Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32
ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.
कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!
सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.
प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रेरणा:
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/34946
इथेही यावरच्या आधीच्या पोस्टी
इथेही यावरच्या आधीच्या पोस्टी वाचता येतील. - http://www.maayboli.com/hitguj/messages/644/123173.html
लिंबूटिंबू- नावाप्रमाणेच
लिंबूटिंबू-
नावाप्रमाणेच खोडकर खट्याळ निरागस वाटणारे पण बेरकी व्यक्तिमत्व. एखादा आयडी लहान समजून अंगावर आला तर शिंगावर घेणारे
दोस्तोंका दोस्त दुश्मनोंका दुश्मन असणारे.
हलकेच घ्या!
दिमा एक सफल डाँक्टरआणि
दिमा एक सफल डाँक्टरआणि पुरोगामी लोकांत जो अभावानेच आढळतो तो आक्रमकपणा असलेले पुरोगामी व्यक्तिमत्व.
आजवरच्या अनुभवातून ज्या
आजवरच्या अनुभवातून ज्या आयडींना राग येणार नाही असा विश्वास वाटतो त्यांच्याबद्दलच लिहीन शक्यतो. वर्णन करणं जमत नसल्याने त्याऐवजी मिळत्याजुळत्या सिनेनटाचा उल्लेख करावा लागेल. तरी देखील आधीच घ्यावा खबरदारी म्हणून.
१. दिनेशदा - जोपर्यंत पाहीलेलं नव्हतं तोपर्यंत अतिशय शांत, मनमिळाऊ असा चेहरा समोर यायचा. अनेकदा हे अकाउंट एखादी स्त्री चालवीत असावी अशी शंका यावी इतक्या पाकृ. पण लोकांना ते भेटलेत हे कळाल्याने ती शंका नाहीशी झाली. बलराज साहनी वगैरे सारखं व्यक्तीमत्त्व.
२. रश्मी - यांच्या पोष्टींवरून अंदाजच येत नाही. पण त्यांचा आधीचा आयडी इतका लक्षात राहिला की जेव्हां जेव्हां या तै अवतरतात तेव्हां त्याच त्या उमादेवी आठवतात. त्यांना पण हसायला फार येतं.
३. एक आयडी आहे त्यांचं नाव घेत नाही, पण त्यांना पाहीलं की काकस्पर्श मधला सचिन खेडेकर आठवतो.
४. लिंबुटिंबू आवडता आयडी आहे. त्यांच्या पोस्टी वाचण्याचा प्रसंग येत नाही पण जेव्हढं काही वाचतो त्यावरून राम लखन मधले माधुरीचे पप्पा आठवतात.
५. आदमखान (कोण ते ओळखा ) यांचं नाव घेतलं की दूर टेकाडावरून धर्मेंद्रावर बंदुकीचा नेम धरून बसलेला सांबा आठवतो. फेसबुक वर फोटो पाहील्यापासून अपेक्षा धुळीस मिळाल्या.
जुन्या माबो वर चर्चा झालीय,
जुन्या माबो वर चर्चा झालीय, माझ्या मनातील काही प्रतीमा लिहिण्या ऐवजी खरोखर काढायला सांगितल्या असत्या तर मजा आली असती, तरी पण..
दिनेशदा: माझ्या मनात थोडे टक्कल असलेला, चष्मा लावलेला, पांढर्या (साऊथ इंडियन स्टाईल) मिशा असलेली व्यक्ती होती. (कालांतराने कळाले यातील किमान एक गोष्ट खरी निघाली )
बेफी: का कुणास ठाऊक पण माझ्या डोळ्यासमोर अब्राहम लिंकन सारखी प्रतीमा येते..
मामी: गव्हाळ वर्ण, हसरी मुद्रा, बोलके डोळे असे काहीतरी..
दादः लिखाण वाचतांना सफशेल गोंधळलो होतो, कधी तरूणी, कधी आईच्या वयाची तर कधी अगदी पोक्त म्हातारी वाटायची. (यथावकाश मुर्त स्वरूप कळाले :))
अजुन बरेच आहेत सावकाश लिहितो..
मला तर इथे ९९ टक्के लोक विलन
मला तर इथे ९९ टक्के लोक विलन वाटतात आणि उरलेले १ टक्के लोक विलन पासून दुर पळालेले. त्या एक टक्यात मीही आहे. असे छान बीन तर कुणीकुणीच वाटत नाही. अगदी ठरवून छान दाखवणारे लोकही दिसतात तसेच ठरवून वाईट होणारेही दिसतात.
चंबू, लिंकन?
चंबू, लिंकन?
