सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
पक्षी फोटो दोन्ही सुंदर.
पक्षी फोटो दोन्ही सुंदर.
जागू, धन्यवाद! नावं मात्र दोन
जागू, धन्यवाद! नावं मात्र दोन टोकावरचीच आहेत.
शोभा१ , पौड रस्त्यावर 'येना'
शोभा१ ,
पौड रस्त्यावर 'येना' बंगल्यात सिल्क फ्लॉस ट्री / दिल्ली सावर आहे. पुण्यात एक्दोनच झाडे आहेत. बहुदा तेच फुललेले असेल. मी पाहिले कधी येताजाता तर कन्फर्म करीन. गूगलवर silk floss tree किंवा Ceiba speciosa शोधून पहा.
अदीजो, गुगलवर पाहिलं पण
अदीजो, गुगलवर पाहिलं पण बसमधून फ़ुल नीट दिसत नाहीत. त्यामुळे कळत नाही. बघु आज लवकर गेले, तर नीट बघेन.
अदीजो ग्रेट. किती पटकन
अदीजो ग्रेट. किती पटकन responce.
अन्जू, अगं फेमस आहे ते झाड
अन्जू,
अगं फेमस आहे ते झाड पुण्याच्या वृक्षप्रेमींमधे.
(No subject)
mast photo !
mast photo !
वाईच्या मित्राच्या घरची
वाईच्या मित्राच्या घरची स्ट्रॉबेरी
पौड रस्त्यावर 'येना' बंगल्यात
पौड रस्त्यावर 'येना' बंगल्यात सिल्क फ्लॉस ट्री / दिल्ली सावर आहे. पुण्यात एक्दोनच झाडे आहेत. बहुदा तेच फुललेले असेल. मी पाहिले कधी येताजाता तर कन्फर्म करीन.>>>>> अदीजो - मस्त माहिती, मनापासून धन्स.
सरिवा (डॉ. मानसीताई) - सुंदर फुले, मस्त फोटो....
स्ट्रॉबेरी ----------- स्लऽऽऽऽऽऽर्प ............. क्लास फोटु.....
सगळे फोटो मस्त. शोभा फोटो काढ
सगळे फोटो मस्त.
शोभा फोटो काढ ग. आदिजो बर झाल सांगितल नाहीतर शोभा सावरीकडे गिरीपुष्प नावानेच पहात राहिली असती.
सगळेच फोटो मस्त मस्त
सगळेच फोटो मस्त मस्त
सरिवा मस्त ताजे टवटवीत
सरिवा मस्त ताजे टवटवीत फोटो...
स्ट्रॉबेरी छानच..
ते सिल्क फ्लॉस ट्री काल मी पण
ते सिल्क फ्लॉस ट्री काल मी पण गुगलुन बघीतले, खुप छान..
सुप्रभात! मस्त फ़ुले,
सुप्रभात! मस्त फ़ुले, स्ट्रॉबेरी.
फ़ळे नुसती दाखवू नयेत. _आदेशावरून_
काय फोटो आहेत सगळ्यांचे. खुपच
काय फोटो आहेत सगळ्यांचे. खुपच सुंदर.
ही जास्वंदी ऑरेंज शेड मधली आहे पण फोटो नेहमी ह्याच कलर मध्ये येतो
जागू, मस्त दिसतय फुल.
जागू, मस्त दिसतय फुल.
स्ट्रॉबेरी .. डोळ्यात बदाम
स्ट्रॉबेरी .. डोळ्यात बदाम आलेत माझ्या..
बोगनवेल मस्त..
जास्वंद सुद्धा छानच..
खोडाचा असाही उपयोग एका
खोडाचा असाही उपयोग एका अलिबागच्या हॉटेल परीसरात होतो.
जागू, उपयोग छान केलाय, पण ते
जागू, उपयोग छान केलाय, पण ते कधीही धडाssssम होईल असं वाटतय.
शोभा हा प्रकार किती
शोभा
हा प्रकार किती मांसाहारी लोकांना माहीत आहे?
जागू, हे मी FOXLIFE वर
जागू, हे मी FOXLIFE वर पाहिलयं. मी मांसाहारी नाही तरीही त्याला काय म्हणतात हे काही आठवत नाहीये
शिंपल्या आहेत ना ह्या?
शिंपल्या आहेत ना ह्या? खडकांमध्ये असतात ना समुद्रकिनारी?
कालवं आहे ही.. जागू, मी त्याच
कालवं आहे ही.. जागू, मी त्याच गावचा गं.. खात नसलो म्हणून काय झालं ?
फोटो सर्वच मस्तच. स्ट्रॉबेरी
फोटो सर्वच मस्तच. स्ट्रॉबेरी अफलातून.
दा बरोबर कालव आहेत. ही
दा
बरोबर कालव आहेत. ही कच्चीही खातात काहीजण.
खूप दिवसांनी आले आज माबोवर.
खूप दिवसांनी आले आज माबोवर. सगळे फोटो सुंदर. नवीन भाग जोमात वाढतोय.
कालवं म्हणून शोध घेतला तर
कालवं म्हणून शोध घेतला तर गुगलकडून पहिली लिंक जागूचीच मिळते. मासे ८) कालवं | Maayboli
सगळेच फोटो सुंदर आहेत. जास्वंद हा जरा जास्तच जिव्हाळ्याचा.
सायली, चार रंगांच्या बोगनवेल. सुंदर दिसत आहेत.
कालवं कसली जबरी आहेत... फ्राय
कालवं कसली जबरी आहेत... फ्राय फार मस्त लागतात.
जागु लाल चुट्टुकं जास्वंद
जागु लाल चुट्टुकं जास्वंद मस्तय ग!!!
बोगन वेलया ची ही छटा पाहुन मनही गुलाबीसर झाले.....:)
Pages