Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32
ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.
कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!
सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.
प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्र! गडबड होगयी, सिटी बज
अर्र! गडबड होगयी, सिटी बज गयी. मॅगी आणी इतर लोक्स. अनवधानाने माझ्याकडुन कुणी दुखावले गेले असेल तर मनापासुन सॉरी. साऊथवले स्मार्ट असतातच, पण फोटो मधून नन्दिनीचे लुक्स महाराष्ट्रीयन दिसले. साऊथ म्हणले की गोल चेहेरा, लाम्बसडक केसान्ची वेणी, सुन्दर साड्या ( आता पन्जाबी ड्रेस सुद्धा) मोठे डोळे असे रसभरी त वर्णन असते. असो, जास्त लिहीत नाही, पण सोन्याबापुनी माझे बरेचसे म्हणजे ७० टक्के वर्णन बरोबर केलेय.:स्मित: फक्त ब्लन्ट कट नाहीये, मध्यम केस आहेत, पण काही वर्षानी पोनीटेल ठेवावी लागेल कारण आमच्या पुण्याचे पाणी.
मला वेस्टर्न पेहेराव अजीबात सुट होत नाहीत, मी दिसायला बरी असुनही. कारण तसे लुक्स पण असावे लागतात, जसे काही मायबोलीरणीन्चे आहेत.
प्रसन्न हरणखेडकर - उंचापुरा,
प्रसन्न हरणखेडकर - उंचापुरा, आणि अतिशय चमकदार दात असलेला माणूस असावा. ३० च्या आतला.
रश्मी - गोबरी, गोरी, जरा बुटकी, दिसायला सुंदर. टिपिकल कोकी असावी.
कापोचे - ७० वर्षाचे आजोबा, धोतर झब्बा घालणारे. (विस्मरण असलेले, फाटक अर्धीच टाकलीये :राग:)
टिना - बारिक, सावळी चुणचुणित २५ च्या आतली मुलगी.
केदार १२३ - अतिशय खोडकर, येता जाता पोटाला गुदगुल्या करणारा.
साती - साडी नेसणारी, एक बो घालणारी किंचित स्थूल मध्यमवयीन स्त्री वाटते.
रश्मी - गोबरी, गोरी, जरा
रश्मी - गोबरी, गोरी, जरा बुटकी, दिसायला सुंदर. टिपिकल कोकी असावी.>>>> अग्ग बाय माझी मी गोबरी नाही, बुटकी नाही, दिसायला नीटनेटकी आहे ( सुन्दर नाही, सुन्दर म्हणजे माधूरी दिक्षीत, जयाप्रदा, हेमा झालच तर नलिनी जयवन्त वगैरे) आणी मी कोकी नाही. अर्धी देशस्थ+ अर्धी कर्हाडे आहे.:स्मित:
साती- चालायला चटपटीत, स्मार्ट, चेहेर्यावर गोडवा, मिश्कील्पणा, मध्यम उन्ची, बान्धेसुद असावी.:स्मित:
दक्षिणा! साडी आणि मी! आणि
दक्षिणा!
साडी आणि मी!
आणि माझे केस छोटेसे आहेत.
बो काय क्लिप पण लावणं कठिण!
>>>सुन्दर नाही, सुन्दर म्हणजे
>>>सुन्दर नाही, सुन्दर म्हणजे माधूरी दिक्षीत, जयाप्रदा, हेमा झालच तर नलिनी जयवन्त वगैरे<<<
ह्यात नंदिनी हे नांव राहिलं की!
(आता 'कृपया इकडे लक्ष द्या' ह्या धाग्यावर गदारोळ होणार माझ्या नावाने)
बाकी जयाप्रदा, हेमा ह्या साऊथ इन्डियन असूनही सुंदर वाटतात तुम्हाला?
मी आणि बार्बी डॉल
मी आणि बार्बी डॉल
दक्षे,
बारिक काय, सावळी काय
मी श्वास घेतला तरी फुगते
खात्यापित्या घरची आहे
सोन्याबापूनं केलेल वर्णन बरचं खरं आहे..
येप्प! हेमामालिनी माझी
येप्प! हेमामालिनी माझी अत्यन्त आवडती हिरॉईन. पण मध्यन्तरी जी तिने माणुसकीहीन वर्तणूक केली, ती माझ्या डोक्यात गेली. जयाप्रदा देखील सुन्दरच आहे. टिपीकल भारतीय सौन्दर्य! मला साऊथवाल्या मुलीन्च्या लाम्ब सडक, दाट, भरघोस केसान्चा, मोठ्या डोळ्यान्चा जाम हेवा वाटतो.
बापू, साडी (तीपण कांजीवरम)
बापू, साडी (तीपण कांजीवरम) आणि मी??? :दचकणारी नंदिनी:
>>>>> आणी मी कोकी नाही. अर्धी
>>>>> आणी मी कोकी नाही. अर्धी देशस्थ+ अर्धी कर्हाडे आहे <<<<<< तर्रीच्च.... मला अंदाज आलाच्च होता म्हणा .....
तुम्ही ना धड ह्या ह्यांच्या इकडच्या... ना धड त्या त्यांच्या तिकडच्या.....
व्हय वो. जशी कॉकटेल्स असतात
व्हय वो. जशी कॉकटेल्स असतात ना मिक्स तशी हाय म्या.:खोखो:
>>>>> व्हय वो. जशी कॉकटेल्स
>>>>> व्हय वो. जशी कॉकटेल्स असतात ना मिक्स तशी हाय म्या <<<<<
राजकीय कॉकटेल्स लई डेंजर बर्का....
