Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीरजा, मस्त माहिती दिली आहेस.
नीरजा, मस्त माहिती दिली आहेस.
अल्पना, तुमच्या गावाला -
अल्पना, तुमच्या गावाला - दिल्लीला पंजाबी आहेत ना. त्यांनी त्यांच्या गावाकडुन आणलेल्या सिस्टीम्स आहेत या.
खरंच नी कडुन खुप वेगवेगळे डायचे प्रकार कळाले.
अगदी नव तरुण असताना बाटिक आणि
अगदी नव तरुण असताना बाटिक आणि बांधणी चे भरपूर प्रयोग केले होते.बाटीक चे गंडले बांधणी चे बर्यापैकी चांगले झाले. शिबोरी आणि गुट्टा बद्दल माहिती नवी आहे.
हे पुण्यातले मॅच करुन देणारे कुठे असतात? सगळे कपड्फे जमा करुन एकदा चक्कर् ताकेन म्हणतेय तिथे(दोनदा, दिल्यावर एकदा आणि घ्यायला दुसर्यांदा.)
अनु, डाय करणे अवघड नाहीये पण
अनु, डाय करणे अवघड नाहीये पण भांडी वेगळी ठेवायची. डाय करत असताना किचनच्या बाकी गोष्टींवर वर्तमानपत्र टाकून ठेवायचे आणि नंतर ते फेकून द्यायचे.
पण रंगांचे मिक्सिंग वगैरे मजा माहित असेल तर ही मजा. प्रत्येक शेडला रेडिमेड डाय मिळत नाही.
विजय टॉकिजच्या जवळ दिप्ती केमिकल्स म्हणून आहे तिथे डायच्या गोष्टी व्यवस्थित मिळतील. किंवा मग रविवार पेठेत तोळ्यावर मोजून मिळतात डाय पावडरी व इतर गोष्टी.
लुंकडच्या बिल्डींगमधे मागे
लुंकडच्या बिल्डींगमधे मागे ओढणीची दुकाने आहेत. ते देतात.
किंवा मग पायोनियर लॉण्ड्री, जुन्या दातेवाडीतली. - स्काऊट ग्राऊंडच्या इथे.
ओके,लुंकड कडे जाणे जमू शकेल
ओके,लुंकड कडे जाणे जमू शकेल
शिबोरी ही बांधणीची जपानी
शिबोरी ही बांधणीची जपानी चुलतबहिण आहे. पण खूप अवघड आहे. बाहेरची आणि आतली घडी एक्झॅक्ट सेम प्रकारे रंगायला हवी यासाठी घड्या आणि दोरा यावर प्रचंड कंट्रोल हवा. ते मॅनिप्युलेशन अवघड आहे खूप. मी एकदाच करून बघितले होते. सुपर गंडले होते. आतली घडी कोरीच राह्यली, बाहेरची पूर्ण रंगली. मध्यभागीच फक्त हवा तो इफेक्ट आला होता.
गुट्टा आपल्याकडे हल्ली मिळायला लागलाय हॉबी लॉबीमधे. पण वेगळा मिळत नाही. बरोबर सिल्क पेंटिंगसाठीचे अॅक्रिलिक कलर्स पण घ्यावे लागतात.
आणि जो मिळतो गुट्टा तो खूप पातळ असतो. डायमधे किती टिकेल सांगता येत नाही.
अनु, मी पण डेनिम डाय करुन
अनु, मी पण डेनिम डाय करुन घेतली होती.फिटिंग मस्त होतं, पण रंग खराब झाला होता.
लेससाठी कॅम्प / क्लोवर मधे जाणार असशील तर क्लोवरमधे एक सरदारजीचं दुकान आहे डाय साठी. ( वेस्ट एंड साइडने) आत गेल्यावर पहिली लेन. तिसरं - चौथं दुकान आहे. बाहेर भरपुर दुपट्टे दिसतीलच.
वेस्ट साइडने क्लोवर मधे शिरताना दुसरी लेन आहे तिथुन आत शिरलीस तर लेसची १-२ दुकान आहेत ('नवाब' सलवारच्या दुकाना शेजारी). १-२ लेसची दुकानं बेसमेंट मधे आहेत.
आता या क्लोव्हर वर धाड
आता या क्लोव्हर वर धाड टाकायलाच पाहिजे एकदा
कधीकाळी बांधणी प्रकाराने dye
कधीकाळी बांधणी प्रकाराने dye केले होते. cotton वर साधे घरीच केले होते . गंमत म्हणून.
बेड शिट्स , पडदे असल काय काय
तेंव्हा कळले नाजूक बांधणी काम म्हणजे काय चीज आहे .
गम्मत म्हणून पांढरा स्कार्फ
गम्मत म्हणून पांढरा स्कार्फ आणून त्यावर बांधणी ट्राय करता येईल परत.अगदी गंडले तरी फार वेळा किंवा फार वाईट दिसणार नाही.
बांधणीचे दोन प्रकार आहेत.
बांधणीचे दोन प्रकार आहेत. त्यातला एक आहे जो वाईट होऊच शकत नाही. तो करून बघा.
नेटवर ट्युटोरियल्स आहेत.
मला दोन माहिती आहेत. एक
मला दोन माहिती आहेत.
एक म्हणजे कपड्याच्या मध्ये धरुन वर उचलून जो उभा भाग आहे तो पाहिजे तसा बांधणे,
दुसरा पूर्ण कपड्यावर नाजूक नाजूक ठिपके बांधणे.