अब्राहम लिंकन
अब्राहम लिंकन यांच्याबद्दलच्या भादु
कवठी चाफा : उपेन्द्र लिमये
कवठी चाफा : उपेन्द्र लिमये
हर्पेन : एक कन्नड व्यक्तीमत्व
चायला (नवीन आय डी माहीत नाही ) : कधी सौम्य तर कधी पक्क ईरसाल
झकास राव : मिशीला पिळ देणारा रान्गडा गडी
मामी : एक सोज्वळ मनमिळावू सौम्य स्त्री
बेफिकीर : एक धीर गन्भीर शान्त व्यक्तिमत्व
अरेरे. माबोकरांचा अभ्यास कमि
अरेरे. माबोकरांचा अभ्यास कमि पडतोय
कैच्याकै लिंकन
कैच्याकै
लिंकन
केदार १२3 जोक्समुळे प्रसिद्ध
केदार १२3 जोक्समुळे प्रसिद्ध आहेत. खट्याळ, मिस्कील आयडी वाटतो.
मामी - विनोदी लिखाण आणि हजरजबाबीपणा मुळे ये लौंग आपको किसकी याद दिलाता है वाल्या माया अलग ची प्रतिमा डोळ्यापुढे येते.
आगाउ- नाव आणि लिखाण जुळत नाही. खट्याळ खंडू मस्त मौला इमेज वाटते. शम्मी कपूर वाटायचा. पण पाहिल्यानंतर सिनेमात हिरो म्हणून चालला असता.
दिनेशदा: मध्यम वय,चश्मा,
दिनेशदा: मध्यम वय,चश्मा, गहुवर्र्ण,सोम्य व्यक्तिमव्त, याच्या प्रतिक्रिया अतिशय सयन्त असतात. वर लिहिल्या प्रमाणे 'बलराज साहानी' सारखे. त्याच्या प्रतिक्रियानी कुणीहि दुखावल्याचे आठ्वत नाही. (अनुस्वार देता येत नाही )
लिंबुटिंबू : रोक ठोक व्यक्तिमव्त, 'नाठाळ्याच्या माथी हाणु काठी' टाइप, याच्या विचारन्चि बैठ्क पक्की आहे. स्वतःचे मत न बदलणारे , चतुर, धार्मिक आसावे. हे आणि दिनेशदा एकाच वयाचे असावेत.
बेफी: पुणेकर, मध्यम वय. अत्यन्त सवेदन्शील व्यक्तिमव्त, जगण्याकडे पाहण्याची वेगळी नजर , प्रसन्गी खड्तर वाट घेण्याकडे कल.
अरुंधती कुलकर्णी : बरेचसे दिनेशदा सारखे व्यक्तिमव्त, चश्मा असावा.
विशाल कुलकर्णी : बरेचसे बेफीजी सारखे व्यक्तिमव्त, अत्यन्त सवेदन्शील, उत्तम लिखाण,
मामी: मध्यम वय, भटकण्याची आवड,बोलके व्यक्तिमव्त, हजरजबाबी,
साती: परिपक्व, मनात शैशव जपलेले.
नंदिनी: अत्यन्त सवेदन्शील, उत्तम लिखाण,मध्यम वय
आजुन बरेच आहेत.
दिनेशदा: मध्यम वय,चष्मा,
दिनेशदा: मध्यम वय,चष्मा, गहुवर्ण,सौम्य व्यक्तिमव्त, यांच्या प्रतिक्रिया अतिशय सयन्त असतात. वर लिहिल्या प्रमाणे 'बलराज साहानी' सारखे. त्यांच्या प्रतिक्रियांनी कुणीहि दुखावल्याचे आठवत नाही
^
संपादित करु शकता.
व्वा ! मस्तय धागा. मी अजून
व्वा ! मस्तय धागा.
मी अजून माबोवरच्या एकालाही प्रत्यक्ष भेटलेलो नाहीये !
स्पॉक - टेक्नोलॉजीस्ट ! स्पॉक आणि पायस यांची माझ्या मनातली प्रतिमा बरीच सारखी आहे.
गा.पै. - थोडीशी कमी उंची आणि पिळदार शरीर असलेले. NTR(Jr.) सारखी प्रतिमा.
बेफि - शबनम घेऊन फिरणारे कवी असतात तसे. फुल टाईम जॉब न करणारे.
लीम्बुजी - बारीक अंगकाठी असलेले धोतर नेसणारे. पूजा सांगायला येणाऱ्या गुरुजींसारखी प्रतिमा. यांचे आडनाव जोशी असेल असे मला नेहमी वाटते. टिपिकल 'जोशी टाईप' आहेत हे.
