बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
काय चीप वाटले जरा प्रकाश पाडा
काय चीप वाटले जरा प्रकाश पाडा बघू
काल कुठल्याश्या चॅनेलवर
काल कुठल्याश्या चॅनेलवर बोलताना प्रियांका ताई म्हणाल्या की पिंगाच्या स्टेप्स एकदम पारंपारिक आहेत कारण त्या भंसालींच्या घरी काम करण्यार्या (७५ वर्षांच्या) मावशींनी शिकवल्या आहेत.
म्हणजे मुळात मावशींच्या स्टेप्स रेमोने बसवल्या.
त्या चॅनेलने मस्तानीची माहिती देऊन झाल्यावर सांगितले की "बाजीरावकी ऑर एक बीबी थी. उनका नाम था काशीबाई" मी समजत होते की ओरिजिनल बीबी काशीबाई होती आणि ऑर एक बीबी मस्तानी होती.
मुर्खाचा बाजार होता सगळा
(No subject)
#BOYCOTTDILWALE In the name
#BOYCOTTDILWALE
In the name of the great Chhatrapati Shivaji Maharaj, he who fought the mightiest empire in the world, that of Aurangzeb, with only his wits, his extraordinary courage, his utter devotion to Mother India and a few hundreds courageous Hindus, Boycott Shah Rukh Khan & Aamir Khan.
Please tweet #BoycottDilwale to ten of your friends and ask them to retweet to ten of their friends, so that it starts trending.
Come on, O my Hindu sisters & brothers, wake-up! You have nothing to be ashamed! You belong to the most ancient spirituality, that which sees the World as One Family. You are the most tolerant people in this planet - you can enter a church, a mosque, and a buddhist temple - and still see God there. Yours is the last Knowledge left in the world, which tells you what happens after death, why we are born again and again, what is Consciousness, what is Mind, what is an Avatar, what is Karma, what is Dharma....
Wake-up o my brothers and sisters. You are not lambs anymore, that were slaughtered by the Moghols or General Dyer. You have the numbers – every sixth person on this planet is a Hindu! You have the brains – your children top in every university of the world! You have the power – Hindus now are heads of dome of the biggest multinationals! Yours is also a Consumer's power that ignores itself. If you boycott Shah Rukh Khan’s and Aamir Khan’s films, they will feel the economic pinch and stop using the word “Intolerance” in the most tolerant country in the world. They will stop abusing a people that gave them hospitality, love, adoration even - to be kicked in the face in return.
Wake up of Hindus, stop being passive, selfish, and fearful. You have had some of the greatest heroes and heroines, from Shivaji Maharaj, to King Deva of Vijatnagar, to the Rani of Jhansi, or Ahilyabai Holkar. Look up to your avatars, Lord Krishna, who fought the battle of Kurukshetra, to Sri Aurobindo, whose basement was used to make bombs to fight the British, to Swami Vivekananda, who showed too that Hinduism is not only about being yogis in Himalayan caves, but also about action in the world, battle against Asuras for the triumph of Truth.
Wake-up of my Hindu sisters and brothers, your time has come. Only your spirituality can save the world from the clash of civilizations, which is going on at the moment. But for that, India needs to come-up, as an industrialized nation, on par with the West and China - but without losing this great Knowledge that some call Hinduism.
Wake-up O Hindus, you are the Light of the World
---
महामुर्खांचा महामुर्खपणा
"बाजीरावकी ऑर एक बीबी थी.
"बाजीरावकी ऑर एक बीबी थी. उनका नाम था काशीबाई"
>>
जयंत,
तुमची चीपची डेफिनिशन सांगा, मग तुम्हास, आम्हास जे चीप वाटते, ते चीप वाटेल की नाही त्याबद्दल कयास बांधता येईल.
मी तर आधीच त्या गाण्याबद्दल
मी तर आधीच त्या गाण्याबद्दल काय वाट्ते स्पष्ट केले आहे. वाचले नसल्यास आपण वाचून यावे
काल कुठल्याश्या चॅनेलवर
काल कुठल्याश्या चॅनेलवर बोलताना प्रियांका ताई म्हणाल्या की पिंगाच्या स्टेप्स एकदम पारंपारिक आहेत कारण त्या भंसालींच्या घरी काम करण्यार्या (७५ वर्षांच्या) मावशींनी शिकवल्या आहेत. >>>>> काही काय. खरोखरच, मावशींचा सल्ला घेतला असता तर मावशींनी पहिला प्रश्न विचारला असता "बाबारे, तुला नक्की काय दाखवायचय, मंगळागौर की लावणी?"