पहिल्याने कोन्सेंट्रिक राऊंडेड चौकोन्/गोल येतात, ठिक ठाक दिसतात. हे करणे सोपे आणि फास्ट आहे.
दुसरे नीट केले तर नाजूक आणि खूप सुंदर दिसते. करणे जरा वेळखाऊ आहे.
सौराष्ट्रामधे जैतपुर गावात
सौराष्ट्रामधे जैतपुर गावात फक्त आणि फक्त बांधणीचाच व्यवसाय चालतो. घरगुती आणि व्यावसायिक पातळीवर फक्त बांधणीकाम. संपुर्ण गावात चक्कर मारली कि कळतं कि पुर्ण गावाची इकॉनॉमी या व्यवसायावरच अवलंबुन आहे. तिथे एक बांधणी वर्कशॉप पाहिलं. त्या बायकांचे कष्ट आणि कला पहाताना कळालं कि बांधणी वर्क महाग का असतं आणि गुपचुप बार्गेन न करता हॅन्डमेड वस्तु का खरेदी करायच्या.
काश हे सर्वांना समजत असते.
काश हे सर्वांना समजत असते.
कँप मधलं शॉपिंग ? नॉस्टॅलजिआ
कँप मधलं शॉपिंग ? नॉस्टॅलजिआ नॉस्टॅलजिआ !!
वॉव, मस्त माहिती आहे. नी,
वॉव, मस्त माहिती आहे.
नी, इकडे ये. सॉलिड वाव आहे तुला. ओढण्या नाही पण स्कार्फ्स वर काही करून दिलेस तर एकदम फेमस होऊन जाशील , इथे असलं फ्युजन काही मिळत नाही.
मुंबईत मंगलदास मार्केटसमोर
मुंबईत मंगलदास मार्केटसमोर छिप्पी चाल म्हणून गल्ली आहे. तिथे सगळी लेसचीच दुलानं आहेत. पुण्यात मोस्टली यांच्याकडूनच माल येतो. (काही दिल्ली आणि लखनऊ. क्लोवर सेंटरला येणारा माल यूपी मधून येतो). माझ्याकामानिमीत्त मला ज्या लेसेस घ्याव्या लागतात, त्या मी तिथूनच घेते. एकदा मनिष मल्होत्राचे असिस्टंटस ढिगानं साड्या घेऊन आले होते लेसेस शोधायला :). त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले लखनऊला (जनरल यूपी मधे) जरदोझी अस्सल आणि अतिशय सुरेख मिळते. पण पूर्ण हँडवर्क असल्यानं किंमत २५००० च्या पुढे जाते. कधीकधी मटेरीअल ५-१० हजाराचं असतं आणि लेस ३०-४० हजाराची :).
अंजली, तुझ्याकडच्या लेसेसचे
अंजली, तुझ्याकडच्या लेसेसचे काय करतेस? म्हणजे कशी वापरतेस त्याचे फोटोज टाक ना जमल्यास.
मी हाय एन्ड होम फर्निशिंग्ज
मी हाय एन्ड होम फर्निशिंग्ज (डेकोरेटेव्हि पिलोकव्हर्स, कर्टन्स, टेबल रनर्स इत्यादी इत्यादी) डिझाईन करते. भारतातून तयार करून घेते. इथे मार्केट करते :).
पुढच्या वेळेस छिप्पी चालचे फोटो काढून टाकेन इथे.
वॉव! युरेका
वॉव! युरेका
ओढण्या नाही पण स्कार्फ्स वर
ओढण्या नाही पण स्कार्फ्स वर काही करून दिलेस तर एकदम फेमस होऊन जाशील <<
देणार.. हॅण्ड पेंटेड सिल्क स्कार्व्ह्ज काही वर्षात नक्की देणार.
अनु लेस लावणारा चांगला शिंपी
अनु लेस लावणारा चांगला शिंपी आहे म्हणालात तो कुठे ???मला ढाका मलमल च्या ड्रेस मटेरियल वर लेस वर्क करुन घ्यायचे आहे .
फार ग्रेट नाही आमच्या
फार ग्रेट नाही आमच्या घराजवळचाच एक आहे, तसा कोणीही चांगला आणि ज़रा कमी लोडेड शिंपी हे काम करू शक्वल.
नीरजा, सिल्कवर पेंटींग क
नीरजा, सिल्कवर पेंटींग क रण्यापूर्वी कापडावर काही प्रोसेस करावी लागते का रंगवण्यापूर्वी ? की घेतला ब्रश अन लाव कापडावर असे अस्ते?
नाही जर प्युअर सिल्क असेल आणि
नाही जर प्युअर सिल्क असेल आणि स्टार्च बिर्च नसेल तर काहीही वेगळी प्रोसेस लागत नाही. अॅक्रिलिक रंग (फेविक्रिल वगैरे) साठी ही प्रोसेस.
डाय करायचे असेल तर तो डाय कंट्रोल करायच्यासाठी(रेझिस्ट) जी काय प्रोसेस असेल ती.
काय मस्त चर्चा चालु आहे.
काय मस्त चर्चा चालु आहे.
म्हणजे स्टार्च नसलेल्या
म्हणजे स्टार्च नसलेल्या सिल्कच्या कपड्यावर अॅक्रेलिक रंगान डायरेक्ट चित्रकला करता येते का?
हो
हो
नाही हो अनु सगळ्यांना नाही
नाही हो अनु सगळ्यांना नाही जमत. त्यातही मलमल वर. एक होता वंडरलँड मधे पण आता तो कुठे तरी हडपसर मधे गेला आहे . बाणेर औंध मधे कोणी आहे का चांगले टेलर????
Pages