निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंडनच्या थंडीत एका वहाळाच्या कडेला >>>>>>>>>.किती आपलासा वाटतो हा शब्द. खूप वर्षांनी वाचला/ऐकला. Happy
वर्षु, उदय अंधारे आणि त्यांची पत्नी मौसमी यांचे हार्दिक अभिनंदन ......>>>>>>>>.+१

Grey Heron ,Toucan, बुलबुल, ती लाल फुले, जागुकडची फुले, केक आणि सर्वच फोटो सुंदर! Happy

कोंकणातील पक्षी, झाडे, फुले, साप, फुलपाखरे, कासवे, खारफुटी इत्यादी बाबत फोटो व थोडक्यात माहिती असणारे पहिलेच पुस्तक आहे. >>>>>>..अरे व्वा! खूपच छान! Happy

वर्षु,
छान फोटो !
उदय अंधारे आणि त्यांची पत्नी मौसमी यांचे हार्दिक अभिनंदन ......
जागु,वर्षु,
सगळे फोटो छानच.
दिनेशदा,
तुमच्यामुळे छान आणि मुळ-ओरिजनल माहिती मिळते.
शशांकजी,
झाडा-फुलांची शास्त्रीय नावे माहितीबद्दल धन्यवाद.

वर्षू, ते घर अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे.. आणि चौकोनी बुंधा वाल्या झाडांचा पानांचा वगैरे पण फोटो हवा होता.

सरीवा, पुस्तक घ्यायलाच हवे आता.

वर्शु घरान्ची लिन्क दे ना !
ह्या नवीन भागातले सर्व फोटो मस्त !. सर्व पाने आत्ताच वाचून काढली.

1.jpg2.jpg
भाजीबाजारात हे कोंब सापडले. कोंबच आहेत की झाडाचा दुसरा कुठला भाग ते माहीत नाही. बरेच वेळा दिसले होते. ज्या अर्थी बाजारात येतात त्या अर्थी खाल्लेही जात असणार हा अंदाज होताच. शेवटी भाजी विकणार्‍या ताईंनाच विचारले. त्यांनी त्याचे नाव 'सळ्ळे' असे काहीसे सांगितले. बाहेरचे आवरण साधारण लिंबाच्या रंगाचे झाले की हा कोंब खाण्यालायक होतो. मग वरचे आवरण काढून टाकायचे. शेवग्याच्या शेंगा तासतात तसे बाहेरचे सगळे धागे सोलून काढायचे. मग आतमध्ये फोटोतल्यासारखा सफेद गराचा दांडा निघतो. तो खायचा. थोडा घट्टसरच असतो. भाजून कडक झालेल्या रताळ्यासारखा किंवा फणसाच्या बियांसारखा. पिठूळ पण गोड नाही. एक दोन दिवस उशीरा सोलून खाल्ला तर अधिकच कडक होतो. मी प्रथमच खाल्ला. बांबूंच्या कोंबाची मिनि आवृत्तीच. किंचित तसाच वास येतो. गरामध्ये जी एक खाच दिसतेय त्यातून अळवाच्या देठातून अगदी कोवळ्या पानांचा निघतो तसा आणखी एक नाजुक सफेद कोंब होता. तो टाकून दिला. फोटोत दोन कोंब मूळ स्थितीत तर एक सोललेला असा आहे.
इथे अनेकांना हे माहीत असेलच. मला नवीन होते म्हणून इथे टाकले.

हीरा.. वॉव, अगदी वेगळाच आहे कोंब्/ भाजी . मला तर आधी वाळकुडलेलं लेमन ग्रास वाटलं Happy
दिनेश , चौकोनी बुंध्याची झाडं इतकी उंच होती की कॅमेर्‍यात पकडताच आली नाही.. शिवाय त्यांच्या फांद्यांच्या पसार्‍यात इतर ट्रॉपिकल वृक्षांच्या फांद्या ही मिसळलेल्या होत्या.. आता गुगलून पाहाव्या लागतील या झाडाच्या फांद्या..

