Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32
ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.
कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!
सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.
प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असा चित्रपट खरंच येतोय? की
असा चित्रपट खरंच येतोय? की आलाय?
अहो नीधप, पण माझ्या मनातील
अहो नीधप, पण माझ्या मनातील शबाना आझमीची प्रतिमा नक्की कशी आहे हे तुम्हाला कुठे ठाऊक आहे
लॉर्ड ऑफ शिंगणापूर
लॉर्ड ऑफ शिंगणापूर
शिंगणापूरमध्ये साईबाबा कसे?
शिंगणापूरमध्ये साईबाबा कसे? ते शिर्डीला असायचे ना :अओआईग्ग:
पादुकानन्द , तुमच्या डोक्यात
पादुकानन्द ,
तुमच्या डोक्यात कोण आहे ते तुम्हालाच ठाऊक..
पण बोलताना जरा भान ठेवा प्रतिसादात.. वाचायला सुद्धा घाण वाटतं..
वाईटच आहे का मग ठिके.
वाईटच आहे का मग ठिके.
by sanshodhak लिंबूटिंबू-
by sanshodhak लिंबूटिंबू- नावाप्रमाणेच खोडकर खट्याळ निरागस वाटणारे पण बेरकी व्यक्तिमत्व. एखादा आयडी लहान समजून अंगावर आला तर शिंगावर घेणारे दोस्तोंका दोस्त दुश्मनोंका दुश्मन असणारे. हलकेच घ्या!
बरोबर ओळखलेत मिथुन रास मिथुन लग्न, सबब मनाने चिरतरुण.... योग्य त्या दुसर्यास श्रेष्ठत्व देऊन, पुढारीपण देऊन स्वतःकडे "लहानपण" अनुयायीपणा स्विकारणारे मन, पण वेळेस अति होतय असे दिसल्यास वीजेच्या वेगाने सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची राखीव क्षमता.
by kaapoche ४. लिंबुटिंबू आवडता आयडी आहे. त्यांच्या पोस्टी वाचण्याचा प्रसंग येत नाही पण जेव्हढं काही वाचतो त्यावरून राम लखन मधले माधुरीचे पप्पा आठवतात.
इथे पण कोड्यात बोलतो, मला रामलखन आठवत नाही, त्यातलि माधुरि नाही की नाही तिचे पप्पा आठवत.
अन माझे लिखाण वाचित नाई तुम्ही हे काय बरे नाही हो..... किती मधुररसाला मुकताय तुम्ही...
अन तुमचा फोटो कधी कुठे बघितला हो?
by ashvinI लिंबुटिंबू : रोक ठोक व्यक्तिमव्त, 'नाठाळ्याच्या माथी हाणु काठी' टाइप, याच्या विचारन्चि बैठ्क पक्की आहे. स्वतःचे मत न बदलणारे , चतुर, धार्मिक आसावे. हे आणि दिनेशदा एकाच वयाचे असावेत.
अगदी बरोब्बर, फक्त दिनेशदा वयाने थोडे लहानच असावेत माझ्यापेक्षा. मात्र त्यांच्या देशविदेशातील वास्तव्याचा, कामाचा अनुभव दांडगा, म्हणूनच मायबोलीव्र माझ्यापेक्षा वयाने लहान असणार्यांनाही त्यांच्या कर्तुत्वामुळे मी माझ्यापेक्षा मोठेच मानतो त्यातिलच हे एक व्यक्तिमत्व.
by praku लीम्बुजी - बारीक अंगकाठी असलेले धोतर नेसणारे. पूजा सांगायला येणाऱ्या गुरुजींसारखी प्रतिमा. यांचे आडनाव जोशी असेल असे मला नेहमी वाटते. टिपिकल 'जोशी टाईप' आहेत हे.
होय हो, निवडक दिवशी माझा असाच वेश असतो. बारीकच आहे मी अजुन तरी. मात्र आडानाव "एकारान्त / त्यातुन रेकारान्त" कोब्राचे आहे. जोशी नाही.
by prakash ghatpande लिंबूटिंबू- शरद पोंक्षे टाईप
प्रकाशराव, हा मी माझा बहुमान समजतो. पण मी दिसायला तसा नाही. शरद पोंक्षे करारी/रुबाबदार व्यक्तिमत्वाचे आहेत. माझ्यात त्यातिल एकही लक्षण नाही, ते हजारालाखतही उठुन वेगळे दिसतील, मी दोनचार जणातही दखल न घेण्यासारखा बाजुला पडीक असेन....
सस्मित, गोरी आणि उंच मी आहेच,
सस्मित, गोरी आणि उंच मी आहेच, पण शिल्पा तुळसकर :इश्शः
ती खूपच सुंदर आहे गं दिसायला. आणि तिचा स्वभावही शांत असावा.
काही मायबोलीकरांच्या मनात माझी ऑनलाईन प्रतिमा 'खड्डूस' अशी होती, मला भेटायच्या अगोदर, आणि मुग्धानंदसारख्या दुष्ट कुचकट मैत्रिणींनी 'हो, हो, खरंय, आहेच ती खड्डूस!' म्हणत दुजोरा दिला होता
मी पण दुजोरा देऊ का मंजुडे
मी पण दुजोरा देऊ का मंजुडे
>>>> काही मायबोलीकरांच्या
>>>> काही मायबोलीकरांच्या मनात माझी ऑनलाईन प्रतिमा 'खड्डूस' अशी होती, मला भेटायच्या अगोदर <<<<
मला वाटते की मंजुडी, मी तुला अजुनही भेटलो नाहीये, बघितले नाहीये..... तेव्हा त्या काही माबोकरात मी देखिल आहेच्चे...
