युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्लेपमध्ये नाही तार येत, बरोबर अनघा. तरीपण मला इतकी सवय झालीयना की भेंडी फोडणीला टाकल्याबरोबर मी लिंबूरस टाकते थोडा, निर्लेप भांड्यात केली तरी.

चनस भेंडीची भाजी करताना मी...
*तेल जास्त घालते
* भाजी सारखी परतत नाही, मधून मधून परतते
* चिंच घालते, किंवा लिंबू पिळते
* झाकण ठेवायचं नाही अजिबात.
* शिजली भेंडी की सर्वात शेवटी साखर आणि मीठ घालायचं.

भेंडीची भाजी करताना मी...
*तेल जास्त घालते>>.+१.भेंडी चिरण्याआधी सर्व भेंडी कोरडी असावी.
झाकण न लावता परतत करावी .भेंडी शिजल्यावर त्यात १-२ कोकमं घालावी.अजिबात तार येत नाही.

भेंडी तू गरम असताना झाकली असशील तर पाणी सुटून दुसर्यांदा परतताना त्या पाण्यामुळे चिकट झाली असेल.

चनस, आंच मंद ठेवायची, निर्लेप भांड्यात भाजी करायची म्हणजे करपत नाही, मसाला परतत रहायचा असतो सुरुवातीला काही वेळ, थोडा खमंग वास यायला लागतो - तेव्हा भेंडी घालायची.

कुणी उत्तरच देईना !
नेटवर अमूलचे हेवी व्हिपिंग क्रीम वेगळे दाखवत आहेत आणि फ्रेश क्रीम नीट घट्ट होत नाहीत असे म्हणत आहेत. शेल्फवर कधीच पाहिल्याचे आठवत नाही व्हिपिंग क्रीम. फ्रेश क्रीमच असते. असो. आता प्रयोग करुन बघते.

अगो, व्हिपिंग क्रिम मिळ्तं त्यांचं पण ते बहूतेक अर्धा किलो की एक किलो चं पॅक असतं. मी एकदा इथे केकच्या दुकानात बघून आले होते पण किलोभर क्रीमचं काय करायचं या विचाराने आणलं नाही.
फ्रेश क्रिम कितीही फेटलं तरी तितकंसं घट्ट होत नाही.

फिल्टर कॉफी चे फिल्टर मिळाले तुळशी बागेत..ढिंक चिका ढिंक चिका.
पण एकदा केल्यावर घरातली कॉफी संपली. एम आर किंवा ब्रू फिल्टर कॉफी आजूबाजूच्या दुकानात पाहिली पण खप नसल्याने सर्वत्र नेसकॅफे आणि ब्रू इन्स्टंट च आहे.
आता बिग बास्केट वगैरे वरुन मागवेन. एकदा केली होती ती छान लागली.

अनु, इफ यु डोन्ट माईंड, फिल्टरची किंमत काय आहे सांगतेस का? मला एके ठिकाणी छोट्या फिल्टरची किंमत रू. ३००/- सांगितली जी मला जास्त वाटली. इथेच कुठेतरी चर्चा झाली होती तेव्हा १५०/- लिहिली होती किंमत कोणीतरी.

पूनम, मीच लिहिली होती १५०/-. केईएम हॉस्पिटल समोरच्या गल्लीत बालाजी नावाचे साउथ इंडिअन पदार्थांचे दुकान. तिथेच कॉफी पावडर, रस्सम पावडर इ. खरेदी करता येते.. Happy

मी पण आणले आहे फिल्टर, लगे हाथ मला कोणी पाककृती पण देइल का ?
मी फिल्टरमधे केलेली कॉफी अजिबात चांगली झाली नाही.
विपुत दिली तरी चालेल.

केईएम हॉस्पिटल समोरच्या गल्लीत बालाजी नावाचे साउथ इंडिअन पदार्थांचे दुकान. >>>>>> कुठे आहे? मला अजुनही ठाउक नाही हे दुकान. Uhoh

सस्मित, केईएम हॉस्पिटल गेट समोरच्या गल्लीत आप्पे, ईडली डोसा वगैरेच्या हातगाडया असतात तिथेच हे दुकान आहे. कदाचित दुकानावर नाव वेगळं असेल पण कॉफी पावडर, रस्सम वगैरे बालाजी ब्रँड्चं असतं.. हे एकच दुकान आहे तिथे त्यामुळे लगेच सापडेल..

गिरनारचे दुकान असेल तिकडे मिळेल फिल्टर कॉफी.>> हो का? हे सोपंच काम झालं मग. गिरनारचं दुकान अगदी जवळ आहे. आता फिल्टरचीच काय ती कमी आहे! ऑनलाईन बघते काय किंमती आहेत ते.

स्वाती२, सॉरी, पाहिलीच नव्हती तुमची पोस्ट. लिंकमध्ये क्रीम व्हिप होतं पण २५ मिनिटं लागतात असं म्हटलंय.
ह्यावेळी मी वेकफिल्डचं कस्टर्ड करुन घेऊन त्यात अमूलचे क्रीम मिसळले आणि लेयर्स लावले. छान झालं होतं पुडिंग.
२५ मिनिटांचा खटाटोप बघता ह्यापुढेही हीच पद्धत वापरेन बहुतेक Happy

(फिल्टर्ड) कॉफीप्रेमी पु़णेकर्स, जमलं तर दोराबजीला भेट द्या. कॉफी बिन्सची इतकी प्रचंड वरायटी आहे. लेटली कॉफी रॅकवर खुप ब्रॅन्ड्स, क्वालिटीज आणि वरायटीज दिसताहेत. एरवी नुसत्याच इन्स्टंट आणि साध्या पावडर्स असायच्या. बिन्स आणुन ग्राइंड केलेली कॉफी म्हणजे स्वर्ग. अक्षरशः व्यसन लागतं. Authentic टेस्ट हवी असेल तर फ्रेश बिन्सच.

ही सर्व दुकाने आमच्या पासून बर्‍याच अंतरावर आहेत. दिवसाचे साडे नऊ-दहा तास हपिस ला आणि दीड तास ट्रॅफिक ला वाहिला असल्याने बिग बास्केट किंवा ग्रोफर्स वरुन हपिसात डिलीव्हरी घेण्यात येईल.

अरे हो आठवले, कोकणे चौकाजवळ एक चहा कॉफी विकणारे दुकान आहे.बहुतेक दुर्गा कॉफी च्या समोर.आणि स्पॉट १८ च्या शेजारी एक केरला दुकान आहे.

Pages