निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंद्रधनुष्य, छान फोटो आणि मनोगत Happy

नवीन भागाच्या आणि संक्रांतीच्या सगळ्या निगकरांना शुभेच्छा. शब्दरुपी तिळगुळ घ्या आणि गोड बोला Happy

नविन भागासाठी मनःपूर्वक अभिनंदन!!!
इंद्रधनुष्य, फोटो आणि मनोगत खुपच छान. खुप आवडले..

इंद्रधनुष्य, ईतक मनाला सुखावणार मनोगत आहे, पुन्हा पुन्हा वाचते आहे...
अस वाटत आहे, की तुम्हा खुप मोठा पाखरांचा थवाच घेऊन उतरले आहात.... Happy

हे बुलबुल जोडपे माझ्याकडुन..

आहा..
पक्षीच पक्षी..
प्रस्तावना अन कोलाज दोन्ही मस्त Happy

सुंदर देखणे पक्षी बघितल्याबरोबर अंदाज आलाच होता हे काम इंद्राचंच!
छान फोटो आणि मनोगतही.
सर्वांना संक्रांत शुभेच्छा! तिळ गुळ घ्या गोड बोला.

अरे वा नवा धागा आला कि... मस्त फोतो सग्लेच.

जागु ते Scaevola taccada, beach naupaka आहे. इथे दिनेशनी लिहिलेले बहुतेक. वाचलेले नक्की आठवतेय, पण कोणी ल्लिहिलेले ते आठवत नाहीय. विकिवर मराठीत भद्रक किण्वा भद्राक्ष म्हणतत असे लिहिलेय.

भद्रक म्हणुन शोधल्यावर निगची भरपुर पाने दिसली या फुलाची चर्चा करणारी Happy

मस्त सुरवात! फोटो, मनोगत दोन्हीही खासच.
समस्त निग परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

vaan_1.jpg

ओके. भद्रक लक्षात राहील.

अलिबाग - रेवस चा समुद्र. समोरचा डोंगर उरणचा द्रोणागीरी डोंगर.

इंद्रधनुष्य, छान फोटो आणि मनोगत!

नवीन भागाच्या आणि संक्रांतीच्या सगळ्या निगकरांना शुभेच्छा. शब्दरुपी तिळगुळ घ्या आणि गोड बोला!

MIAL (Mumbai International Airport Ltd) आणि मुंबई रोझ सोसायटी यांनी दि.९ व १० जानेवारी रोजी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाचा वृत्तांत बघायचा सुटला असेल तर हि लिंक जिप्सी च्या धाग्याची.. http://www.maayboli.com/node/57197

जिप्सी आणि साधना गेले होते बघायला.. टाकलेल्या चित्रवृत्तांतावर व्हर्चुअल गर्दी कमीच दिसली म्हणून इथ दिलीय मी..नि ग वरील लोकांनी बघायचे राहुन गेले असल्यास नक्की बघा Happy

नवीन भागाबद्दल सर्वांचे अभिनंदन!
DSCN9609.jpgDSCN9608.jpg

सुंदर देखणे पक्षी बघितल्याबरोबर अंदाज आलाच होता हे काम इंद्राचंच!>>>>>.पक्षी पाहूनच अंदाज आला होता. सुंदर फ़ोटो आणि मनोगत.

तिळ्गुळ घ्या, गोड गोड बोला.
tilgul_0.jpg

नविन भागाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा! मनोगत आवडले पण फोनवर फोटो दिसत नाहीयेत .... संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Common name: Showy Silk Cotton Tree, Silk Cotton Tree •
Marathi: देव सावर Dev-savar •
Sanskrit: कूटशाल्मली Kutasalmali
Botanical name: Bombax insigne
Family: Bombacaceae (Silk Cotton Tree family)
(Source: http://www.flowersofindia.net)

दोन्ही डोळे रोखुन नजर ठेवून आहे ह्या धाग्यावर, तेंव्हा गपगुमान रोज हिथ हजेरी लावायची बर्का. फिदीफिदी+++ हे कोण बोलतय!!!! कीत्ती दिवस गायब होते गुर्जी...

पण, जिप्सी फोटो कातील..
जागु तुझा देखिल फोटो मस्तच,

शोभा, मस्त फोटो, मी देखिल गेल्या आठवड्यात एका बगीचात ल्याम्प पोस्ट वर पाच पोपड बघीतलेत..:)

आहाहा.. सुंदर पक्ष्यां चे अतिसुंदर फोटो पाहिले तेंव्हा न वाचताच समजलं कि यावेळचं मनोगत सलीम अलींचं असणारे.. छान आहे मनोगत.. Happy

सायु, बुलबुल जोडी- वाह बहोत खूब!!!

मानुषी, नलिनी,शोभा.. तिळगुळाचे फोटो कातिल ... इइइ.. मी मिस्सिंग तिळगूळ..

टीना, मला वाटत होतं तू नागपूर बेस्ड आहेस.. पर तू तो पास मे है अभी.. मुंबई-पुणे काहीच अंतर नाही तसं.. Happy

जिप्सी किती सुंदर फोटोज. ( और क्या कहूँ--जाऊ दे रे तुला या वाक्याचा कंटाळा नै न आलाय Wink Proud )

मुंबई पुणे बरेचदा येण जाणं चालायच कामासाठी..
आणि नै गं..नागपुर बेस्ड नको म्हणू.. मला नै आवडत नागपूर (सायली ची माफी मागुन _/\_)
आपलं यवतमाळच बरं Happy

यस्स्स डिअर.. मेरा मोबाईल अपलोड.. नो फोटो शॉप ,नो टचिंग.. तू मी टाकलेले चिऊचाय्कौ चे फोटो पाहाना..तिकडे मी डिसक्लेमर ही टाकलं होतं.. Happy

मुंबई-पुणे काहीच अंतर नाही तसं>>>>>>>>>> बघ टिना
>>>>>>>कशाला जळवतेयस..निदान घरापासुन दूर राहणार्‍या माझा तर विचार करायचा >.... अगं नगर पुणेही दोन अडिच तास! ये तिळगूळ वड्या खायला.
वर्षू ..........>>>>चिउ चाय कौ की याद मेंफोटोत चिऊ काऊ नसले तर काय झालं, नावांत तर हायेत !>>>>>>> Biggrin
पण फोटो मस्त!

Pages