Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि वरच्या साहित्यात उकडलेला
आणि वरच्या साहित्यात उकडलेला बटाटा, टॉमेटो पण घाल आणि कांदा तिखट असेल तर कमी, म्हणजे एकत्र खाताना कमी तिखट होईल. थोडक्यात भेळ कर लेस तिखट चटणी
सूप किंवा तत्सम युटेन्सिल
सूप किंवा तत्सम युटेन्सिल (गेला बाजार नवे कोरे केरभरणे) वापरून त्या गव्हाच्या लाह्या पाखडून व नंतर चाळून घ्या. तिखट गळून पडेल, व सुसह्य होतील.
ही आयड्या चांगली आहे त्या
ही आयड्या चांगली आहे त्या बटाट्याच्या जाळ वेफर्ससाठी सुद्धा.
भेळ करुन झाली पण गव्हाचे
भेळ करुन झाली पण गव्हाचे मुरमुरे फारच लाबट असल्याने प्रकरण मिसळून येत नाही फारस , भेळ केल्याने चव अजुन सुधारली पण तिखट पणा कन्टीन्यु! बटाटा अॅडुन बघते,
दिमाचा उपाय पण करुन बघावा.... (रच्याकने पोन्ग्यासारखेच लागणारे हे प्रकरण तेलकटही नाहीये त्यामुळे एक तिखट सोडल्यास बाकी गोष्टि आवडेश!)
आप्पे करून बघा सिजन
आप्पे करून बघा सिजन चालूये..जमून जातील
आप्पे करून बघा स्मित सिजन
आप्पे करून बघा स्मित सिजन चालूये..जमून जातील >>> मेधा .
बाळकोबानी हौसेनी आणलेली केलॉगची पाकिटं तशीच पडलीत .
मी आता ती ही आप्प्यात ढकलावी का विचार करतेय
गोड केलॉग आप्प्यात ढकललं तर
गोड केलॉग आप्प्यात ढकललं तर आप्प्याचा पोपट होऊ शकेल
गोड आप्प्यात हो ! तिखट आप्यात
गोड आप्प्यात हो ! तिखट आप्यात नाही
मग ढकला बिनधास्त
मग ढकला बिनधास्त
व्हीट पफ्स तिखट असतील तर दही
व्हीट पफ्स तिखट असतील तर दही / ताकात जरा वेळ भिजवून, नीट मिसळून, त्यात कोथिंबीर, चवीनुसार मीठ वगैरे घालून खाता येतील. दही / ताकाने तिखटपणा जरा कमी जाणवेल.
भेळ केलीत तर त्यात लिंबाचा रस घालायला विसरू नका. त्याने तिखटपणा कमी जाणवेल.
थोड्या पफ्सचा मिक्सरमध्ये भुगा करून तोही वेगवेगळ्या प्रकारे खपवता येईल, किंवा चटणी म्हणून वापरता येईल.
शर्मिला.. मॅकडेमिया नट्स अन
शर्मिला.. मॅकडेमिया नट्स अन व्हाईट चॉकलेट असलेल्या कुकीज माझ्या जीव की प्राण आहेत. मी घरी नाही बनवत अर्थात. पण करून बघ. त्या भन्नाट वासाने गाव गोळा होईल त्याचे बघ काय ते..
व्हिट पफ्स काही भाज्या घालून
व्हिट पफ्स काही भाज्या घालून पण छान लागेल बहुतेक. कांदा, मटार, फ्लॉवर (अजुन आवडेल ते) वगैरे फोडणीला घालून मिरची किंवा तिखट न घालता वाफ आणली आणि मिक्स केलं तर चांगलं लागेल, कदाचित.
माझ्याकडे चांगला बासमती
माझ्याकडे चांगला बासमती तांदूळ २-३ किलो आहे . जुना झाला म्हणून आवरताना मी तो उन्हात ठेवला . तांदूळ उन्हात ठेवू नये हे माहित असूनही काय होतय थोड्या वेळ ठेवला तर हा माझा आगावूपणा नडला
आणि आता तो तांदूळ शिजवला कि पार गाळ शिजतो .
