युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरभर्‍याचा पाला मिळाला मार्केटात. त्याची आंब भाजी म्हणून एक भाजी करतात. ती उद्या करेन म्हणते. कुणी रेसिपी द्याल का?

माझ्याकडे संपदाने चित्र दिलं आहे तसा फिल्टर आहे. त्यात कोठाज किंवा नरसू किंवा कुर्ग कापीने मज्जा येते. इथे हे तीन ब्रॅन्ड्स मिळतात. नायतर मग आपली चिकोरीवाली ब्रू. Happy

नका हो ती चिकोरी ब्रू फिल्टरात घालून पिऊ! :टाहो!: Proud

ती कशी प्यायची? कपात घालून चांगली घोटून घेऊन, दाट दूध घालून. अगदी वेलची-जायफळही नको. नुसती घोटूनच चढली पाहिजे Wink फिल्टर आणि ती ब्रू, दोघांचाही अपमान नाही का होत तुमच्यात अशी कापी पिऊन?

बाळ प्रज्ञा, चिकोरी घातलेली ब्रू फिल्टर कॉफी प्रकारात मिळते हो. ती फिल्टरात घालूनच बनवावी लागते, घोटून बनणारच नाही Proud

ह्या वेळी आईने मला तो कापी फिल्टर आणला भारतातून आणी मेरीतो लाइफ बन गयी. मी इंग्रोत मिळणारी ब्रूची कॉफी पावडर वापरते)नॉट इंस्टंट, फिल्टरसाठी बनलेली वेगळी कॉफी पावडर) काय मजा येते कापी प्यायला.

खरच जरी महिन्या दोन महिन्यातून एकदाच वापरला तरी पैसावसून आहे तो फिल्टर.

हा असलाच फिल्टर walmart टाईप दुकानात मिळतो मे? बघितल्यासारखा वाटतोय. नसेल तर भारत आणि इंग्रो सोडून कुठे मिळतो का?

सानुलीच्या फोटोत आहे तसा कॉफीमेकर मिळतो इथे सर्रास. ऑफिसमधे बरेच जण कॉफी बिन्स घेउन ते ग्राइंडरमधे वाटुन सकाळी आल्या आल्या त्या कॉफिमेकरमधे गरम पाणी टाकुन ठेवतात आणि लागेल तशी पितात.
फिल्टर कॉफी म्हणजे असाच प्रकार असतो का?

@निधप
आता तुझी भाजी करून पण झाली असेल . पण झाली नसेल तर निट निवडून घे .( ताजी भाजी मिळाली आहे अस गृहीत धरून ) आळया खूप असतात त्या भाजीत. झटकून घ्यावी लागते ती भाजी .
आणि दिलेली लिंक वाळलेल्या भाजीची आहे

काही डेखं जरा जास्तच जून वाटत होती त्यामुळे मी निवडूनच घेतली.
नशिबाने अळ्या नव्हत्या.
पण थँक्स गं.
दिलेल्या लिंकवरची केली नाही. चकली ब्लॉगवर आहे त्या रेसिपीने केलीये. ती जास्त आवडली मला.

कोवळी भाजी फार मस्त लागते. पूर्वी शेतातून येत असे घरी. तोच रेफरन्स असल्यामुळे भाजीवाल्याकडून घेतलीच जात नाही .

काल रात्री मी भेंडीची भाजी चिरुन, थोडी परतुन ठेवली तेव्हा चिकटपणा नव्हता .. नंतर जेवायचा मेन्यु थालिपीठ + लोणी वर आल्याने भाजीनंतर करु म्हणुन बाजुला ठेवली .. मग कंटाळा आला म्हणुन ती भेंडी थंड करुन तशीच डब्यात घालुन ठेवली.. पण आज सकाळी भाजी करता परत ती चिकटच झाली :(.. भाजी करताना \ केल्यावर आलेला तो चिकटपणा कसा घालवायचा?

भेंडीची भाजी झाल्यावर आलेला चिकटपणा बहुतेकदा जात नाहीच. कोरडी भाजी असेल तर दाण्याचं कूट घालून प्रयोग करून बघायचा. नाहीतर चिंचगूळ घालून सरळ रसभाजी करून टाकायची.

दाण्याचं कुट घातल होतं .. पण ते भेंडी वेगळी नि मसाला वेगळा असं झालं.
रसभाजी >> बेटर हाफ म्हणलेच "आमच्या घरी करत नाहीत असलं कधी" Proud .. म्हणुन मी अजुन ताकातली भेंडी पण नाही केली

सी.. ओक्के ट्राय करेन

भेंडीच्या भाजीची ( काचर्‍या ) माझी यशस्वी ट्रीक आहे, मीठ सगळ्यात शेवटी घालुन भाजी मिक्स करायची. अजिबात चिकट होत नाही. नाहितर भेंडी कितीही धुवून, पुसून घेतली तरी चिकटचं होते.

पण भेंडी चिकट होणारच. तिचा गुणधर्मच आहे तो Happy ती चिकट झाली म्हणून तिच्या बिचारीवर रागावू नका आणि तुम्ही उदास होऊ नका. त्यातून मार्ग काढा. लिंबू, आमसूल, दाकु असे पारंपरिक उपाय आहेतच. पण भेंडी बराच वेळ परतली तरीही तिची तार जाते. लक्ष ठेवून तिथेच उभं रहायला हवं मात्र.

कारलं कडू नसेल, मेथी कडसर नसेल, मुळा किसल्यावर त्याला ऊग्र वास आणि तिखट चव नसेल, कोबी शिजवल्यावर 'घमघमाट' सुटत नसेल तर मजा ती काय? - हे अवांतर आहे याची मला कल्पना आहे Proud

भेंडी कोरडसर करायची असेल तर सरळ भरवाँ भिंडी/ भेंडी करायची. मी फोडणीतच बेसन/ मूगडाळपीठ खमंग परतून घेते. त्यात तिळकूट, दाणेकूट, लसूण पेस्ट, चिंचेचं बुटूक, गरम मसाला, धणेपूड, आमचूर पावडर घालून खमंग परतायचे. त्यात भेंडीच्या काचऱ्या (मूळ रेसिपीत भेंडीला उभी चीर देऊन त्यात मसाला भरणे वगैरे प्रकार आहे. पण मला काचऱ्या जास्त सोप्या वाटतात) घालून मंद आंचेवर अधूनमधून परतत राहायचे. भेंडी रंग बदलू लागली की मग जरा सावधान मोडमध्ये ती आपल्याला हवी तितकी कुरकुरीत, चुरचुरीत परतायची, मीठ चवीप्रमाणे घालून नीटच मिसळायचे. (मी जनरली मीठ मसाल्यातच घालते.) झाकण न लावता ही भाजी करायची असल्याने बाकी स्वैपाक उरकत एका बर्नरवर ही भाजी मंद आंचेवर शिजवायची. मसाल्याच्या कोरडेपणामुळे तार येत नाही व खमंग भाजी तयार होते. मूळ कृतीत तार येऊ नये म्हणून लिंबाचा रस घाला सांगितलंय, पण मी चिंच वापरते. तेल नेहमीपेक्षा सढळ हाताने वापरावे लागते हीच काय ती दु:खाची बाब!

तेल नेहमीपेक्षा सढळ हाताने वापरावे लागते >>>> आमच्यात Wink नेहमीच सढळ हाताने तेल वापरतात भेंडीच्या काचर्‍यांना त्यामुळी भाजी कधीच चिकट होत नाही Happy

Pages