दाद - एकदम प्रगल्भ. माझ्या आईसारख्या दिसत असतील अस वाटत.
दिनेशदा - यांच्याबद्दल असे काहीतरी आहे जे इथे कोणालाच माहिती नाही असे वाटते.
दिडमा - तंतोतंत दिग्विजयसिंह यांचीच प्रतिमा डोळ्यासमोर येते.
अजून लिहितो हळूहळू
कवठी चाफा : उपेन्द्र लिमये
कवठी चाफा : उपेन्द्र लिमये >>>>केदार, अगदी अगदी.... आधीचा कचा चा फोटु बघुन अजुनही उ लि ला पाहिल्यावर गोंधळ होतो.
दिनेशदा : शांत, समंजस एकदम आईच्या मायेने, निगुतीने पदार्थ करणारी सोज्वळ + प्रेमळ व्यक्ती
रिया : एखादी अगदीच छोटी, निरागस मुलगी असं वाटतं आपल्याला पण भेटल्यावर चॉकलेटसाठी हट्ट करणारी, आणि थोडीशी(च) बालिश बाकी समंजस मुलगी (रिये गरज नाही पण घेच)
दक्षिणा : एकदम कडक, करारी, स्मार्ट व्यक्तिमत्त्व, जिला भेटायची इच्छा आहे पण समोर आल्यावर भिती वाटेल का?
बाकी माहितीतल्या खुप माबोकरांना भेटल्याने लिहिता येणार नाही.
डॉ. साती जी - कायम गळ्यात
डॉ. साती जी - कायम गळ्यात स्टेथस्कोप असणारे मध्यमवयीन व्यक्तिमत्व लिखाणात तसेच डायग्नोस्टिक्स मधे प्रचंड ऑब्जेक्टिविटी असल्यामुळे कायम चेहऱ्यावर कुठलेतरी कोड़े सोडवत असल्याचा भाव
बेफी - अविनाश खर्शीकर अन प्रदीप पटवर्धनचे लुक असणारी पर्सनालिटी निवांत बसणे ह्यांना कठीण जात असावे अगदी खुर्चीवर बसले तरी खुर्चीच्या हातावर ठेका वाजवत बसत असावेत
विशाल कुळकर्णी - आता ह्या मेल्या बद्दल काय बोलावे
दिमा - व्यग्र अन भुवया उंचावलेला लुक मध्यम ऊँची सावळा वर्ण
उदय - नाव घेतले की उदयन महाराज आठवतात
शशांक पुरंदरे सर- गोरा वर्ण पांढरे केस संयत व्यक्तिमत्व कायम काहीतरी वाचत असलेले
आशुचैंप भाऊ - मध्यम बांधा भरघोस दाढ़ी अन साइकिलिंग च्या वेशात
टीना - कमी ऊंची असणारी अन एक्टिवा चालवणार एक वर्किंग गर्ल
ऋन्मेष - स्वप्नील जोशी लुक्स
रॉबिनहुड - मध्यमवयीन गव्हाळ वर्ण कायम पांढरा शर्ट काळी पैंट काळे बूट डोळ्याला एविएटर अन खिशाला पार्कर पेन
योकु - शेफ विकी रत्नानी सारखी पर्सनालिटी
बाकी आठवतील तसे लिहितो
रॉबिनहुड - मध्यमवयीन गव्हाळ
रॉबिनहुड - मध्यमवयीन गव्हाळ वर्ण कायम पांढरा शर्ट काळी पैंट काळे बूट डोळ्याला एविएटर अन खिशाला पार्कर पेन>>>>> याना दाढी पण आहे.:फिदी: शोभतात ते दाढीत.
पाठीला बाणांचा भाता पण असतो
पाठीला बाणांचा भाता पण असतो ना?
*
बाप्पू,
मी ६ फूट पूर्ण आहे हो.
साती- सुप्रिया सुळे टाईप
साती- सुप्रिया सुळे टाईप व्यक्तिमत्व
लिंबूटिंबू- शरद पोंक्षे टाईप
दीमा- राज ठाकरे टाईप
सोन्याबापू- सुबोध भावे टाईप
ऋन्मेष - प्रत्यक्षात लग्न
ऋन्मेष - प्रत्यक्षात लग्न झालेला साधारण तिशीचा पण bachelor life मिस करणारा म्हणून व्हर्च्युअल जगात बॅचलर बनून वावरणारा एक मुलगा असावा
अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असावा ...........