त्याची फिरनी, खीर छान होते.
पण एवढा तांदूळ संपणे शक्य नाहीये.
तर मग ह्या तांदळाचे काय करू .
भाजणी, आंबोळी अशा पिठात वापरला तर चालेल का ?
डोसे , इडली अशी ओली पीठ कशी होतील
किंवा अजून काय करता येयील
मृणाल, ते तांदुळ जरा वेळ भिजत
मृणाल, ते तांदुळ जरा वेळ भिजत घालून नंतर मिक्सर मधून काढून लग्गेच त्याचे एउकड केली की छान लागते
(आमच्या घरी तांदळाचे पिठ तयार नसते मग मी आणी बहिण उकड खाविशी वाटली की हे असच करतो)
मृणाल१, त्याचा मऊ गुरगुट्या
मृणाल१, त्याचा मऊ गुरगुट्या भात करता येईल. नाश्त्यासाठी असा भात, त्यावर तूप, मीठ, मेतकूट. सोबत उपवासाचे लिंबाचे लोणचे. स्वर्ग!!
यम्मी!!मी येईन खायला.
यम्मी!!मी येईन खायला.
बासमतीला वास छान असतो
बासमतीला वास छान असतो त्यामुळे पानगी मस्त होईल. (एरवी आम्बेमोहोर वापरतात.)
मृणाल, भाकर्या जमत असतील तर
मृणाल, भाकर्या जमत असतील तर दळुन आणु शकतेस तांदुळ.
thanks रिया , अकू , योडी ,
thanks रिया , अकू , योडी , सीमंतिनी
भाकरी होईल का अशा तांदळाची ?
तांदूळ धुवून वाळवून दळून आणायचा का भाकरीसाठी ?
मृणाल, नीरडोसा करून बघा
मृणाल, नीरडोसा करून बघा त्याचा. चांगला होईल.
भजी सुरेख (खुसखुशीत, खमंग,
भजी सुरेख (खुसखुशीत, खमंग, कमी तेलकट स्मित ) होण्यासाठी च्या युक्त्या सांगा.
रावी, भज्यांचं पीठ भिजवतांना
रावी, भज्यांचं पीठ भिजवतांना थोडं तांदूळपीठी वापरायची. त्यानी भजी खुसखुशीत होतात. तेलाचं मोहन घालतांनाही तेल कडकडीत गरम हवं.
धन्स योकु. भजी छान होण्यासाठी
धन्स योकु. भजी छान होण्यासाठी सोडा घालावाच का?
भजी करताना सोडा घातला तर भजी
भजी करताना सोडा घातला तर भजी तेलकट होतात. त्यापेक्षा वर सांगितलंय तसं तांदळाची थोडी पिठी आणि कडकडीत तेलाच मोहन घाला. तळताना भरपूर तेलात, तेलाचं तापमान योग्य राखत तळल्यास भजी खुसखुशीत आणि कमी तेलकट होतात.
मी तांदुळ पीठ आणि गरम
मी तांदुळ पीठ आणि गरम तेलाबरोबरच एक स्पुन corn flour पण घालते. बहुतेक फेमिना मधे वाचलेली टीप होती. आणि खरंच क्रिस्प होतात भजी.
रोज ऑफिसला घेऊन जायच्या
रोज ऑफिसला घेऊन जायच्या डब्यामध्ये काय घेऊन जायचं यावर एक धागा आहे का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/37604 रन्गासेठ हे बघा.
.
.
धन्यवाद
धन्यवाद
नवरयाने पूर्ण गल्लीला पुरेल
नवरयाने पूर्ण गल्लीला पुरेल इतका पुदीना आणून ठेवला आहे. काय काय करता येईल?? ताकाचा मसाला, पाणिपुरी, पुदीना चटणी एवढे डोक्यात आहे. अजुन काय करू?
Pages