सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मागिल विकांताला दांडेली,
मागिल विकांताला दांडेली, गणेशगुडीला जाऊन आलो.. परत येउन दोन दिवस उलटले खरे.. पण मन काही परतायला तयार नाही. ते तर त्या सदाबहार निसर्गातच गुंतले आहे. असा स्वच्छ आणि सुंदर निसर्ग क्वचितच अनुभवायला मिळतो. दांडेली म्हणजे फुलं, झाडं, पक्षी आणि प्राण्यांची विविधता. निसर्गप्रेमींच एक निसर्ग गटग इथे झालच पाहिजे असं मनोमन वाटून गेलं.
बाजारात जायफळ आणतात ते थोडेसे
बाजारात जायफळ आणतात ते थोडेसे धूरावर वाळवलेले असते. त्यानेच तो सुगंध खुलतो. >> तरीच, मला जे उकलेल जायफळ मिळालय त्यावर तुम्ही म्हणताय तस जायपत्रीच आवरण होत / आहे, पण सुगंध अपेक्षे पेक्षा कमी आहे
इन्द्रा.. छान सजेशन.. खरंच
इन्द्रा.. छान सजेशन.. खरंच केलं पाहिजे गटग एकदा अश्या ठिकाणी.. साउंड्स इन्ट्रेस्टिंग!!!
स्निग्धा - ते मागील पानावरील
स्निग्धा - ते मागील पानावरील सारे फोटो -पांढरा कांचन, गुलाब, अबोली, केळफूल, भातशेती वगैरे कुठले फोटो आहेत - भारीएत सगळेच ....
@ शशांकजी - वेंगूर्ला आणि
@ शशांकजी - वेंगूर्ला आणि टेंबेस्वामी मंदिर, माणगांव
अन्जुताई उदास राहूच नका. इथे
अन्जुताई उदास राहूच नका. इथे येत रहा निसर्गात.
इंद्रा मी काहीच नाही बोलत. ते लाजाळू छान आहे.
स्निग्धा किती छान सगळ ते जायफळ, अबोलीचा रंग वेगळाच सुंदर दिसतोय. सगळेच फोटो छान.
अलिबाग किहीम येथील एका हॉटेलच्या पाठी फुललेली अबोली.
आहा अबोली..मस्तच..
आहा अबोली..मस्तच..
अबोली, वा!... सुंदर रंग
अबोली, वा!... सुंदर रंग संगती...
सायली - झेंडुच्याच कुळातले पण
सायली - झेंडुच्याच कुळातले पण जरा वेगळे फूल आहे का हे ?? पाने झेंडुपेक्षा वेगळी दिसताहेत !!!
बरोबर शशांकजी, त्या फुला जवळ
बरोबर शशांकजी, त्या फुला जवळ मरीगोल्डच लिहिले होते..(एका पुष्प प्रदर्शनात टिपलेला.)
नभ मेघांनी आक्रमिले
नभ मेघांनी आक्रमिले
उजू, या दिवसात कसले हे ढग ?
उजू, या दिवसात कसले हे ढग ? पाऊस पडतोय कि काय ??
हा पक्षी कुठला आहे सांगा जरा.
हा पक्षी कुठला आहे सांगा जरा. चोच तीक्ष्ण वाटत होती. डोळेही भेदक होते.
अलिबागच्या नागेश्वरच्या देवळा
अलिबागच्या नागेश्वरच्या देवळा समोर हे झाड आहे. ह्यात कलाकृती तयार झालेल्या दिसतात ना?
हे पुर्ण झाड
अश्विनी अग क्लियर नाही दिसत.
अश्विनी अग क्लियर नाही दिसत.
स्निग्धा, जायफळ उकलल्यावर
स्निग्धा, जायफळ उकलल्यावर (त्या मांसल सालांना कवच्या म्हणतात कोकणात) आत काळ्या रंगाचं कडक जायफळ असतं आणि त्याला चिकट्लेली लाल जायपत्री असते. जायपत्री काढून, ते कडक आवरण फोडल्यावर खरं जायफळ बाहेर येतं ज्याला तो जायफळी गंध असतो आणि आपण किसून वापरतो.
सगळ्यांचे प्रचि सुंदरच..
स्निग्धा, व मंडळींचे मस्त
स्निग्धा, व मंडळींचे मस्त फोटो.
पौडरोड वर येना बंगल्याच्या
पौडरोड वर येना बंगल्याच्या इथे एक पर्णहीन झाड फ़ुललेलं आहे. मस्त गुलाबी दिसतय ते झाड. बसमधून फ़ोटो काडःअता येत नाही. कोणी तिकडे गेलात तर जरूर फ़ोटो काढा, आणि इथे दाखवा.
जागू, अगं झूम करुन काढावा
जागू, अगं झूम करुन काढावा लागला फोटो त्यामुळे स्पष्ट आला नाही. पण मी तो पक्षी पहिल्यांदाच पाहिला.
शोभा ते गिरी पुष्प उर्फ
शोभा ते गिरी पुष्प उर्फ उंदीरमारी. काय दोन टोकांच्या पलीकडची नाव आहेत ना? माझ्या ऑफिसच्या रोडलाही फुललेय. खुप सुंदर वाटत. इंद्राने टाकलाय ना फोटो.
येतं ज्याला तो जायफळी स्मित
येतं ज्याला तो जायफळी स्मित गंध असतो आणि आपण किसून वापरतो. >>>>>> येस, अशी झाडावर तयार झालेली २ जायफळ मिळाली मला जेव्हा ती किसून पुरणात / श्रीखंडात घालीन तेव्हाचा फिल काही निराळाच असेल
आत्ता गूगलवर शोधलं. बहुतेक
आत्ता गूगलवर शोधलं. बहुतेक इंडियन स्पॉटेड इगल आहे.
दोन पक्षी आहेत ना त्यात? एक
दोन पक्षी आहेत ना त्यात? एक कावळ्यासारखा पण आहे खाली. मला तोवरचा बगळ्या सारखा वाटतोय. तो थोडा मातकट रंगाचा बगळा असतो तो. थांब फोटो टाकते माझ्याकडचा. ह्याचे खरे नाव मला माहीत नाही.
जागू . फोटो सर्व मस्तच.
जागू :).
फोटो सर्व मस्तच. मेरीगोल्ड सॉलीड.
ओह मग त्यात आणि ह्यात खुप
ओह मग त्यात आणि ह्यात खुप फरक आहे.
जागु ते झाड खुप मस्त आहे
जागु ते झाड खुप मस्त आहे ग..
बगळ्याचा रंग सुरेख.. तुला कीती छान फोटो काढु देतात सगळे पक्षी..
अन्जूताई
अन्जूताई तुमच्यासाठी.
माझ्याकडील नविन जास्वंद
अग ते म्हणतात हिला काय
अग ते म्हणतात हिला काय घाबरायच?
कोकीळ बघ कसा मलाच दम देतोय.
कावळा नाही. तो वरचा ब्राऊन
कावळा नाही. तो वरचा ब्राऊन पक्षी. इंडियन स्पॉटेड इगलचं पिलू असावं ते.
जागू थांकू. गोड आहे जास्वंद.
जागू थांकू. गोड आहे जास्वंद. प्लीज नो अहो जाहो.
Pages