रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा डोळा फडफडतय हा ss म्हणणारी सून अतिच ओव्हरअ‍ॅक्टिंग करते तर ती सायंटिस्ट सून भावशून्य गोळा आहे. शेवटी सासरा गेला हे कळल्यावरसुद्धा शांतपणे म्हणते अरे नाना गेले असतील. याहून दु:ख तर लोक्स पाळीव कुत्रं गेल्यावर सुद्धा करतात.. तिचा नवरा आणि मुलगा साधारण एकाच वयाचे दिसतात. >>>>>++++++११११

सायंटिस्ट सूनबाई सीरिय्ल किलर सारखे भाव आणते चेहर्र्यावर!!!

कालचा episode पाहिला. अभिनयाच्या बाबतीत सगळेच शाळेतील स्नेहसंमेलनातल्या नाटकात काम केल्यासारखे होते. आण्णा जरा बरे वाटले तर पहिल्या भागात त्यांची exit.
बाकी मला विहिरीचा एरियल व्हू छान वाटला.

ह्या भागातील काही गोष्टी एकदम बंडल

१) बंडल कलाकार ज्यांना मालवणी जराही येत नाही. तोंड वेंगाडत आणि डोळे गरागरा फिरवत बोलले म्हणजे मालवणी नाही. Proud

२) अतीच गुढतेचा उगीच मारा
३) मुलगी मुलाकडे सापु ला जाणे
४) रांगोळी चौकोनी काढलेली( शुभ दिवशी अशी काढत नाही म्हणे)
५) नको तेवढे अंधविश्वासाला फोडणी- विधवेने समोर येणे, रस्त्यात 'हे' दिसणे, ताट सांडणे

हे असलं बघून लोकं उगाच विचार करायला लागतील.. आधीच असले समज काय कमी आहेत.

आणि आजच्या काळातील सिरियल आहे ना, मग तरूण मुलीचे लग्न नाही लावून दिले परत......

काहिच्या काहि आहे.

मुग्धटली | 23 February, 2016 - 02:22 नवीन
आणि अजून एक गोष्ट साखरपुडा हा मुलीच्या घरी असतो ना. >>>> या मालिकेत म्हणताय की इन जनरल?
<<<<< इन जनरल

माझा डोळा फडफडतय हा ss म्हणणारी सून अतिच ओव्हरअ‍ॅक्टिंग करते तर ती सायंटिस्ट सून भावशून्य गोळा आहे. शेवटी सासरा गेला हे कळल्यावरसुद्धा शांतपणे म्हणते अरे नाना गेले असतील. याहून दु:ख तर लोक्स पाळीव कुत्रं गेल्यावर सुद्धा करतात.. तिचा नवरा आणि मुलगा साधारण एकाच वयाचे दिसतात. >>>>>++++++११११

आणि अजून एक गोष्ट साखरपुडा हा मुलीच्या घरी असतो ना. >> हो ना, नाहीतर हाॅलमध्ये. मुलाच्या घरी सापु कधी बघितला नायऽऽऽऽऽऽऽ. Wink

घरी लग्न कार्य आणि दारात मांडव नाय? Uhoh ह्या काय पटत नाय बघा.

घरी लग्न कार्य आणि दारात मांडव नाय? अ ओ,>> +१, भागाच्या सुरवातीलाच आलेले पाहुणे भर उन्हात अंगणात उभे दाखवले, नंतर सगळे गायब. आणि मांडव नाही पण भोंगा मात्र लावलेला दिसला Uhoh

त्या आण्णांच्या बायकोच्या चेहर्‍यावर कसले गुढ/खुनशी/काय चाललय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही/काहीतरी भयंकर घडणारे असले मिश्र भाव होते एपिसोड सुरु झाल्यापासुन.

मांडव नाय? ह्या काय पटत नाय >>> +१११
त्या सासूला एकपण डायलॉग नव्हता, पण गूढ एक्स्प्रेशन्स चांगले देत होती ती.. हे एकच पात्र जरा बरं वाटतंय..

हायला! शुभांगी, तेच लिहीत होते मी Happy

त्या आण्णांच्या बायकोच्या चेहर्‍यावर कसले गुढ/खुनशी/काय चाललय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही/काहीतरी भयंकर घडणारे असले मिश्र भाव होते एपिसोड सुरु झाल्यापासुन.>> +१
ते अण्णा अगदी प्रेमाने वैगेरे म्हणतात, 'संध्याकाळी दृष्ट काढुन टाका हो तुमची. ' तरी चेहरा तसाच निर्विकार. जरा म्हणून लाजत नाही ती बाई.

ते अण्णा सूनेच्या आईलाही साडी द्या म्हणतात , तेव्हा त्यान्चा हेतु चान्गला नै वाटला मला!
पण आता तेच गेले!! :p

आणि अजून एक गोष्ट साखरपुडा हा मुलीच्या घरी असतो ना. >>>> या मालिकेत म्हणताय की इन जनरल?
<<<<< इन जनरल >>>> अस काही नाही. माझा सापु नवर्‍याच्याच घरी झाला होता. अगदी घरात नाही पण नवरा पुण्यातला आहे आणि मी कल्याण, पण आमचा सापु पुण्यात झाला होता.

