बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
दुसर्या परिच्छेदाला अनेक
दुसर्या परिच्छेदाला अनेक अनुमोदने
फारएंड चित्रपट जर १०%
फारएंड
चित्रपट जर १०% मस्तानीचे प्रेम आणि ९०% बाजीरावांचे युध्दपराक्रमावर आधारीत असेल आणि बाहुबलीसारखे महाप्रचंड युध्द दाखवले असेल तर असा चित्रपट बघायचा की नाही हे विवेकबुध्दीवर ठरवायला हवे
राहिले अशोका चित्रपटाबद्दल तर
राहिले अशोका चित्रपटाबद्दल तर तो करिना कपुर बरोबरचा भंपकपणा होता. हे मान्य पण तेव्हा मात्र कोणी तिच्या ड्रेसवरून संस्कृती बुडाली म्हणून ओरडले नाही.
अर्र बाजीराव मस्तानी पण
अर्र बाजीराव मस्तानी पण पाहायचा नाही, आणि दिलवाले ही? मग कोणता पाहायचा ते अॅप्रूव्ह करायला एक सर्वपक्षीय समिती नेमा. चित्रपट रिलीज व्हायच्या आसपास त्यांनी चेक करून सांगावे की पाहावा की नको. Oh wait, त्यालाच सेन्सॉर बोर्ड म्हणतात ना?
फारएंड यांच्याशी सहमत. पण
फारएंड यांच्याशी सहमत.
पण तेव्हा मात्र >> बघा. तरी मी वैधानीक इशार दिला होता...
त्यालाच सेन्सॉर बोर्ड म्हणतात
त्यालाच सेन्सॉर बोर्ड म्हणतात ना? >>
गंमत आहे सेंसार बॉर्ड. जिथे बाँड चित्रपटातील चुंबन दृष्ये काढायला सांगितली तिथेच "क्या कुल है हम ३" सारखा पोर्न चित्रपट पास केला जातो. या चित्रपटाचा ट्रेलर देखील तुम्ही एकट्याने बघितला तरी लाज येईल.
म्हणजे जयंत तुम्ही कोणता
म्हणजे जयंत तुम्ही कोणता पाहायचा याचे उत्तर देत आहात का? :). हिंदी पिक्चर मधे नायक "मुझे मेरा जवाब मिल गया" म्हणतो तसे झाले
पुण्यातल्या लोकांनी बाजीराव
पुण्यातल्या लोकांनी बाजीराव बघू नका.
दिलवाले बघा
ज्या वर्गाला याचा सर्वात
ज्या वर्गाला याचा सर्वात जास्त राग आलेला आहे, त्याच वर्गाला आत्तापर्यंतचे सर्वात अनुकूल सरकार सत्तेवर आहे. देशात आणि राज्यातही. अगदी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देउन झालेले आहे. आणि तरीही चित्रपट रिलीज झालेला आहे.
This is BIG generalization. It's funny how you simplify things LOL.
'पिंगा' गाणं ज्यांना आक्षेपार्ह वाटलं ते सर्व भाजपचे मेंबर असं काय त्यांनी सर्वांनी येऊन तुम्हाला कानात सांगितलं? माझी एक मैत्रिण कट्टर मोदी विरोधक व केजरीवाल समर्थक आहे. तिची फेसबुक वॉल केजरीवाल प्रमोशन्सने भरलेली असते. मोदींचा खूप द्वेष करते. पण 'पिंगा' आक्षेपार्ह आहे अशी पोस्ट तिनेही टाकली होती.
अनेक neutral/apolitical लोक आहेत इतकंच काय अनेक परदेशस्थ वा ग्रीन कार्ड होल्डर लोक आहेत ज्यांना भारतातील राजकारणाशी काहीच देणंघेणं नाही त्यांनाही काशीबाईंचं असं चित्रण खटकलं आहे. यापैकी कोणाला 'जास्त राग' आलाय ते कसं ठरवणार?
भाजपचे लोक आंदोलन करत असतील..त्यांना लागतात काहीतरी मुद्दे असे -सर्वच पक्षांना लागतात- पण अशी सरसकट पॅकेजेस नका काढत जाऊ!
बाकी कायदा हातात घेण्याला विरोध याबद्दल समर्थन!