मी जास्त सक्रिय राहत नाही
मी जास्त सक्रिय राहत नाही माबो वर पण हा धागा वाचायला आवडेल ... म्हणजे यातुन एखाद दोन खलनायक दिसतील बहुदा... जास्तीत जास्त लोकांनी प्रतिक्रिया द्याव्यात.
स्पॉक आणि श्री - माझ्यावर सतत
स्पॉक आणि श्री - माझ्यावर सतत संशय घेणारे, मला कुणाचा तरी ड्यू आय मानणारे पण मनाने चांगले असणारे. मला कळतंय की एखाद्या नव्या आयडी वर पटकन विश्वास नाही ठेवता येत. पण हळूहळू ठरेन तुमच्या विश्वासास पात्र.
चेसुगु: बुटके ,गोल
चेसुगु: बुटके ,गोल चेहरा,चष्मा,गुटगुटीत,इनशर्ट स्टाइल,चप्पल वापरणारे,मारुति डिलक्स अथवा डिझाइअर आवडते.
ऋन्मेष: पाच चार उंची,कल्ले अथवा छोटीशी दाढी,दाट भुवया,टीशर्ट अथवा चौकडीचा शर्टची आवड,टाटा इंडिका आवडते.पुस्तकांची आवड.पॅाइंटिड बूट ब्राऊन कलरचे आवडतात.
रश्मि: एक हात धुवून मागे लागणारे का काय ते व्यक्तिमत्व.शहरातल्या निरनिराळ्या कार्यक्रमास उप्स्थिती लावायला आवडते.रेडिओ लावून वाचन,काम करायला आवडतं.मध्येच सोसायटी कंपाउंडमध्ये कार शिरली की कोण उतरतंय पाहण्यासाठी बाल्कनितले काम निघते.
दिमा - व्यग्र अन भुवया
दिमा - व्यग्र अन भुवया उंचावलेला लुक मध्यम ऊँची सावळा वर्ण
यांना बहुतेक एकच भुवई सुद्धा उंचावता येत असावी, shrewd.
स्पॉक: अभ्यासु, मध्येच सर्कास्टिक, दमदार विनोद करणारे.
रश्मि: एक हात धुवून मागे
रश्मि: एक हात धुवून मागे लागणारे का काय ते व्यक्तिमत्व.शहरातल्या निरनिराळ्या कार्यक्रमास उप्स्थिती लावायला आवडते.रेडिओ लावून वाचन,काम करायला आवडतं.मध्येच सोसायटी कंपाउंडमध्ये कार शिरली की कोण उतरतंय पाहण्यासाठी बाल्कनितले काम निघते.>>>>>>:हहगलो: एस आर डी धमाल आहात तुम्ही.
रेडिओ लावून वाचन,काम करायला आवडतं>>>> हे थोडे बरोबर आहे, पण रेडीओ नाही तर मोबाईलवर गाणी किन्वा कॉम्प्युटरवर डाउनलोड केलेली गाणी आवडतात. त्यातल्या त्यात वसन्तराव देशपान्डेन्ची नाट्यगीते ( कट्यारमधली) किन्वा बाकी मिक्स गाणी लावते मी. निरनिराळ्या कार्यक्रमाना जाताच येत नाही, कारण घरचे व्याप.
.मध्येच सोसायटी कंपाउंडमध्ये कार शिरली की कोण उतरतंय पाहण्यासाठी बाल्कनितले काम निघते.>>>> हा भोचकपणा माझ्यात कमी आणी माझ्या मुलीत जास्त आहे. आमच्या वर आधी एक कुटुम्ब रहायचे, त्या बाई अशा भोचक होत्या, म्हणून माझ्या मुलीला मी त्यान्च्या नावाने चिडवते. तिला अभ्यास नको असेल तेव्हा ती असे उपद्व्याप जास्त करते.:फिदी:
<<<<स्पॉक आणि श्री - माझ्यावर
<<<<स्पॉक आणि श्री - माझ्यावर सतत संशय घेणारे, मला कुणाचा तरी ड्यू आय मानणारे पण मनाने चांगले असणारे. मला कळतंय की एखाद्या नव्या आयडी वर पटकन विश्वास नाही ठेवता येत. पण हळूहळू ठरेन तुमच्या विश्वासास पात्र. स्मित>>>>
तुम्ही तर ऑलरेडी आणखी एक आयडी काढून ठेवलाय संशोधक उर्फ़ बेअर फूट ...;)
हो माहिताय आणि admin ना तो
हो माहिताय आणि admin ना तो डिलीट करायला सांगितलाय.
कापोचे - महेश कोठारे.
कापोचे - महेश कोठारे.
Pages