बाजीरावकी ऑर एक बीबी थी. उनका नाम था काशीबाई >>>>> ड्वाले पानावले हे वाचुन.
ओ शेट, धील्वालेसाठी शेपरेट
ओ शेट,
धील्वालेसाठी शेपरेट धागा टाका. फेस्बुकी/कायप्पी विचाररत्ने इथे उधळून टाकू नये.
- आदेशाहुन
शनवारवाडा.
"बाजीरावकी ऑर एक बीबी थी.
"बाजीरावकी ऑर एक बीबी थी. उनका नाम था काशीबाई" >>>>>>> मुर्खपणा आहे... कैच्याकै चालु अस्ते न्युजचॅनेल वर.
इंडीया टी.व्ही अजुन असेल तर त्यावर काय चर्चा घडवतील देव जाणो...
पोस्ट वाचली का ? असा होतो
पोस्ट वाचली का ?
असा होतो ब्रेनवॉश
अरे तुला काय चीप वाटते ते
अरे तुला काय चीप वाटते ते सांग. मला वाटणारा चीपनेस तुला काही वेगळा वाटू शकतो
वैद्य. मला त्यात काहीच चीप
वैद्य. मला त्यात काहीच चीप वाटले नाही तर काय सांगू?
आजा नचले नामक चित्रपट कुणाला
आजा नचले नामक चित्रपट कुणाला आठवतोय का? त्यावरून उठलेला वादविवाद???
नंदिनी, ते बोले मोची भी खुद
नंदिनी,
ते बोले मोची भी खुद को सोनार रे वाला वाद म्हणताय का तुम्ही ?
माधुरीचा पिक्चर ना नंदिनी?
माधुरीचा पिक्चर ना नंदिनी? त्याच्यावरुन काय वादविवाद उठले होते?
तसा छोटा वाद तर बिल्लू या
तसा छोटा वाद तर बिल्लू या चित्रपटावरून सुध्दा केलेला.
दिलवालेला विरोध करणे हा
दिलवालेला विरोध करणे हा मुर्खपणा आहे, पण त्या विषयाला या धाग्यावर टीआरपी देण्यात येऊ नये.
हम्मम सगळ मस्तानी दिलवाले
हम्मम सगळ मस्तानी दिलवाले बाजीराव गुंता झालाय डोक्यात...
भारताच्या ईतिहासात असे पैल्यांदाच घडत असावे, दोन वादग्रस्त ब्लॉकबस्टर एकत्र
बिल्लू बार्बर या
बिल्लू बार्बर या चित्रपटावरून. नंतर त्याचे टायटल बदलण्यात आले.
वैद्य. मला त्यात काहीच चीप
वैद्य. मला त्यात काहीच चीप वाटले नाही तर काय सांगू?
>>
त्या गाण्याबद्दल नाही … इन जनरल, तुम्हाला कोणत्या गोष्टी चीप वाटतात.
बाकी कमीने पिक्चरमधले एका गाण्यातील 'तेली का तेल' ह्या शब्दांवरूनही विवाद झाला होता. नंतर ते शब्द बदलले होते.
क्या कुल है हम हेट स्टोरी
क्या कुल है हम हेट स्टोरी टाईप चीप वाटतात.
बाकी मर्यादीत राहून केले तर चुकीचे नाही वाटत
मग तुम्हास त्या गाण्यात काय
मग तुम्हास त्या गाण्यात काय वाईट दिसले नाही, ह्यात काही प्रोब्लेम नाही!
मला उल्टापुल्टा करून दाखवलं की राग येतो! राजकन्या आणि राण्या, लावणीवर नाचतात हे पटत नाही म्हणून चीप! अधू काशीबाईंना नाचतांना दाखवले ते अजून चीप …
राण्या नाचत नव्हत्या? नाही
राण्या नाचत नव्हत्या? नाही म्हणणारे काय बघून आलेले का कि त्यांचा आता पुनर्जन्म झालेला आहे ? कैच्याकै
आणि ते एक गाणे आहे लावणी
आणि ते एक गाणे आहे लावणी नाही
आता वाजले की बारा ही लावणी आहे. तसे पिंगा गाण्यातले शब्द आहे का? कैच्याकै बोलायचे म्हणून लावणी बोलत आहे. राहिले प्रियांका लावणी बोलली त्यामागे आता महाराष्ट्रातील गाणे आहे म्हणून फेमस काय लावणी त्यानुसार बोलली असेल. तिला थोडी माहीत आहे लावणी कशाला म्हणतात, मंगळागौरीची गाणी कशाला म्हणतात? आपण तेच मुर्खासारखे पकडून बोलत आहे. लावणी आहे लावणी आहे.
