Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रमडचे डोळे पारच स्वप्नाळु आणी
रमडचे डोळे पारच स्वप्नाळु आणी प्रेमाळु दिसतायत.:फिदी::दिवा:
रेश्मा.. सुरुवातीला बोअर
रेश्मा.. सुरुवातीला बोअर वाटणारी, पण मालिका पुढे पुढे सरकायला लागल्यावर सर्वात जास्त आवडायला लागली. बहुतेक असं वाटणारा मी एकटाच
२२ फेब पासून नवी मालिका येतेय
२२ फेब पासून नवी मालिका येतेय
हो का? कोणितरी लिंक द्या ना
हो का? कोणितरी लिंक द्या ना नविन सिरियल ची:(
(No subject)
कबीर स्टोरी अशीच असेल असं का
कबीर स्टोरी अशीच असेल असं का कुणास ठाऊक त्याची एंट्री झाली तेव्हाच मला वाटलं होतं. मला वाटायचंच त्याची गफे असणार. त्यामुळे धक्का वगैरे बसला नाही. त्याला काही एपिसोडससाठीच आणलं. एनिवे आता मालिका संपतेय किंवा अल्पविराम घेतेय.
आज मीनलने डायलॉग छान पेश केला. आशु सो स्वीट. छान केलं त्याने. सुजुचं काही ठिकाणी आवडलं. पण जास्त आशु आवडला. कैवल्यचा शेवटचा डायलॉग आवडला.
कबीर टवका दिसत होता. त्याच्या बायकोकडे नाहीच जास्त लक्ष गेलं.
सो टची एपिसोड. फार रडू आलं
सो टची एपिसोड. फार रडू आलं
सगळे किती सांभाळून घेतात पण मीनलला... फार आवडले. असे मित्र पाहिजेतच यार आयुष्यात!
असे मित्र पाहिजेतच यार
असे मित्र पाहिजेतच यार आयुष्यात! अगदी खरं. त्याचं एकमेकांशी असलेलं मैत्रीचं नातंच फार भावतं मनाला आणि अनेकदा टचकन डोळ्यात पाणी येतं. खुप मिस करणार यांना.
पुर्ण टीमने छान मालिका पेश केली. डायलॉग्ज कधी कधी एवढे सुंदर की आहाहा क्या बात है. असं व्ह्यायचं.
मीनलचा डायलॉग आणि आणि आशूकडे
मीनलचा डायलॉग आणि आणि आशूकडे बघुन मात्र डोळयातुन पाणी आलं. आशु काय करतो राव नेहेमीच.
हो गं आशूचा पण जीव खूप तुटत
हो गं आशूचा पण जीव खूप तुटत होता मीनलसाठी.
आशू-सुजा डोळ्यातून व्यक्त
आशू-सुजा डोळ्यातून व्यक्त झाले. कैवल्यने मीनल ची घुसमट मोडली. रेश्माने मीनलला सावरले. अॅना तशीही लिंबू -टिंबू च असल्याने तिच्या परीने तिने मीनलला सावरायचा प्रयत्न केला.
एकंदर कालचा एपिसोड फूल टू दिल, दोस्ती आणि दुनियादारी झाला.
बहुधा ही मालिका
बहुधा ही मालिका अल्पविरामापर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचेल आणि हूरहूर लावून निरोप घेईल ( काही काळासाठी )
आत्तापर्यंत झी मराठीवर
आत्तापर्यंत झी मराठीवर कुठल्याही मालिकेचे दुसरे पर्व आल्याचे आठवत नाही. मागे तुझं माझं जमेना मालिका संपली त्यावेळी या मालिकेचे दुसरे पर्व येणार असल्याची भिती दाखवली होती. आता कदाचित पुन्हा जानीचे दुसरे पर्व येईल अश्या बातम्या आहेत.
पण या मालिकेचे दुसरे पर्व बघायला नक्की आवडेल.
धनश्री, नविन मालिकेची लिंक
आभाळमायाच आल होत की दुसर
आभाळमायाच आल होत की दुसर पर्व.
एवढ्या लवकर अल्पविराम घ्यायची
एवढ्या लवकर अल्पविराम घ्यायची गरज नव्हती. आता ६ महिने तरी gap पडेलचना किंवा ३ महिने तरी. मग परत ते कलाकार दुसरीकडे बिझी झाले तर. परत तीच टीम उभी राहील का?
