निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा, अरेरे, वाईट वाटले वाचुन.. लोकांना काहीच कसे वाटत नाही असे करतांना..
हिरवा गार निसर्ग, फुलं झाड आणि पक्षांनी भरलेली सोसायटी कीती छान दिसली असती...
डासांकरता आणखी काही उपाय करता आले असते की...

रच्याकने, आशुपालव म्हणजे कुठले झाड?

आमच्या सोसायटीत खाली पसरलेले सगळे गोकर्णाचे वेल उपटून टाकले गेले. हेच गेल्या वर्षी कृषकमळणीच्या वेलाचे झाले. डास होतात म्हणे

मुर्ख अशिक्षित लोक आहेत. माझी शेजारीणही माझ्या झाडांकडे बघत नेहमी हेच उद्गार काढत असते. म्हटले सगळी झाडे कापुन टाका आणि ऑक्षिजन सिलेंडर्स विकत घ्या.

आमच्या सोसायटीतपण हल्ली फार उदासिनता आहे झाडांबद्दल, पुर्विची मोठी झाडं आहेत सुदैवाने आपलं अस्तित्व टिकवुन. मला सोनटक्का माझ्या कुंडीतला खाली जाऊन लावायचाय पण हल्लीच्या उदासिन वातावरणामुळे लावला नाही मी.

सुप्रभात निगकर्स!
सध्या जमत नाहीये इथे यायला. पण जमेल तसं वाचतेय!
इथे एक आनंदाची बातमी शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये!
माझ्या जावयाचा एक (सिनियर्)जिवलग मित्र, ज्याला आम्ही आमच्या उसगाव भेटीत भेटतोच भेटतो........................राहूल ठक्कर याला ऑस्कर मिळालं.
त्याला जेव्हा सर्वात प्रथम भेटलो.......६/७ वर्षांपूर्वी..त्याचा स्टुइओ, त्याची पेन्टिन्ग्ज, त्याच्या कलाकृती बघूऩ अगदी जॉ ड्रॉप्ड. आणि त्याची पॅशन जाणवून वाटलं होतं हा कुणीतरी वेगळा आहे. नक्की खूप पुढे जाणार! त्याचे वडील चंद्रकांत ठक्करही नावाजलेले कलावंत होते!

हे

हे आहे का?
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kapok%20Tree.html

बुन्धा ९ फुट व्यासाचा होतो वगेरे लिहीले आहे. मी जितकी झाडे बघितली आहेत, ती जास्तीत जास्त १.५-२ फुट रुन्दीची बघितली आहेत.

दिनेश वाढदिवसाच्या शुभेछा!

शोभा, सायु मस्त गुलाब. शोभा बाल्कनीत ही मस्त फुलवली आहेस बाग.

माझ्या जावयाचा एक (सिनियर्)जिवलग मित्र, ज्याला आम्ही आमच्या उसगाव भेटीत भेटतोच भेटतो........................राहूल ठक्कर याला ऑस्कर मिळालं. >> मानुषी काय भारी वाटलं असेल ना. माझ्यातर्फे ही अभिनंदन सांग .

सगळ्या निगकरांना रविवारच्या शुभेच्छा !!!

DSCN2051-001.JPG

शेतात पिकले मोती! तरुणाने गडचिरोलीसारख्या मागास जिल्हय़ात गोडय़ा पाण्यात चक्क मोती पिकवण्याची किमया करून दाखवली आहे. -

http://www.loksatta.com/bavankashi-news/naxal-belt-farmer-takes-to-pearl...

Ceiba pentandra किंवा कपोक नाव आहे याचे. सध्या हिरवी फळे आणि फुले दोन्ही आहेत झाडांवर. फुले खाली गोलाकारात गळून पडतात

हा आपल्याकडचा नाही. मूळ साऊथ अमेरिकी आहे. तिथल्या जंगलात इतके रुंद खोड सहज शक्य आहे. ट्रॉपिकल आहे, त्यामुळे आपल्याकडेही चांगला वाढतो. जंगलात कदाचित रुंद खोड पाहायला मिळेल.

धन्यवाद साधना!
मनीमोहोर सुन्दर सजावट केली आहे.

सध्या मुम्बैमध्ये दुरापास्त असलेल्या थन्ड आल्हाददायक हवेचा लाभ घेत सन्ध्याकाळी अर्धा एक तास चालत होते. परवा पहिल्यान्दा आम्ब्याच्या मोहोराचा गन्ध अनुभवला!. बोरीवलीतील करुणा इस्पितळाकडुन आयसी कोलनीकडे जाताना एक विशिष्ट वास नाकात भिनत होता. जन्गलाचा वास म्हणुन समाधान करुन घेत होते, पण मन मानत नव्हते. मग जरा निरीक्षण केल्यावर लक्षात आले, जिथे आम्ब्याची झाडे होती आणि मोहोर होता, तिथेच गन्ध जाणवत होता.
शोध लागल्यामुळे आनन्द झाला. Happy

मराठीत लिहिताना तो अर्धा न न येता अनुस्वर यावा म्हणुन काय करावे?

अरे वा, आपल्या माणसाला ऑस्कर मिळाले, अभिनंदन.

फेसबूक वर खरी जन्मतारीख टाकली तर त्याच्या गैरवापर होऊ शकतो. एकदा खरे नाव, ईमेल, जन्मतारीख सापडली, कि मन पॅन कार्ड, फोन सिम कार्ड मिळवता येते, म्हणून शक्य असल्यास तिथल्या तारखा बदला.
फेसबूक पण लबाडी करते, तारीख फक्त एकदाच बदलता येते !!!

अर्रे व्वा!!! ममो, राहुल ठक्कर यांना ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिमान वाटला.. आणी तू तर प्रत्यक्षच भेटलीयेस या व्यक्तीला.. वॉव यू लकी!!! Happy
ममो, फुलांची रांगोळी सुरेख

सायु सुंदर आहे तुझी बाग.

दिनेश.. युअर लॉजिक इज राईट.. तरी मी तुला फेबु वर शुभेच्छा दिल्यात .. वर्षातून दोन्दोन्दा वादिहाशु ..वॉव. Happy

दिनेशदा बापरे, मी सर्व खरीखुरी माहीती टाकलीय तिथे.

हेमाताई मस्त सजावट.

आज ब-याच दिवसांनी बदलापुर पाईपलाईन रोडवर गेलो तर तिथे गुलाबीसर लवेंडर कलर तुरे असलेल्या फुलांची खुप झाडं बघायला मिळाली. पानं नव्हती त्याला. गाडीतून उतरुन फोटो नाही काढले. तसं पण माझे फोटो म्हणजे आनंदी आनंदच म्हणा.

जागूताई, कसे आभार मानावेत तुमचे समजेना झालंय. किती सुंदर लिहिता तुम्ही! प्रचि तर अप्रतिमच आहेत.

Pages