निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालवं.. खरंच की.. जागु ची रेस्पी येतीये पहिल्या पानावर Happy
कालवं ला इंग्लिश नांव काय आहे??
सर्व फुलं टवटवीत फ्रेश कलरफुल आहेत अगदी!!!

OMG!!!! वर्षु दी, कोण आहे हा देखणा पक्षी, धनेश का? चोच तशी वाटते आहे, म्हणुन विचारते आहे..

वर्षु मस्त फोटो.
यावळचे पक्षांचे फोटो बघुन माझा ही हा एक. नाव गाव नाही माहित पण लंडनच्या थंडीत एका वहाळाच्या कडेला उभा होता बिचारा काही ही हालचाल न करता.

From mayboli

अर्र..खरंच काकडलेला दिस्तोय बिचारा.. ममो.. ये कौन है??

देवकी.. ऑईस्टर बरोबर.. पण ते समुद्रा किनारी कुठे सापडतात माहीत नव्हतं मला.

जागु ने लिहिल्याप्रमाने मी ही कच्चे पण बर्फात ठेवलेले अगदी फ्रोझन अवस्थेत खाल्लेत थायलँड मधे.. ऑस्सम..
शेल से डायरेक्ट .. Happy

यावळचे पक्षांचे फोटो बघुन माझा ही हा एक. नाव गाव नाही माहित पण लंडनच्या थंडीत एका वहाळाच्या कडेला उभा होता बिचारा काही ही हालचाल न करता. --------- बहुतेक ग्रे हेरॉन असावा - Ardea cinerea

याचे नाव काय? लालचुट्टुकं फुलांनी, पानावरच्या रेषां मधेही काय सुरेख रंग भरलेला दिसतोय..

टुकान भारीच नाव आहे...
Grey Heron मस्तय हेमाताई..

सायु हे लाल तुर्‍याच झाड मिही नवीनच आणलय. सुंदर दिसतात फुले.

हा मोबाईलने काढलेला फोटो.

राम राम मंडळी.

salvia dwarf scarlet flower हे आहे का सायली ते फुल ???

मुंबईत पुर्वी मोरबगळे यायचे, बोरीवलीला मुक्काम असायचा. आता येत नाहीत का ? बर्‍याच वर्षात पेपरमधे वाचले नाही.

बिगोनिया / बेगोनिया >> माझ्याकडे हे लाल आणि पांढर्‍या रंगात आहे..झुडुप वाढत ना फ्लॉवर पॉट मधे ठेवल्यासारखं.. मी हँगिंग कुंड्यात लावलय त्यांना घरी Happy

जिप्सी, स्ट्रॉबेरी अप्रतिम! इतर फुले व पक्षीही सुंदर.

राम मोने यांचे निसर्गधन कोकणचे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. एकूण ३५० प्रजातीचे ६८१ सुंदर फोटो व १६० पाने असलेले संपूर्ण आर्ट पेपर पुस्तक छान आहे. कोंकणातील पक्षी, झाडे, फुले, साप, फुलपाखरे, कासवे, खारफुटी इत्यादी बाबत फोटो व थोडक्यात माहिती असणारे पहिलेच पुस्तक आहे. सर्वाना उपयोगी असणारे पुस्तक खालील लिंकवर ऑनलाईन खरेदी करू शकता. सावंतवाडी येथे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहेच. https://www.payumoney.com/store/product/08513ce562e4f0125f861d78e619a8cd

सरिवा कसलं सुंदर रंगाचं फूल आहे हे.. सायु, जागु भार्रीच सुंदर दिसत असेल तुमची बाग..
बुलबुल.. तो जागुली चा पर्सनल बुलबुल आहे Happy

इथे एका फॉरेस्ट ट्रेल मधे हे गमतीदार झाड दिसले. अगदी चक्क चौकोनी आकाराचा बुंधा होता याचा. कारण कळलं नाही.. सगळी माहिती स्पॅनिश मधे लिहिलेली होती. काहीतरी सायंटिफिक कारण असेल.. कोण सांगू शकेल बरं..

हा समोरून घेतलेला फोटो.अगदी फ्लॅट बुंधा.. चारही बाजूंनी असाच

याचे अजून काही भाऊबंद.. गाईड ने सांगितले अशी आता या भागात थोडीच उरलीयेत. चांगली उंचच्या उंच आहेत झाडं ही

अवांतर निरोप Happy तुमच्या बरोबर हा आनंद शेअर करत आहे.
आठवतं मी मागे इथे भारतातील अवॉर्ड प्राप्त ५० आकर्षक घरांपैकी एका घराचे फोटो इथे शेअर केले होते. ते माझा आतेभाऊ उदय अंधारे आणी त्याची पत्नी मौसमी यांनी स्वतं डिझाईन केलेले त्यांचे राहते घर आहे.
आज दुपारी ( शनिवार)१२ वाजता एन डी टी वी प्राईम या चॅनेल् वर उदय ला ,' डिझाईन आणी आर्किटेक्चर' तर्फे मिळालेल्या अवॉर्ड चा सोहळा दाखवणारेत. ( त्याच्या लेटेस्ट अचीवमेंट करता मिळाले आहे हे अवॉर्ड) .. पण आम्ही मिस करूकारण इथे हे चॅनल अवेलेबल नाहीये शिवाय आमच्याकडे रात्री चे दीड वाजले असतील तोपर्यन्त.. जस्ट इन केस इफ एनी वन ऑफ यू आर इन्टरेस्टेड!!!प्लीज वॉच फॉर मी..

अरे वा वर्षुताई, अभिनंदन त्याचं.

एन डी टी वी प्राईम, आमच्याकडे दिसत नाही. तुमची पोस्ट वाचल्यावर परत टीव्हीवर बघितलं जाऊन.

हँडबॅग्स, मेकप सेट कप केक्स.. >>>>> अग्दीच जमलंय आणि तोंपासु ... फोटोवरच समाधन मानून घेतोय ... Happy

उदय अंधारे आणी त्याची पत्नी मौसमी यांचे हार्दिक अभिनंदन ....... Happy

Pages