सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
(No subject)
या फुलाचं नांव काय आहे??
या फुलाचं नांव काय आहे??
रेड पॅशन फ्लॉवर आहे.
रेड पॅशन फ्लॉवर आहे. कृष्णकमळाचा प्रकार.
सुंदर दिसतंय!
वर्षू, तो लाल तूरा देशागणिक
वर्षू, तो लाल तूरा देशागणिक बदलतो असे दिसतेय. मी हा फार तोकडा पण दाट आणि ताठ बघितलाय.
पॅसिफ्लोरा फॅमिलीत आता बरेच रंग दिसतात. आणि काही कलर्स कॉम्बिनेशन्स पण. देखणी असतात सर्व !
सद्ध्या इकडे गप्पा मारायला
सद्ध्या इकडे गप्पा मारायला जमत नाहीये, पण वाचतेय सगळं. नव्या भागातले सगळेच फोटो सुंदर!
शोभा, त्या येना बंगल्यातल्या सिल्क फ्लॉस ट्री बद्दल आपण मागच्या वर्षी बोललो होतो! या वर्षी फुलं जरा कमी वाटली. येनाच्या आवारात केवढं मोठं बांधकाम करताहेत ... बाग कमी होणार तिथली
अलिबाग जवळ समुद्रकिनार्याच्या इथे या सुंदर शेंगा आणि फुलं दिसली:
काय आहे ते आठवत नव्हतं पण विषारी / धोक्याचं आहे हे डोक्यात होतं म्हणून हात लावला नाही आणि वाचले! नंतर बघितलं - ही खाजकुईली आहे!
अजून एक गंमत बघितली एवढ्यात
अजून एक गंमत बघितली एवढ्यात ... आमच्या सोसायटीच्या दारात हे कलाकारी सापडली:
From australian_babhool
बी आणि शेंगेला जोडणारे तंतू किती सुंदर! ही ऑस्ट्रेलियन बाभळीची वाळलेली शेंग आहे. हिरवी पानं दुसर्या झाडाची. वर फोटोशेजारी लिंक आलीय त्या अल्बममध्ये अजून फोटो आहेत या शेंगांचेच.
कसले एकेक सही फोटो
कसले एकेक सही फोटो आहेत.
माझ्या टोमॅटोच्या रोपाला ३ टोमॅटो आलेत. त्यापैकी एक जरा मोठा झालाय, बाकी बारीक आहेत. तो मोठा झालेला पिवळसर केशरी रंगाचा दिसतोय, तर तो झाडावरुन कधी काढायचा हा माझा प्रश्न आहे. तो पुर्ण लाल होईपर्यंत झाडावर ठेवायचा का?
अन्जू, तो टोमॅटो आताच काढून
अन्जू, तो टोमॅटो आताच काढून ठेवायचा. बाहेरच ठेवायचा ( फ्रीजमधे नाही ) २ दिवसात पिकेल. तो काढला तर उरलेले दोन मोठे होतील.
गौरी, खाजखुजलीने खाज येते
गौरी, खाजखुजलीने खाज येते एवढेच पण ती विषारी नाही. तिची खाजरी कुसेही औषधी असतात आणि तिच्या बिया ( कौचा) फार पौष्टीक असतात. त्याचाच कौचापाक करतात. फुलांचा गुच्छ असतो. ( वर मोजकीच दिसताहेत. )
खुप खुप धन्यवाद दिनेशदा.
खुप खुप धन्यवाद दिनेशदा.
माझ्या टोमॅटोच्या रोपाला ३
माझ्या टोमॅटोच्या रोपाला ३ टोमॅटो आलेत>>>>> अन्जू, कुंडी मोठी आहे का?
५-६ महिन्यांपूर्वी २ अरवी कुंडीत खोचल्या होत्या.४-५ दिवदांपूर्वी कोंब आला,त्यातून २ पाने आली आहेत.पाहू कबुतर अळू ठेवते की नाही.
(No subject)
देवकी नाही. पण ह्यावेळी आलेत.
देवकी नाही. पण ह्यावेळी आलेत. नेहेमी रोपाला फुलं येतात पण टोमॅटोपर्यंत मजल जात नाही. फार मोठा नाही झालाय टोमॅटो पण बरा आहे. बाकीचे दोन बघुया आता.
अळू अरे वा. हो ना कबुतरे सगळीकडेच खूप आहेत.
जिप्सी फोटो सुंदर. काय आहे ते, कॅक्टसचा प्रकार आहे का.
सगळेच फोटो मस्त. अंजु,
सगळेच फोटो मस्त.
अंजु, टोमॅटोचा झाडावर असतानाचा फोटो टाक ना.
पहायची उत्सुकता वाटतेय.
अरेरे हेमाताई, काढला टोमॅटो.
अरेरे हेमाताई, काढला टोमॅटो. फोटो नाही काढला. मला नाही फोटो तंत्र जमत :(. एनिवे दुसरे दोन जर मोठे झाले तर जरुर काढेन फोटो.
दिनेशदा, फुलं सुकत होती
दिनेशदा, फुलं सुकत होती झाडावरची, थोडीच शिल्लक होती. खाजकुईलीचे एवढे औषधी उपयोग आहेत हे माहित नव्हतं! ती कुसंच खाजरी असतात ना? मग खातात कशी?