कपकेक्स आवडल्याबद्दल धन्यवाद..
प्रज्ञा , तुला विपूत लिंक देत आहे.

हा आमच्या हाऊस हेल्पर ला रस्त्यात जखमी अवस्थेत सापडला होता.. त्याची काळजी घेऊन त्याला बरा केलाच तिने ,, आता तो तिचा पेट आहे

Hira that is called as a Tarale if I remember it correctly. Majhe baba thandi madhe aanayche market madhun..nantar wicharun aankhi details astil tar sangte

हिराताई तरले आहेत ते. फोटो पेक्षा वर्णनावरून मी सांगते. ही मी त्याच्या बद्दल लिहीलेली माहीती. एका गटगला मी आणले पण होते.
http://www.maayboli.com/node/20355

वर्षूताई अभिनंदन आणि पर्सनल बुलबुल Lol

वर्षू.... हेल्पर सुंदर

हा कालचा खिडकीतला टाईमपास...

अण्णा.. जेवायलाऽऽ जेवायलाऽ जेवायला

जागु,सायो..सुंदर फुलं.. ममो.. बदकं स्वीट आहेत..

खाली एका झुडुपाला या शेंगा लागलेल्या आहेत. आत काळे , गोल गोल दाणे आहेत. लोकल लोकांमधे प्रिय आहेत.
लोकल नाव आहे ,'ग्वांदू'
कालच घरी ग्वांदू राईस केला हेल्पर ने.. टेस्टी लागला

मस्त जांभळ्या रंगाचा झाला भात, ग्वांदू मुळे.

थांकु,ममो.. अगा शेंगांचा फोटो क्लिअर नाही आलाय .. खाली जाईन तेंव्हा झाडासकट काढीन फोटू Happy

हो वर्षूताई मलाही तूरच वाटली शेंगेवरून.

जिप्सी आम्ही ह्याला मासतोडी म्हणतो. पूर्वी ही कुंपणाला लावायचे. ह्याला खुप काटे आणि वाकडे असलेले असतात. जरा हात जरी ह्या काट्यावर फिरला तरी न रुपता ओरबडा उठून रक्त येत. मास तोडते म्हणून मासतोडी. ही लहानपणी खुपदा लागली आहे.

आमच्या सोसायटीत खाली पसरलेले सगळे गोकर्णाचे वेल उपटून टाकले गेले. हेच गेल्या वर्षी कृषकमळणीच्या वेलाचे झाले. डास होतात म्हणे. कुणा पदाधिकार्‍याच्या अंगात आले की अचानक झाडांची अंदाधुंद कापाकापी होते. या कत्लेआममधून चांगली जोपासलेली बकुळ, पारिजातक, बहावा अशी झाडेही सुटत नाहीत. दहा वर्षे वाढवलेला बकुळ तीन वेळा छाटून प्रत्येक वेळी जमिनीपासून फक्त तीन फुटापर्यंत नुसता बुडखा ठेवला होता. पण प्रयत्न न सोडता पाणी घालणे सुरू ठेवले. आता पुन्हा पाने फुटली आहेत. सुंदर डवरलेला बोगनविलिआ काटेरी म्हणून साफ तोडून टाकला. आतासुद्धा आशुपालवाची सात आठ झाडे वाळवीने गच्च लिंपली आहेत तिकडे लक्ष न देता कोणी निगुतीने जोपासलेल्या झाडांवर मात्र संक्रांत. मनुष्यस्वभाव. दुसरे काय!

वा वर्षू, सुंदर रंग आलाय भाताला. आपल्याकडे क्वचित चवळी / मक्यात निळे दाणे दिसतात. पण त्याचे कारण म्हणजे जीन्समधे बदल असे असते.

जिप्स्या, हि फुले खुप ओळखीची वाटताहेत. अबु धाबीच्या वाळवंटात बघितली होती.

Pages