निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा..मस्तच प्रचि..
हुरडा..शेकोटी आठवली
ओव्याचे फुल खुप आवडायचे मला..,म्हणजे इतक्यात नै बघीतले म्हणुन भुतकाळात बोलली..
जागु मस्त गडद गुलाबी रंग..
चिंचा .. मिठ लावलेल्या.. तोंपासु

हे काय आहे ? कोकणात खुप ठिकाणी ही झाड दिसली, अगदी घाटात सुध्दा >>>> किंदल किंवा किंजळ म्हणजेच
Terminalia paniculata Happy

आंबा - Mangifera indica

काजू - Anacardium occidentale

बिब्बा - Semecarpus anacardium -

चारोळी - Buchanania lanzan सगळे एकाच कुळातले - Anacardiaceae Happy

चारोळी >>>>>>>>>.मे महिन्यातले उद्योग. चारोळीच्या झाडाखाली फिरून चारोळ्या गोळा करायच्या. काही फळासहीत मिळायच्या तर काहींच्या फक्त बिया. किती पतेरा पालथा घालायचे आम्ही. :भूत काळात आहे मी:

हि किंजळची झाडे कोकणात खुप दिसतात. आणि त्याची ही फळे झाडावर बरेच दिवस तशीच राहतात.
रात्रीच्या अंधारात आणखी भयाण दिसतात.

शांताबाईंच्या, जिवलगा गाण्यातल्या, किज बोलते घन वनराई.. या ओळीचा संबंध मी या झाडाशी लावला होता.

सर्व फोटो मस्तच. शशांकजी, दिनेशदा ग्रेट. छान माहीती.

इथे येऊन डोळ्यांना सुखद गारवा मिळतो. मन उदास असेल तेव्हा इथे मी फक्त फोटो बघायला येते. थोडा रिलीफ मिळतो. त्यावेळी वाचत नाही काहीही. पोस्टपण टाकत नाही. धन्यवाद सर्वांचे. Happy

मन उदास असेल तेव्हा इथे मी फक्त फोटो बघायला येते. थोडा रिलीफ मिळतो. >>>>>>..निसर्ग आहेच सगळ्यांना समाधान देणारा. Happy

अंबा, काजु, बिब्बा,, चारोळी एकाच कुळातले माहिती नव्हते..
बीब्याच्या बीया म्हणजेच गोडंबी ना!

इथे येऊन डोळ्यांना सुखद गारवा मिळतो. >> +१
निसर्ग आहेच सगळ्यांना समाधान देणारा. स्मित+१

हे अजुन काही फोटो -

जायफळाचे झाड आणि त्यावर लाल मुंगळ्यांनी तयार केलेल घर
jayphal 3.jpg

कळ्या -
Jaayphal 2.jpg

कच्चे जायफळ
Jaayphal.jpg

फळ पुर्ण पिकल्यावर........, याच्या आत जायफळ असतं
Jaayphal 1.jpg

स्निग्धा, जायफळाचे फोटो छान आलेत ग. Happy
ते लाल मुंगळे खूपच छान घर बनवतात. पानाला पान जुळवून चिकटवतात आणि नीट घर बांधून झालं की आत अंडी घालतात. त्यांना कोकणात हुमले/ओंबिल म्हणतात. चावतात पण खूप छान Proud

चावतात पण खूप छान >>>> माहिती आहे म्हणुनच फोटो काढताना चार हात लांब होते Lol

स्निग्धा, जायफळाचे फोटो छान आलेत >>>>> +१११११

या झाडाच्या पानांना, फुलांना तो टिपिकल जायफळी सुवास असतो का ??? Happy

या झाडाच्या पानांना, फुलांना तो टिपिकल जायफळी सुवास असतो का >>> नाही. मलाही असचं वाटल होत पण तो सुवास नव्हता येत पानांना. फुल मात्र मला पहायला मिळाली नाहीत, त्यांना येत असेल तर कोणास ठाऊक

वाह.. सुंदर फुलं, छान माहिती..
ओव्याचं फूल,जायफळं लगडलेलं झाड , वॉव, पहिल्यांदाच पाहिलं.. मुंगळ्यांचं घर- किती सुबक..

स्निग्धा, मस्त फोटो.

जायफळाची फुले अगदीच पिटूकली असतात. वास घ्यायचा तर नाकातच घालावी लागतील.. पण नसतो त्यांना वास. जायफळ तयार झाले कि उकलते, मग त्याला जायपत्रीचा वास येतो.

बाजारात जायफळ आणतात ते थोडेसे धूरावर वाळवलेले असते. त्यानेच तो सुगंध खुलतो.

Pages