तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी - लेडी अशोक सराफ >>> अरारारारारारारा ... धन्यच! Rofl

कोणीतरी मला सोज्वळ का कायसं म्हटलंय त्यांना साजूक तुपातला शीरा खायला घालण्यात येईल. ऐन दिवाळीत आलात तर मटण-भाकरी मिळेल.

विकुंच्या चिनुक्सला बघायची भारी उत्सुकता वाटतेय आता. पुण्यनगरीतील आश्रमात प्रस्थान ठेवावे लागणार.

>>>>> लिंबुटिंबू - शत्रुघ्न सिन्हा <<<< Uhoh Angry
खामोऽऽष.... बाळ ऋन्मेषा, तू माझा कोणत्या जन्मीचा सूड का घेतो आहेस अशा उपमा देऊन?
अबे मी खालुन वरुन उजवीकडुन डावीकडून मधुन आतुन बाहेरुन कुठुन कुठुनच शत्रुघ्न सिन्हा नाही रे......

ऋन्मेषने धमाल उडवलेली दिसतेय.

त्याचे लेख आणि त्यावरील प्रतिसाद बघुन मी पण त्याच्याबद्दल वाटलेल्या पर्सनॅलिटीबद्दल लिहिणारच होतो:
तर मला ऋन्मेष म्हणजे, Lunch Box चित्रपटामधील नवाझुद्दीन सिद्दिकी सारखा वाटतो. समोरच्याने काहीही म्हटले, कसलेही भाव दर्शविले तरी "हेल्लो सर! हाऊ आर यु सर!" म्हणत आपली जिद्द न सोडणारा, न कंटाळणारा.
समोरच्या इरफान खानला माघार घ्यायला लावणारा.

अय्यो मेरेको काजोल बोल्या.
तुस्सी बडे मजाकी हो. Lol

धन्यवाद. तुला कोंबडी वडे.
@ विकु मस्तच Lol

प्रसन्न हरणखेडकर - उंचापुरा, आणि अतिशय चमकदार दात असलेला माणूस असावा. >> मला ४० च्या आतला वाटतो.

कापोचे - ६०-६५ वर्षाचे आजोबा, स्वच्छ सदरा-लेन्गा आणि सोनेरी काड्यांचा चश्मा घालणारे. (विस्मरण असलेले, फाटक अर्धीच टाकलीये >> दक्शुतैस अनुमोदन)

साती - उन्च , सावळी , मधुरा वेलण्कर टाईप्स Happy
सस्मित - तरूण पणीची माधवी गोगटे . ( दिवा घे ग ताई )
वर्षू नील ताई - फोटो पाहिला आहे .
मनीमोहोर - आउ Wink

बेफिकीर ,दिनेशदा,लिंबुटिंबू - फोटो बघितलेत Happy
ऋन्मेष - माझ्या डोक्यात प्रतिमा आहे , पण नक्की माणूस सांगता येत नाही . आठवला की सांगते .