सदाशिवरावभाऊ कोण? - माहित
सदाशिवरावभाऊ कोण? - माहित नाही!
पहिला पेशवा कोण? - माहित नाही!
पानिपतची लढाई कधी झाली?- माहित नाही!
बाजीरावानं किती लढाया जिंकल्या? - माहित नाही!
बाजीरावनं पहिली लढाई कधी लढली?-माहित नाही!
आंदोलन मात्र जोरात चालू आहे,
अस्मितांचा बाजार तेजीत आहे!
---
Vishwambhar Choudhari फेसबुक वॉल
गंमत आहे सेंसार बॉर्ड. जिथे
गंमत आहे सेंसार बॉर्ड. जिथे बाँड चित्रपटातील चुंबन दृष्ये काढायला सांगितली तिथेच "क्या कुल है हम ३" सारखा पोर्न चित्रपट पास केला जातो. या चित्रपटाचा ट्रेलर देखील तुम्ही एकट्याने बघितला तरी लाज येईल. >>>> क्या कुल है हम ३ की हेट स्टोरी ३?
तुम्ही "क्या कुल है हम ३" चा
तुम्ही "क्या कुल है हम ३" चा नुसता ट्रेलर तर बघा त्याच्या समोर हेट स्टोरी ३ हा फारच सोज्ज्वळ चित्रपट म्हणणार
काय सांगता? बादवे क्या कूल है
काय सांगता? बादवे क्या कूल है हम २ कधी येउन गेला की या लोकांनी ३ आणला बाजारात?
क्या कूल है हम २ आलेला.. माझा
क्या कूल है हम २ आलेला.. माझा एक मित्र बघून आलेला.. कसाय विचारला तर म्हणाला की मोबाईलवर आपण नॉनवेज मेसेज वाचतो तेच पडद्यावर ऐकायला बघायला कसे वाटतील तसा आहे.. भाग एक मी रितेश साठी बघितलेला..
अग्गाग्गा.
अग्गाग्गा.
'पिंगा' गाणं ज्यांना
'पिंगा' गाणं ज्यांना आक्षेपार्ह वाटलं ते सर्व भाजपचे मेंबर असं काय त्यांनी सर्वांनी येऊन तुम्हाला कानात सांगितलं? >>> मी कधी म्हंटलो की ते भाजपचे मेम्बर आहेत? बाजीरावाबद्दल जर काही अपमानजनक वाटले तर त्यावर आवाज उठवायला आत्ताचे सरकार आधीच्या कोणत्याही सरकारांपेक्ष जास्त अनुकूल आहे, इतकाच अर्थ आहे त्याचा. मी लोक कोणत्या पक्षाचे आहेत वगैरे बद्दल काहीच म्हणत नाहीये. त्यात काय जनरलायझेशन झाले?
जयंत, एकंदरीत तेव्हा तशीच
जयंत,
एकंदरीत तेव्हा तशीच वेशभूषा असावी! चाणक्य किंवा भारत एक खोज मध्ये मौर्यकालीन बाया नव्वारी घालून दाखवल्या नव्हत्या आणि असोकाबाबतही ओरड झाली होतीच !
आणि त्या चौधरींना माहिती नसेलही, पण मग काय वंशज ओरडून राहिले तर त्यांना सपोर्ट नाय करायचा? लोक्स राहुल गांधीना सपोर्ट करतात … आमि पेशवा न बहादूर कुटुंबियांना कराव म्हंटल तर असले प्रश्न लिहितात
नोट- इथे राहुल गांधीचा उल्लेख वंशज याच अर्थाने, फॉर एग्झाम्पल म्हणूनच घ्यावा, ही णम्र विणंती.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/56439?page=13#comment-3743918
या प्रतिसादाशी अगदीच सहमत.
हे सारे मुद्दाम घडवून आणले गेले आहे असे वाटत आहे. आणि नसेल तरी आयतेच मिळालेल्या कोलिताचा आसूरी आनंद अनेकांना झालेला आहे. तो अगदी येथील काही विशिष्ट आयडींच्या प्रतिसादांवरून पण दिसून येत आहे.