जिप्सीच्या फोटोत काटेरिंगणी आहे ना? मस्त फोटो!
सगळ्यांचे फोटो सुंदर
सगळ्यांचे फोटो सुंदर आहेत.
गौरी माझी आजी पूर्वी कुयलीच्या कोवळ्या रोपांची मुळे काढायची आणि ती धुवून चावायला द्यायची. चांगला लागतो त्याचा रस चघळताना. मला अजून चव आठवतेय लहानपणीची. जंत वगैरे मरतात अस म्हणायची आजी.
सगळ्यांनी टाकलेले फोटो भारीएत
सगळ्यांनी टाकलेले फोटो भारीएत ....
माझ्या टोमॅटोच्या रोपाला ३ टोमॅटो आलेत. >>>>>> अंजू - आमच्या बागेतही टोमॅटोच्या रोपाने टोमॅटो धरलेत - लहान आहेत अजून ....
जिप्सीच्या फोटोत पिवळा धोत्रा
जिप्सीच्या फोटोत पिवळा धोत्रा आहे,काटेरिंगणी नाही ती.
जिप्सीच्या फोटोत पिवळा धोत्रा
जिप्सीच्या फोटोत पिवळा धोत्रा आहे,काटेरिंगणी नाही ती.त्याला स्वर्णक्षिरी असेही म्हणतात.
अंजू दुसरे टोमॅटो मोठे झाले
अंजू दुसरे टोमॅटो मोठे झाले तर नक्की काढ फोटो.
किंवा शशांक तुम्ही तरी टाका तुमच्या झाडावरच्या टोमॅटोचे.
हेमाताई इथे दिनेशदा याचं
हेमाताई इथे दिनेशदा याचं वाचलं आणि लगेच काढला टोमाटो, सकाळी कबुतरं येतात ती भीती होतीच मनात, मनात होतं संध्याकाळी नको काढायला.
शशांकजी मस्त, तुमची बाग आहे त्यामुळे छान येतील टोमाटो. माझी कुंडी .
शोभा, त्या येना बंगल्यातल्या
शोभा, त्या येना बंगल्यातल्या सिल्क फ्लॉस ट्री बद्दल आपण मागच्या वर्षी बोललो होतो! या वर्षी फुलं जरा कमी वाटली. >>>>>>अग, नाही. मी जेव्हा इथे लिहीलं ना, त्याच्या आधीपासून तो वृक्ष अगदी फ़ुलांनी पूर्ण भरला होता. फ़क्त गुलाबी झाड दिसत होत. तु पाहिलस तो पर्यंत फ़ुले कमी झाली.
सर्वांचे फोटो मस्त. अंजू, आम्ही कोकणात असताना लावलेल्या टोमॅटोंचा आकार खूप छान असायचा. गोल लाल भोपळ्यासारखा आणि मधे रेषा. त्याची चवही खूप छान असायची. आम्ही टोमॅटो धुऊन नुसतेच खायचो. इकडे तसे टोमॅटो बघायलाही मिळत नाही. तुझ्याकडचा कसा आहे?
माझ्याकडचा लांबट, प्लेन आहे
माझ्याकडचा लांबट, प्लेन आहे शोभा. ते असंच बिया टाकते कुंडीत त्याला आलंय.
माझ्याकडचा लांबट, प्लेन आहे
माझ्याकडचा लांबट, प्लेन आहे शोभा.>>>>>>>>>>.म्हणजे इकडचाच. मला तो गावठी हवाय.
शोभा तु म्हणतेस तसे इथल्या
शोभा तु म्हणतेस तसे इथल्या बाजारात हल्ली कधीतरी विकायला असतात. गोल गोल आणि त्याला देठ पण असत. नॉर्मल पेक्षा अगदी थोडे महाग असतात.
हो मीपण बघितलेत तसे एकदोनदा
हो मीपण बघितलेत तसे एकदोनदा इथे.
कोकणात भाज्या घरी करणं म्हणजे मस्त जागा, माती सर्वच छान. झाडांना मुक्त वातावरण पण इथे कोकण म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा असल्यासारखं. फक्त आठवत राहायचं.
कोकणात भाज्या घरी करणं म्हणजे
कोकणात भाज्या घरी करणं म्हणजे मस्त जागा, माती सर्वच छान. झाडांना मुक्त वातावरण >>>>>>>>.हो. त्यामुळे तिथल्या भाज्यांची चव पण छान असायची.
अदिजो, दिनेश आवं
अदिजो, दिनेश आवं सांगितल्याबद्दल धन्यवाद..
टोमॅटोज झाडावर लागलेले क्यूट दिसतात अगदी.. फोटो काढा लोक्स!!!
ते सुंदर,गोल , लाल टोमेटोज आजकाल हद्दपार होत चाललेत.. फार क्वचित दिसतात,
हिमाचल मधे पाहिलेत . पातळ साल वाले गोल्,लाल वाले. ग्रेवीज मधे अलगद विरघळते साल .
वर्षू ताई, मस्त Red Passion
वर्षू ताई, मस्त Red Passion Flower....
गौरी ताई, खाजकुयलीचे प्रचि छान पण Australian Babhool जास्त छान...
जिप्सी, पिवळा धोत्रा खासच... मस्त प्रचि..
Focus n Blurre... वाह...
Pages