खुळेपणाचीपण काही हद्द असते हो.
राजकन्या आणि राण्या, लावणीवर
राजकन्या आणि राण्या, लावणीवर नाचतात हे पटत नाही म्हणून चीप! अधू काशीबाईंना नाचतांना दाखवले ते अजून चीप …+ १११११
चांगली त्यावेळेची नऊवारी
चांगली त्यावेळेची नऊवारी दाखवायचीना, नीट मंगळागौर दाखवायची. साड्या नाभीखाली अजुनही लावणी करण्या-यापण नेसत नाहीत.
काल पाहिला बाजीराव मस्तानी.
काल पाहिला बाजीराव मस्तानी. ईथे पण आपापसातल्या व्हॉट्सअॅप ग्रुप्स वर चर्चा होती की ईकडे कोणी हा सिनेमा पाहणार नाही. कारण ईथला ऑफिशीयल धर्म मुसलमान आणि सिनेमात मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा यांचे प्रेमप्रकरण!!! कोणाला कश्याचे तर कोणाला कश्याचे!! ...पण असे काही झाले नाही. रात्री साडेअकराच्या शो लाही थेटर फुल्ल होते.
आणि पब्लिकचा एकंदरीत रिस्पॉन्स सिनेमा आवडल्याचाच होता.
पिंग्गा गाणे किंवा वाट लावली पण खटकले नाही सिनेमाच्या ओघात. मी मात्र प्रत्येक सिन मनात राऊ, बाजी आणि पेशवे या कसोटीवर घासून बघत होते....आणि ह्या...असं काही नव्हतं , असं मनातच म्हणत होते. पण नंतर आमच्या ग्रुपमधेच असे कित्येक होते ज्यांन्ना बाजीराव ह्या व्यक्तीरेखेबद्दल फारशी माहिती नव्हती....अगदी माझ्या नवर्यालाही. नॉर्थइंडीयन पब्लीकने तर हे नावही ह्या सिनेमाची चर्चा सुरु झाली तेंव्हाच ऐकले होते. या सगळ्यानी सिनेमा खूप एंजॉय केला. मग मलाही आठवले की खरं म्हणजे आपल्या शालेय ईतिहासातही बाजीरावांबद्दल फारसे काही उल्लेख नव्हतेच.
सिनेमा मुलतः बाजीराव मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारीत आहे. बाजीरावांची ४० युद्धे दाखवली असती तर सिनेमाला प्रेक्षक मिळणे कठीणच गेले असते.
राण्या नाचत नव्हत्या? अ ओ,
राण्या नाचत नव्हत्या? अ ओ, आता काय करायचं नाही म्हणणारे काय बघून आलेले का कि त्यांचा आता पुनर्जन्म झालेला आहे ? कैच्याकै
>>
नाचत होत्या हे तुम्हाला पुनर्जन्म झालेल्या लोकांनी येउन सांगितलं?
राण्या, राण्यांसारख्या नाचत होत्या. त्यातही मराठा सल्तनतीत कोणत्याही राणीने, राजकन्येने वा सरदारपत्नीने नाच केला ह्याची नोंद नाही. तोच इतिहास छत्रसालची मुलगी मस्तानी नृत्य आणि शस्त्रकलेत निपुण होती हे लिहून जातो. मग कशाला कोणी लागेल पुनर्जन्म घेऊन परत यायला?
ह्याच पिक्चरमध्ये दिवानी मस्तानी गाण्यात किंवा जोधा अकबर मध्ये जोधा किंवा अकबराचा ख्वाजावाला डान्समध्ये जो ग्रेस आहे तो ह्यात नै
हे तद्दन फालतू आयटम सॉंग वाटत.
अन्जू, +१ सहमत.
अन्जू,
+१
सहमत.
राण्या, राण्यांसारख्या नाचत
राण्या, राण्यांसारख्या नाचत होत्या. >>>>>>>>>>>>>>>
त्यातही मराठा सल्तनतीत कोणत्याही राणीने, राजकन्येने वा सरदारपत्नीने नाच केला ह्याची नोंद नाही. >>>>
Pages