ते अण्णा सूनेच्या आईलाही साडी द्या म्हणतात , तेव्हा त्यान्चा हेतु चान्गला नै वाटला मला! >> म्हणजे विहिरीला नारळ दिला तसा आईला साडी का ??? Wink

ते अण्णा सूनेच्या आईलाही साडी द्या म्हणतात , तेव्हा त्यान्चा हेतु चान्गला नै वाटला मला! >> म्हणजे विहिरीला नारळ दिला तसा आईला साडी का ??? >> Lol
पण तेव्हा तरी त्या बाईला राग यायला हवा ना. तर ते नाय. Uhoh

तो गडी विहिरीला नारळ द्यायला जात होता तेव्हा जाम घाबरले मी. नवरा सारखा म्हणत होता आता ती विहिर नारळ म्हणून यालाच घेणार बघ ओढून. मग घाबरुन मी तो शाॅट बघितलाच नै. Sad शेवटी नवरा 'ओह शट वाचला तो' म्हणाला तेव्हा मी डोळे उघडले. Happy

आणि अजून एक गोष्ट साखरपुडा हा मुलीच्या घरी असतो ना. >>>> या मालिकेत म्हणताय की इन जनरल?
<<<<< इन जनरल >>>> अस काही नाही. माझा सापु नवर्‍याच्याच घरी झाला होता.
>>> माझाही नवर्‍याच्याच गावी नाशिकला आणि आता माझ्या नणंदेचाही तिच्या सासरीच झालाय. अर्थात या सगळ्यात सोय बघितली गेली होती कारण त्यांचेच लोकजास्त होते म्हणुन आणि आम्हाला पुण्यात इतक्या लोकांचा खर्च करण्यापेक्षा लग्न लावुन देणं जास्त परवडलं असत म्हणुन Wink Lol

मला वाटलं त्या रामागड्याला धरणीमाय पोटात घेते की काय आता नारळासकट कारण किती ते भयंकर दाखवत होते एकेक फरशी ओलांडुन जाताना Wink

शुकु Lol

अगं नेहमी नाही बघत मी डोळे मिटुन. Happy पण काल नवरा घरात होता. आणि उगाचच घाबरवत होता त्यामुळे मी आधीच घाबरलेली आणि तो सीन पण भारी शूट केलेला. मग घाबरणं भागच होतं मला. Proud

हेहे, काही सीन बरे जमले होते, विहिरीला नारळ देताना, तसच ते अण्णा पूजा सुरू होण्यापुर्वी मागच्या दाराबाहेर जातात तो आणि नवरी घराबाहेर येते तोसुद्धा. पहिलाच एपिसोड म्हणून प्रत्येकच सीनच्या बॅकग्राऊंडला हॉरर म्युझिक होतं..

ते काल मालवणी ऐकून मीपण नवऱ्याला म्हणाले, ही काय मालवणी भाषा आहे? वाटत नाही. कारण नवऱ्याला मालवणी येतं, मला नाही. तो म्हणाला नाही ग, चुकीचं दाखवतायेत. चलो जाने दो.

एक आठवडा एक स्टोरी असणार बहुतेक त्यामुळे डायरेक्ट शनिवारीच बघू का, हा विचार करतेय. त्या दिवशी सर्व उलगडा होईल असलेल्या-नसलेल्या रहस्याचा.

कमेंट्स वाचायलाच आलेले. एकंदरीतच कोंकण हा नवरोबाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने कामं धामं आटोपून टिव्हीला डोळे डकवून बसलेलो. शीर्षकगीत मस्त शूट केलंय बर्‍यापैकी भंभेरी उडते. पण भाषेत नेहमीप्रमाणे मार खाल्ला! स्थानिक भाषांचं वावडं आहे का या दिग्दर्शकीय लोकांना? ज्या भागातील सिरीयल दाखवणार तेथील कमीत कमी राहणीमान, बोलीभाषा, पेहराव वै. चा बेसिक अभ्यास तरी करावा?

हुवाचा, फडफडता हा टाईप्स मालवणी ऐकून नवरा जाम उखडलेला! नवी पात्रच घ्यायची तर आमची स्थानिक मालवणी पात्र तरी घ्यायची ना? फार हौशीनं अ‍ॅक्टींग करतात ती! निदान या पाठांतर हेलकाढू मालवणी पासून सुटका झाली असती! तुका-माका, शेवटी हा लावणे आणि हेल काढणे म्हणजे मालवणी का? मालवणी-कोकणी-रत्नांग्रीची भेळ घातलेय सगळी! कोकणात नक्की कुठलं ठिकाण दाखवलंय कोणास ठाऊक.

बॅकग्राऊंडचं म्युझिक बर्‍यापैकी हॉरर आहे, पण मला निगेटिव्ह वाईब्ज आल्यासरखं डोकं उठलं त्यानं. त्या ओव्हरअ‍ॅक्टींग करणार्‍या सूनेचे आणि अज्जीबात अ‍ॅक्टींग न करणार्‍या थंड ढ गोळा शास्त्रज्ञ (???) सूनेचे सगळेच डायलॉग्ज डोक्यात गेले. फडफडता हा, हुवाचा आणि नाना असतील तर _/\_!!

बघुया २-३ भागांपर्यंतच बघू शकेन हीच परीस्थिती असेल तर! हेल काढलेलं मालवणीचं लक्तर अगदीच डोक्यात गेलंय!!

Pages