लोकप्रिय मालिका लगेच बंद करायचं झीला काय सुचलं. एरवी बाकी दळण दळत बसलेत त्याचं काही नाही.
मस्त झाला कालचा भाग. खरंच असे
मस्त झाला कालचा भाग. खरंच असे मित्र पाहिजेत. सर्वात पटलं ते कैवूचं. उगाचच 'मी ठीक आहे'चं चिलखत नको घालायला मित्रांसमोर!
तो मोनोलॉग कसला आहे!! कुठल्या नाटकातला/ पुस्तकातला आहे की संवाद लेखकाने खास मालिकेसाठीच लिहिलेला आहे?
नवीन सीझन काही जुन्या काही नव्या दोस्तांबरोबर येईल बहुतेक.
पण काही केल्या मला रेश्मा
पण काही केल्या मला रेश्मा नाहीच आवडली मात्र. माहिती नाही का. कैवल्य आणि अना आवडले मध्ये मध्ये. पण मी fan आशु, सुजू. मीनलची.
मला आधी मीनल आणि मग आशू
मला आधी मीनल आणि मग आशू आवडतात, बाकी सगळे ओके. कबीर आल्यापासून कबीर-मीनल आणि आशू असा क्रम झाला होता :रमडची बदामी स्मायली:
कबीर आवडलाच, पण त्याला तसं
कबीर आवडलाच, पण त्याला तसं काम कमीच होतं. ही मालिका पूर्णपणे सहा जणांचीच होती. कबीर फारच टवका दिसत होता, कामपण छान केलं त्याने.
आजचा भाग सुरु झाल्यावर मला तो
आजचा भाग सुरु झाल्यावर मला तो व्हाईट बलुन मुवीच आठवला. नंतर त्या लोकांनीपण आठवण काढली त्याची. अॅनाने छान केलं काम आज. फार टची आहेत तिच्या आठवणी, रडू येतं ती सांगते तेव्हा.
परवा मीनलच्या प्रेमभंगाच्या
परवा मीनलच्या प्रेमभंगाच्या एपिसोड मधे अॅनाला तसं फारसं काही काम नव्हतं, त्याची कसर काल भरुन काढली. आवडला कालचा भाग पण.
ही मालिका संपवणार आहेत म्हणे?
ही मालिका संपवणार आहेत म्हणे? खर का ?
हो. त्या जागी हा खेळ
हो. त्या जागी हा खेळ सावल्यांचा ही हॉरर मालिका येतेय.
अरे व्वा, हॉरर मालिका आहे का?
अरे व्वा, हॉरर मालिका आहे का? म्हणजे मी सुटलो .....
आता वेळेचा तो स्लॉट एक तर मी बघु शकणार टीव्ही.... नैतर गाणी ऐकणार्,नैतर लौकर झोपायला मिलणार....
कारण लिंबी हॉरर शो/फिल्म बघत नाही.
नविन मालिका येतेय 'रात्रिस
नविन मालिका येतेय 'रात्रिस खेळ चाले' म्ह्णुन. होरर आहे बाकी लिम्बुकाका,:P
अश्विनी, हा खेळ सावल्यांचा
अश्विनी, हा खेळ सावल्यांचा नाव आहे मालिकेच..
(No subject)
ही वरची जाहिरात सारखी सारखी
ही वरची जाहिरात सारखी सारखी लागते आजकल.
"कोंबड्यांचा आवाज रात्रभर येत होता",
"..... पण आपल्याकडे कोंबड्याच नाहीत" हे स्पष्टीकरण.. यातून अजिबातच काहीतरी अमानवीय असल्याची वातावरण निर्मिती झाली नाही. तरीही २२ फेब्रुवारी पर्यंत वेट अॅन्ड वॉच पॉलिसी.
राहून राहून कणेकर आणि त्यांच्या रामसे बंधूंवरच्या कोट्या आठवल्या.
आजचा आवडला एपिसोड. सुजय
आजचा आवडला एपिसोड. सुजय अॅनाची शाळा घेतो
एक बरंय यात सगळे एकमेकांशी पटापट बोलतात सगळं पियूची कैवल्यबद्दल सुजयला कबुली देणं आवडलं.
पुर्ण पोस्टला मम अंजली.
पुर्ण पोस्टला मम अंजली. सुजयपण मस्त मित्रासारखा वागला पियुशी.
Pages