मागे एक असाच बीबी होताना?
मागे एक असाच बीबी होताना? खूप मजा आलेली तिथे वाचून.
मी पण सक्रिय नाही मायबोलीवर.
मी पण सक्रिय नाही मायबोलीवर. पण धागा वाचायला आवडेल.
निवडक दहात घालून ठेवते म्हणजे पटकन वाचता येईल
मी निवडक दह्यात वाचलं आणि
मी निवडक दह्यात वाचलं आणि 'पाककृती वाला कोणता धागा वाचत होते' म्हणून क्षणभर विस्कळीत झाले
दिनेशदा, मस्त आलाय फोटो.
दिनेशदा, मस्त आलाय फोटो.
मला ज्या मायबोलीकरांविषयी
मला ज्या मायबोलीकरांविषयी उत्सुकता वाटते, मी लगेच त्यांचे प्रोफाइल बघते आणि थोपुवर देखील सर्च करुन बघते.
इथं खरी नाव फार कमी लोकांनी
इथं खरी नाव फार कमी लोकांनी टाकलीए म्हणुन प्रत्येकवेळी थोपूवर त्यांना बघण कठीण होतं
ऋन्मेऽऽष - ती अॅड आहे ना...
ऋन्मेऽऽष - ती अॅड आहे ना... हँडस् अप बाॅबी.. बाॅबी हँडस् अप... मधल्या बाॅबीसारखा वाटतो सेम.
थोपु म्हणजे, थोबाड पुस्तक का?
थोपु म्हणजे, थोबाड पुस्तक का?
थोबाड पुस्तिका उर्फ Facebook
थोबाड पुस्तिका उर्फ Facebook
शक्यतो जे आयडी कथा लेख वा
शक्यतो जे आयडी कथा लेख वा धागे लिहितात अश्यांबद्दल प्रतिमा चटकन तयार होते माझ्या मनात.
तर काही आयडी बघून कोण प्रसिद्ध फिल्लमस्टार नजरेसमोर येतात ते लिहीतो.
का ते लॉजिक शोधायला जाऊ नका.
साती - स्मिता पाटील
नंदिनी - हेमा मालिनी
रीया - अनुष्का शर्मा
सस्मित - काजोल
वर्षू नील ताई - श्रीदेवी
टिना - दिव्या दत्ता
मनीमोहोर - मीनाकुमारी
सीमंतिनी - मौसमी चटर्जी
दाद - रोहीणी हट्टंगडी
मी अनु - दिप्ती नवल
मामी - लेडी अशोक सराफ
फारेंड - रवी शास्त्री
फेरफटका - द्वारकानाथ संझगिरी
असामी - संजय मांजरेकर
भाऊ - सचिनचे आचरेकर सर
बेफिकीर - राजेश खन्ना
दिनेशदा - दिलीप कुमार
लिंबुटिंबू - शत्रुघ्न सिन्हा
सोन्याबापू - दादा कोंडके
हर्पेन - अमोल पालेकर
राकु - अमजद खान
दिमा - ईरफान खान
ऋन्मेष - शाहरूख खान
काही अजून चांगले ओळखू लागलेलो आयडी लिस्टीत टाकायला आवडले असते पण नेमके कलाकार डोळ्यासमोर येत नव्हते.
- कोणा स्त्री आयडीचा आक्षेप असेल तर पोस्ट संपादित करायला सांगा.
मामी - लेडी अशोक सराफ
मामी - लेडी अशोक सराफ
भारी ..
भारी ..
असामी - संजय मांजरेकर >>>
असामी - संजय मांजरेकर >>> खामोश!
राकु - अमजद खान >> अरे काय..
राकु - अमजद खान >> अरे काय.. अमजद खान का ते ?
सोन्याबापू : तिरंगा मधला
सोन्याबापू : तिरंगा मधला राजकुमार. तोंडात डायनामाईट युक्त पाईप. एखादे टोळके देशद्रोहाच्या गप्पा मारत असताना "पोट्टे पाट्टे देशद्रोहाच्या गप्पा मारून राहिले की बे !" असे उद्गार काढून त्यांना मिलिटरी इश्शू बुटाने मारणार आणी नेहेमिच्या ठेल्यावर पान खायला निघून जाणार !
चिनूक्स : पुण्याच्या आसपास कुठेतरी एक आश्रम. नेसलेला पंचा व दांडीवर वाळत घातलेला पंचा एवढाच काय तो वार्डरोब. निरपेक्षपणे ज्ञानयज्ञात आयुष्याची समीधा टाकणारे तळपते ज्ञानसूर्य. आश्रमात फारसी/संस्कृत्/पाली/अर्धमागधी पोथ्या रचून ठेवलेल्या. जमीनीवर बसून "झरत्रुष्ट्र कालीन इराण मधील जिलेब्यांतील पाकाचे प्रमाण" या आगामी लेखाची तयारी करत आहेत. अधून मधून संदर्भा साठी फारसी शब्दकोष चाळत आहेत.
विकु
विकु
विकु
विकु
झरत्रुष्ट्र कालीन इराण मधील
झरत्रुष्ट्र कालीन इराण मधील जिलेब्यांतील पाकाचे प्रमाण >> विकु
फेरफटका - द्वारकानाथ संझगिरी:
फेरफटका - द्वारकानाथ संझगिरी: हे मला प्रामुख्याने क्रिकेट च्या धाग्यावर टंका-टंकी केल्याचं मिळालेलं फळ आहे.
Pages