सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
इंद्रधनुष्य, छान फोटो आणि
इंद्रधनुष्य, छान फोटो आणि मनोगतही सुंदर.
नवीन भागाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.
सर्वांचे फोटोपण सुरेख.
चिमण्यांना गोकर्णाची फुलं
चिमण्यांना गोकर्णाची फुलं खायला खुप आवडतात का? माझ्याकडे खात असतात वेलीवर आलेली फुलं चिमण्या.
सुप्रभात मंडळी हे पहाणार का
सुप्रभात मंडळी
हे पहाणार का प्लीज?
http://www.maayboli.com/node/57211
अन्जू, चिमण्या औषधे संशोधन
अन्जू, चिमण्या औषधे संशोधन करत असतात. त्यांना गोकर्णात कसलेतरी औषध सापडले असणार.
शंकासूराची पाने त्या ताप येऊ नये म्हणून खातात. ( पण तो उपाय आपल्यावर चालेलच असे नाहि. )
त्या सगळीच पाने फुले खात नाहीत. कोथिंबीर खातात, जास्वंदीच्या कळ्या खातात.
<<<इंद्रधनुष्य, छान फोटो आणि
<<<इंद्रधनुष्य, छान फोटो आणि मनोगतही सुंदर.>>> +१...
नविन भागाच्या जागूताई आणि निग करांना हार्दिक शुभेच्छा..
वर्षु दी, कातील
वर्षु दी, कातील फोटो...
दिनेश दा खुप छान निरिक्षण...:)
धन्यवाद दिनेशदा, एक्झाटली
धन्यवाद दिनेशदा, एक्झाटली मनात हेच आलं होतं की ती फुले औषधी असावीत बहुतेक, सायलीचा सुर्यपक्षी आणि गोकर्ण पण आठवलं काल लिहीताना.
इंद्रा, मनोगत व फोटो
इंद्रा, मनोगत व फोटो मस्त.
नवीन भागाचे स्वागत.
त्यासाठी माझ्याकडून :
आहा.. कसले गोड बदक
आहा..
कसले गोड बदक आहेत..चुम्मेश्वरी एकदम..
हातात घेउन लाड करावासा वाटतो बघीतल्या बघीतल्या..
अरेवा! आज सगळे फोटु दिसायले
अरेवा! आज सगळे फोटु दिसायले की ! अप्रतिम!
पाण्यात डौलदार वाटणारे बदक,
पाण्यात डौलदार वाटणारे बदक, जमिनीवर अगदीच बेडौल चालीचे वाटते. कारण त्याचे पाय शरीराच्या मध्यबिंदूपेक्षा जरा मागेच असतात.. बोटीच्या प्रोपेलरसारखे. म्हणून जमीनीवर ते नीट चालूही शकत नाही.
सुंदर देखणे पक्षी
सुंदर देखणे पक्षी बघितल्याबरोबर अंदाज आलाच होता हे काम इंद्राचंच!>>> +१
१) बदक देखणी
२) वर्षूतैचे चिऊ काऊ उच्च!
३) तिळाच्या वड्या तोपांसू
आजकाल मला जिकडे तिकडे पारवे दिसू लागलेयेत
माझा स्पॅथोडिया जिकडे तिकडे फुलू लागलाय पुन्हा..... आता पुन्हा होड्यांचा सिजन येयय्य्य्य्य्य्य्य्य
वा..पांढरी शुभ्र बदकं ,गोड
वा..पांढरी शुभ्र बदकं ,गोड आहेत अगदी..
दिनेश छान माहिती!!
रीया..
ऊठा ऊठा !
ऊठा ऊठा !
वा आंबेमोहर. निसर्गाची कृपा
वा आंबेमोहर. निसर्गाची कृपा असुदे आणि मोहर टिकून आंबे येऊदेत हीच प्रार्थना.
अंजू, किती लवकर आलाय बघ
अंजू, किती लवकर आलाय बघ मोहोर.
शोभा आमच्याकडे लवकरच येतो.
शोभा आमच्याकडे लवकरच येतो. नोव्हेंबर एंडपासून यायला सुरुवात होते, सासरच्या प्रांतात.
मागे वेंगुर्ल्याची हापूस पेटीपण आली बाजारात.
अरे वा नवा भाग! धाग्याचा
अरे वा नवा भाग! धाग्याचा फोटो पाहूनच कळलं की हे इंद्राचं काम आहे
माझ्या स्वयंपाकघराच्या मागच्या आंब्यालाही मोहोर दिसू लागलाय.
मागे वेंगुर्ल्याची हापूस
मागे वेंगुर्ल्याची हापूस पेटीपण आली बाजारात.>>>>>>>>..काल बातम्यांत पण ऐकलं, हापूस बाजरात आल्याच.
शोभा अभिनंदन... ही कसली
शोभा अभिनंदन...
ही कसली फुलं? पाहुन शशांकजींची थेंब घुंगरु कविता आठवली..:)
अर्रे व्वा... शोभा.केव्हढा
अर्रे व्वा... शोभा.केव्हढा मोहर फुललाय.. सुंदर!!! इतक्या लौकर येतो मोहर??
इथे मोठ्याल्या झाडांच्या एखाद्या अगदी लहानश्या झुबक्यात मोहरा ची इटुकली चाहूल दिस्तीये फक्त!!!
सायु.. किस फल का फूल है ये??
ही कसली फुलं? पाहुन
ही कसली फुलं? पाहुन शशांकजींची थेंब घुंगरु कविता आठवली.>>>>>> सायली - या फुलांचे नाव बेगोनिया/ बिगोनिया..... (cane stemmed begonia)
थेंबघुंगरुची आठवण करुन दिल्याबद्दल मनापासून धन्स .....
हुरडा
हुरडा
ओव्याचे फुल
ओव्याचे फुल
वा हुरडा मस्त. बाकी सगळे
वा हुरडा मस्त. बाकी सगळे फोटोही सुंदर.
सुप्रभात.
जागू, या फुलांचे / वेलीचे
जागू, या फुलांचे / वेलीचे नांव काय? माझ्या रोजच्या वाटेवर हा वेल आणि फुलं खुप ठिकाणी फुललेली दिसतात. फक्त रंग थोडा फिका आबी, गुलाबी म्हणता येईल. तुझ्या फोटोतला जरा गडद आहे.
जागू, या फुलांचे / वेलीचे
जागू, या फुलांचे / वेलीचे नांव काय? ----- आईस्क्रिम क्रिपर .....
शशांक, एकदम Prompt उत्तर
शशांक, एकदम Prompt उत्तर दिलतं त्याबद्द्ल खुप धन्यवाद. आईस्क्रिम क्रिपर असेल असं वाटत होत पण खात्री नव्हती
हो आईस्क्रिम क्रिपरच आहे.
हो आईस्क्रिम क्रिपरच आहे.
घ्या थोड्या थोड्या. अलिबागच्या आहेत.
सुदुपार... शशांकजी बिगोनिया
सुदुपार...
शशांकजी बिगोनिया ची ओळख करुन दिल्या बद्द्ल, धन्स..:)
ओव्याची फुल्,काय मस्तय, आईसक्रीम क्रीपर मला पण खुप आवडतो,
चिंचा, आ हा ! तोंडाला पाणी सुटले..
Pages