निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, फळं आणी पदार्थांची नावं लक्षात राहतात.. नॉट फुलांची... कारण काही माहीतच नसतात..
पण त्याकरता तुम्ही सर्व आहातच सांगायला... Happy

या फुलांचं/ फळांचं नांव सागा पाहू

१)


आपकी हार्ड डिस्क टेरा-टेराबाईट्स की है क्या ???? स्मित - कुछ गिगाबाईट्स जरा इधर बी पास करना.... >> अरे काय लोक तुम्ही..टेरा काय गिगा काय..इथ आम्ही एक एक एमबीशी झुंजतोय ..
पायातली चप्पल हरवल्याचं दु:ख निदान लंगड्यासमोर तरी बोलू नका .. Sad

नविन प्रचि मस्तच वर्षू..
मी सांगितले असते .. पण असु दे इतरांना ओळखु दे.. Proud

आजकाल जागु इतकी कमी का दिस्तीये???

जागु ला जागृत करायला हा नैवेद्य.. जय जागू माँ!!!

आता बघा येईल पट्टकिनी Happy

काय इचीबन लोक हाय..
कस्काय वरच सगळे याक्टीव्ह अस्तात न इथं दुष्काळ.. सार्‍या जगाची काळजी मायाच माथी..
असो..

तर झाल असं का आमच्या ओनर कल्ल्या आंब्याच्या झाडाले आला मोहोर न मंग मी विचार केला अर वा आता पक्षी बी दिसनं याच्यावर कदी कदी.. मंग म्हणल आपण त्यायच्यासाठी खाऊ ठिवला त कसं..आता ताटलीत गिटलीत का ठिवाचा..मंग मले दिसला जमवून ठेवलेल्या आईस्क्रीम स्टिक्स..लगेच का का करु शकतो याचा ठोकताळा बसोला न एकदाच हे तयार करुन टाकलं..

आता नेमक हे तयार झालं न फ्लॅट सोडाचा विचार सुरु झाला.. तर का करावं ?
कसाय न आपण सुद्या मनानं काहीतरी करतो पण सर्व्याइले ते आवडनचं हे जरुरी नै ना.. आता मी निगुन गेल्यावर आमच्या ओनर नं नै तर त्याइच्या लेकराइनं ते घर दाबल न पक्षाइचे दाणे देल्ले फेकुन त कोणत्या भावात जाईन म्हणुन मंग पक्षाइले दाणे साद्या सुद्या कारटन च्या बक्स्यात ठेउन मी हे घर आमच्या कार्टून गाथा ला देणार हाय..
तिले पन दाणा कसा टाकाचा, पक्षी कशे यीन अशी सब फुस लावुन देतो म्हणजे घरी कल्ला सुरु होइल, पक्षायचा न माणसायचा सोबतच Wink ..

हे पा बनोलेली खोपडी.. लय सुंदर नाई हाय .. मी आर्किटेक्चर नाय ना म्हणून..
लाकड कापण्यात पण चुकले जरा जरा अन फ्लोअरिंग पण एवढ चांगल नाई जमलं पण असो..

टिनीमिनी नाईस ट्राय.. पण पक्ष्यांकरता इत्कुसं दार?? मोठा कर ना प्रवेश द्वार.. Wink

एखादा धसमुसळा ,मोठासा पक्षी आला तर ? आईसक्रीम च्या स्टिक्स स्ट्राँग आहेत ना पुरेश्या??

बाकी रूफ मस्तं दिस्तंय.. Happy

आहा मस्त गुलाब...
अग मी दाणे अंगणात पसरवून ठेवणारे.. ती झोपडी म्हणजे गोदाम आहे बस Lol
हो...इतक्या स्ट्राँग आहे कि मी तोडते म्हटल तरी तुटेना ते घर Sad

वर्षू, मस्त फोटो.. काल शुभेच्छा द्यायच्या राहिल्या ( ट्रांझिट मधे होतो )

तूझा व्हॅलेंटाईन डे !

बाकी, नि, ग, करांनो, सध्या प्रवासात आहे. भारतात काही जणांना भेटेनच. व्होट्स अप वर पण नाहीये सध्या. मग परत अंगोलाला गेलो कि येतोच.

टीना मस्त घर बनवलेस ग! एकदम गोडः-)
वेलेंटाईन्स फ्लॉवर पण मस्त वर्षूदी .
दिनेश दा इथे आल्यावर निगकरांना कधी भेटणार आहेत?

दिनेश, थांकु थांकु.. Happy काल दिवस रात्र नुस्ती धमाल केली होती !!!!

ओह.. भारत भेट पण आहे तुझी आता?? कधी???? आता डिसें शिवाय तुझ्या भेटीचा योग नाही दिसत Uhoh

@ अन्जू.. बघ की गं.. आता येईल बहुतेक...

इतका लपायचा प्रयत्न केला याने.. पण त्याचा ब्राईट रंग लपू देईना त्याला

एक शोध लागला.. कोस्तारिकाचे आंबे अतिशय रसदार, गोड, केशरी रंगाचे आणी मधुर वासाचे असतात.कंपेअर्ड टू इतर साऊथ अमेरिकन आंबे..
कोस्तारिकन मैत्रीणी च्या घर च्या अंगणातले झाड!!! मागच्या बाजूला तर चक्क आंबराईच होती,,

पक्षी कसला सही आहे..कलर कॉम्बो तर गजब..चुम्मेश्वरी एकदम..

वर्षू ,
हे असं आंब्याच झाड बघुन इकडली आठवण येत असेल ना ?
आणि तिथं ते बघुन ती मैत्रीण अगदी जवळची वाटली असेल नै ?
मला तर जर्रासा कोकण फिल सुद्धा आलं.. Happy

यस्स्स टीना.. लोकं दिसायला अगदी वेगळी आणी कानावर पडत असलेली भाषा फक्त स्पॅनिश.. या दोन गोष्टी सोडल्यास सब अपना अपनासा फील Happy

वर्षूताई नेवैद्य पावला ग. मी आले Lol आणि आज कोलंबीचे प्रकार पण टाकलेत बघ माबोवर.
काही आठवडे जरा बिझी होते. आता थोडी रुळावर येतेय गाडी.

हे पा बनोलेली खोपडी.. लय सुंदर नाई हाय .. मी आर्किटेक्चर नाय ना म्हणून.. >>>>> टीना - अगदी सुबक बनवलंय की हे घर ... नक्कीच पक्षी येऊन रहातील यात ..... Happy

वर्षुदी - तो भडक मेकप केलेला पक्षी Happy Wink आणि कैर्‍यांनी लगडलेले झाड - मस्तच ...

vt220 ,
हे वावळ्याचे बी आहे. Holoptelea integrifolia
याला monkey biscuit पण म्हणतात.
हे सोलून आतले बी खाता येते. भोपळ्याच्या बी सारखे लागते.

सुदुपार...

आज आमच्या गोकर्णावर तीळे जन्माला आलेत...

टीना खुपच छान केलय घर, मी फार पुर्वी केलेला आणि पेन स्ट्यान्ड पण केलेला..

आणि तो गुलाब अगदी मान वर करुन शुभेच्छा देतोय...:)

आदीजो ते बी पाहिले होते पण नाव आणि माहिती आजच कळली..:)

Pages