आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
सर्वात काऊंटर इन्ट्युटिव्ह
सर्वात काऊंटर इन्ट्युटिव्ह केलॉग्स स्लिम आहे. त्यात प्रचंड प्रमाणात साखर आहे.
राजगिरा - हिंदी मध्ये चौलाई
राजगिरा - हिंदी मध्ये चौलाई म्हणतात, पंजाबीमध्ये सिउल.
महाराष्ट्रातले हिंदी भाषिक मारवाडी वगैरे राजगिराच म्हणतात.
संतुलित आहार अन व्यायाम याला
संतुलित आहार अन व्यायाम याला पर्याय नाही>>>> +1000
माझा पाय दुखावल्यामुळे २ महिन्यात कहीच व्यायम होउ शकला नाही..त्यामुळे अतिरिक्त वजन वाढले आहे..
काही नवीन व्यायम प्रकार सुचले तर नक्की सांगा...
माऊ, डॉक्टरांना विचारा.
माऊ, डॉक्टरांना विचारा.
आज दीड तास . पावणे आठ किमी
आज दीड तास . पावणे आठ किमी ६३० क्यालरीज... ( फक्त )
http://www.outlookindia.com/a
http://www.outlookindia.com/article/sedentary-evil-meets-its-active-neme...
सेलिब्रेटिंग वन ईअर ऑफ
सेलिब्रेटिंग वन ईअर ऑफ मेंटेनन्स!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार तुझे पुन्हा एकदा आभार.. एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे ,पण या धाग्यापासून मिळालेली प्रेरणा अजून तितकीच स्ट्राँगली काम करतीये..
वर्षूनील, हे असं म्हणण्याची
वर्षूनील, हे असं म्हणण्याची वेळ माझ्यावर पण पुढच्या जानेवारीत येऊ दे
प्रयत्न चालू आहेत जमतील तसे जमतील तेवढे.. फक्त मेंटेनन्स न म्हणता निदान हवे तेवढे वजन आधी कमी झाले तरी चालेल मग पुढे मेंटेनन्स...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने, तुझे अभिनंदन
कित्येक वेळा दुर्लक्ष केल मी
कित्येक वेळा दुर्लक्ष केल मी या धाग्याकडे. पण आता ... काहीतरी कराव लागणार आहे..
अति तेथे माती..
सोनचाफा.. थँक्स.. अगा तू
सोनचाफा.. थँक्स.. अगा तू नक्की करू शकशील.. एकदा तू कमिट केलंस की तुला तूच अडवू शकणार नाहीस..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रकु.. Everyday is a new beginning. Take a deep breath, and start again.. हाकानाका!!!
It feels good to be lost in the right direction..
रोज इकडे अपडेट करा आपली अॅक्टिविटी..
धन्यवाद वर्षु नील मी आता
धन्यवाद वर्षु नील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आता सायकल देखील घेणार आहे. बारीक होण्याकरता
गेल्या शनिवार आणि रविवार या
गेल्या शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एक किलोने वजन उतरले होते. त्यात एक फेरी पर्वती आली.
आज सिंहगडला जाऊन आलो तर एक दिवसात एक किलो तीनशे ग्रॅम वजन उतरले.
घरी चालण्यासाठी ट्रेडमिल
घरी चालण्यासाठी ट्रेडमिल घेतलय. महिना झाला. पण दोन तीनच दिवस चालले. आजपासून रोज चालेन परत त्यावर.
कोणी हर्बलाइफ ची प्रोटिन पावडर आणि मल्टिव्हिटॅमिन पाबवडर वापरली आहे का. त्यानेही वजन थोडं कमी होतं म्हणे आणि महत्त्वाचे म्हणजे एनर्जी वाढते म्हणे.
कोणी वापरली असेल तर मला अनुभव ऐकायला आवडेल.
प्रोटिन्स घेण्यापेक्शा फक्त
प्रोटिन्स घेण्यापेक्शा फक्त चालत रहा.
दररोज कमित कमी १ तास चाला ट्रेड्मील वर. use fat burn workout, u can see results in 1 month. I am doing it daily in gym. my settings are, Fat Burn workout, 6.3 kms per hr.
madya - मान्य आहे. पण ते
madya - मान्य आहे.
पण ते घेण्याच्या मागे एनर्जी वाढवणे आणि इम्युनिटि वाढवणे हे विचार देखील आहेत.
Everyday is a new beginning.
Everyday is a new beginning. Take a deep breath, and start again.. हाकानाका!!! स्मित >> +१००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रोटीन्स साठी मांसाहारी असाल
प्रोटीन्स साठी मांसाहारी असाल तर अंडी , शिजवलेले चिकन बेस्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाकाहारीसाठी मोड , दूध अन सोया वगैरे आहेत , पण त्याचा फारसा अनुभव नाही
वर्षू नील , धन्यवाद . अग
वर्षू नील ,
अन कस कुणास ठाऊक पण त्याबाबत वाईट वाटणही बंद झाल होत (१०५ च्या मानाने अजून काहीच नाही ना अस स्वतःला समजवायच).![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद . अग तुझ्यामुळे मीही परत चालू केलय . जवळ जवळ १.५ वर्षे ८३ च्या दरम्यान राहिलेले वजन परत वाढायला सुरूवात झाली . अन दिवसाच अगदी हेक्टिक शेड्युल , प्रोजेक्ट एंड्चे नाईट ऑट , पिझ्झा खाऊन राहणे यानी परत वजनाने वर वाट्चाल सुरू केली . ९० कधी गाठल कळल ही नाही .
