जा . म्हणजे आज २० मिनिट चालल , तर उद्या २५ . मग त्रास वाटणार नाही
फक्त प्रोटीन्स भरपूर खात जा .
आणि ८ नंतर हेवी खाण नको अन गोड्/तेलकट कमी
वाटल्यास इथे लिहित जा . पण एक चेक पॉईंट असण चांगल आहे
रिया , डाएटशियन गाठणे
रिया , डाएटशियन गाठणे सर्वप्रथम . डायट and व्यायाम गोझ हॅन्ड इन हॅन्ड .
सोमवार ते गुरुवार 10 पैकी 10.
सोमवार ते गुरुवार 10 पैकी 10. शुक्रवार प्रवास. शनिवार रविवार -20. असा माझा शिडी सापाचा खेळ चाललाय. अगदी साईन कर्व्ह. काय करावे बरे.
पुर्ण ऑफिसला ३ राऊंड मारुन
पुर्ण ऑफिसला ३ राऊंड मारुन येते म्हणजे३३ किमी चालण्ं होईल
>> आं? ऑफिस आहे के एखादे बेट ?
३३ किमी चालणार??
३३ किमी चालणार??
३-३ किमी असेल हो ३३ किमी
३-३ किमी असेल हो
३३ किमी परिघ वालं हपिस पुण्यात नाहीय
अनू ३३ किमी परीघ नाही गं
अनू
३३ किमी परीघ नाही गं ... ११ नाहीतर १.१ किमीचा असायला हवा.
ओ हां ११ किमी. ११ किमी परिघ
ओ हां ११ किमी.
११ किमी परिघ वाले हपिस पण कठीण आहे. रियाच सांगेल
ओ हां ११ किमी. ११ किमी परिघ
ओ हां ११ किमी.
११ किमी परिघ वाले हपिस पण कठीण आहे. रियाच सांगेल
अरे ते ३ किमी होतं पण माझ्या
अरे ते ३ किमी होतं पण माझ्या मोबाईलचा ब्राऊझर गंडलाय त्यामुळे नंबरांसोबत घोळ होतो.
जाई,बोलते तुझ्याशी याबाबत
केदार, पण माझं डिनर ८ नंतरच होतं मी ऑफिसातून घरी १० वाजता जाते
मग हेवी ब्रेकफास्ट अन लंच घेत
मग हेवी ब्रेकफास्ट अन लंच घेत जा . अन ६-७ च्या सुमारास लाईट काहीतरी . रात्री घरी गेल्यावर फक्त एक फळ .
मी ही अस बर्याचदा केलय . थोडे दिवस रात्री भूक लागल्यासारखी होते पण नंतर सायकल सेट होते
रात्री १० ला हेवी जेवण करत असशील तर इतर उपायानी फारसा फायदा होणार नाही.
मी जेव्हा माझा चार्ट पाहिला तेव्हा रात्री जास्त जेवल्यावरच जास्त नुकसान झालेल दिसल (प्रमाणात गोड खाण अन व्यायाम चुकण पे़क्षा )
रात्री घरी गेल्यावर फक्त एक
रात्री घरी गेल्यावर फक्त एक फळ
>>
आई सेंटी मारते मग माझी मुलगी नीट जेवत नाही म्हणुन पण सांगते तिला समजावून
माझा ब्रेकफास्ट नॉर्मली इडली सांबार/ मेदू वडा सांबार आणि अगदी क्वचित सँडविच आणि लिंबू सरबत असा असतो
मग लंचला २ पोळ्या आणि भाजी
मग ४ वाजता खाल्ले तर कधी पोहे कधी डोसा
आणि मग डायरेक्ट डिनर
यात सुधारणा हवी मेन
अग रीया , प्रोटीन्स ऑलमोस्ट ०
अग रीया , प्रोटीन्स ऑलमोस्ट ० आहेत
जर नॉन व्हेज असशील तर किमान सकाळी २ अंडी (दोन्हीच पांढर अन अर्ध पिवळ ) तरी नक्की सूरू कर . अन शक्य असेल तर टोंड दूध भरपूर पी
Pages