फक्त तू मुम्बैकर असल्याने "अगदीच कै त्या निवडक पुणेरी पेठी स्त्रीपुरुष आयड्यांसारखी प्रत्यक्षातही " खडुस असशील असे वाटत नै बर्का...
पण खडूस असण्यात काय वाईट आहे
पण खडूस असण्यात काय वाईट आहे मंजू?
भेटण्या अगोदर खडुस अशी
भेटण्या अगोदर खडुस अशी प्रतिमा नंतर बदलली का नाही ते सांगा आधी
मला तर रोज भेटणारे सुध्धा, घरचे दारचे सगळेच बरीच रीजर्व आहे/ थोडी खडुस वाट्टे नै असं म्हणतात.:-)
आयला! इथे मी एक पोस्ट
आयला! इथे मी एक पोस्ट लिहेपर्यंत दोन तीन पोस्टी पडतात
वाईट काहीच नाही नी भेटण्या
वाईट काहीच नाही नी
भेटण्या अगोदर खडुस अशी प्रतिमा नंतर बदलली का नाही ते सांगा आधी दिवा घ्या>> सस्मित, यावर नो कमेंट्स! उगाच कशाला ना मला खडूस समजणार्यांच्या मनातली प्रतिमा बदलायची
रिया-गहु वर्णिय, तब्यत बरी-
रिया-गहु वर्णिय, तब्यत बरी- म्हणजे जाड हि नाही बारिक ही नाही, पक्की चिकित्सक, सर्व क्षेत्रात- लिखाण, कविता, पाककला, देव धर्म, कला-सगळच येणारी पण मनापासुन ऑफ़िस काम आवडणारी, स्वभाव मिश्र-जे असेल ते समोर पण तरी जरा जपुन- मन जापुन-राखुन
>>>
यातलं एकही नाही गं
पाककला वाचून उडून पडले तरी पण धन्स
ऋन्मेष, पोहचलं धन्स
स्मिते
मी कुणाकुणाचा डूआयडी होते
मी कुणाकुणाचा डूआयडी होते एकेकाळी. माझेपण दोन चार डु आयडी येऊन गेले. मग वविला लोकं प्रत्यक्ष माझ्यासकट माझ्या डुआयडीला भेटली होती.
अहो लिंबूआजोबा, आपण भेटलोय
अहो लिंबूआजोबा, आपण भेटलोय कर्जत वविला.
नी - माशी क्लॅरिफिकेशन बद्दल
नी - माशी क्लॅरिफिकेशन बद्दल आभार
मंजुडी
मंजुडी
काय धमाल चाललीये या
काय धमाल चाललीये या धाग्यावर..
ऋन्मेष... मी श्रीदेवी????????? ऊप्स... मेरेपर ( किंबहुना श्रीदेवीपर ) क्यूं ये जुल्म??
यंदा वर्षाविहाराला हजेरी लाव... सब गलतफहमियोंको दूर कर्नेके लिये
मामी--- लेडी अशोक सराफ... अरारारा... , ऋ ला नक्कीच नाही मिळणार साजूक तुपातला शिरा.. हीही
"फेरफटका - क्रिकेट तर आहेच.
"फेरफटका - क्रिकेट तर आहेच. पण आपल्या उपमा उदाहरणे बघून द्वारकानाथ संझगिरी आठवतात. त्यांचे लेखही मी मधूनच वाचायला सुरुवात केली तरी समजते की हा लेख त्यांचाच असणार. आपलीही एखादी उपमा वाचनात आली की मी वर आयडी नाव बघून कन्फर्म करतो की येस्स फेरफटकाच आहेत." - ऋन्मेष, बस, अब रुलायेगा क्या?
लिंबूकाका विपू पहा
लिंबूकाका
विपू पहा
बऱ्याच माबोकराना /
बऱ्याच माबोकराना / माबोकरिणीना प्रत्यक्षात भेटलेय. ( ववि त्यासाठीच तर असतो )
इथल्या पोस्ट्स भारी आहेत . गंमत वाटली वाचून .
नंदिनी आणि हेमामालिनी ?????
नंदिनी आणि हेमामालिनी ????? अगायाया
नंदुभाय पढ रे ली है क्या
अभ्यासपुर्ण पोष्टी लिहिणारे
अभ्यासपुर्ण पोष्टी लिहिणारे अशोक यांना एकदा प्रत्यक्ष भेटायची ईच्छा आहे.
ते दिसायला एक्स मिल्ट्रीमनसारखे असावेत असे वाटते.
छे हो महेश , अशोक मामा एकदम
छे हो महेश , अशोक मामा एकदम साधे आहेत दिसायला
अशोक पाटीलच ना ? या नावामुळे
अशोक पाटीलच ना ? या नावामुळे तगडी तब्ब्येत, पिळदार मिशा, करारी आणि भेदक नजर, इ. इ. वाटत होते.
नाही, ते साधे आहेत.
नाही, ते साधे आहेत.
>> या नावामुळे तगडी तब्ब्येत,
>> या नावामुळे तगडी तब्ब्येत, पिळदार मिशा, करारी आणि भेदक नजर, इ. इ. वाटत होते. स्मित
>> नाही, ते साधे आहेत.
तगडी तब्येत, पिळदार मिशा, करारी आणि भेदक नजर असलेली माणसं साधीही असू शकतात की ..
सशल, ते एक्स मिल्ट्रीमन
सशल,
ते एक्स मिल्ट्रीमन ह्याबाबत आहे.
Pages