मजेशीर धागाय... आंधळी कोशिंबीर खेळल्या सारखे.
मी एकाही माबोकर/करीण ला भेटले नाहिये त्यामुळे त्यांचे लेख/प्रतिक्रीया वाचुन जी काही प्रतिमा झाली ती अशी-
१) रुन्मेष-- स्थुल (जाडे Happy ), गोरे, खाण्याची प्रंचड आवड असणारे. दाढी वाले, एकुलते एक, मराठी मध्यम वर्गिय असे सगळे म्हणजे मग दिदोदु मधला आशु तर नसेल?? तर काय कोण जाणे आशु म्हणजेच रुन्मेष अस काहिसा वाटतय. यांचे लेख मी आशु कसा बोलेल त्याच स्टाईल मधे वाचले.
२) अप्पाकाका (आताचे आयडी नाव माहित नाही)- गोरे घारे ४० ते ४५ वयाचे रोख ठोख थोडे खडुस पण थोडे मृदु स्वभावाचे
३) रिया-गहु वर्णिय, तब्यत बरी- म्हणजे जाड हि नाही बारिक ही नाही, पक्की चिकित्सक, सर्व क्षेत्रात- लिखाण, कविता, पाककला, देव धर्म, कला-सगळच येणारी पण मनापासुन ऑफ़िस काम आवडणारी, स्वभाव मिश्र-जे असेल ते समोर पण तरी जरा जपुन- मन जापुन-राखुन
४) दक्षिणा आणि बी- हे एकत्र- कारण यांचे फोटो आहेत- व्यक्तिमत्व गेस-
अयुष्या बद्दल ठाम मते असणारे म्हणुन असे डॅशींग, मित्र-मैत्रिणी फ़ार नाहीत मोजकेच पण अगदी जिवाभावाचे, अत्यंत रोखठोक, कामात वाघ.
५) साती- ५.५ उंची, कॉटन चा कडक, शुभ्रा ड्रेस, कायम टापटिप, माफ़क-जुजबी बोलणे सरळ मुद्दा सांगणे. हसत मुख पण कडक, बॅलन्सड व्यक्ति
६) दिमा- ६फ़ुट उंची, सावळा वर्ण, दरदरित लांब नाक, टोकाचे हुषार, स्वभावने मृदु हो मृदुच- मतेटोकाची पण ती फ़क्त लिहिण्यापुर्ती- मानवता वादी-थोडेसे खट्याळ

६०-६५ वर्षाचे आजोबा, स्वच्छ सदरा-लेन्गा आणि सोनेरी काड्यांचा चश्मा घालणारे. >>> मला भेटू नका रे कुणी ! हार्ट अ‍ॅटॅकने काही तरी व्हायचं Rofl

सानिसा = साथ निभाना साथिया
नांदा सौख भरे मधल्या सासूचं नाव = सुहास परांजपे

माधवी गोगटे सानिसात कधी आल्या? ती मालिका आणि त्यातली कागडी=कोकिलाबेन माझे अत्यंत प्रिय कॅरॅक्टर आहे. Wink

हो . आता या स्वस्ति, सस्मित यांना सानिसातली सासू म्हणजे नक्की कोण म्हणताहेत याबद्दल आणि त्यावर सस्मित यांची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल माझी उत्सुकता वाढत चाललीय.

स्वस्ति, तुम्ही जवां दे ने कोकिला म्हणणार्‍या हेतलबद्दल बोलताय का?

मला सानिसा माहित नाही. (सानिसा म्हणल्यावर मला तु चीज बडी है मस्त मस्त गाणं सुरु होताना ते सानिसाsss असं आहे ना तेच मनात सुरु होतं. Happy

आणि मा गो पण मी पहिल्यांदाच बघतेय. तर मी काही बोलु शकत नाही. Happy

शर्टची वरची दोन तीन बटन उघडे आणि कॉलर उभी केलेली. बारीक चेक्सचा नेहरु शर्ट. अक्षय कुमार सारखी शरिरयष्टी. त्याच्या समोरुन जाणारी प्रत्येक मुलगी त्याला एकदा तरी निरखून बघते. असे रुप उभे राहते ऋन्मेशचे Happy

निरा धन्यवाद Happy कामात वाघ अगदी बरोबर Happy
मित्र कमी आहेत - हेही बरोबर. (तसे तर खूप आहेत पण जिवाभावाचे कमी आहेत. त्यामुळे बरोबर)
अगदी रोखठोक - हे मलाही माहिती नाही नक्की. माझ्यापेक्षा रोखठोक लोक पाहिली की मला मी मुखदुर्बळ वाटतो Happy

निरा - तुझ्याबद्दल. तू मला वाळ्यासारखी गार, चंदनासारखी शीतल, चांदण्यांसारखी चंचल वाटते. थोडीफार आश्विनी भावेसारखी दिसत असावी.

Pages