दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस झाले लपवाछपवी च्या नादात धमाल चालली आहे. काल आजारी अ‍ॅना, आशूचे 'अ‍ॅना, बनाना ' वगैरे पंचेस भारी. राकेश आणि केतन मधला संवाद पण भारी होता.

दोन दिवस सुजा लई बोर मारतोय.
आज ' एक सावळी मुलगी ' जरा बरं वाटलं. चाल 'रोजा जानेमन' सारखी वाटली.

हो काल सुजय काय करत होता नक्की ?? ! Happy

वाढलेल्या दाढीतला आदे हसला की त्याचे दात जरा जास्तच पांढरे दिसतात.. Proud

कालचा मीनलला प्रेमाचा साक्षात्कार होतो तो एपिसोड एकदम गोड झाला! Happy प्रेमात पडताना सपोर्ट करणारे असे मित्र हवेत आजूबाजूला! तेवढा एकदा ललित दिसला असता तर..... Wink

आधीचा आशुचा ओव्हर रेटेचा एपिसोड फार भारी होता.:फिदी: लय आवडला.:फिदी: कालचा धावत पळत पाहीला. कालचा भाग छान होता, पण काल मीनलच्या चेहेर्‍यावरचे भाव फार विचीत्र होते. ती कबीरची प्रोफेसरशी तुलना करणार हे लक्षात आलेच.

कालचा मीनलला प्रेमाचा साक्षात्कार होतो तो एपिसोड एकदम गोड झाला!
>>
मला बोअर झालं.
आम्ही कधी संपतेय सिरिअल याची वाट बघत होतो काल Uhoh

आशुचा ओव्हर रेटेचा एपिसोड फार भारी होता
>>>
+१

एकदमच भारी

कालच्या भागात आशुचं 'रे कबीरा, मान जा' एवढंच आवडलं स्मित

>>
+१
मिनलची अ‍ॅक्टिंग नाही आवडली.
आणि प्रेमात पडल्याचं कळल्यावर कोण हे एवढालं आणि जड जड बोलत बुवा :अओ:अ

कालचा एपिसोड= मीनल कुणाच्यातरी प्रेमात पडली याचं अ‍ॅना व रेश्माला मनस्वी कौतुक तर आपली मीनल बाहेरच्याच कुणाच्या तरी प्रेमात पडली याचा सुजा, कैवल्य व आशु याना अत्यानंद !! Wink

काल धमाल आली. केके ची शत्रुच्या गोटात जाऊन मांडवली करणे आणि सुजय चं मराठलेलं हिंदी एकदम भारी.

कालचा भाग आवडला. माजघरातल्या दोन प्रमुख पात्रांमधे भांडण झालं म्हणून नाही, तर दोन्ही पात्रांनी आपापली बाजू किती कन्व्हिंसिंग्ली बरोबर आहे हे दाखवलं या साठी. कालचा भाग पाहताना, माजघर काहीतरी वेगळं दिसत आहे असं सतत वाटत होतं . फक्त फर्निचरची रचनाच नाही, तर एकदम घरंच मोठं वाटलं. कालचा भाग वन शॉट होता असं अमेय वाघ च्या फेबु पोस्टवरुन समजलं. म्हणजे बहुतेक नेहमी सारखं तुकड्या तुकड्यात शूट न करता, नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे सलग एकाच शॉट मधे शूट केलं असणार (चु.भू.द्या.घ्या.)
एकंदर..... कालच्या भागातलं सगळंच आवडलं Happy

हो, काल घर किती मोठं आहे याचा अंदाज आला आणि जास्तच आवडलं.
मित +१
दोघांचे मुद्दे अगदी त्यांच्या जागी फीट बसत होते.

काल घरात काही तरी वेगळं वाटत होतं खरं. मे बी फर्निचर ची अरेंजमेंट बदलली आणि घरातला रंग पण.
पहिल्यांदाच माजघरात एवढं सिरीयस भांडण दाखवलं.दोन्ही आपल्या जागी बरोबर होते.सुजय रागात असल्यावर छान दिसतो आणि अभिनय पण मस्त!

कालचा flat वेगळा होता बहुतेक. मोठा होता, माझी एक मैत्रीण आणि नवरा म्हणाला घर दुसरं आहे. मला आधी वाटलं की पसारा आवरलाय, मोकळं केलं, नीटनेटकं केलं.

कालचा एपिसोड छान सुजू आणि कैवल्य दोघांची तगमग पोचली.

मुगु कालचा एपिसोड नक्की बघ. अनुभवण्याचा आहे. पियुला डॉककडे न्यायचं हा निरोप सुजुला कैवल्य द्यायला विसरतो त्यावरुन गैरसमज दोघांत.

मला आधी वाटलं की पसारा आवरलाय, मोकळं केलं, नीटनेटकं केलं.>> मला ही असंच वाटलं. बहुतेक 1 shot साठी आवरलं असावं

Pages