"ज्यांना बाजीराव आणि त्याचा (हो, एकेरी उल्लेखच आहे हा) इतिहास माहिती नाही, त्यांना जी इमेज मिळणार आहे ती किती टुकार आणि फालतू असणार आहे" याचा जास्त राग येत आहे.
ज्यानी चित्रपट पाहिला आहे
ज्यानी चित्रपट पाहिला आहे त्यानी इथे लिहा कसा होता ते!
.....रसप यांच्या रिव्ह्यूच्या प्रतिक्षेत असलेले सर्व माबोकर
महेश, तसलं काही घडवून नाय्ये
महेश,
तसलं काही घडवून नाय्ये आणल कोणी. माझा थोडाफार आक्षेप पिंगा गाण्यासच आहे. बाजीराव एक विलक्षण लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. साध्या सैनिकांपासून छत्रपतींपर्यंत सर्वत्र वावर होता, आणि तेव्हा जरी मल्हारी वर नसेल डान्स केला, तरी ते उत्सवात सामील होत होतेच. शिवाय खंडोबाचे भक्त होतेच.
थोरले महाराज, संभाजी महाराज, होळी, आणि इतर सणांना सैनिकांमध्ये मिसळून ते सण साजरे करीत.
मग डान्सला येवढा का विरोध मला कळले नाही.
काशीबाईंचा पर्फ़ोर्मन्स जास्त
काशीबाईंचा पर्फ़ोर्मन्स जास्त चांगलाय असे म्हणताहेत न जाणो बाजीराव मस्तानी मध्ये काशीबाई भाव खाउन जायच्या
Bajirao Mastani review: This Ranveer, Deepika, Priyanka-starrer is the best film of 2015.
http://www.firstpost.com/bollywood/bajirao-mastani-review-this-is-the-be...
मिळूनमिसळून राहणारा राजा
मिळूनमिसळून राहणारा राजा दाखवला आहे
चांगलेच आहे की
होका, पिंगामध्ये ती फारच
होका, पिंगामध्ये ती फारच अनिमिष नेत्रांनी मस्तानीकडे पहात होती म्हणून अनेक वावड्या उठल्या होत्या आणि याच लावणी डान्स मध्ये एक्सप्रेशन्स तर जबरी चीप होते
मिळूनमिसळून राहणारा राजा
मिळूनमिसळून राहणारा राजा दाखवला आहे
>>
च्च्याक … राजा नाय पेशवा
तेच हो. राजा म्हणा पेशवा
तेच हो. राजा म्हणा पेशवा म्हणा.
चांगला दाखवला आहे ना. बस
डीविनिता, खूप आधी
डीविनिता,
खूप आधी प्रियांकाने ट्विट केले होते की लावणी मस्त झालीये. तेव्हा भंसालीला दोघींना लावणीच करायला लावायची असेल. आणि म्हणूनच एक्स्प्रेशन चीप वाटत आहेत.
खखोदेजा.
आणि त्यात तिची सतत लटलट कापणारी (नेमक काय म्हणतात त्याला? ) मान तर पार असंभवच्या आजोबांचा रेकोर्ड मोडणारे
द हिंदू मधे आलेली
द हिंदू मधे आलेली बातमी,
http://www.thehindu.com/news/cities/mumbai/pune-court-admits-petition-se...
आणि त्यात तिची सतत लटलट
आणि त्यात तिची सतत लटलट कापणारी (नेमक काय म्हणतात त्याला? ) मान तर पार असंभवच्या आजोबांचा रेकोर्ड मोडणारे>>> अगदी! लावणी कलाकार कधीच एवढ्या चीप प्रदर्शन करीत नाहीत.
बाकी काम बरे केले असेल तिने अशी आशा आहे.. पुर्वी थोडी मॅच्युअर वाटली होती मला ती कलाकार म्हणून, पिंगाने तिची इज्जत पार धुळीला मिळाली आहे.
काय झाल नाही महेश. २४
काय झाल नाही महेश. २४ नोव्हेंबरची बातमी आहे.
तात्या, पण ती केस दायर केली
तात्या, पण ती केस दायर केली होती एका मुस्लिम व्यक्तीने आणि त्याचा वकिल देखील मुस्लिम.
म्हणुन जास्त कौतुक वाटले.
Pages