निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोर्नडो.. बाबौ...
बाहेर नको निघु अज्याब्बात..उडून गिडून गेली म्हंजी..घरीच राहायचं..दार खिडक्या बंद करुन..
प्रचि मस्तच आहे गं..

मस्तं मस्तं , (रिलेटिव्हली स्वस्तं ही) लाल लाल, गोड स्ट्रॉबेरीज.. आकाराने मोट्ठ्या
इकडल्या ,' महाबळेश्वरातील तील.. Happy

अहं..यम्म यम्म..
स्ट्रॉबेरीज..
पण तू काय लिहिल त्याचा अर्थ लागेना मला..

जागु कातील फोटो.... क्लास..
वर्षु दी, स्ट्रॉबेरीस यम्मी...
दिनेश दा, झलक ईतनी लुभावनी हो तो पिक्चर कैसा होगा...:)
मानुषी ताई, कुठे होतीस ग ईतके दिवस?

सायु....बघ .....निगकरांपैकी फक्त तू आणि अन्जूने मला मिस केलं.......:डोमा:
काल दिवसभर वादळी वारे आणि अंधारी ढगाळ हवा. आज ओके.
<<<<<<<उडून गिडून गेली म्हंजी..घरीच राहायचं..दार खिडक्या बंद करुन..>>>>>>टिने.... आज्ञा शिरसावंद्य! तेच केलं बरं!
जागू काय भारी फोटो काढतीयेस !

वॉव... कातिल हवामान दिस्ताय हं मानुषी..
या जन्मात तरी फॉरेन देशांना माझ्या चरणकमलांच्या स्पर्शाची अनुभुती मिळेल कि नै कुणास ठाऊक..
कित्तीदा वाटत फॉरेन देशांची अतृप्त इच्छा पूर्ण करावी पण अजुन जवळच्या जवळ असलेल्या नेपाळला सुद्धा ते नशीबानं मिळालेल नाही तर अमरिका अन लंडन चे हाल काय सांगावे.. जाऊच द्या.. त्यांच नशिब म्हणावं आणि काय.. Sad

जागु, वर्षुताई, मानुषीताई फोटु लय भारी.

या जन्मात तरी फॉरेन देशांना माझ्या चरणकमलांच्या स्पर्शाची अनुभुती मिळेल कि नै कुणास ठाऊक.. Lol त्यांच्या भाग्यात असेल तर जरूर मिळेल.

बाकी असं अतृप्त ठेऊ नये कोणाला, ते यज्ञ वगैरे करतील तू येण्यासाठी तर लगेच पाव ब्वा त्यांना, जास्त भाव खाऊ नकोस, दर्शन द्यायला Wink .

बाकी तुझी आज्ञा बघ मानुषीताईंनी अमेरिकेत पाळली, टीने.

बाकी तुझी आज्ञा बघ मानुषीताईंनी अमेरिकेत पाळली, टीने. >> म्हणजे काय.. दरारा आहेच माझा.. Proud तेपन जाउच दे.. मुळात मला खुप काळजी आहे हे तिला चांगलच ठाउक आहे..हय ना गं मानुषी..

अन्जू,
तसा एक चान्स आला होता..
पण त्यांनी ट्रान्सपोर्ट साठी पाठवलेल वाहन आवडल नै आपल्याला..
मग काय कोपली ना मी.. नाय म्हणलं Proud

टिने.. आशी काऊन कर्तेस गा.. काय न्हाई समजलं मी लिहिल्यात्लं तुले .. सोप्प तर लिहून राहिलीये Wink
मोडकं ह्व्हराडी ग्वाड मानून घे बर्का Happy इस से ज्यादा नही लिख पाउंगी ..
पासपोर्ट असेल ना तुझा रेडी.. फिर क्या.. तुला कुठेही चरण धूळ झाडायला जाता येईल.. हाकानाका..

पासपोर्ट आहे गो पण सद्ध्या मी सुशिक्षित बेरोजगार आहे.. स्पॉन्सर करणारे मातोश्री अन पप्पा काय जाउ द्यायचे नै मला.. आइशप्पथ हवी ती नोकरी मिळूच दे एकदा ज्याचे इतक्यात चान्सेस आहेच फुल उडवणार आहे मी पैसे.. Lol

मानुषी... आ गई तू मेरे टैम झोन पर... सेम टू सेम

फोटो मस्तं भारीये.. गूढ, गंभीर, थंड , चिडीचूप वातावरण जाणवतंय अगदी!!!
अश्या वेळी फायरप्लेस जवळ गर्रमागर्र्म कॉफी आणी आपल्या माणसांबरोबर रंगलेल्या गप्पा .. ऊब देणार्‍या दोन गोष्टी .. बस और क्या चाहिये!!!!

टिनीमिनी.. समझ के ले.. आसपास पोरंबाळं असली कि कोण शांती मधे पुस्तक वाचू देणारे?? आणी वाटत ही नाही पुस्तक वाचावसं.. धिस इज टोट्टल फॅमिली टाईम Happy

आणी वाटत ही नाही पुस्तक वाचावसं.. धिस इज टोट्टल फॅमिली टाईम स्मित......खरंय गं वर्षू.
तेच्च चाल्लंय इकडे.

आणी वाटत ही नाही पुस्तक वाचावसं.. >> साहकिकच आहे ना.. नविन ठिकाण, नविन वातावरण म्हटलं कि त्याचा आनंद घेण प्रायॉरिटी होते..नेहमी राहणार्‍या लोकांना कदाचित पुस्तक वाचावस वाटेल Wink

मानुषी ताई मस्त फोटो, अच्छा परदेशात आहेस तु..
एखादी चक्कर आपल्या बागेत पण मारत जा...

टीने, अपने भी दीन आयेंगे फॉरेन जाने के...

वर्षु दी लै ग्वाड लिव्हलस ग...:)

Pages