Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 February, 2016 - 01:48
बोलव रे दत्ता चालव रे आता
घालव रे दत्ता मी पण हे ||
जाहलो उर्मट करी कटकट
करावा ना वीट परी माझा
घालवू नकोस धुत्कारू नकोस
अडाणी भक्तास रित्या हाती
असशी दयाळू तू माय कृपाळू
प्रीत आळूमाळू असो द्यावी
वर्षून कृपेसी घेई हृदयाशी
ठाव पायाशी देईं मज
कधी रागावसी तू फटकारशी
धरुनी प्रेमासी मी चुकता |
राहीन दारात तुझिया पथात
घेवूनि हातात प्राण माझे |
विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
मस्त !
मस्त !
सुरेख...
सुरेख...
छान लिहीलय.
छान लिहीलय.
मस्त आहे काव्य... अप्रतिम
मस्त आहे काव्य...
अप्रतिम भक्तीभावनेने ओथंबलेले...
धन्यवाद अश्विनी ,शशांक
धन्यवाद अश्विनी ,शशांक मुक्तेश्वर,,रश्मी, विजय