तुझ्या विपूने अन इथल्या मेसेजने परत जरा डोक ठिकाणावर आल . एवढे सगळे कष्ट , सुधारलेली जीवनशैली सगळ पाण्यात जातय हे कळल . तेव्हापासून परत सुरू केलय . सुरूवात तर चांगली आहे अन निर्धार ही आहे . यावेळी सगळा डेटा ही मेंटेन करतोय . जर प्रयोग यशस्वी झाला तर इथे शेअरही करेन . आतापुरत गेल्या १३ दिवसात १२७/१३०
१२७/१३० काय आहे?
१२७/१३० काय आहे?
पादुकानंद , तो स्कोर आहे .
पादुकानंद ,
तो स्कोर आहे . धाग्याची सुरूवात पाहिली तर कळेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार, ७७ ते ८३ ते ९०??
केदार, ७७ ते ८३ ते ९०?? शो.ना.हो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लोकांनी तुझ्याकडून प्रेरणा घेतली, आणि तूच अशी कच खाल्लीस तर त्यांनी कोणाकडे बघायचे?
चल, लवकरात लवकर ७७-८० ला पोचलो हे लिही इकडे.
मंजूडी मलाच कळत नाही कधी
मंजूडी
मलाच कळत नाही कधी दुर्लक्ष झाल . इथ लिहायच कारणही तेच होत की एक स्वत:लाच जाणीव रहावी
लेट्स होप फॉर द बेस्ट .
केदार गुर्जी ___/\___
केदार गुर्जी ___/\___
अर्रे तुझ्यामुळेच तर करत असलेल्या चुका समजतात..
ठीकै देर आये दुरुस्त आये
वेल.. हर्बललाईफ प्रोटीन पावडर ( ती ही झालीये करून माझी
) ऑल टेंपररी.. महिन्याभरात जैसे थे
त्यापेक्षा ट्रेडमिल वर चाल, जॉग.. हळू हळू स्पीड आणी वेळ वाढवत राहा, त्याच्या जोडीने काही फ्लोअर एक्सरसाईझेस कर .
मी दिवसातले (झोपेकरता ७,८ तास वजा करून !!)तीन तास( अॅट अ स्ट्रेच नाही.. विभागून) माझ्या करता ठेवते वॉक, व्यायाम आणी पोहणे या अॅक्टिविटीज करता. मग बाकीची पत्करलेली कामे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी तीन वर्ष झाले जीम
मी तीन वर्ष झाले जीम करतोय...त्यामुळे वजन नियमीत ठेवणे आता छंद झाला आहे.. फीट राहण्याने लाईफ बदलुन गेले आहे
केदार पुन्हा सुरुवात केलेय
केदार
पुन्हा सुरुवात केलेय तर आता थांबू नका. तुमची गुण पद्धत वापरल्याने १-२ दिवस गाडी घसरलीच तरी परत रुळावर आणणे सोपे जाते.
त्यामुळे काही अडले तर नक्की
त्यामुळे काही अडले तर नक्की विचारा
"अरे! मी तर हवं तेव्हा वजन
"अरे! मी तर हवं तेव्हा वजन उतरवू शकतो. काय फरक पडतोय, लेट्स इंडल्ज अ बिट, आज फार थकलोय."
भयंकर वाईट आयडिया आहे ती.
आधी उतरवायला जमलं तेव्हा माझं वय कमी होतं. आज प्रयत्न सुरू करीन तेव्हा वय वाढलेलं असेल. तेव्हा, इसकू पकडके रखना जी. फिर बढने नही देना.
(No subject)
गेल्या ४ आठवड्यातला डेटा वर
गेल्या ४ आठवड्यातला डेटा वर लिहिला आहे .
रोज सकाळी उठल्या उठल्या केलेले वजन , रोजचे गुण अन वजन कमी होण्याचा वेग .
साधारण महिन्यात ६.४ किलो वजन कमी झाले आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अपेक्षेप्रमाणे पहिल्या आठवड्यात वेग प्रचंड होता , आलेली सूज उतरली म्हणा .
सध्या थोडा प्लाटू आलाय
ये दिन भी जायेंगे . ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढ्या डेटा वरून काढलेले निष्कर्षे (सँपल साईज छोटा असला तरी)
१. रात्री प्रचंड जेवण सगळ्यात हानिकारक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२. बाहेरचे खाणे ही फार डेंजरस . तेवढ्याच प्रमाणात घरच अन बाहेरच चिकन खाल्ल तरी बराच फरक असतो
३. कधी कधी तुम्ही प्रयत्न नीट करत असाल तरी वजन ३-४ दिवस कमी होत नाही . पण नंतर अचानक मोठा फरक दिसतो
४. महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसात चहा सोडून अजिबात गोड नाही . वाढदिवसाचा केक नाही की "Sweets at my Desk" वाला पेढा ही नाही
तळटीप : वर्षू नील . झोपलेल्याला जागे केल्याबद्दल परत एकदा आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दीमा, "अरे! मी तर हवं तेव्हा
दीमा,
"अरे! मी तर हवं तेव्हा वजन उतरवू शकतो. काय फरक पडतोय, लेट्स इंडल्ज अ बिट, आज फार थकलोय."![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भयंकर वाईट आयडिया आहे ती.
>> अगदी खर
Pages